चतुःश्लोकी भागवत - श्लोक २६

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


तथाऽपि नाथमानस्य नाथ नाथय नाथितम् ॥ परावरे यथारूपे जानीयां ते त्वरूपिणः ॥२६॥    

॥ टीका ॥
ऐसा स्वामी विश्वनाथ ॥ तूं अनाथांचा निजनाथ ॥ मज करावें जी सनाथ ॥ ऐसें प्रार्थित उपतप्यमान ॥२३॥
कां ह्मणसी उपतप्यमान ॥ मी केवळ जाहलों अज्ञान ॥ त्या मजवरी कृपा करून ॥ निजगुह्यज्ञान सांगावें पैं ॥२४॥
कोणतें ह्मणसी गुह्यज्ञान ॥ तुझें सूक्ष्मस्वरूप निर्गुण ॥ आणि स्थूल तेंही तूंचि आपण ॥ हें अभेद निजज्ञान सांगिजे मज ॥३२५॥
मी जडमूढ अतिदीन ॥ तुझे नाम हें दीनोद्धरण ॥ माझें समूळ निरसे अज्ञान ॥ ऐसें गुह्यज्ञान उपदेशी ॥२६॥
स्थूलसूक्ष्म तुझेंचि रूप ॥ रूपीं वार्तोनी तुं अरूप ॥ हें तुझें ज्ञान निर्विकल्प ॥ कृपानुरूप मज सांगे ॥२७॥


References : N/A
Last Updated : July 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP