अथ चिरंजीवपदप्रारंभः

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


श्रीगणेशायनमः ॥
चिरंजीवपदपावावयासी ॥ अधिकारकैसाधकासी ॥ तेकिंचित्बोलोनिश्चयासी ॥कळावयासीसात्विका ॥१॥
प्रथमपाहिजेअनुताप ॥ त्याचेंकैचेंस्वरूप ॥ नित्यमृत्युजाणेंसमीप ॥ नमनीअल्पदेहसुख ॥२॥
ह्मणेनरदेहेकिमर्थनिर्मिला ॥ तोम्याविषयभोगींलाविला ॥ आहापरमार्थस्वार्थबुडाला ॥ करीवहिलाविचार ॥३॥
ऐसाअनतापवाहतांचित्ता ॥ वैराग्ययेत्याचियाहाता ॥ त्या वैराग्याचीकथा ॥ ऐकआतांसांगेन ॥४॥
तेंवैराग्यबहुतापरी ॥ बोलिलेआहेतीअवधारी ॥ सात्वीकराजसतामसत्रिप्रकारी ॥ ओगेश्वरींबोलिजे ॥५॥
प्रथम राजसतामसदोनी ॥ अल्पसांगौकलोनी ॥ जैसाधकालागुनी ॥ अंतरीहुनीत्यागाव्या ॥६॥
राजसतामसत्याग ॥ तेणें न कळे परमार्थमार्ग ॥ करावासात्वीकत्याग ॥ सुखअव्यंगतेणेंलाभे ॥७॥
नेणेंवेदविधिविचार ॥ नाहींसत्कर्मसाचार ॥ करीकर्मभ्रष्टाचार ॥ तो अपवित्रतामस ॥८॥
त्यागलोकपूज्यतेकरणें ॥ सत्संगसांडूनिसेवाघेणें ॥ शिष्यममताधरूनीराहणें ॥ तेजानणेंराजस ॥९॥
ऐसें वैराग्यराजसतामस ॥ तोत्यागनमनेसंतास ॥ जेणेंनभेटेकृष्णपरेश ॥ अनर्थासतेंमुळ ॥१०॥
आतांवैराग्यशुद्धसात्विक ॥ जेंजगद्वद्यमानीयदुनायक ॥ तेंसविस्तरऐक ॥ मनीनिष्टंकबैसावया ॥११॥
भोगइच्छाविषइक ॥ तेजोसांडिसकळिक ॥ प्रारब्धेंप्राप्तहोतांदेख ॥ तेथुनीनिष्टंकआंगकाढी ॥१२॥
जेणेंधरिलाशुद्धपरमार्थ ॥ त्यासीजनमान्यताअतिअनर्थ ॥ तेणेंवाढेविषयस्वार्थ ॥ ऐकानेमस्तसांगेन ॥१३॥
नैराश्यपुरुषदेखोनि ॥ त्याचीस्तुतिकीजेजनीं ॥ येकसन्मानेंकरूनी ॥ पुजिलागुनीपैनेती ॥१४॥
विषयपांचआहेती ॥ तेअवश्यसाधकानाडिति ॥ तेथेंचिलागेप्रीती ॥ कवणेरितीतेऐका ॥१५॥
याचेवैराग्यकोमळकंटक ॥ नेटनधरिचनिष्टंक ॥ देखोनिमानअलोलिक ॥ भुललादेखपैतेथें ॥१६॥
जनस्तुतीलागेमधुर ॥ ह्मणतीहाउद्धरावयाअवतार ॥ आह्मांलागींजालास्थिर ॥ तेणेंधरीउपारशब्दगोडी ॥१७॥
हापांचामाजी प्रथम ॥ शब्दविषयउपक्रम ॥ आतांस्पर्शविषयसंभ्रम ॥ झोंबेपरमतोकैसा ॥१८॥
नानामृदुआसनेघालिती ॥ विचित्रपर्यंक निद्रेप्रती ॥ नरनारिशुश्रुषाकरिती ॥ तेणेंधरीप्रीतिस्पर्शाची ॥१९॥
रुपवीषयोकैसागोवि ॥ वस्त्रेंभूषणेंदेतीबरवी ॥ तेणेंसौंदर्यमानीजिवी ॥ देहीभावीश्लाघ्यता ॥२०॥
रुपविषयोऐसाजडला ॥ मगरसविषयोकैसाझोंबला ॥ ज्याची आंवडतेत्याला ॥ गोडगोडालाअर्पिंती ॥२१॥
तेरसगोडीकरितां ॥ घडिघडिधरीममता ॥ मगगंधविषयोवोढितां ॥ होयतत्त्वतातोकैसा ॥२२॥
अवडेसुगंधचंदन ॥ अवडेबुकासुमन ॥ ऐसेंपंचविषयपूर्ण ॥ जडलेजाणतयासी ॥२३॥
मजजेजेत्यासीमानिती ॥ तेचित्याचीनिंदाकरिती ॥ तरीअनुतापनुपजेचित्ती ॥ ममतानिश्चितीपूजकाची ॥२४॥
ऐसापरमअनर्थसाधकासी ॥ जनमान्यताविघ्नत्यासी ॥ जेणेंलाधेविषयासी ॥ त्याचिन्हासीनबोलिलो ॥२५॥
ह्मणालजोविवेकीआहे ॥ त्यासीजनमान्यताकरीकाये ॥ हेबोलणेंमूर्खांचेहोये ॥ ज्याचाडआहे मनाची ॥२६॥
ज्ञात्यासीप्रारब्धगती ॥ मानझालातरीनघेती ॥ तेथें गुंफोनिनराहती ॥ उदास होती तात्काळ ॥२७॥
परीसाधकाचाचित्ता ॥ मानगोडीनसुटे सर्वथा ॥ जरीकृपाउपजेभगवंता ॥ तरीहोयमागुताविरक्त ॥२८॥
तो विरक्तकैसाह्मणाल ॥ तरी मानिलेटाकीस्थळ ॥ सत्संगीराहे निश्चड ॥ नकरी तळमळमानाची ॥२९॥
नमांडीस्वतंत्रफड ॥ कांजेआंगयेईलअहंतावाड ॥ जिविकेचीनधरीचाड ॥ नबोलेगोड मनधरणी ॥३०॥
नावडेप्रपंचजनिबैसणें ॥ नावडेयोग्यता मिरवणें ॥ नावडेकोणासी बोलणें ॥ बरवेखाणेनावडे ॥३१॥
नावडेलेणीलुगडी ॥ नावडेलौकिकपरवडी ॥ नावडेपरान्नाचीगोडी ॥ द्रव्यजोडिनावडे ॥३२॥
नावडेस्त्रियांतबैसणें ॥ नावडेस्त्रियांतें पाहणें ॥ नावडेंस्त्रियाचेंरगडणें ॥ बरवेखाणेनावडे ॥३३॥
आशंका ह्मणालग्रहस्तकेसाधके ॥ स्त्रियासंडूनिजावेके ॥ येविषींउत्तरनीके ॥ परीसाविवेकेभावार्थीं ॥३४॥
तरीस्वस्त्रियेवांचूनी ॥ नातळावीआनकामिनी ॥ कोणास्त्रियेसीसंन्निधवाणी ॥ आश्रयेगुणीनद्यावा ॥३५॥
स्वस्त्रियेसहीकार्यापुरतें ॥ बोलावें स्पर्शावेनिरुतें ॥ परीआसक्तहोऊनितेथें ॥ विरक्तसंतेंनवर्तावें ॥३६॥
नकोनकोस्त्रियांचासांगात ॥ नकोस्त्रियांचाएकांत ॥ नकोनकोस्त्रियांचापरमार्थ ॥ करीअपघातपुरुषार्थीं ॥३७॥
जरीस्त्रियासेवाकरिती ॥ भक्तिममताउपजविती ॥ तरीतयाचे संगती ॥ शुद्धपरमार्थींनबैसवि ॥३८॥
अखंडएकांतीअसणें ॥ प्रमदासंगेनराहणे ॥ जे निःस्म्गनिराभिमाने ॥ त्याजवळीबैसणें सर्वदा ॥३९॥
कुटुंबआहारार्थअन्न ॥ अकल्पितनमिळेंतरी कोरान्नकरणें ॥ ऐसेंजयाचेंवर्तनें ॥ तेजाणनेवैराग्य ॥४०॥
ऐसेंवैराग्यनाहींज्यासीं ॥ कृष्णप्राप्तीकैसीत्यासी ॥ म्हणोनिकृष्ण भक्तीसी ॥ स्थितीऐसीपाहिजे ॥४१॥
ऐसीस्थितीज्यासीनाहीं ॥ तो कृष्णभक्तनव्हेचिकांहीं ॥ दांभिकजाणावानिश्चयी ॥ ज्ञाननाहींत्यालागीं ॥४२॥
यास्थितिवांचूनिनिजाण ॥ कृष्णमिळेलम्हणेतोअज्ञान ॥ तोसकळमुर्खाचेअधिष्ठान ॥ लटिकेतरीआणदेवाची ॥४३॥
हेबोलणें माझीयेमतीचे ॥ नोहेनोहेगासाचे ॥ देवेंसांगितलेंहिताचे ॥ तेमीसाचेंबोलिलो ॥४४॥
साचनमानीज्याचेंमन ॥ विकल्पेंनवपेकृष्ण चरण ॥ माझेंकायजाईलजाण ॥ मीतोसांगुनउतराई ॥४५॥
साधावयावैराग्यनिधान ॥ साधकीकरावाप्रयत्न ॥ म्हणेएकाजनार्दन ॥ आणिकयत्नअसेना ॥४६

॥ इतिचिरंजीवपदसमाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP