TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६७१ ते ५६८०

जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८०
॥५६७१॥
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिलें ॥२॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥३॥
तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥४॥

॥५६७२॥
भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाटी । होऊनि हिंपुटी दु:ख पावे ॥१॥
काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥२॥
मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥३॥
तुका ह्मणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करुनियां ॥४॥

॥५६७३॥
निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपली तीं फळें न संडीच ॥१॥
तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुन सांडी ॥२॥
परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥३॥
तुका ह्मणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जवळिकें ॥४॥

॥५६७४॥
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥
एक रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥२॥
सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥३॥
तुका ह्मणे भार वागविती मुर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥४॥

॥५६७५॥
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥
असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥२॥
आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥३॥
तुका ह्मणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥४॥

॥५६७६॥
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरेचिना ॥१॥
किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥२॥
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥३॥
तुका ह्मणे डेंगा न कळे हित । किती फजित करुं तरी ॥४॥

॥५६७७॥
ऐसें ठावें नाहीं मुढा । सोस काकुलती पुढां ॥१॥
माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥२॥
पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥३॥
संचित ते करी । नरका जाया मेल्यावरी ॥४॥
परउपकार । न घडावा हा विचार ॥५॥
तुका ह्मणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥६॥

॥५६७८॥
नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥
त्याचे तोंडीं पडे माती । हीन शूकराची जाती ॥२॥
घोकुन अक्षर वाद छळणा करीत फिरे ॥३॥
ह्मणे देवांसी पाषाण । तुका ह्मणे भावहीन ॥४॥

॥५६७९॥
अभक्ताचे गांवीं साधु ह्मणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥
कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया कायी ॥२॥
केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥३॥
तुका ह्मणे खीर केली कार्‍हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥४॥

॥५६८०॥
अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥
कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥२॥
जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥३॥
मुसळाचें धनु । तुका ह्मणे नव्हे अनु ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T21:15:44.4100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेतन

 • न. १ मजुरी ; पगार ; केलेल्या कामाचा मोबदला ; बिदागी . वरदास दाससेना हे नाथा वेतनात मागे हें । - मोकृष्ण ८४ . २० . - मोवन ४ . १७७ . २ ( विशेषतः ) सालीना नेमणूक ( पूर्वी पुराणिक , पोतनीस , फडनीस इ० ना देत ती ). गांवकामगाराशिवाय वतनपध्दतीला फांटा मिळाला व चाकरीबद्दल वतनाऐवजी वेतन देण्याची पध्दत चालली . - गांगा ६८ . [ सं . ] 
 • ०गुरु पु. भाडोत्री , निव्वळ पगारी मास्तर . - टिव्या . वेतनी - वि . १ वेतन ठरवून कांहीम कामास लावलेला ( गडी , मजूर , पुराणिक , आश्रित इ० ). मृत्यु न म्हणे वेतनी । वेतन धर्ता । - दा ३ . ९ . १३ . २ कांहीं कामाबद्दल एखाद्याला रोख पैसे किंवा पगार न देतां त्याच्या मोबदला बक्षीस दिलेला ( गांव , हक्क , अधिकार इ० ). वतन पहा . ३ वेतनासंबंधाचा ( तंटा , हिशेब इ० ). ४ भाडोत्री ; पगारी . 
 • n  Wages or pay; salary. 
RANDOM WORD

Did you know?

पिंड म्हणजे काय? त्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.