मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ५ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ५ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ५ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥सआदिदेवो जगतां परो गुरुः स्वधिष्ण्यमास्थाय सिसृक्षयेक्षत ॥ तां नाध्यगच्छदृशमत्रसंगतां प्रपंचनिर्माणविधिर्यथा भवेत् ॥५॥ ॥ टीका ॥ इंद्रादिदेवां पूज्य तत्त्वतां ॥ यालागीं आदिदेव विधाता ॥ प्रजापतींचाही पिता ॥ परमगुरुता पाहे तूं ॥५८॥गायत्रीमंत्र उपदेशिता ॥ हाचि झाला परंपरता ॥ यालागीं परमगुरुता ॥ जाणता तत्वतां ब्रह्मयासी ॥५९॥ऐसा परमगुरु ज्ञाननिधी ॥ तोहि कल्पाचिये आदीं ॥ होऊनि ठेला मूढबुद्धी ॥ सृष्टिसर्जनविधी स्मरेना तया ॥६०॥एवं नाभिकमळीं कमलासन ॥ बैसला केवळ अज्ञान ॥ तंव हृदयीं झाली आठवण ॥ मी येथें कोण कैंचा पां ॥६१॥मज कैंचें हें कमलासन ॥ येथें याचें मूळ तें कवण ॥ तें पाहावया आपण ॥ जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥सहस्रवरुषें बुडी देतां ॥ कमळमूळ नयेचि हाता ॥ तेथें निरबुजला ये वरुता ॥ बैसे मागुता कमळासनीं ॥६३॥विधाता विचारी चारी खाणी ॥ चौर्यांसीलक्ष जीवयोनी ॥ या चराचराची मांडणी ॥ सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥सुर नर आणि पन्नग ॥ उत्तममध्यमअधमभाग ॥ कैसेनी सृजावें म्यां जग ॥ पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥ऐसी सृष्टा चिंता करी ॥ निश्चळ बैसे कमळावरी ॥ पंचभूतें हीं कवणेपरी ॥ देहीं देह धारी होतील ॥६६॥ऐसी तो चिंताकरी ॥ चित्त उगें नराहे क्षणभरी ॥ मी कोण मजभीतरीं ॥ हें मनीं निर्धारीं कळेना ॥६७॥नकळतां माझें मीपण ॥ केवीं प्रपंच होय निर्माण ॥ ऐसें चिंतोनी अतिगहन ॥ चतुरानन अनुतापी होत ॥६८॥कृपा करी गा अच्युता ॥ धांवें पावे गा भगवंता ॥ या एकार्णवाआंतोता ॥ होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥मी अतिशयें तुझें दीन ॥ मजवरी कृपा करी संपुर्ण ॥ निजभावें अनन्यशरण ॥ मनीं लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ऐसी ब्रह्मयाची ती चिंता ॥ तत्काळ कळली भगवंता ॥ तो अंतर्यामी जाणता ॥ करताकरविता तो एक ॥७१॥जंव हरी हृदयीं कृपा नकरी ॥ तंव अनुताप नुपजे शरीरीं ॥ त्याची पूर्ण कृपा ज्यावरी ॥ तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥विवेकाविण वैराग्य उठी ॥ तें अपायीं घाली कडेकपाटीं ॥ कीं वैराग्याविण विवेक उठी ॥ तो जन्मला पोटीं नपुंसक ॥७३॥विवेकाविण वैराग्य आंधळें ॥ वैराग्याविण विवेक पांगुळें ॥ हें एकएका अवेगळें ॥ झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥जैं कृष्णकृपा पूर्ण घडे ॥ तैं विवेकवैराग्य समपाडें ॥ हृदयीं वाढती वाडेंकोडें ॥ तैं ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥वैराग्यावीण जे स्थिती ॥ त्यातें गिळी विषयशक्ती ॥ विवेकहीन वैराग्यस्थिती ॥ ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥जैं कृष्णकृपा पूर्ण आकळे ॥ तैं विवेक वैराग्य एके वेळे ॥ जैं हृदयीं वाढेप्रांजळें ॥ तैं परब्रह्म लोळे दोंदावळी ॥७७॥तेणें श्रीनारायणें आपण ॥ ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण । कमळासनीं बैसोनि जाण ॥ झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥त्यासी द्यावी आपुली भेटी ॥ कृपा उपजली हरीचे पोटीं ॥ नवह्ती चित्तशुद्धि गोमटी ॥ ह्मणुनी हरि रूपीं दृष्टी रिघेना ॥७९॥जरी ह्मणाल बहुत दूरी ॥ इंद्रियां तो व्यापारी ॥ निजज्ञानें नांदे श्रीहरि ॥ घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥इंद्रियव्यापार ज्ञानें होती ॥ तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं ॥ यालागीं हृदयस्थाची प्राप्ती ॥ प्राणी न पावती विषयांधजे ॥८१॥ते विषयासक्ती ज्याची उडे ॥ त्या नांव चित्तशुद्धि जोडे ॥ तैं हृदयीं हरि आतुडे ॥ सर्व सांपडे परमात्या मग ॥८२॥त्या चित्तशुद्धीलागीं जाण ॥ भावें करावें भगवद्भजन ॥ कां गुरुदास्य करितां पूर्ण ॥ परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥ते घडावया भगवद्भक्ती ॥ तपादिसाधन सुयुक्ती ॥ देव सांगे ब्रह्मयाप्रती ॥ ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP