मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय|

मल्हारी मार्तंड विजय - अध्याय चौदावा

श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.


॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मणीचा होतांचि प्राणांत ॥ देवाचें द्रवलें चित्त ॥ विष्णुसी शिव म्हणे जावें त्वरित ॥ मल्ल दैत्य बोधावया ॥१॥
जें जाहलें ते बरे जाहलें ॥ आतां जीव वांचवि आपुले ॥ शेषसेना जे उरले ॥ घेवोनि जाय पाताळाप्रति ॥२॥
स्वार होवोनि गरुडावरि ॥ मल्लस्थळासीं गेले हरी ॥ मल्लानें स्तुति करोनि बरी ॥ म्हणे किंनिमित्ये आगमन ॥३॥
मल्लासी बोले नारायण ॥ सांगावया आलों तुज कारण ॥ उरलें सैन्यातें घेवोन ॥ पाताळासीं जाय ॥४॥
मार्तंड बळ अद्भुत ॥ सैन्य मारिलें समस्त ॥ मणीचा केला प्राणघात ॥ बहुत विख्यात प्रताप ते ॥५॥
आतां वेग शरण जाई ॥ लाग मार्तंडाचे पायीं ॥ जीव वांचवोनि सुखी राही ॥ पाताळ भुवनांत ॥६॥
मल्ल म्हणे देवराजा ॥ पाहेपा पराक्रम माझा ॥ जिकोनियां दशभुजा ॥ रक्तप्राशन करीन मी ॥७॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥८॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां विष्णोदैत्याभिगमनो नाम चतुर्दशोऽध्याय  ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP