मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ९ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ९ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ९ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥तस्मै स्वलोकं भगवान्सभाजितः संदर्शयामास परं न यत्परम् ॥ व्यपेतसंक्लेशविमोहसाध्वसं स्वदृष्टविद्भिर्विबुधैरमिष्टुतम् ॥९॥ ॥ टीका ॥ तें वैकुंठ जाण साचार ॥ सर्व लोकां वरिष्ठवर ॥ त्यानहून परतें नाहीं पर ॥ यालागीं परात्पर ह्मणतीं त्यातें ॥६०॥जेथें परमात्मा नांदे स्वयंजोती ॥ त्या वैकुंठाची वैभवस्थिती ॥ वर्णितां खुंटली परेची गती ॥ यालागीं ह्मणती वैकुंठ लोक ॥६१॥ज्या लोकाचिये ठायीं ॥ क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं ॥ मोहाची वार्ता कांहीं ॥ कोणी स्वप्नींही न देखती ॥६२॥नित्य देखतां हरीचे पाय ॥ क्षुधातृषा जिरोनी जाय ॥ तेथें मोहक्लेश कैंचा राहे ॥ आनंदें नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥ज्या वैकुंठाचें नांव घेतां ॥ काळ पळे मागुता ॥ तेथें कैंची भयाची वार्ता ॥ जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥ज्या लोकाचिये ठायीं ॥ मरणाचें नांव नांहीं ॥ जरा प्रगटे निजदेहीं ॥ हें जन कोणी जाणेचिना ॥१६५॥ज्या लोकाचें स्तवन ॥ सदाशिव करी आपण ॥ इंद्रादिदेवगण ॥ वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥मृत्युलोकींचे मुनिगण ॥ पावावया वैकुंठभुवन ॥ अद्यापि करिती अनुष्ठान ॥ भगवद्भजन निजनिष्ठा ॥६७॥तोचि वैकुंठलोक ॥ पांचश्लोकीं श्रीशुक ॥ वर्णितसे आत्यंतिक ॥ ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP