TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५६०१ ते ५६१०

जनांस शिक्षा अभंग - ५६०१ ते ५६१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


जनांस शिक्षा अभंग - ५६०१ ते ५६१०
॥५६०१॥
चंदनाचे गांवीं सर्पाचीं वसती । भोगिती ते होती द्विपांतरीं ॥१॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥२॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥३॥
तुका ह्मणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनी दगड बरे देवा ॥४॥

॥५६०२॥
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥
एक गुण तो केला दों ठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥२॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥३॥
परउपकार घडे तो भला । नाटयाळ तया दया नाहीं ॥४॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥५॥
हित ते अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥५॥

॥५६०३॥
नावडे ज्यां कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥१॥
तो असे जवळी गोंचिडयाच्या न्यायें । देशत्यागें ठाय तया दुरी ॥२॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥३॥
तुका ह्मणे तया करावें तें कायी । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥४॥

॥५६०४॥
देहा लावी वात । पालव घाली झाली रात ॥१॥
वेडी ते वेडी बहुतच वेडी । चाखतां गोडी चवी नेणे ॥२॥
कडिये मूल भोवतें भोये । मोकुलुनि रडे धाये ॥३॥
लेंकरें वित्त पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥४॥
आपुली शुद्धि जया नाहीं । आणिकांची ते जाणे कायी ॥५॥
तुका ह्मणे ऐसे जन । नर्का जातां राखे कोण ॥६॥

॥५६०५॥
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥२॥
काय ते नेणते होते मागें ऋषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥३॥
द्रव्य दारा कोणें स्थापियलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥४॥
तुका ह्मणे दोहीं ठायीं हा फजीत । पावे यमदूत जना हातीं ॥५॥

॥५६०६॥
वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरुप पाहीं ॥१॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥२॥
न वैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥३॥
जाता कांटाळे देऊळा । तोचि सुना मुखकाळा ॥४॥
हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥५॥
तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥६॥

॥५६०७॥
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥
लात हाणोनियां वारी । गुंडा वाट शुद्ध करी ॥२॥
बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥३॥
तुका ह्मणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥४॥

॥५६०८॥
सावित्रीचें विटंबण । रांडपण करीतसे ॥१॥
काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥२॥
कुबेर नांव मोळी वाहे । कैसी पाहे फजिती ॥३॥
तुका ह्मणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख फुंदतां ॥४॥

॥५६०९॥
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणता ॥१॥
हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥२॥
जळो ऐसे वांजट बोल । गुणा मोल भूस मिथ्या ॥३॥
तुका ह्मणे अंधळ्याऐसे । वोंगळ पिसें कौतुक ॥४॥

॥५६१०॥
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृतिया ॥१॥
पडा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥२॥
जळो ऐसी ब्रिदावळी । भाटवोळीपणाची ॥३॥
तुका ह्मणे पाहों डोळां । अवकळा नये हे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-04-04T20:03:25.9700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जुनवट

  • a  Oldish. 
  • वि. १ जीर्ण ; प्राचीन ; जुना . २ अनुभविक ; जुन्यासारखा जुनटु जुंझारू हा येकु । नाहीं जयातें कलंकु । - गीता १ . ४३५ . [ सं . जीर्ण ; प्रा . जुण्ण + वत - वट प्रत्यय ] जुनवत - स्त्री . नागवेली , वड इ० झाडाचीं पिकलेलीं पानें . जुनवान - वि . १ पिकलेलीं ( पानें ). २ जुनाट ( झाड , वनस्पति ). 
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.