मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक ८ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक ८ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक ८ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥दिव्यं सहस्राब्धममोघदर्शनोजिता निलात्मा विजितोभयेंद्रियः ॥ अतप्यतस्माखिललोकतापनं तपस्तपीयांस्तपतां समाहितः ॥८॥ ॥ टीका ॥मनुष्याचा जो जाणिजे मास ॥ तो देवांचा एक दिवस ॥ ऐसी संख्या सहस्रवरुष ॥ तपसायास करी ब्रह्मा ॥११५॥ऐसीं सहस्रवरुषेंवरी ॥ ब्रह्मया कमलासनीं तप करी ॥ त्याच्या तपाची थोरी ॥ व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥हे आदिकल्पींची जुनाट कथा ॥ होय श्रीव्यासची वक्ता ॥ तेणें आणोनियां वेदार्था ॥ यथार्थ वार्ता निरूपिली ॥१७॥तीच श्रीशुकें परीक्षिती ॥ निरूपिती कृपामूर्ती ॥ या विंरिचीची तपप्राप्ती ॥ उत्कृष्ट स्थिती अवधारा ॥१८॥ब्रह्मा कमलासनीं तप करी ॥ नवल त्याचे धारिष्टाची थोरी ॥ नानाइंद्रियविकारी ॥ परी झाला अविकारी निजनिष्ठ ॥१९॥शमदमाचेनी निजमेळें ॥ जिंतिले मनपवनांचे उल्लाळे ॥ इंद्रियांचे अपार पाळे ॥ तेणें तपोबळें आक्रमिले ॥१२०॥मन अमन पाहों आदरिलें ॥ तंव तें चंचलत्व विसरलें ॥ चित्तविषयचिंते मुकलें ॥ चित्तीं चिंतलें चैतन्य पैं ॥२१॥बुद्धीनें दृढबोध धरिला ॥ तेथें अहंकार कापिन्नला ॥ तेणें सोहंभाव बळकावला ॥ तेव्हां प्राण परतला दचकोनी ॥२२॥देहीं दशधा धांवत होता ॥ तो एकवठुनी आंतौता ॥ धरूनि सोहंचा सांगाता ॥ पश्चिमपंथा चालिला ॥२३॥यापरी मनपवनांसी ॥ जिंतिलेसें निजनिष्ठेसी ॥ तंव बहिरिंद्रियांसी ॥ द्शा आपैसी बाणली ॥२४॥डोळ्यां डोळे देखणें झालें ॥ तेणें दृश्याचें देखणें ठेलें ॥ श्रवण अनुहतध्वनी लागले ॥ तंव शब्दा वरिलें निःशब्दें ॥२५॥स्पर्शें स्पर्शावें जंव देहीं ॥ तंव देहीं देहत्वस्फुरण नाहीं ॥ देहींच प्रकटला विदेही ॥ तेथें स्पर्शें काई स्पर्शावेंपें ॥२६॥चित्कळा वोळली वोरसें ॥ गोडी रसनेमाजीं प्रवेशे ॥ रसना लाजे विषयतोषें ॥ सर्वांग तेणें रसें अतिगोड ॥२७॥घ्राणी घेऊं जातां गंधासी ॥ प्राण चालिला पश्चिमेसी ॥ मागें कोण सेवी गंधासी ॥ एवं विषयासी विरक्ति स्पष्ट ॥२८॥मन इंद्रियद्वारें विषयीं धांवे ॥ त्यासी प्रत्याहार लाविला सवें ॥ यालागीं तें जीवेंभावें ॥ झालें निजस्वभावें निर्विषय ॥२९॥ज्ञानेंद्रियें जिंकिलीं ऐसीं ॥ तैं कर्मेंद्रियांची स्थिति कैसी ॥ तेंही सांगेन तुजपाशीं ॥ ऐके राजर्षि नृपवर्या ॥३०॥जेवीं धूर जिंकिलिया रणीं ॥ कटक जिंकिलें तेंचि क्षणीं ॥ तेवीं मनोजयाची बांधावणी ॥ तोचि करणीं सर्व विजय समजे ॥३१॥विजय बांधावा राजद्वारीं ॥ तंव गुढिया उभविजे घरोघरीं ॥ तेंवीं मनोजयाची थोरी ॥ तेंचि इंद्रियद्वारीं नांदत ॥३२॥वाचा वदली सत्यासत्य ॥ तिसी रामनामें दिलें प्रायश्चित्त ॥ वाच्यवाचक स्फुरेना तेथ ॥ वाचा स्फुरत तच्छक्ती ॥३३॥जैं भेटोंनिघे मना मन ॥ तैं हात मोकळे संपूर्ण ॥ तेव्हां क्रियेमाजीं अकर्तेपण ॥ आपुलें आपण हातावरी ॥३४॥क्रिया रतली चिच्छक्ती ॥ तेणें ज्ञानगम्य चरणांची गती ॥ तेव्हां गमनप्रत्यावृत्ती ॥ समाधान स्थिती आसनस्थ ॥१३५॥यापरी जिंतूनी चरण ॥ दिव्यसहस्र वरुषें जाण ॥ दृढ घालूनियां आसन ॥ प्राणापान वश्य केले ॥३६॥मनीं कामाचा अतिसाटोप ॥ तेणें खवळला उटी कंदर्प ॥ तें मन चिंती जें चिद्रूप ॥ तैं कामकंदर्प असतांच नाहीं ॥३७॥जेथें मन असे इंद्रियें उरलें ॥ तेथें कंदर्पाचें चालोंशकलें ॥ चित्त चिद्रूपध्यानीं गुंतलें ॥ तैं कांही नचले काम कंदर्पाचें ॥३८॥देखोनी रंभेचा साटोप ॥ शुकापोटीं नुठे कंदर्प ॥ ज्याचे हृदयीं नुठे कामसंकल्प ॥ तो निर्विकल्प सर्वार्थीं ॥३९॥काम तापसांचा उघड वैरी ॥ मन जिंकोंनेणे त्यातें मारी ॥ जे गुंतलें चिदाकारीं ॥ त्यांचे तोडरीं अनंग रुलत ॥१४०॥गुदेंद्रियाचा स्वभाव क्षर ॥ तंव ध्यानबळें साचार ॥ क्षरीं प्रगट होय अक्षर ॥ क्षराक्षर नुरवुनी तेथें ॥४१॥ज्ञानकर्मेंद्रियें दाही ॥ अकरावें मन ते ठायीं ॥ यापरी उभयेंद्रियें पाही ॥ जिंतूनी दूढदेही तो झाला ॥४२॥अंतरीं निग्रह दृढ केला ॥ शम शब्दें तो वाखाणिला ॥ बाह्येंद्रियां नेम केला ॥ तो दम बोलिला शास्त्रज्ञीं ॥४३॥हृदयींचेनी विवेकमेळें ॥ वैराग्याचे अनुतापवळें ॥ शमदमाचेनी निखळें ॥ तप प्रांजळें दूढ केलें ॥४४॥परी तें तप जाहलें कैसें ॥ लोक प्रकाशे निजप्रकाशें ॥ एवढी महिमा आली दशे ॥ त्रैलोक्य भासे त्या तपामाजीं ॥४५॥ऐसा निष्टेचा निजप्रताप ॥ तेणें तप जाहलें सफळरूप ॥ ब्रह्म अजाहला सत्यसंकल्प ॥ तपवक्त्याचें रूप देखोनियां ॥४६॥यालागीं सफळदर्शन ॥ विरिंचीचें तें तपाचरण ॥ आचरला निजांगें जाण ॥ ब्रह्मा आपण नेमनिष्ठा ॥४७॥तपाचे निजनेमेंसी कष्ट ॥ साधिले स्वनिष्ठें चोखट ॥ यालागीं तो अतिश्रेष्ठ ॥ जाहला वरिष्ठ तपस्व्यांमाजीं ॥४८॥देखावें तपवक्त्याचें रूप ॥ ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प ॥ यालागीं वैकुंठपीठदीप ॥ कृपाळु सत्यसंकल्प स्वरूप दावी ॥४९॥न होतां गुरुकृपा संपूर्ण ॥ कदा न साधे आत्मज्ञान ॥ त्या गुरुत्वालागीं नारायण ॥ आपुलें आपण स्वरूप दावी ॥५०॥नसेवितां सद्गुरुचरण ॥ स्रष्ट्यासी नव्हें ब्रह्मज्ञान ॥ त्या गुरुत्वाचें महिमान ॥ श्रीनारायण स्वयेंदावी ॥५१॥मागें उपदेंशीलें ‘ तप तप ’ ॥ परी प्रत्यक्ष नव्हे सद्गुरुरूप ॥ गुरुकृपा नव्हतां सद्रूप ॥ शिष्याचे विकल्प नतुटती कदा ॥५२॥संतोषोनी सद्गुरुनाथ ॥ शिष्याचे माथां जों नठेवी हात ॥ तोंवरी नातुडे परमार्थ ॥ हा निश्चितार्थ हरिजाणे ॥५३॥यालागीं श्रीनारायण ॥ गुरुत्वें आपुलें आपण ॥ शिष्यासी देऊनी दर्शन ॥ स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥निष्ठें केली तपस्थिती ॥ तेणें झाली सद्गुरुप्राप्ती ॥ आतां गुरुमुखें प्रजापती ॥ आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥१५५॥जैं पूर्वपुण्याची निष्कामजोडी ॥ तैं सद्गुरुचरण जोडिती जोडी ॥ गुरुचरणीं आवडी गाढी ॥ तै पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥गुरूच्या ठायीं नीचपण ॥ शिष्यें देखीलें असें जाण ॥ अणुमात्र केलीया हेळण ॥ ब्रह्मज्ञान कदा नुपजे त्या ॥५७॥गुरूतें पाहतां मनुष्यबुद्धीं ॥ ज्ञान नव्हेगा त्रिशुद्धी ॥ यालागीं कृष्णकृपानिधी ॥ निजवैभवसिद्धि स्रस्ट्यासी दावी ॥५८॥गुरूचें अगाध महिमान ॥ दावावया श्रीनारायण ॥ जेथें लक्ष्मी करी संमार्जन ॥ तें वैकुंठभुवन स्वयें दावी ॥५९॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP