TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६९१ ते ५७००

जनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


जनांस शिक्षा अभंग - ५६९१ ते ५७००
॥५६९१॥
जयासी नावडे संतांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥२॥
मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा ॥३॥
तुका ह्मणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥४॥

॥५६९२॥
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटी केला अपघात ॥१॥
अष्टोत्तरशें व्याधि ज्या वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारुनि उत्तीर्ण झाला ॥२॥
नव मास माया वाहिलें उदरीं । ते माता चौबारीं नम्र केली ॥३॥
गायत्रीचें क्षीर पिळूनी घेउनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥४॥
तुका ह्मणे दासां निंदी त्याचें तोंड । पाहतां नरककुंड पूर्वजांसी ॥५॥

॥५६९३॥
गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें ॥१॥
त्याचें भुंकणे न राहे । स्वभावासी करील काये ॥२॥
श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥३॥
तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥४॥

॥५६९४॥
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्या समान ॥१॥
दर्पण नावडे तया एका । डाव नाहीं ज्याच्या नाका ॥२॥
तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥

॥५६९५॥
तरलों ह्मणुनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फाटा ॥१॥
वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी भांड ॥२॥
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली संतत ॥३॥
तुका ह्मणे ऐसीं कितीं । नरका गेलीं अधोगती ॥४॥

॥५६९६॥
अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तो वीट मानी ॥१॥
नावडेसा झाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥२॥
नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥३॥
तुका ह्मणे अभक्तासी । माता दासी जग झोडी ॥४॥

॥५६९७॥
भोगिली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥
करी संतांचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥२॥
बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥३॥
तुका ह्मणे ठावें । ऐसें झालें अनुभवें ॥४॥

॥५६९८॥
पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंतावरी बोल ॥१॥
भेईना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी ॥२॥
नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥३॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥४॥

॥५६९९॥
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥
दिवस गमा भरा पोट । कां गे नट नटावा ॥२॥
दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥३॥
तुका ह्मणे झोंडगीं हो । फुंदा कां हो कोरडी ॥४॥

॥५७००॥
कळे परि न सुटे गांठी । झालें पोंटीं कुपथ्य ॥१॥
अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥२॥
हेंकटाची एकींच वोढी । तेही खोडी सांगती ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T21:17:10.3330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

depreciated cost

  • ऱ्हसित परिव्यय 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.