मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ६२ ते ६३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६२ ते ६३ Translation - भाषांतर रुक्मिण्या हरणं श्रुत्वा गीयमानं ततस्ततः ।राजानो राजकन्याश्च बभूवुर्भृशविस्मिताः ॥६२॥सूतमागधबंदिजन । गायक नर्तक कलाप्रवीण । सर्वत्र भूतळीं गाती जाण । पाणिग्रहण भीमकीचें ॥६९॥गंधर्व गाती अमरभुवनीं । नारदप्रमुख ब्रह्मसदनीं । कम्बलाश्वतरुप्रमुख फणी । शेषायतनीं वाखाणिती ॥११७०॥असो भूतळीं बहुधा नृपति । रजकन्या राजयुवति । रुक्मिणी हरणविवाहकीर्ति । विस्मित होती ऐकोनी ॥७१॥राजाङ्गना म्हणती दैव । कन्यादानकृतगौरव । जामातृभावें वासुदेव । शुद्धमतीनें पूजिला ॥७२॥ऐसें आम्हांस भाग्य कैचें । सान्निध्य लाहोनि श्रीकृष्णाचें । कन्यादानमिसें साचें । सार्थक जन्माचें घडेल ॥७३॥राजकन्या इच्छिती मनीं । आम्हां तुष्टोनि भवभवानी । रुक्मिणीऐसा चक्रपाणि । पाणिग्रहणीं वर हो कां ॥७४॥राजे म्हणती धन्य भाग्य । जामात जोडल्या श्रीरंग । वसुदेवप्रमुख पंक्तियोग्य । पूज्यता साङ्ग पावला ॥११७५॥रुक्मी दुर्मति विमुख भजनीं । तत्पापें त्या विटंबणी । येर चौघे सहरुक्मिणी । श्रीकृष्णचरणीं अनुसरले ॥७६॥ऐकोनि दुष्टासी खरखरा । मागधप्रमुख भंगल्या धुरा । शिशुपाळाची हरिली दारा । द्वारकापुरा जयलाभ ॥७७॥यथाधिकारें भूमंडळीं । कीर्तिरूपें श्रीवनमाळी । सर्वांचिये हृदयकमळीं । तद्गुनशाळी स्फुरद्रूप ॥७८॥द्वारकायामभूद्राजन्महामोदः पुरौकसाम् ।रुक्मिण्या रमयोपेतं दृष्ट्वा कृष्णं जगत्पतिम् ॥६३॥कुरुकुलक्षीरार्नवसंभवा । हृद्भूषण तूं वर वैष्णवां । रमा रुक्मिणी वासुदेवा । प्रभुदित पुरजन देखोनी ॥७९॥स्वयें श्रीकृष्ण मंगलधाम । लोकत्रयाचा कल्याणकाम । रमारुक्मिणीरमणाराम । मेघश्याम मोदाब्धि ॥११८०॥कृष्णमोदें प्रमुदित विश्व । विश्वाह्लादें वासुदेव । गृहस्थधर्माचें गौरव । त्रिजगीं स्वमेव प्रकाशी ॥८१॥एवं द्वारकेमाझारी । परमानंद घरोघरीं । देव वर्षती कुसुमें अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥८२॥यापरी गृहप्रवेश । करोनियां हृषीकेश । रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ॥८३॥शुक म्हणे गा परीक्षिति । गृहस्थ झाला श्रीपति । भीमकीहरणाची हे ख्याति । म्यां तुजप्रति सांगितली ॥८४॥एवं हरण पाणिग्रहण । तुज केलें गा श्रवण । त्याच्यानि श्रवणें जाण । दोष दारुण नासती ॥११८५॥ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण । कळसा आलें निरूपण । प्रेम सज्जन जाणती ॥८६॥रुक्मिणीहरणवार्ता । जुनाट होय सर्वथा । परी पाणिग्रहणव्यवस्था । नवी कथा कवित्याची ॥८७॥ऐसा विकल्प मानाल झणी । जें बोलिले व्यासवाणी । तोचि ग्रंथ विस्तारोनि । प्रकट केला प्राकृत ॥८८॥यथाविधि पाणिग्रहण । मुळींच आहे व्यासवचन । तें सूत्रप्राय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलों ॥८९॥साच न मानी ज्याचें चित्त । तेणें पहावें श्रीभागवत । तेथील श्लोकींचा श्लोकार्थ । ऐसाचि आहे सर्वथा ॥११९०॥राजे जिणोनि दारुण । भीमकी आणूनि आपण । कृष्णें केलें पाणिग्रहण । हें निरूपण मुळींचें ॥९१॥येणेंचि पदें पदविस्तारीं । कथा चालिली पुढारीं । खोडी न ठेवावी चतुरीं । ग्रंथ निर्धारीं न पाहतां ॥९२॥जैसें वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय । तैसीच हेहि कथा आहे । थोडेनि बहुत विस्तारें ॥९३॥मूळ सांडूनि सर्वथा । नाहीं वाढविलें ग्रंथा । पाहतां मुळींच्या पदार्था । अर्थें कथा चालिली ॥९४॥नाहीं ग्रंथारंभसंकल्प । न होतां श्रोत्यांचा साक्षेप । ग्रंथीं उजलिला कृष्णदीप । सुखस्वरूप हरिकथा ॥११९५॥ जेणें हा ग्रंथ करविला । तो आधींच उपरमला । पुढें ग्रंथ कैसा चालिला । बोलतां बोला न बोलवे ॥९६॥नेणों काय कृष्णनाथा । हे आवडली ग्रंथकथा । तोचि होवोनि कर्ता वक्ता । अर्थ परमार्था आणिला ॥९७॥ये ग्रंथींचें निरूपण । जीवशिवा होतसे लग्न । अर्थ पाहतां सावधान । समाधान सात्त्विकां ॥९८॥येथ विवेकी व्हावा वक्ता । सावधान पाहिजे श्रोता । त्याचेनि संवादें हरिकथा । सुख समस्तां देईल ॥९९॥घेवोनि अनुभवकसवटी । कथा चालिली मराठी । ओंवी न चले फुकासाठीं । श्रद्धा पोटीं धरिलिया ॥१२००॥हें कृष्णकथा आलोलिक । महादोषांसि दाहक । भवरोगाची छेदक । अर्थमात्र सेविलिया ॥१॥हे मुमुक्षाची कुलदेवता । मुक्तांची तरी हे नित्य मुक्तता । येरां संसारियां समस्तां । नवरसें निववीत ॥२॥जरी कोणी स्वभावें पढे । तरी उघडती कानींचीं कवाडें । अर्थ एकतां निवाडें । पुढें पुढें अतिगोड ॥३॥गोडपण पडतां मिठी । सुटती जीवशिवांच्या गांठी । कृष्णकृपा होय गोमटी । उठाउढीं निजलाभ ॥४॥जेथें भीमकीचें पुरलें आर्त । तो हा आदरें वाचितां ग्रंथ । श्रोतयांचे मनोरथ । कृष्णसमर्थ पुरवील ॥१२०५॥माझे पुरवावे मनोरथ । तें मनचि झाला कृष्णनाथ । एकाजनार्दनीं नित्य तृप्त । पारंगत हरिचरणीं ॥६॥एकाजनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण । सहजीं खुंटलें निरूपण । महामौन मुद्रेचें ॥७॥वाराणासीमहापुरीं । मणिकर्णिकेच्या तीरीं । रामजयंती माझारीं । ग्रंथ निर्धारीं संपविला ॥८॥मुख्य जनार्दन वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता । जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ॥९॥एका एकजनार्दनीं । जनार्दन एकपणीं । जैसें जाह्नवीचें पाणी । मणिकर्णी अतितीर्थ ॥१२१०॥शके चौदाशें त्र्याण्णव । प्रजापति संवत्सराचें नांव । चैत्रमासाचें वैभव । पर्व अभिनव रामनवमी ॥११॥तये दिवशीं सार्थक अर्थीं । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ति । एकादनार्दनकपास्थिति । वारानसीप्रति झाली ॥१२॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां गृहप्रवेशलक्ष्मीपूजनं नामाष्टादशप्रसंगः ॥१८॥श्रीमदेकनाथ भगवान । तदुक्त रुक्मिणीपाणिग्रहण । टीकासंदर्भ श्लोकव्याख्यान । ग्रंथसंयोजन पैं केलें ॥१३॥पुढें अध्यायीं पंचावन्नीं । समात्प पंचम एकादशिनी । तिये कथेच्या निरूपणीं । श्रोतयांलागोनि निमंत्रण ॥१४॥तमांश म्हणोनि रुद्रावतार । महामायावी शंबरासुर । त्याचिये सदनीं स्मरकलत्र । रति निरंतर वसतसे ॥१२१५॥मन्मथ जाळिला जैं शंकरें । तैं रति आक्रंदे आर्तस्वरें । अशरीरी गगनोच्चारें । तीस निर्जरीं गुज कथिलें ॥१६॥मन्मथ जन्मेल रुक्मिण्युदरीं । तंववरी राहें शंबराघरीं । शंबरासुरातें जो मारी । तो निर्धारीं तव भर्ता ॥१७॥ऐसा ऐकोनि गगनोच्चार । सशोक रतीचें अंतर । कांहीं न स्फुरे विचार । मग नारदें सविस्तर प्रबोधिलें ॥१८॥पुढले अध्यायीं ते कथा । रुक्मिणी प्रसवेल मन्मथा । शंबरा वधूनि रतीची व्यथा । स्मर सर्वथा निवारील ॥१९॥तिये कथेच्या व्याख्यानें । श्रवणें भेटती गतसंतानें । वैरियांचीं निःसंतानें । शंबरापरी हरि कर्ता ॥१२२०॥तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मपित ग्रंथ । वक्ता शुकाचार्य समर्थ । श्रोता भारत परीक्षिति ॥२१॥त्यामाजील स्कंध दशम । कृष्णें केला गृहस्थाश्रम । तो हा अध्यय उत्तमोत्तम । चौपन्नावा संपला ॥२२॥कृष्णदयार्णवाची विनति । श्लोकव्याख्यान शैशवमति । संयोजिलें तें विपश्चितीं । पाहोनि निगुतीं शोधावें ॥२३॥न्यून पूर्ण असंलग्न । जेथ संदिग्ध संशयापन्न । भ्रामक भासेल जरी व्याख्यान । सरळ करून तें दीजे ॥२४॥श्रोता एकाजनार्दन । वक्ता एकाजनार्दन । बुद्धिबोधक जनार्दन । कृतव्याख्यान एकत्वें ॥१२२५॥तृतीय शक शालिवाहन । गताब्द सोळाशेंसत्तावन्न । राक्षस संवत्सराचें अभिधान । भृगुशुचिकृष्णचतुर्थी ॥२६॥पिपीलिकानामक क्षेत्रीं । स्वतःसिद्ध टीका श्लोकार्थसूत्रीं । व्याख्यानयोजना दयार्नववक्त्रीं । श्रीएकनाथें केलीसे ॥१२२७॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां श्लोकसंदर्भव्याख्यानसंयोजनश्रीमदेकनाथकृतरुक्मिणीस्वयंवरलेखनालंकारकथनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥५४॥श्लोक ॥६३॥ ओव्या ॥१२२७॥ एवं संख्या ॥१२९०॥ ( चौपन्नावा अध्याय मिळून ओवी संख्या २६१६७ ) अध्याय चौपन्नावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP