मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग २१ ते ३० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग २१ ते ३० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग २१ ते ३० Translation - भाषांतर २१एक दिन तु एक दयाळू ।दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी ।कोणापाशी तुजविण ॥२॥मी अंतरीची खूण तूचि एक जाणना ।सांगो या अनंता कोणापाशी ॥३॥एक मशक पडिलो तुझे द्वारी ।लाज सर्वापरी आहे तुज ॥४॥बोधला म्हणे देवा मी तुझा आखिला ।दासाचा विकिला जन्मोजन्मी ॥५॥२२एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे ।भेटी दे निधाने पांडुरंगे ॥१॥भेटी मज देसि आहे तुझी दासी ।म्हणोनी आलो चरणापाशी ॥२॥तरी बापा तारिशिल मज ।शरण आलो तुज ॥३॥राख माजी लाज | येहि काळी ॥४॥राखसिल लाज शरण आलो तुज ।येइ चरणिचे रज बोधला म्हणे ॥५॥२३ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण ।होईल दोषांचे दहन। गुरुचे स्मरण केलिया ॥१॥गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाघे त्यासी ।त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥२॥गुरु ज्ञानाचा आगरु । गुरु धैर्याचा मेरु ।नौका नेईल पारु। गुरुचे स्मरण केलिया ॥३॥गुरु मायेचे मूळ जीव । गुरु मोक्षपदाचा ठाव ।साध्य होती सर्व देव । गुरुचे स्मरण केलिया ॥४॥जय जय गुरु मायबापा । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा ।बोधला ध्यातो निज स्वरुपा । पर ठायी लय लावुनी ॥५॥२४ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा ।भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥१॥पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी ।सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥२॥सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।ही खुण दाविली आम्हा जवळच पाही ॥३॥संत साधुजन अवघे विश्वरुप देवा विश्वरुप ।पाहु गेलो महिमा महिमा तुझे न कळे स्वरुप ॥४॥पंच प्राणांची उजळोनी आरती देवा उजळोनी आरती ।भावे ओवाळिता राही रुक्मिणीचा पती ॥५॥सत्याची आरती सत्य भावे ओवाळू देवा सत्यभावे ओवाळू ।बोधला उभा दास तुझा उभा, आपल्या चरणाजवळी ॥६॥२५करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी ॥१॥आपलाली कर्मे आपण भोगिती ।केल्यावीण देती झाडा जणी ॥२॥तेथे आनंदाचे ।प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥३॥येथे माझा स्वामी कृपाळू पाही ।पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥४॥जळी बुडलीया तृण आज्ञा केली लागे जाण ।रामी रतलिया मन पाप केवी राहे ॥५॥बोधला म्हणे मन रामी विनटले ।दहन झाले संसाराचे ॥६॥२६काय मी करितो कशाने तरतो ।नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥नाम तुझे वाणी बोबडिया बोला ।न ये मज चाली करु काय ॥२॥न ये मज गाणे न ये मज नाचणे ।भावे आलो शरण तुझे पायी ॥३॥बोधला म्हणे देवा तु मज बोधिले ।आवडीने ठेविले नाम माझे ॥४॥२७कुरंगिणी आपुली बालके सांभाळी ।तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥बहुत माझे लळे पुरविले सकळ ।माउली कृपाळ अनाथांची ॥२॥उपकार सांगता नलगे आत पाहाता ।सकल माझी चिंता दूर केली ॥३॥काये गा मी सांगो सांगता गा नये ।सकाळ बाप माये पांडुरंग ॥४॥सर्वा परि माझी पुरविली आस ।चुकविला गर्भवास बोधला म्हणे ॥५॥२८कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव ।इतरां लोकां संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥आपण तो बाळ ब्रह्मचारी सकळ ।जन्मले तयाचे उदरी ब्रह्ममाया न कळत ।याची थोरवी येर लोक काये जाणती ॥२॥हा तो सर्वांचा साक्षभूत ।कोणा न कळे याचा अंत आता सांगेन तयाचा वृतांत ।सावधान श्रोते हो ॥३॥कृपा आपणाची नारी आपण वर्त देह परी ।दोनी दावी जनाचारी आपण यकटचि एक ॥४॥आपण एकलाची एक सर्व । सोळा सहस्त्र गोपाळ ।गोपिकांसहित खेळे । तरी न कळे चरित्र ॥५॥आता सांग न कृष्णाची मूळ कथा ।आपणचि माता आपणचि पिता ।आपण जाला चरित्र करिता । कंसारि कान्हया ॥६॥आपण चौवर्णाचे मूळ । आपण ब्रह्म ते केवळ ।विश्वी विस्तारला रे सकळ । चहू वेदांची कळ तयापासी ॥७॥साही शास्त्रे झगडती । आठरा पुराणांची वित्पत्ती ।परि न कळे तयाची गती । आपण श्रीपती खेळतसे ॥८॥आपण तो पांडवांचा सोईरा । धावे ब्रह्मी द्रुपदिच्या कैवारा ।दुष्ट दुर्योधन विरा । साहे नव्हे सर्वथा ॥९॥पांडवालागी आपण । कृष्ण साहये होये सावधान ।सत्य तयाचे देखोन । उणे येऊ नेदी सर्वथा ॥१०॥पाचही पांडव समूळ । आता सांगेन तयाचे मूळ ।हे तो पंडू चे पुत्र केवळ । कृष्ण साहये होये तयासी ॥११॥जो च आपला स्वधर्म तोच धर्म रे जाण ।मग अनुभवाची खुण सांगतो ऐका ॥१२॥भीम तोची भावबळी ।या अगाध पाहाहो योगियाचा रावो । तोची एकु ॥१३॥आर्त तोचि अर्जुन सबुध ते सुभद्रा जाण गुरुपुत्र जाणती हे खुण ।इतरा न कळे जाण सर्वथा ॥१४॥अवलोकी तोचि न कुळ । सादृष्ट तो सहदेव ।पाचाची प्रीत द्रुपदी पहावो । अवलोकिता ठावो सन्निधचि असे ॥१५॥सत्य तेचि सीता स्वये । आत्माराम लक्ष्मण बंधु सवे १६॥राम तोचि रावण दुर्बुध्दी दुर्योधन । असता जवळी जाण म्हणता दुरी ।बोधला म्हणे जेथिले तेथेच आहे । ज्ञानदृष्टी पाहे परतोनिया ॥१७॥२९कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक ।आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥१॥भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख ।हारितो त्यांचे जन्म दुःख । सुखसमाधी बैसवी ॥२॥गोपाळामाजी क्रीडा करी । सवे गोपिका सुंदरी ।हात टाकुनी खांद्यावरी । कैसा रळिया करितसे ॥२॥कोणा न कळे याचा पार । भुलवितो नरनारी ।बळे चुकवी जन्मफेरा । आढळपदी बैसवी ॥४॥बोधला म्हणे भुलविले कैसे । बळच लाविले आपले पिसे ।पूर्वपुण्ये ओढे कैसे । थोर भाग्य आमचे ॥५॥३०गुज गोप्ये गोष्टी।हो त्या तुझे पोटी ।त्या त्वा जगजेठी सांगितल्या ॥१॥ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि ।जैसा पांडवांसि वेळा आतु ॥२॥बोधला म्हणे देवा तू दीनांचा दयाळू ।कोवळा कैवल्ये केले बापा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP