मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग ६१ ते ७० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ६१ ते ७० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ६१ ते ७० Translation - भाषांतर ६१धन्य माझे भाग्य पूर्व पूण्ये फळासी आले।तरिच आवडले तुमचे सुख ॥१॥ऐसे बोल वो रुखमिणी ।बहुत दिस होत माझे मनी ॥२॥जे चिंतित होतो आंतकरणी ।ते फळासी आले ॥३॥की तुम्हासारिखा ना हो मजलागी ।सोहोळा हा घ्यावा निज गुह्याचा ॥४॥काय सांगो आता सुखाची आवडी ।देखोनी मन माझे ओढी तुमच्या पायी ॥५॥न करिता क्लेश पावले अवचिता ।हे कृपा भगवंता केली मज ॥६॥बोधला म्हणे पूर्व भाग्ये पडिली मिठी ।आता सांगसिल गोष्टी आंतरीच्या ॥७॥६२नलगे जपतप करावे साधन ।नाम हे निधान जीवि धरा ॥१॥नामे ची तरले कोट्यांनीकोटी ।नामेच वैकुंठी सरते केले ॥२॥नामाची आवडी जयाच्या चित्तासी ।धन्ये पुण्य राशी तोचि नर ॥३॥बोधला म्हणे नाम उच्चारा हरिचे ।भये कळिकाळाचे नाही तुम्हा ॥४॥६३पतित पावना जानकीजीवना ।सर्व सुखाच्या हरि बापा निधाना ॥१॥ऐसे पतित तो किती उद्धरिले ।शरण आलिया कोण गेले ॥२॥आसे पतित तो उद्धरिले किती ।बापस्वामी या लक्ष्मी पति ॥३॥दुष्ट कौरवी कपट रचिले ।करुनिया विवर कैसे पांडवा नेले ॥४॥दुष्ट कौरवी द्रुपदी पांचालि ।ऐकोनि वचन कैसी धावणी केली ॥५॥जैसे पवाडे तुझे जगी गर्जती ।महा महा पतित तो वो उध्दरिले किती ॥६॥जैसे ब्रीदे रे तुझी किती वाखाणु ।बोधला म्हणे हे सुखाचे निधान ॥७॥६४पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी ।ते आह्यालागुनी कळो आले ॥१॥मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे ।परि तुज आवडले पांडुरंगा ॥२॥कळा गा कुसरी नये मज गाता ।परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥३॥बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा ।कळो आल्या केशवा मायबापा ॥४॥६५पंढरीवाचुनी सुख कोठे नाही ।ते आहे गा पाई विठोबाचे ॥१॥भाग्यवंत येती हे सुखे घेती ।मागुते न येती परतोनिया ॥२॥बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये ।तरीच त्या सोय सांपडली ॥३॥६६पांडवा कैवारी । जालासि श्रीहरि ।तैसी आम्हावरी केली कृपा ॥१॥संसार परंजनी । पडलो होतो महावनी ।आलासे धावोनि पांडुरंग माझा ॥२॥बोधला म्हणे आता धन्ये पंढरीनाथा ।सकळ माझी चिंता दूर केली बापा ॥३॥६७प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही ।काढिले लवलाही पांडुरंगे ॥१॥बहुत जाल्या तुझ्या उपकाराच्या रासी ।सांगा संतापासी घडी घडी ॥२॥ऐसे मागे बहुत ऐकत होतो कानी ।ते तो मजलागुनी केले बापा ॥३॥बोधला म्हणे तुझी वाखाणिता कीर्ती ।सांगो संता प्रती तुझे गुण ॥४॥६८पूर आला आनंदाचा ।लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥बांधु नामाची सांगडी ।पोहुन जाऊ पैलथडी ॥२॥अवघे भाविक जन भक्त ।घाला उड्या चंद्रभागेत ॥३॥बोधला म्हणे थोर पुण्ये ।वोघा आली पंथे येणे ॥४॥६९पैल यमुने पाबली । कृष्ण खेळे चेंडू फळी ।खेळ खेळोनी वनमाळी । कवणा नातुडे ॥१॥हा तव नाटक निराळा । कवणा न कळे याची लिळा ।हा तव जाईन गोकुळा । कंसास करि रीस ॥२॥जाऊनी गोकुळा भितरी भुलवितो नरनारी ।खुणा दावी नाना परी या गोपिकालागी ॥३॥हा तव असोनि घरोघरी । बाळ लीला क्रीडा करी ।दहीदूध करुनी चोरी। नवनीत भक्षीतसे ॥४॥बोधला म्हणे कवतुक केले नव्हेत सुख दाविले ।माझे मन तल्लिन जाले। कृष्णापायी पहावो ॥५॥७०बहु दिवस बहु कष्ट सोसीले ।वाट म्या पाहिली विठो तुझी ॥१॥कृपाळु होउनी केधवा बा येसी ।मज भेटी देसी चहु बाही ॥२॥पोटासी धरुनि देसी आलिंगन ।कुरवाळी वदन आपुले करे ॥३॥बोधला म्हणे मी तुज लडिवाळ ।घडी सांभाळ करी भाना ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP