मल्हारी मार्तंड विजय - भूपाळी

श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.


पठार लिंगाची भूपाळी

गिरिवरचे गिरिवर पठार लिंगा, जेजुर लिंगा । आदिशक्ति म्हाळसा बानू शोभती गंगा ॥धृ॥
पदी घालूनी बळकट मिठी । पहावे शोधून अंतर दृष्टी । प्रभूने रचली सृष्टी । त्यामध्ये भक्त जनाच्या भेटी होती प्रसंगा ॥१॥
शिव शिव नामामृत सार । सेवन करावे वारंवार । जावे भवसागर उतरुन पार । भक्ती मुक्तीचे दरबार रंगले रंगा ॥२॥
धरुनिया हृदयांतरी विश्वास करुनिया षड्‍कर्माचा नाश । जावे भवबंधन तोडूनी पाश । जगदीश पुरविल आंस मिटवतील दंगा ॥३॥
रामभाऊ सेवक कधि काळी । गळ्यामध्ये घालुनियां भंडारी । उभा सद्गुरुनाथाचे द्वारी । कर जोडून मागतो वारी मिळूनी सत्संगा ॥४॥

भूपाळी

उठी उठी हो मैराळा । मालो महिपती मल्हारी । अमृत भरोनि गंगा । तिष्टे रानांची झारी ॥धृ.॥१॥
इंद्रादिक सूर मिळोनि आले दरबारी । मृदंग कहाळ वाजविताती । पण वानक भरी ॥२॥
तुजविण नाही कोणी आम्हा । दुसरा कैवारी । मुख प्रक्षाळूनी देई । सुकृत प्रेमाची वारी ॥३॥
हळदीकेशरकर्दम करुनी गंधी । उटणे करु तिष्ठती दासीसिध्दी अष्टविधी । सनकादिक नारद गाती नाना प्रबंधी ।
ज्ञानार्कोदय झाला वेगी प्रबोधी ॥४॥
वस्त्रे अलंकार घेउनि तिष्ठती गण कोटी । जयजयकारे सुरवर करिती सुमनाची वृष्टी । ध्यानी त्याला देसी संतती, संपत्ती यश सृष्टी ।
दत्त वरद विठ्ठल कवि वंदीत गर्जुनि यळकोटी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP