मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय|

मल्हारी मार्तंड विजय - अध्याय बाविसावा

श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.


॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मनुष्यासि माझी भक्ति ॥ पूर्व पुण्याविण नव्हे प्राप्ति ॥ ऐसें बोले मार्तंडमूर्ति ॥ स्वमुखे कडोन ॥१॥
माझें प्रतिमेचें पूजन ॥ जे करिती एकभावेन ॥ त्याचे घरींच बसणे ॥ सदा घडे मज ॥२॥
माझ्या माहात्म्याची पोथी ॥ ज्याचे घरीं राहती ॥ त्याचीं विघ्नें नासतीं ॥ दीर्घायु होय तो ॥३॥
माझें माहात्म्य जो ऐकेल ॥ एक एक अक्षर एक अश्वमेध फळ ॥ जो दुसर्‍यास ऐकवेल ॥ मीच मानोन पूजा करी ॥४॥
जो का नित्य पठन करितो ॥ इच्छिलेलें फळ पावतो ॥ जो हें माहात्म्य लिहवितो ॥ त्यासी माझी प्राप्ति होय ॥५॥
अष्टमी चतुर्दशी नवमीस ॥ चतुर्थी षष्ठी शिवरात्रीस ॥ वाचे किंवा ऐकिलेस ॥ देवता प्रसन्न तेहतीस कोटी ॥६॥
कपटी असो दांभिक ॥ चोर जार असो देख ॥ श्रवण करितां पातक ॥ क्षणामाजी दूर होती ॥७॥
सर्वभावें कडोन ॥ माझी भक्ति करितां जाण ॥ त्याचें पातकदहन ॥ मीच करित असे ॥८॥
माहात्म्य श्रवण करणाराचें ॥ ब्रह्मवाणी माहात्म्य त्याचें ॥ जो भक्त माझे पुरातनाचे ॥ तो मीच होवोनि राहतो ॥९॥
मार्तंड भैरवाचे बोल ॥ ऐकोनी ऋषी संतोषले ॥ आज्ञा घेवोनि गेले ॥ आपुले आपुले स्थळासी ॥१०॥
अठ्ठ्यांशी सहस्त्र युग पूर्वी ॥ अवतार मार्तंड भैरवी ॥ द्विज पक्षपातास्तव उर्वीवरी ॥ सांब आले असे ॥११॥
कलियुगीं तथासारिखा ॥ दुजा देव नाहीं देखा ॥ सनत्कुमार ऋषिलोका ॥ पार्वतीसी सांब सांगे ॥१२॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१३॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लारिवाक्यमूळप्रसादमाहात्म्यवर्णनो नाम द्वाविंशातितमोऽध्याय गोड हा ॥२२॥
शुभं भवतु ॥ श्रीमार्तंडभैरवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP