मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय दुसरा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय दुसरा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय दुसरा Translation - भाषांतर श्रीमार्तंडभैरवाय नम: ॥ मग धर्मपुत्र साती ॥ कुटुंब ठेवोनि अन्य पर्वतीं ॥ जाते झाले अमरावती ॥ सुधर्मं सभा देखिली ॥१॥रत्नजडिंत सिंहासन ॥ वरि बैसला सहस्त्रनयन ॥ बृहस्पति आदि ऋषि जन ॥ सभे माजीं असती ॥२॥ अग्नि यम नैऋत्य ॥ वरुण वायू मूर्तिमंत ॥ चंद्र सूर्यादि दैवत ॥ उभे कर जोडोनी ॥३॥नाग सिध्द चारण ॥ रंभानृत्य गंधर्वगायन ॥ कुबेर नवविधि हस्तें कडोन ॥ सेवा करी ॥४॥चामर ढाळिती मृगनयनी ॥ धर्मपुत्र देखिले नयनीं ॥ तटस्थ होऊनी मनीं ॥ सन्मुख उभे राहिले ॥५॥शक्र द्विजास पाहोन ॥६॥मुख तुमचें लहान जाहलें ॥ कवणे तुम्हांसी गांजिलें ॥ आणि वृत्तांत काय जाहले ॥ ते सांगा मज ॥७॥ऋषि म्हणतीं शक्रालागुन ॥ तुझे अभय, वरदे कडोन ॥ मणिचूल पर्वतीं अनुष्ठान ॥ सुखें कडोन करीत होतों ॥८॥मृगयाचें निमित्य ॥ येवोनिया मल्लदैत्य ॥ नासिले आश्रम समस्त ॥ म्हणोनि तुज सांगो आलों ॥९॥त्यांसि पारिपत्य करावें ॥ हाचि आमचा मनोभाव ॥ आम्ही स्वधर्म आचरावे ॥ म्हणोनिया श्रुत केलें ॥१०॥शक्र म्हणे द्विजोत्तमा ॥ तो मल्ल नाटोपें आम्हां ॥ धूम्रपान करोनिया ब्रह्मा ॥ तोषविला त्यानें ॥११॥तुम्हीं सर्वही मिळोन ॥ जो वैकुंठनाथ भगवान ॥ त्यासी जावें शरण ॥ त्याचे कडोन कार्य होय ॥१२॥ऐकोनि ऋषि तोषले ॥ म्हणति शक्रा सत्य बोलिले ॥ शरण जाऊं अनन्यभावें ॥ साह्य होईल आम्हांसि तो ॥१३॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१४॥श्री माणिकप्रभुकृतटीकायां शक्राभिगमनोनाम द्वितीयोऽध्याय गोड हा ॥२॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP