मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय अठरावा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय अठरावा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय अठरावा Translation - भाषांतर ॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ जयजयाजी कैलासनाथा ॥ जयजयाजी उमाकांता ॥ जयजयाजी वरप्रदाता ॥ मार्तंडराया श्रीगुरु ॥१॥मार्तंड बोलिले धर्मपुत्रांसी ॥ आम्ही मारिलें मणीमल्लसी ॥ आपण रहावें स्वस्थळासीं ॥ यज्ञयागादि करोन ॥२॥घालोनियां नमस्कार ॥ सांबासी म्हणती द्विजवर ॥ आपण असावें उर्वीवर ॥ जग पावन करावया ॥३॥अवश्य म्हणोनि शिव बोले ॥ द्विजास आनंद जाहले ॥ आकस्मात कल्पवृक्षाखाले ॥ उद्भवली लिंगे दोन ॥४॥निर्विकल्प स्फूर्णकल्पवृक्ष ॥ तळीं मूळ लिंगदर्शन मोक्ष ॥ द्वितीयालिंग मार्तंड पार्थीव प्रत्यक्ष ॥ सुज्ञ जन जाणती ॥५॥मार्गेश्वर शुक्लपक्ष षष्ठीस ॥ चंद्र शततारा नक्षत्रास ॥ दृष्टिगोचर लिंग ते दिवस ॥ सुरवरऋषी पाहूं आले ॥६॥देव ऋषी तेथें राहिले ॥ तेव्हां नगर उत्पन्न जाहलें ॥ प्रेमपूर नांव ठेविलें ॥ सकळ मिळोनि ॥७॥संपूर्ण येती ध्यानास्तव ॥ हरिहरात्मक मूर्तिदेव ॥ पार्थीव मार्तंड भैरव ॥ मणी वरद अश्वासह केलें ॥८॥मूर्ति स्थापोनि ऋषेश्वर ॥ स्तवन करिती अपार ॥ तव पार्थीव मूर्ति सत्वर ॥ बोलें कोंनिमित्य सतव करितां ॥९॥ऋषि म्हणती यास्तव स्वामी ॥ स्तवन आरंभ केले आम्ही ॥ जे तरले तुमचे नामी ॥ त्यांचे चुको जन्ममरण ॥१०॥पुत्रपौत्र ध्यान्यधन ॥ शत वर्षे वांचणे ॥ पशुराज अश्व देणें ॥ सर्वदा भक्तांप्रति ॥११॥विद्याशूरत्व असावें ॥ मनीं द्वैतभाव नसावे ॥ इच्छिलें तें पूर्ण व्हावें ॥ हेचि वर द्यावे मार्तंडा ॥१२॥वर मागतां अपूर्व ॥ अवश्य म्हणे मार्तंडभैरव ॥ ऋषी आनंदले सर्व ॥ जयजयकार गर्जती ॥१३॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यातील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१४॥श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां सुरऋषिस्तुतिवरप्रदानी नाम अष्टादशोऽध्याय: ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP