मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय आठवा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय आठवा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय आठवा Translation - भाषांतर ॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ नंदीरुढ मार्तंड भैरवरुप धरिलें ॥ चंद्रसूर्य झळकती कुंडले ॥ डमरुखड्गबाणत्रिशुल ॥ रुंडमाळा गळा शोभे ॥१॥रत्नापरि दंत त्रिनयन ॥ मयूरपुच्छ चामर मुकुट धारण ॥ सप्तकोटी पिशाच्चगण ॥ सेनाचूर्ण उधळिती ॥२॥देव वज्र कवच ल्याले ॥ आपुलें आपुलें सैन्य मेळविलें ॥ मणिचूल पर्वतासी चालिले ॥ युध्द करावयास्तव ॥३॥समर भूमीवरी स्वामी कार्तिक ॥ मार्तंडासि सेना दावी प्रत्येक ॥ वृषमांरुंड छत्र चंद्रासारिखे पताक ॥ बंदीजन गर्जती ते शंभुसेना ॥४॥मयुर वाहन शक्ति कुंतादि आयुध ॥ नीलवर्ण कवच हे माझी सेना प्रसिध्द ॥ ऐरावतारुढ छत्र वज्र आयुध ॥ गज तुरंग सेना शक्राची ॥५॥शक्तिशस्त्र मेषवाहन सेना अग्निची ॥ सहिषवाहन दंड आयुध यमसेना साची ॥ खड्ग आयुध राक्षस सेना नैऋत्याची ॥ पाशहस्ताची वरुणध्वज ॥६॥सुवर्णालंकृत कुबेर सैन्य ॥ मुखाकृती गज उंदीरवाहन ॥ फरश अंकुश आयुध जाण ॥ हे सेना गणपतीची ॥७॥मृगमुख अश्वछत्र शुभ्र चंद्रसैन्य ॥ सप्तमुख अश्वरथ सूर्यछत्रसुवर्ण ॥ शुभ्रतुरंग गज कमंडलु आयुध जाण ॥ हे सेना ब्रह्मदेवाची ॥८॥शंख चक्रादि आयुध गरुडवाहन ॥ पिवळे छत्र मेघवर्ण ॥ मकर कुंडल सुहास्य वदन ॥ हे सेना विष्णुची ॥९॥शूलतोमर खड्गबाण ॥ मुसळ खट्वांग धनुष्यासन ॥ अष्ट आयुध गजचर्म वसन ॥ ऐसी सेना त्रिनयनाची ॥१०॥शाकिनी डाकिनी समस्त ॥ वेताळदिभूतप्रेत ॥ लांब ओठ दीर्घ दांत ॥ कपाळावरी डोळ्याचे ॥११॥चार तीन कानाचे ॥ पंचसप्तदशओंठाचे ॥ नऊ सात तीन जिव्हाचे ॥ सात तीन सहा डोई ॥१२॥जिव्हा लांब दीर्घ नाक ॥ विशाळ नासिक विक्राळ वदन ॥ नानारुप विलक्षण ॥ सेना चालिली मणिचूल पर्वतीं ॥१३॥परोपरीची वाद्यें वाजत ॥ भिडती रथादि समस्त ॥ भूमीवरी उतरलीं सेनाजात ॥ मल्लासवें युध्द करावया ॥१४॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१५॥श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां शिवसैन्यवर्णनो नाम अष्टमोऽध्याय गोड हा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP