मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय नववा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय नववा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय नववा Translation - भाषांतर ॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ शिवसेनेसि पाहून ॥ मल्लासि सांगाति जाऊन ॥ मल्ल म्हणे दूता लागून ॥ शिवासि सैन्य कोठोनि आलें ॥१॥वाद्यनाद कानीं पडला ॥ मल्ल पहावयास्तव गोपूरीं चढला ॥ सेना पाहोनि घाबरला ॥ दळ सिध्द केलें आपलें ॥२॥ऐरावत दिधले सुरार्दनासि ॥ विद्युच्छकटनिर्जर विध्वंसासी ॥ चतुर्दंतगज उद्मत्त मल्लासि ॥ चित्रांगा वाजी देवशल्यासीं गज ॥३॥चतुरंग सैन्य इंद्रगोप वाजीस ॥ हिमवंत गज दिधले सोरभास ॥ खड्ग सुरेंद्र दर्पदळणास ॥ कर्पुर तिलका वाजी गज ॥४॥सुरग्रास दैत्याप्रति ॥ जयमंगल नामाचा हत्ती ॥ आणि अश्व जेंवी चंद्रकांति ॥ हातीचा भाला दिधला ॥५॥कस्तुरीकवच नामाचा गजक्रूर ॥ नंदनोद्यानदलन कुंजर ॥ नरविर्ध्वंसका दिधले सत्वर ॥ चंडकोपासि विजयध्वजरथ ॥६॥सिंधुनाम दैत्याला ॥ भ्रमरवेष्टित मातंग दिधला ॥ गोमुख श्रेष्ठ रथीं चढला ॥ धूम्रवर्णासि रथनीलगिरीं गज ॥७॥सुवर्णवर्ण जुंपिले अश्वास ॥ श्यामध्वजरथ शूर्पकर्णास ॥ गज घोडे शस्त्र आपुले दळास ॥ युध्दास्तव दिधले मल्लें ॥८॥ज्वालामुख शूलजिव्हा सुरारि सुरमर्दन ॥ कराळ पावकाख्य शक्तिदंत भीमाख्य मुख भीषण ॥ देवमल्ल बुधांतक निर्जरारिं गजमुखरक्ताक्ष त्रिदशार्दन ॥ काळध्वंस कुंभनास सिंहनाद नरांतक ॥९॥खररथ खररोम खरांघ्रीकेश खरानन ॥ सप्तबाहु नववक्तृ चतुर्भुज हलदंत क्रूरदृष्टि करभानन ॥ वक्रदंत खरनख खड्गकेश असिजिव्ह सुराशन ॥ कुंतजिव्ह कुर्मकर्ण त्रिलोचन उदग्नासिं दुर्मुख ॥१०॥चामरश्मश्रुरुत्रत वज्रांध्निदुर्धंर दुष्ट शूलरोम विनाशक ॥ त्रिनास सप्तरसन त्रिशीर चतु:शीर विद्युत्केश ज्वलदंष्ट् व्याधमुख ॥ सुदुर्मतीं दुर्मुख रासभाकार बृहद् जटा तडित्कर्ण क्रोधमुख ॥ पाशकर्ण प्रमोदन सिंहनाद खरनाद ॥११॥अश्ववेश शुंडहस्त कोशबाहु तडीद्वक्ष त्रिपादवली नीलानन ॥ तिमीरांगार त्रिकर्ण चंडविक्रम श्वेतोदर शताक्ष धूम्राक्षवीर स्वांदन ॥ सुग्रीव शृंखलाहस्त शूलग्रीव सिंहासन ॥ क्रोधमूर्ति नभोमूर्ति महामूर्ति मदोत्कट ॥१२॥सहस्त्राक्ष महारथांत ॥ मल्ल बैसला शस्त्रास्त्रांसहित ॥ गजारुढ होवोनियां दैत्य ॥ सैन्य घेवोनि निघाला ॥१३॥कोल्हाळ वाद्यांचा गजर ॥ दणाणिलें त्रैलोक्यसमग्र ॥ दैत्य वीर अपार ॥ युध्दास्तव निघाले ॥१४॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१५॥श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लसैन्यनिर्गमननाम नवमोऽध्याय गोड हा ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP