मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|टीका| श्लोक १६ टीका आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ श्लोक ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ आरती एकनाथाची अथ चिरंजीवपदप्रारंभः नानक चतुःश्लोकी भागवत - श्लोक १६ एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत Tags : bhagvatekanathsantएकनाथभागवतसंत श्लोक १६ Translation - भाषांतर ॥ श्लोक ॥किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसि लक्षितं श्रिया ॥ अध्यर्हणीयासनमास्थितं परं वृतं चतुःषोडशपंचशक्तिभिः ॥१६॥ ॥ टीका ॥मागुतेनी तो कैसा भगवंत ॥ निजभाग्यें विधातां देखत ॥ माथां मुकुट रत्नखचित ॥ सुमनीं संयुक्त कबरीबंध पैं ॥४२॥चतुर्भुज घनसांवळा ॥ मकरकुंडलें कौस्तुभ गळां ॥ वैजयंती वक्षःस्थळा ॥ आपाद वनमाळा रुळत ॥४३॥विजृशरण आली हरीसी ॥ अस्ता जाणें खुंटलें तीसी ॥ तैसा पीतांबर कासेसी ॥ दिव्यतेजेंसी तळपतसे ॥४४॥नाभीं आवर्तला आनंद ॥ परमानंदें वाढलें दोंद ॥ सर्वांगें सच्चिदानंद ॥ स्वानंदकंद शोभतसे ॥२४५॥पाहतां हरीचीं करतळें ॥ संध्याराग लाजिन्नला पळे ॥ अधर आरक्तपोवळें ॥ सुकुमार रातोत्पळें तैसें चरण ॥४६॥चरणीं तोडर गर्जती देखा ॥ ध्वजवज्रांकुशऊर्ध्वरेखा ॥ पाहतां पायींच्या सामुद्रिकां ॥ सनकादिका आनंद बहु ॥४७॥पडतां पायींच्या पायवण्यासी ॥ शंकर वोढवी मस्तकासी ॥ तेणें शिवत्व आलें त्यासी ॥ अद्यापि शिरीं वाहतसे ॥४८॥त्याचिये वक्षःस्थळीं वामा ॥ वामांगीं बैसलीसे रमा ॥ तिच्या भाग्याची थोर सीमा ॥ नवर्णवें महिमा श्रुतिशास्त्रां ॥४९॥रमा बैसताचि अर्धांगीं ॥ तिच्या निजशक्ति अनेगी ॥ उभ्या तिष्ठती निजविभागीं ॥ आज्ञाविनियोगीं अधिकार त्या ॥२५०॥श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण ॥ रमासमवेत रमारमण ॥ तेथें सृष्टीचें कार्यकारण ॥ ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥करावया सृष्टिसर्जन ॥ ब्रह्मा पुढें देखे नारायण ॥ सृष्टीचें कार्यकारण ॥ आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥चारी पांच आणि सोळा ॥ ऐसा पंचविसांचा मेळा ॥ आज्ञाधारक हरिजवळा ॥ विधाता डोळां स्वयें देखे ॥५३॥त्यांची शक्ति कोण कोण ॥ कोण कार्य कोण कारण ॥ कैसें कैसें त्यांचें लक्षण ॥ नामाभिधान तें ऐका ॥५४॥प्रकृति पुरुष महदहंकार ॥ हा चतुःशक्तींचा प्रकार ॥ पंचशक्तींचाहि विचार ॥ जाण साचार महाभूतें ॥२५५॥ज्ञानकर्मेंद्रियांचें लक्षण ॥ अकरावें गणिजे पैं मन ॥ पंचतन्मात्रा विषय जाण ॥ यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥या पंचविसांच्या पोटीं ॥ ब्रह्मांडेसीं उठिजे सृष्टी ॥ त्याहि माजीं त्रिगुणत्रिपुटी ॥ अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥ References : N/A Last Updated : July 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP