मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर चैलेन बद्ध्वा तमसाधुकारिणं सश्मश्रुकेशं प्रवपन्व्यरूपयत् ॥३६॥ पूर्वार्धम् ॥बळें धरूनि रुक्मिया वीर । वसनें पाठिमोरे कर । बांधोनि निंदित असाधुकर । विटंबी श्रीधर न मारोनी ॥७१॥मस्तकवपना आणा पाणी । नाहीं आड ना विहीर वनीं । घाला वाटेचें वाटवणी । विनोद मेहुणपणीं मांडिला ॥७२॥अर्धखांड अर्धमिसी । पांच पाट काढिले शिशीं । विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेंसीं बांधिला ॥७३॥रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन । वेगें करी निंबलोण । सकळ जन हांसती ॥७४॥रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बलराम घेऊनि आपण । बन्धमोचन करील ॥४७५॥परिहारमिसें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एकाजनार्दनीं विनोद । परमानंद प्रकटेल ॥७६॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां युद्धवर्णनं रुक्मिविरूपवर्णनं नाम द्वादशप्रसंगः ॥१२॥तावन्ममर्दुः परसैन्यमद्भुतं यदुप्रवीरा नलिनीं यथा गजाः ॥३६॥ उत्तरार्धम् ॥येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर । लोटले येरयेरां समोर । घाय निष्ठुर हाणिती ॥७७॥दाक्षिणात्य राजे निजभारीं । युद्ध पाहती राहोनि दुरी । रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी लोटले ॥७८॥उरलें रुक्मियाचें दळ । यादवीं त्रासिलें प्रबळ । वर्षोनियां बाणजाळ । वीर सकळ भेदिले ॥७९॥यादवांच्या तिखट बाणीं । निधडे वीर पडती रणीं । धडमुण्डाङ्कित धरणी । अर्धक्षणीं तिहीं केली ॥४८०॥कृष्णें रुक्मिया बांधिला । उरल्या सैन्या पळ सुटला । जय यादवांसि आला । मग परतला बलभद्र ॥८१॥सरोवरामाजी कमळीं । गज करी रवंदळी । तैसी मर्दूनि शत्रूची फळी । कृष्णाजवळी तो आला ॥८२॥कृष्णांतिकमुपव्रज्य ददृशुस्तत्र रुक्मिणम् ।तथाभूतं हतप्रायं दृष्ट्वा संकर्षणो विभुः ॥३७॥रुक्मियाचें विरूपकरण । देखता झाला संकर्षण । कृपा द्रवलें अंतःकरण । दीन वदन देखोनी ॥८३॥विमुच्य बद्धं करुणो भगवान्कृष्णमब्रवीत् । असाध्विदं त्वया कृष्ण कृतमस्मजुगुप्सितम् ।वपनं श्मश्रुकेशानां वैरूप्यं सुहृदो वधः ॥३८॥सोडूनियां गलबंधन । कृष्णासि म्हणे हे बुद्धि कोण । सोयरियासि विरूपकरण । निंद्य जाण आम्हांसी ॥८४॥शरीरसंबंध्या विरूपबाधु । तंव हा वधाहूनि अधिक वधु । तुंवा केला थोर अपराधु । सुहृदसंबंधु लाजविला ॥४८५॥याचा वध तूं करितासी । तरी हा पावता निजसुखासी । मान देऊनि सोडितासी । सोयरिकेसी श्लाघ्यता ॥८६॥क्षत्रिय सांपडे रणसांकडीं । त्यासि द्यावीं लेणीं लुगडीं । युद्धीं खांड मिशा बोडी । हे अपरवडी तुवां केली ॥८७॥मैवास्मान्साध्व्यसूयेशा भ्रातुर्वैरूप्यचिंतया ।सुखदुःखदो न चान्योऽस्ति यतः स्वकृतभुक्पुमान् ॥३९॥सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । दोष न ठेवीं कृष्णांसी । जो कर्में करी जैसी । फळें तैसीं तो पावे ॥८८॥कृष्ण निजतत्वें तत्वता । कर्में करूनि अकर्ता । बंधुवैरूप्याचा दाता । नव्हे सर्वथा श्रीकृष्ण ॥८९॥तुझिया बंधूचें वैरूप्य । तयाचें त्यास फळलें पाप । हेंचि जाणें भोगाचें निजरूप । सांडीं कोप सर्वथा ॥४९०॥येथें कर्ता तोचि भोक्ता । ऐसी कर्ममर्यादा तत्वता । बोल न ठेवी कृष्णनाथा । हृदयीं व्यथा न धरावी ॥९१॥बंधुर्वधार्हदोषोऽपि न बंधोर्वधमर्हति ।त्याज्यः स्वेनैव दोषेण हतः किं हन्यते पुनः ॥४०॥सवेंचि म्हणे श्रीकृष्णासी । रणीं विटंबूं नये शूरासी । बोल लागला क्षात्रधर्मासी । हृषीकेशी हे अनुचित ॥९२॥दंडायोग्य जर्ही अपराधु । तर्ही दंडूं नये सोयरा बंधु । दंडापरीस अधिक बाधु । न मरूनि वधु त्वां केला ॥९३॥इतरापासोनि अन्याय झाला । तो आपण पाहिजे क्षमा केला । शेखीं तुवां सोयरा दंडिला । बोल लागला निज धर्मा ॥९४॥जो आवडीनें विष प्याला । तो आपणाआपण मारक झाला । त्या अन्याया दंड नाहीं बोलिला । घात केला निज कर्में ॥४९५॥यालागीं जो प्रवर्ते अधर्मासी । तेणेंचि कर्में दंडिजे त्यासी । मेलियासीच कां मारूं पाहसी । रुक्मियासी जाऊं दे ॥९६॥येलियासीच हो मारणें । हेंचि आम्हांसि लाजिरवाणें । विनोद न करावा मेहुणपणें । सोडोनि देणें सर्वथा ॥९७॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP