मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग ५१ ते ६० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ५१ ते ६० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ५१ ते ६० Translation - भाषांतर ५१तुमचे तुम्हा जवळी असता ।वाया सिणालका सर्वथ ॥१॥हरि करुणानिधी मोठा ।व्यापार टाका तुम्ही खोटा ॥२॥सांडा प्रकृती स्वभाव ।तुम्हासारिखाची देव ॥३॥हरिस नाही बोल काही ।वाया पडाल प्रवाही ॥४॥जैसे प्रकृतीस्वभाव ।त्यासी तैसाची देव ॥५॥बोधला म्हणे पहा मनी ।आणिक संतां विचारुनी ॥६॥५२थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली ।आम्हा प्रेमपान्हा घाली । अगा तू कृष्णा जननीये ॥१॥तू तर माऊली आमची। थोर सावली संतांची ।विश्रांती तुझिया नामाची । अगा तू कृष्ण जननीये ॥२॥आजची पूर्वकाळ थोर । गाई वत्सी करी एकधार ।आम्हा दिना करि गा उध्दार । अगा तू कृष्ण जननीये ॥३॥बोधला म्हणे आवड देई । आणिक न मागे तुज काही ।आवड तुझे पायी । अगा तू कृष्ण जननीये ॥४॥५३दिनांचा दयाळू पतितांचा पावन ।सर्वसुखनिधान पांडुरंग ॥१॥घडी घडी आठव करावा तयांचा ।धोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥२॥पांडव जयाने रक्षीले जो हरि ।ते नेले विवरी काढूनिया ॥३॥प्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे ।करितसे गोमटे वेगळाची ॥४॥बांधोनी पाषाण सागरी लोटिला ।तो पहा तारिला वरचेवरी ॥५॥जैसे आणिक पतित बहु उध्दरिले ।आठवा रे पाऊले त्यांची वेगी ॥६॥बोधला म्हणे ऐशा देवा शरण जावे ।भवसागर तरावे हेळामात्रे ॥७॥५४दिंडी आणि पताका गरुड टकियाचे भार ।आनंद गर्जती नाम यादव वीर ॥१॥ ॥ध्रु॥चलावे विंठोबा राजमंदिरी ।करी घेऊनि चामर ढाळिती गा सुंदरा ।वेडे आणि वाकुडे गर्जती हरिचे पवाडे ।भक्तीचा आळुका उभा भाग आणि पुढा ॥२॥घातला मंचक कळि सुमने बरुवार ।आनंद पहुडले वरि यादव वीर ॥३॥सकळिका मिळोनि वरि जाणविती वारा ।ऐका परिसा येक त्या दिसती सुंदरा ॥४॥सुवर्णाचे ताटी आर या गोपिका येती ।बोधला म्हणे मी तेथे चरण तळाची ॥५॥५५देवकी म्हणे बाळा धन्ये भाग्य जाले ।धन्ये उदरा आले परब्रह्म ॥१॥धन्य माझे आता निवती दृष्टी डोळे ।धन्ये कडिये खेळे कृष्णु बाळ ॥२॥जन लोक बोलती देवकीचा बाळ ।धन्ये उभयता कुळ उद्धरिले ॥३॥धन्ये हे भूमीस्थळ धन्ये हे गोकुळ ।धन्ये ते गोपाळ सदा सांग ॥४॥धन्ये पावा मोहरी वाहुनिया खाद्यांवरी ।धन्ये भिमातिरीं क्रीडा करी ॥५॥बोधला म्हणे हरी देखिले दृष्टी ।धावोनिया मिठी घाली पायीं ॥६॥५६देवा देवा तुझे चरणाची आवडी ।हे कल्प कोडी जोड माजी ।नामाची हे मात देई अखंडित ।तेथ माझे चित्त बैसलेसे ॥१॥नामा वाचोनिया हीत काही दासा ।मन हे बैस आन के ठाई ।बोधला म्हणे देवा नाम तुला सोप ।दिधले माये बाप कृपा करुनी ॥२॥५७देह हे पंढरी आत्मा पांडुरंग ।नित्य करी संग अहर्निशी ॥१॥चहु देहाची करुनिया वीट ।त्यावरी उभा नीट पांडुरंग ॥२॥मन पुंडलिक आवरोनी धरा ।होईल सोयरा पांडुरंग ॥३॥बोधला म्हणे माझ्या संचिताचा रेखा ।जोडियला सखा पांडुरंग ॥४॥५८देह जालिया जर्जर ।सकळा होईल वार ॥१॥कोण्ही नव्हे कोणाचे ।जन लटिके जे पायेचे ॥२॥माझ्या रामासी शरण जाता ।भय नाही सर्वथा ॥३॥बोधला म्हणे हरि शरण ।चुकविती जन्ममरण ॥४॥५९धन्ये ते पंढरी पुन्ये पावन ।जेणे तारियेले विश्वलोक ॥१॥धन्ये तेणे पावन केले ।आम्हासी दाखविले निज सुख रे ॥२॥धन्ये ते भीमा चंद्रभागा ।धन्ये ते भूमी वैकुंठ रे ॥३॥धन्ये पांडुरंग धन्य पुंडलिक ।पुण्ये जाली उत्कृष्ट रे ॥४॥धन्ये नामदेव नाम च भरला ।हाता आले नवनित रे ॥५॥संत साधुजन जेवविले जेणे ।आवघे केले संतृप्त रे ॥६॥तेथे वडिलाचे धान्य वाटत आहे ।म्हणोनि कानी आइकिली मातु रे ॥७॥ते देती न देत म्हणोनी ।भित भित गेलो तेथ धणि भेटला अवचिते रे ॥८॥त्याणे भेउ नको म्हणोनि नाभिकार दिल्हा ।मस्तकी ठेविला हात रे ॥९॥आमचे आम्हासि देवूनी ।त्याणी सुखी केले सावचित रे ॥१० ॥बोधला म्हणे घ्या रे घ्यारे तुम्ही ।नका राहु दुचित रे ॥११॥६०धन्या असोन घरी वाया फिरसिल फेरी ।मुळिचा धन्या नोळखेसी । हेचि गुन्हो सिरी ॥१॥चाल निरंजना सुख होईल मना ।फिरोन पाहे नवे ग उमा ।सबाळी आपल्या स्थाना ॥२॥सोडि लाज जाता उघडा घाली माथा ।सदगुरुसौ शरण जाई। कृपा करिल आता ॥३॥नव्हे नर नव्हे नार नाही तेथे योनी ।हुरकोन गेले साबले मग हारपळली दोन्ही ॥४॥बोधला म्हणे सांडी वाद वाचा करिसी सीण ।आम्हा तुम्हा एकपणा कैचे भिनाभिन ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP