मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय|

मल्हारी मार्तंड विजय - अध्याय पंधरावा

श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.


॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मल्ल युध्दास्तव निघाला ॥ वस्त्रभूषण त्याला ॥ आकाशीं वाद्यनाद कोंदला ॥ ऐकोनि घृतमारी खवळली ॥१॥
गज धरोनियां हातीं ॥ दळावरी टाकोनि देती ॥ तेणें रथ गज सारथी ॥ चूर्ण होती बहुत ॥२॥
बहुत दळ मारित जाय ॥ शस्त्र दांताने चावोनि खाय ॥ मल्लें बाणवृष्टि केलीया माय ॥ मारी तयासी नाटोपे ॥३॥
गदा घेवोनि टाकिली ॥ ते गदेस डावे हातें धरिली ॥ शूल मारितां देखिले ॥ मुष्टींत धरीं तत्क्षणींच ॥४॥
खड्ग मारिलें मल्लदैत्यें ॥ परतोनि भुजावरी मारित ॥ बाहु तुटोनि गळलें रक्त ॥ त्याचें श्रोणिततीर्थ जाहलें ॥५॥
आरोळी मारुनि आकाशवरुते ॥ शिळां घालोनि पाडिलें दैत्यातें ॥ सवेंचि येवोनि खालतें ॥ युध्द करी महामारी ॥६॥
मल्ल मूर्च्छा सांवरोनि ॥ डोईस बाण मारिला नेम धरोनी ॥ सत्तावीस सत्तावीस मारिले स्तनीं ॥ कंठ स्कंध हृदयीं शत शत ॥७॥
नाभि लालट वक्षस्थळें ॥ मांडया गुडघ्यांत शर शिरले ॥ बाणें मारीस जर्जर केले ॥ मार्तंड पाहोनि सन्मुख जाहला ॥८॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥९॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां घृतमारीयुध्दं नाम पंचदशोऽध्याय:  ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP