मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय तेरावा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय तेरावा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय तेरावा Translation - भाषांतर ॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मणी म्हणे मल्लास ॥ आजीचा हा सुदिवस ॥ रणीं भिडेन सांबास ॥ देह पुनीत करीन मी ॥१॥सिंहनाद केला मणीं ॥ किरिट कुंडल झळके कणी ॥ छत्र शोभे नीळवर्णी ॥ वीस हात जयासी ॥२॥मणि आला युध्दासी ॥ सांब सांगे दैत्यासी ॥ आज वधीन दुष्टासी ॥ म्हणोनि रणीं सरसावला ॥३॥मणिं महादेवास म्हणत ॥ तूं युध्दासि आलासि येथ ॥ आज जिंकीन मी त्वरित ॥ पाहि रे कपर्दिका ॥४॥सांबानी गदा मारिली ॥ मणी म्हणे तुझी शक्ति गेली ॥ सांबानें सहस्त्रशक्ति सोडिली ॥ तेहि दैत्य तोडोनि टाकी ॥५॥मणिनें सोडिले सहस्त्र बाण ॥ सांबें हुंकारें केलें दहन ॥ देवानें मुकुटावरी बाण ॥ सोडिले तेव्हां रत्नें गळति ॥६॥क्रोधें मणिं धांवला ॥ देवें चंद्रमुख बाणें शिर उडविला ॥ शरभ रुप धरुनि भुजा चाविला ॥ कार्तिक आयुधें मारिलें ॥७॥आयुध मुखें धरिलें नंतरी ॥ शूळानें मारिलें पाठीवरी ॥ तेव्हांचि हयरुप धरीं ॥ अर्धचंद्रबाणें छेदिला ॥८॥पुन्हां गजमुख जाहला ॥ कुराडीनें मस्तकीं मारिलां ॥ खड्गासह अश्वावरी स्वार जाहला ॥ बाणवृष्टि करुं लागे ॥९॥मार्तंड ब्रह्मास्त्र सोडिलें ॥ तेणें अश्वासह व्याकुल पडले ॥ ते स्थळीं तुरंगाख्य तीर्थ जाहलें ॥ पुनीत जन पाहती ॥१०॥सांबास सर्वांगी बाण भेदले ॥ तेणें बहुत क्रोध आले ॥ शूलाने मणीस मारिलें ॥ पाय धरी मणी त्वरित ॥११॥मस्तक ठेवोनि चरणी ॥ स्तवन करितां झाला मणी ॥ नमो नमो जी शूलपाणी ॥ त्रिपुरांतका ॥१२॥नमो भूतनाथा सर्वांतयामीं ॥ नमो नागभूषणा कैलास स्वामी ॥ नमो नीलकंठ पशुपते नामि ॥ दीनवत्सला तुज नमो ॥१३॥मार्तंड म्हणे जाहलों प्रसन्न ॥ काय मागतोस वरदान ॥ ते मीं तुज देईन ॥ माग मणी दैत्यसुता ॥१४॥मणी म्हणे हेंचि देई ॥ हें मस्तक असो तुझे पायीं ॥ अश्वरुपासहित राही ॥ अवश्य म्हणे मार्तंड ॥१५॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१६॥श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मणिकासुरवधनो नाम त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP