मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग ४१ ते ५० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ४१ ते ५० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ४१ ते ५० Translation - भाषांतर ४१जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा ।तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥१॥विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही ।देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥२॥नावरुप तुज याती नाकुळ । ब्रह्मांडनायक तू व्यापक सकळ ।कीडा कीटक मुंगी सर्वांचे मूळ । अभक्तासी काय भक्त गोपाळ ॥३॥साधु संत जन ज ध्याती सकळ । जया जैसा भाव त्या तैसा गोपाळ ।जाणिव कृपाळू संचिताचे मूळ । संचितावेगळे कैचे ते फळ ॥४॥माता पिता बंधु तूची सकळ । कन्यापुत्र अखंड तूची केवळ ।भक्त भाविक जन तुज ध्यानी सकळ । इतरांसी न कळे बा भ्रांतीचे मुळ ॥५॥बोधला म्हणे शरण मी आता । अखंड निजाध्यास हरिगुण गाता।हृदयी प्रकाश तुझा समयी । तुज वाचोनी आण नेणे सर्वथा ॥६॥४२जवळी असता राम अंतरला दुरी ।माया मोहो जाळे कैसा वाहोली दुरी ॥१॥देहेक सृजा भोगुनी जोडियेली जोडी ।अंतकाळे जाता नये फुटकी कवडी ॥२॥जंवरि देह बळ तंववरी जिंकावा हा काळ ।आठवा रघुवीरा हेची सोडवण करा ॥३॥बोधला म्हणे का रे भुललेसी ।सोडुनीया भ्रांती शरणे जावे विठ्ठलासी ॥४॥४३जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥धृ॥भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता ।मग भेटी जाली भगवंता ॥१॥वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि ।कुबुध्दीची कुलपे मोडी । काही करावे आपुले हित ।दया धर्मी द्या बा चित्त । नामी न करा दुश्चित ।गा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला ।हरिचरणी जाउनी विनटलो ॥२॥४४जै तुज मज झाली भेटी ।तुझे पायी पडली माझी मिठी ।पंढरीराया आता तु कैसा जासी ।तुज ओढुनी बांधेन गळियासी ॥धृ॥जये देखियेले तुझे मुख ।गेली गेली माझी तान भुक। पंढरीराया ॥१॥कानी देखियेली कुंडले ।देखोनि मन माझे निवाले। पंढरीनाथा ॥२॥गळा देखिली वैजयंती माळा ।माझ्या डोळियासी सुकाळ जाला ॥३॥कंठी देखियेले कौस्तुभ ।देखोनि सुख जाले अमाप ॥४॥कटि देखियेले दोन्ही कर।देखोनी हारुषे जालो निर्भर ॥५॥इटे देखियेले दोन्ही पाये ।देखोनी मन स्थिर राहे ॥६॥आम्हा पडता जडजुड ।आपण उगवितो आमचे कोडे ॥ ७॥आम्ही हिंडता रानीवनी ।सवे विठ्ठल आमुचा धनी ॥८॥आम्ही हिंडतो जिकडे तिकडे ।आपण झाडितो काटे खडे ॥९॥जेवु बैसवितो आपणा सांगती ।ग्रास घालितो आपुल्या हाते ॥१०॥दोघा निजता सुख शेजार ।काये सांगो त्या सुखाची थोरी ॥११॥लोक हसोन करिती काये ।आम्हा जोडले जोडले तुज पाये ॥१२॥बोधला म्हणे बोध जाला ।तै हा देहेच तुज वाहिला ॥१३॥४५झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला ।म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥१॥वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला ।पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥२॥धामणगावी भक्त एक थोर ऐकीला ।गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥३॥बोधला म्हणे थोर आनंदु झाला ।हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥४॥४६तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही ।भ्रांती हे येत डोळा । तेणे पडिलो वाही।माझे माझे म्हणता रे अंती न चले काही ।गुरुवचन भावबळे । विश्वासे राही ॥१॥रामकृष्ण वासुदेवा। घरी संतसंग सेवा ।त्याणेची हीत होईल । मग पावसील देवा ।वाया तु नवजासी करी गुरुची सेवा ।आता तरी सावध होई का भुललासी मुढा ।व्यर्थ तु पडु नको पाहे मायेच्या खोडा ॥२॥प्रपंच महाझट त्याने लागिले वेढा ।स्वहित नव्हेची काही घट मुष्टीच्या हुंडा ॥३॥सहज विचारीता हीत आपणासी ।सदगुरु शरण जावे तनमन धनेसी ।जैसे तु जाणोनिया का मुढ बा होसी ।न परतोनी पाहे बापा मग सुख पावसी ॥४॥पैल तो जीव पाहे कैसी उडते मासी ।मोहळ रचियले बहुता सायासी ।आणिके झाडीपले काही नव्हे बा तिसी ।तैसा तु गुंतु नको व्यर्थ या मायसी ॥५॥माझी मज होईल म्हणोनी केली खटपट ।वृध्दपण पातलिया अवघ्या येईल वीट ।म्हणऊन दृढ धरी गुरुचरण निकट ॥६॥माया हेलाव पाही कैसी लागली पाठी ।म्हणऊनी शरण आलो पायी घातली मिठी ।कृपाळु हरि माझी केली वासनेची तुटी ।बोधला म्हणे आता कृपाळु जगजेठी ॥७॥४७त्रिभुवनामाजी पंढरी थोर ।तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥१॥पतित पावन जडमूढ भारी ।तयास कौल दिल्हा रे ॥२॥निंदक दुर्जन कंटक भारी ।कौल नाही तयाला रे ॥३॥अनंत कोटी पुण्य जयांचे ।तोचिये पेठेसी आले रे ॥४॥नामाचे भरित भरितो भला ।अभागी चुकला करंटा रे ॥५॥बोधला म्हणे कैवल्य आले ।दुकान तेथे बोधला रे ॥६॥४८तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले ।सांग विठ्ठल माये माझे ॥१॥साच की लटके विचारी मनासी ।हा बोला कोणासी ठेवसील ॥२॥हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले ।वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥३॥सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा ।तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥४॥सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता ।दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥५॥बोधला म्हणे हे वचन निर्धारी ।अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥६॥४९तुझीया भेटीला जीव माझा तळमळी ।केधवा वनमाळी येईल घरा ॥१॥येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा ।जीव जाईल आता करु काय ॥२॥माझिया देहीचा बैसकार केला ।का रे नाही आला विठोबा माझा ॥३॥येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि ।तुज आता नाही उरी संसाराची ॥४॥हळुच तुज बुध्दी बैसविन घरि ।तुज म्हणे अवतारी जाऊ नेदी ॥५॥बोधला म्हणे देवा कोण माझा केवा ।आता येऊन द्यावा प्रेमपान्हा ॥६॥५०तुझिये चरणी जाण स्थिरावले मन ।आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥मुक्तिदासी आहेता तुजपासी ।त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥२॥वैकुंठ कैलास न लगती आम्हास ।आवडी बोधल्यास तुझे पायी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP