मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक २० टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक २० एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक २० Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥ श्रीभगवानुवाच ॥ त्वयाऽहं तोषितः सम्यग्वेदगर्भसिसृक्षया ॥ चिरंभृतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम् ॥२०॥ ॥ टीका ॥ लहरी लोटली चित्सागरा ॥ आनंदाचा सुटला झरा ॥ सुखमेघ गर्जे गंभीरगिरा ॥ ऐशिया वरा रमाधव बोले ॥२९०॥परमानंदाची आली भरणी ॥ निजसुखाची उघडली खाणी ॥ तेवीं मृदुमंजुळमधुरवाणी ॥ सारंगपाणी बोलतसे ॥९१॥तो स्वमुखें ह्मणे ब्रह्मयासी ॥ सृष्टिसर्जनसामर्थ्यासी ॥ तप केलें माझेआज्ञेसीं ॥ तेणें मी संतोषी बहुत झालों ॥९२॥जेवीं कां निजबाळ तान्हें ॥ नाचोलागे मातेच्यानी वचनें ॥ तें देखोनियां पां नाचणें ॥ सुखावे मनें माउली जैशी ॥९३॥तेंवी ‘ तप ’ माझें वचन ॥ ऐकोनी केलें अनुष्ठान ॥ तेणें अनुष्ठानें मी आपण ॥ जाणिजे संपूर्ण संतोषलों ॥९४॥जो मी तुझेनी तपे संतोषलों ॥ प्रत्यक्ष तुजसा भेटलों ॥ तो मी हृदयस्थ दूर केलों ॥ दुःप्राप्य जाहलों कूटयोगियां ॥२९५॥जे विषय कल्पूनि चित्तीं ॥ नाना तपें आचरती ॥ त्यांसी नव्हे माझी प्राप्ती ॥ जाण निश्चितीं कूटयोगी ते ॥९६॥ज्या कनककांता आवडे चित्तीं ॥ ज्यांसी लोकेषेणेची आसक्ती ॥ त्यांसी नव्हे माझी प्राप्ती ॥ ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९७॥जो जग मानी अज्ञान ॥ तेथें मी एकचि सज्ञान ॥ तो कूटयोगी संपूर्ण ॥ कल्पांतींही जाण नपवे मातें ॥९८॥कूटऐसें देहातें ह्मणती ॥ त्या देहाची ज्या आसक्ती ॥ त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती ॥ ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९९॥ऐसी कूटयोगियांची स्थिती ॥ देव सांगतसे प्रजापती ॥ तपें तुष्टला लक्ष्मीपती ॥ होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP