मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ५६ ते ६१ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ५६ ते ६१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ६१ Translation - भाषांतर नरा नार्यश्च मुदिताः प्रमृष्टमणिकुण्डलाः । पारिबर्हमुपाजह्रुर्वरयोश्चित्रवससाः ॥५६॥विवाहमंडप शोभिवंत । करावया नरनारी समस्त । वस्त्राभरणीं सालंकृत । होऊनि प्रमुदित निघाले ॥२४॥त्रिजगीं विख्यात अमूल्य मणि - । मंडित कुंडलें डोलती श्रवणीं । मुकुटीं पदकीं जैसे तरणी । बाहुभूषणीं कटकींही ॥६२५॥अनर्घ्य वसनें निर्जरभाग्यें । कीं वैष्णवसभामान्यते योग्यें । यादव आथिले जे श्रीरंगें । तिही तद्भाग्यें तीं धरिलीं ॥२६॥अग्निधौतें कनकाम्बरें । रत्नरंगीं चित्रविचित्रें । मंडपीं पूजावया वधूवरें । अहेर गजरे चालविले ॥२७॥कुळदैवतें पूजूनि गृहीं । यादव निघाले सर्वही । तेव्हां द्वारका शोभली पाहीं । भुवनीं तिहीं सौभाग्यें ॥२८॥सा वृष्णिपुर्युत्तभितेंद्रकेतुभिर्विचित्रमाल्यांबररत्नतोरणैः ।बभौ प्रतिद्वार्युपक्लृप्तमंगलैरापूर्णकुंभाऽगुरुधूपदीपकैः ॥५७॥तेजें द्वारका वृष्णिपुरी । शोभती झाली कवणे परी । कौरवचक्रपा सावध श्रोत्रीं । ते अवधारीं वर शोभा ॥२९॥चित्रविचित्र इंद्रध्वज । दामोदरीं तेजःपुंज । उभिले चंचल चपलातेज । लाजविती ते निजतेजें ॥६३०॥महाद्वारीं प्रतिगोपुरें । नगरगर्भीं शिखरोशिखरीं । दामोदरीं विचित्रवस्त्रीं । लोलपताका डोलती ॥३१॥जडितरत्नीं कनकपर्णें । विचित्र माल्याम्बरतोरणें । प्रतिद्वारीसुगंधसुमनें । मंडित भवनें विराजती ॥३२॥सहज द्वारकाभुवनभित्ती । कनकरत्नीं विराजती । कृष्णविवाहोत्सव आणूनि व्यक्ति । शोभा निगुती प्रकाशली ॥३३॥द्वारद्विभागीं उभय वीथी । पूर्ण कलशांचिया पंक्ति । मंडित लाजदध्यक्षतीं । प्रदीप्तदीप्ति फळपुष्पीं ॥३४॥मलयजकृश्णागुरुसौरभ्य । सोज्वळ सफळित कदळीस्तंभ । धूपदीपावलींची शोभ । पुर नभगर्भ प्रमुदित पैं ॥६३५॥सिक्तमार्गा मदच्युद्भिराहूतप्रेष्ठभूभुजाम् । गजैर्द्वाःसु परामृष्टरंभापूगोपशोभिता ॥५८॥राजे बैसोनि मत्तकुंजरीं । यदुभूपाज्ञा वंदूनि शिरीं । येतां जातां नृपमंदिरीं । गजमदधारी भू सिक्ता ॥३६॥आवाहनीं विसर्जनें । सामंत भूपांच्या गमनागमनीं । गजमद स्रवोनि भिजे धरणी । तन्मदसिक्ता मघमघित ॥३७॥द्वारदेशीं उभयभागीं । गज निर्मिले रत्नरंगीं । तत्करसंस्पृष्ट कदळीपुंगीं । शोभा नभाङ्गीं ते दाटे ॥३८॥कुंकुमकस्तूरीमलयजसडे । वीथी प्रसिक्ता चहूंकडे । गगनदीपावळीउजियेडें । गमती मांदोडे सुरतरूंचे ॥३९॥प्रफुल्लारपंकजानना । वृष्णिभोजान्धकाङ्गना । स्वभावें करितां प्रसर्पणा । अमरललना लाजविती ॥६४०॥पुरगोपुरललनालक्ष्मी । पाहतां सुरेंद्रसामरपक्ष्मीं । स्तिमित चक्षु जडले वर्ष्मीं । अद्यापि रश्मि नावरिती ॥४१॥ध्यानस्थमुनिवरांच्या कोटी । लयस्थ मुकुलित मुद्रादृष्टी । तेही प्रस्फुरनेत्रवाटीं । पाहतीं गोमटी पुरलक्ष्मी ॥४२॥असो ऐसी सकौतुका । शोभे साळंकृत द्वारका । परमाह्लाद सकळ लोकां । जगन्नायकाउद्वाहीं ॥४३॥ऐसें वर्हाड सिद्ध झालें । सपरिवारें सुरवर आले । तंव इकडे श्रीकृष्णें काय केलें । तें परिसिलें पाहिजे ॥४४॥पाचारूनि विश्वकर्म्यासी । आज्ञा दिधली मंडपासी । मूळमाधवीं अतिविशेषीं । शोभा चौपासीं आणावी ॥६४५॥मूळमाधवीं अद्यापिवरी । वृक्षमात्र मंडपाकारीं । कृष्णाज्ञा पैं तरुवरीं । अद्यापिवरी पाळिजे ॥४६॥मूळमाधवा आले हरि । शोभा देखोनि साजिरी । संतोषले जी श्रीहरि । सहपरिवारीं उतरले ॥४७॥तीर्थस्नान केलें सहजीं । पूजाविधि सांगिजे द्विजीं । मूळमाधवा माधव पूजी । पुण्यपुंजें ऋषीश्वरीं ॥४८॥भीमकी दिधली भीमकापासीं । थोर उह्लास झाला त्यासी । कन्या नेली निजमंडपासी । हृषीकेशी केळवला ॥४९॥कौण्डिन्यपुरींची आयती । सकळ सामग्री संपत्ति । घेऊनि आली शुद्धमती । भावें श्रीपति पूजावया ॥६५०॥कृष्णरुक्मिणींचें देख । पहावया विवाहसुख । नगरनागरिक लोक । आले सकळिक उह्लासें ॥५१॥कुरुसृंजयकैकेयविदर्भयदुकुंतयः । मिथो मुमुदिरे तस्मिन्संभ्रमात्परिधावताम् ॥५९॥थोर उह्लास श्रीकृष्णासी । मूळें पाठविलीं रायांसी । कुरुसृंजय कैकेयांसी । सोयरियांसी निजलग्ना ॥५२॥कुरुसृंजयादि जे सुहृद । मूळपत्रिकादर्शनीं मोद । पावोनि सहपरिवारीं सिद्ध । परमानंदें ते आले ॥५३॥नाना अहेर उपायनें । दिव्य वस्तु वस्त्राभरणें । अमूल्यवस्तु विविधें रत्नें । कृष्णार्पणा आणियलीं ॥५४॥परमोह्लासें सुहृत्पंक्ति । परस्परें अनुवर्तती । कृष्णविवाहविजयोर्जिती । तोषें न समाती ब्रह्माण्डीं ॥६५५॥एवं मूळ वर्हाडी सोयिरे आप्त । मिनले द्वारकेमाजि समस्त । पुढें चालिले तो वृत्तान्त । श्रोतीं स्वस्थ परिसावा ॥५६॥कृष्णविवाह मनोहर । पाहों आले सुरवर । शिवशाम्भव यक्ष किन्नर । नारदादि वैष्णव ॥५७॥द्वारकावासी झाले सिद्ध । पूर्वीं कथिले एवंविध । मंगलवादिवगीत प्रसिद्ध । भाटमागधजयघोषें ॥५८॥वर्हाड निघालें द्वारकेबाहेरी । गनेश चढिला उंदिरावरी । अग्रपूजेचा अधिकारी । निर्विघ्न करी लग्नासी ॥५९॥सिंहें पसरिलीं चाभाडें । दुर्गा येऊनि त्यावरी चढे । मुक्तकेश खांड उघडें । तेही पुढें निघाली ॥६६०॥वेगें आल्या अष्ट मातृका । एक चढिन्नल्या वृश्चिका । वाराही ते शूकरमुखा । वर्हाड देखा निघाली ॥६१॥नेणती वर्हाडीणी चर्बटा । स्थूल उदर दांत थोटा । उंदिरा चढोनि लटलटा । ढेरपोटा कां आला ॥६२॥विकराळ सिंहांचीं चाभाडें । वायिलें हातीं उघडें खांडें । कोणें बोलविलीं वर्हाडें । अवघ्यांपुढें निघालीं ॥६३॥रोडकें आंग चढे वृश्चिका । कोणें बोलविली चंडिका । फजितीचें वर्हाड देखा । शूकरमुखा कां आली ॥६४॥ऐसियांसी नेतां वर्हाडें । व्याही हांसतील रोकडे । यांसि राहवा मागिलीकडे । वर्हाड पुढें चालों द्या ॥६६५॥मिळोनि पांचां पंचकांचा मेळा । निंदूं लागलिया बरळा । कोपला गणमातृकांचा मेळा । तो तत्काळ रूसला ॥६६॥गणेशें विघ्न केलें गाढें । ठायींचे ठायीं मोडले गाडे । रथींचे पांगुळले जी घोडे । वर्हाड पुढें चालेना ॥६७॥कोपल्या महामातृका । शीतज्वर सोडिला देखा । दुर्गा सोडी विषूचिका । हागी वोकी देखा सूटली ॥६८॥बोकाबोकी वर्हाडिणी । एक म्हणती पाणी पाणी । उठिली माशांचीं गोंगाणी । साउली पोहाणी घाणती ॥६९॥कृष्णासी लग्नाची अति गोडी । कां पां न येती द्वारकेचे वर्हाडी । मार्गीं कांहीं पडली आडी । दूत तांतडी पाठविले ॥६७०॥दूत सांगती श्रीहरी । वर्हाडिणीसी लागली शारी । खटाखटा वाजती दांतोरीं । रथीं कुंजरीं न बैसवे ॥७१॥बहुतां झाली विषूचिक । गाडे मोडले निःशेख । तुटले रथांचे पैं आंख । घोडींही देख पांगुळलीं ॥७२॥कृष्ण म्हणे अबळा मूर्खा । उपहासिलें विनायका । क्षोभविल्या महामातृका । दुर्गा देखा कोपली ॥७३॥कृष्णें स्तविला विनायक । दिधले साखरेचे मोदक । सुखीं झाला विनायक । विघ्न देख निरसिलें ॥७४॥सुखसेवया कुंकुमरेखा । कृष्णें पूजिली अंबिका । सम्मानूनि महामातृका । मंडपीं देखा स्थापिल्या ॥६७५॥वर्हाड पातलें गजरें । गाजती नानापरीचीं तुरें । नरनारी जी अळंकारें । केले साजिरे रथगज ॥७६॥श्रीकृष्णाची निजजननी । देवकी बैसविली सुखासनीं । करवली सुभद्रा बहिणी । गजारोहणीं मिरवती ॥७७॥ज्येष्ठबंधूची जे राणी । रेवती कृष्णाची वोहिनी । यादवांच्या वर्हाडिणी । अनर्घ्य लेणीं लेयिल्या ॥७८॥उग्रसेन वसुदेवासमान । दोघां एकसारिखाचि मान । वर्हाड दाटलें संपूर्ण । भेरी निशाण गर्जती ॥७९॥दोहीं मंडपीं झाली प्रतिष्ठा । होम दिधला हव्यवाटा । द्विज पूजिले बरविया निष्ठा । वस्त्रें ज्येष्ठा अर्पिलीं ॥६८०॥आयिती केली शुद्धमती । भीमकें आणिली सेवती । नोवरा अभ्यंतरीं श्रीपति । यादवपंक्ति बैसलिया ॥८१॥समाधिसुख तेंचि आसन । मुक्तचौकें मंडित जाण । बैसावया श्रीकृष्ण । भीमकें विंदान मांडिलें ॥८२॥च्यार्ही पुरुषार्थ तेचि चवाई । तेंचि आसन त्यावरी पाहीं । पूजावया निज जांवयी । भीमक ठायीं तिष्ठत ॥८३॥म्हणती आचार्य सावधान । शब्द सांडूनि धरा मौन । वर वरिष्ठ श्रीकृष्ण । फळ संपूर्ण त्याहातीं ॥८४॥पाहतां कृष्णाचें रूपडें । अरूपरूपें कृष्ण चहूंकडे । विस्मयें भीमक झालें वेडें । मागें पुढें कृष्ण देखे ॥६८५॥अनंतरूप यादवपति । कैसेनि पूजूं मी श्रीपति । पूज्यपूजकतावृत्ति । तेही स्थिति नाठवे ॥८६॥केवळ प्रपंच तें वर्हाड । परी भीमकाचें भाग्य वाड । पुरत परमार्थाचें कोड । वर्हाड गोड त्या झालें ॥८७॥उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपति । तीर्थें श्रीचरणतीर्थ मागती । कृष्णपदप्राप्ति दुर्लभ ॥८८॥कृष्णपाळा पावे कोण । तेथही सप्रेम चंदन । भीमकें अर्पिलें शुद्ध सुमन । कृष्णभजन दृढभावें ॥८९॥शुद्धसत्वाचें विरजाम्बर । चिद्रत्नांचे अळंकार । भेमकें अर्पोनि अपार । कृष्ण वरावर पूजिला ॥६९०॥भीमक गौरवी व्याह्यांसी । व्याहीरूपें देखे श्रीकृष्णासी । भूतमात्री हृषीकेशीं । निजवृत्तीशी ठसावला ॥९१॥वृद्धपरंपरा ऐसी आहे । वराचे चरण उथी वोहमाये । शुद्धमती येऊनि लवलाहें । वदन पाहे कृष्णाचें ॥९२॥मुगुट कुंडलें कौस्तुभमाळा । झळकत पीताम्बर मेखळा । देखोनियां घनसांवळा । दोहीं डोळां निवाली ॥९३॥झणीं लागेल माझी दिठी । म्हणोनि घेतली इठीमिठी । निंबलोण उठाउठीं । करी गोरटी निजभावें ॥९४॥कृष्णचरणीं लावितां हळदी । अहंभावेसीं ठकली बुद्धि । लाज विसरली त्रिशुद्धी । मी तूं उपाधि नाठवे ॥६९५॥ज्याचे चरणींचे रजःकण । शिव विरंचि आपण । वंदिताती सांडूनि गुण । ते कृष्णचरण अपावली ॥९६॥अक्षवाणें करी आरती । कृष्णप्रभादीपदीप्ति । कृष्णा लागलिया परमप्रीती । चित्तवृत्ति तद्रूप ॥९७॥चिच्छक्ति न सोडी चिन्मात्रा । तेंवि कृष्णाधाकुटी सुभद्रा । मणिमौक्तिकें रत्नहारा । दिव्याम्बरा दीधलें ॥९८॥शुद्धमति म्हणे देवकीसी । धन्य धन्य तुमची कुसी । जेथें जन्मला हृषीकेशी । म्हणूनि पायांसी लागली ॥९९॥मग पूजिली यथाविधीशीं । वस्त्रें भूषणें दिधलीं तिसी । जगन्निवास जन्मला कुसीं । मान्य सकळांसी यालागीं ॥७००॥एवं भीमक आणि शुद्धमती । विनीत होऊनि सर्वांप्रति । वस्त्रें भूषणें अर्पिती । सोयरा श्रीपति जोडला ॥१॥सावधान आचार्य म्हणती । झाली रुखवताची आयिती । संतोषली शुद्धमती । भावें श्रीपति प्रार्थिला ॥२॥कृष्णपरमात्मा मध्यमूर्ति । आवरणपूजा यादवपंक्ति । लाविल्या स्वप्रकाशज्योति । शुद्धमती सावध ॥३॥तळीं त्रिगुणाची आडणी । त्यावर ताटांची मांडणी । वाढिताती नवजणी । खुतखावणी जाणोनी ॥४॥ऐका रुखवताची स्थिति । वाढीतसे शुद्धमती । जे जे धाले कृष्णपंक्ति । क्षुधा पुढती त्यां न लगे ॥७०५॥झळकती भावार्थाचीं ताटें । जडित चतुर्विध चोखटें । स्वानन्दरसें भरलीं वाटें । वोतूनि कांथे ठेविली ॥६॥खांडिवा खुडिवां तोडिवा । त्रिगुणगुणांच्या सोलिवां । शाखा वाढिती स्वानुभवा । हावभावा फोडणिया ॥७॥एक पचलीं गोडपणें । एक सप्रेमें सलवणें । एक नुसधींचि अलवणें । बरवेपणें मिरवती ॥८॥एक सबाह्य आंबटें । एक अधिकचि तुरटें । एक बहुबीजें कडुवटें । एक तिखटें तोंडाळें ॥९॥एक हिरवीं करकरीत । एक जारसें कचकचित । एक परिपाकें निश्चित । स्नेहदेंठींहूनि सूटलीं ॥७१०॥वाळल्या अनुतापकाचरी । वैराग्यतळनें अतिअरुवारी । राजसा वाढिल्या कुसुंबिरी । नानापरी रायतीं ॥११॥मुखीं घालितां अतितिखटीं । नाकीं तोंडीं धूर उठी । कुसमुसोनि कपाळ पिटी । दुरसेन गोठी न करवे ॥१२॥एक वाळोनि कोरडी । तोंडीं घालितां अतिकुडकुडी । त्यांची अनारिसी गोडी । बहु परवडी स्वादाची ॥१३॥बळवटांची नवल परी । एक पोकळ अभ्यंतरीं । एक वर्तुळ साजिरीं । सुमनाकारीं पैं एक ॥१४॥परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या सेवया । मोडों नेदिती सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ॥७१५॥सेवया वेळिल्या अतिकुसरी । असार वेळण सांडिलें दुरी । घोळिलिया क्षीरसागरीं । चवी जेवणारीं जाणावी ॥१६॥अत्यन्तलाडें वळीले लाडू । विवेकतिळवियांचा जोडु । सुरस रसें रसाळ गोडु । चवी निवाडु हरि जाणे ॥१७॥पापड भाजिले वैराग्यआगीं । तेणें ते फुगले सर्वांगीं । म्हणोनि ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती ॥१८॥उकळिलिया नुकळती । आंतुच्या आंतु गुण्डाळती । तापलुया तेलीं तळिजती । कुडी आयती कुरवडिया ॥१९॥भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती । जाणें वृद्धाचाररीति । परमप्रीति वोहरांची ॥७२०॥त्रिगुण त्रिकूटा चवी कायी । भोंकरें खारलीं ठायींच्या ठायीं । कृष्णरसें रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ॥२१॥पूर्णपणें पूर्ण पुरिया । सबाह्य गोड गुळवरिया । क्षीरसागरींच्या क्षीरघाटिया । इडोरिया सुकुमारा ॥२२॥सभेदफेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्करा भरिली भीतरी । अमृतफळें ठेविलीं वरी । अभेदघारी वाढिल्या ॥२३॥नुसधे गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली । गगनगर्भींची काढिली । घडी मोडिली मांडियाची ॥२४॥स्नेहदेंठींहुनि सुटली । अत्यन्तपरिपाकें उतटलीं । वनिताहातींहूनि निष्टलीं । फळे खादली शिखरणीं ॥७२५॥अत्यन्त सूक्ष्म अणियाळे । तांदुळ वेळिले सोज्वळे । सोहंभावाचें वोगराळें । भावबळें भरियेलें ॥२६॥खालीं न पडतां सित । न माखतां वृत्तीचा हात । वोगराळा भरिला भात । न फुटत वाढिला ॥२७॥अन्नीं वरिष्ठ वरान्न । विवेकें कोंडा सांडिला काढून । अवघियावरी वाढिलें जाण । वरा वरान्न स्वादिष्ट ॥२८॥लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्य भोज्य जी प्रसिद्ध । षड्रसांचे जे स्वाद । केले विविध उपचारें ॥२९॥जिह्वा चाटूनि घेइजे । लेह्यें त्यां नांव बोलिजे । घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे त्या नांव ॥७३०॥रस चोखोनि घेइजे । बाकस थुंकोनि सांडिजे । चोष्य त्या नांव बोलिजे । खूण जाणिजे रसाची ॥३१॥अग्न्युदकलवनेंवीण । जें जें खावया योग्य जाण । खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ॥३२॥क्षीर भात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण । रोटी पोळी आणि पक्वान्न । भक्ष्य जाण त्या नांव ॥३३॥ऐसीं षड्रसांची चोखडी । ताटें वाढिलीं परवडी । चोखों जाणती ते गोडी । निज आवडीचेनि मुखें ॥३४॥कृष्ण स्वादासि जाणता जाण । अवघ्यां आणिलें गोडपण । यालागीं वाढिलें वरी लवण । अपूर्णते पूर्ण करावया ॥७३५॥नाहीं श्रद्धेची ज्यां भूक । आंगीं अश्रद्धेचें असुख । गोड तेंचि म्हणती विख । थुंकूनि देख सांडिती ॥३६॥कृष्णपंक्तीची आवडी । श्रद्धा क्षुधा ज्यापैं गाढी । ग्रासोग्रासीं अधिक गोडी । हे परवडी त्यांलागीं ॥३७॥कृष्णपंक्तीसी नाहीं उनें । जेवितां जेवित्ये जाणती खुणे । रुचलेपणें वाढिती जाणें । सावध म्हणे शुद्धमती ॥३८॥कृष्ण देखोनियां डोळां । जीवा जीवन देती चपळा । चतुर्विध सुपरिमळा । एळावाळाउदादि ॥३९॥चतुर्विध चार्ही मुक्ति । शुद्धमती पुढें रावती । जें जें पाहिजे जिये पंक्ती । तें तें देती त्या ठायीं ॥७४०॥पहिलें वाढिलें नव जणी । पूर्ण करिती चौघी जणी । एकाजनार्दनभोजनीं । अतृप्त कोण्ही राहों नेदी ॥४१॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां भीमकीवसुदेवादिसर्वमूळमाधवे विवाहमण्डपाभिगमनं नाम चतुर्दशप्रसंगः ॥१४॥शुद्धमतीनें सगळे । न फोडितां रांधिले कोहळे । चवी आली सोहंमेळें । स्वाद गोपाळें जाणिजे ॥४२॥धालेपणाचे ढेंकर । स्वानंदें देती जेवणार । गोडी नित्य नवी अपार । कृष्ण दातार जे पंक्ती ॥४३॥स्वाद घेतला जेवणारें । जेवितां कोणी न म्हणे पुरे । गोडी घेतली शार्ङ्गधरें । भाग्यें उदारें शुद्धमती ॥४४॥सावध शुद्धमती वाढी । यादवां तृप्ति झाली गाढी । ब्राह्मणांची शेंडी तडतडी । धोत्रें बुडी ढिलाविती ॥७४५॥भीमक करिताहे विनन्ति । अवघियां झाली परम तृप्ति । उष्टावणालागीं श्रीपती । ठायीं ठेविती निजमुद्रा ॥४६॥देखोनि आनन्दली शुद्धमती । भीमकीभाग्य वाणूं किती । कृष्णनिजमुद्रा चढली हातीं । शेषप्राप्ति निजभावें ॥४७॥कृष्णपंक्तीं जे जेविले । सवेंचि संसारा आंचवले । कृष्णरंगें सुरंग झाले । विडे घेतले सकळिकीं ॥४८॥कृष्ण देखोनियां डोळां । भीमकीच्या सख्या सकळा । विस्मित राहिल्या वेह्लाळा । आणिक डोळां नावडे ॥४९॥कृष्णोच्छिष्ट घेवोनि हातीं । वेगें निघे शुद्धमती । संतोषोनियां श्रीपति । प्रसाद देती निजमाळा ॥७५०॥कृष्णप्रसाद निजमाळा । शुद्धमती घाली गळां । लाज सांडोनि वेह्लाळा । चरणकमळा लागली ॥५१॥कृष्णासि रुखवत सेंवती । देतां न कळे दिवसराती । ज्योतिषी रायातें म्हणती । उदयप्राप्ति हो आली ॥५२॥वेगीं मंडपासि चला । घडवटे आधीं घाला । उशीर न लावावा फळा । यादवां सकळां सांगावें ॥५३॥नमस्कारूंनि श्रीपति । मंडपा आली शुद्धमती । उष्टावण भीमकीहातीं । परमप्रीति दीधलें ॥५४॥कृष्णप्रसाद धरिला माथां । भीमकी झाली रोमाञ्चिता । चित्तीं विसरली चिंता । सावधानता कृष्णशेषा ॥७५५॥जंव जंव कृष्णशेष सेवी । समाधिसुखा वांकुल्या दावी । बापभाग्याची पदवी । स्वर्गीं देवीं वाणिजे ॥५६॥कृष्णमुद्रा हृदयीं धरी । अभिवंदोनियां शिरीं । मग घातली कराग्रीं । लोण उतरी शुद्धमती ॥५७॥चढोनि परेच्या उपरी । सद्गुरु सावधान करी । घटिका प्रतिष्ठिली अभ्यंतरीं । जीवनावरी संख्येच्या ॥५८॥घडिघडी जेंकटातें हाणित । काळ गेला रे गेला म्हणत । जेंगट तेणें नादें गर्जत । काळ व्यर्थ जाऊं नेदा ॥५९॥अक्षर निमेष पळें पळ । घडी भरतां न लगे वेळ । लोक व्यापारें बरळ । गेला काळ नेणती ॥७६०॥सद्गुरु सांगे भरली घडी । उगेचि पाहती वर्हाडी । ज्यांसि निजकार्याची तांतडी । ती घडिया घडी साधिती ॥६१॥आळसी लोक निद्रापर । निजमंडपीं कृष्ण सादर । विस्तारवी फळसम्भार । नानाप्रकार मेचूचे ॥६२॥शून्य सांडोनि विरजाम्बर । चिद्रत्नांचे अळंकार । पदकीं नीळ मनोहर । जो श्रृंगार हृदयींचा ॥६३॥अहंकाराचें बीज भरडी । मोहममतेचा कोंडा काढी । सोलींव दाळीची परवडी । भरली दुरडी श्रद्धेची ॥६४॥विवेकचाळणिया चाळी । कणीक आणिली तेजाळी । निवडोनि स्वानंदाची नव्हाळी । ठेविली उगळी निजगोडी ॥७६५॥देठींहूनि सुटलीं फळें । अत्यंत परिपाकें निर्मळें । मघमघीत सुपरिमळें । सफळ फळें रुक्मिणी ॥६६॥अत्यंत पढिये भीमकबाळा । गुणेंविणें सुमनमाळा । आंगें गुंफी घनसांवळा । हार गळां आणि जाळी ॥६७॥सौभाग्यद्रव्यें ठेविलीं आधीं । धणीपणें धने हळदी । जिरें मेळविलीं त्यांमधीं । जेंवि सुबुद्धि विवेक ॥६८॥गांठी सांडिल्या सोडूनि । घेतला सूक्ष्मतंतु काढोनी । कृष्ण वोवीत कृष्णमणि । तेचि रुक्मिणीगळसरी ॥६९॥सांडूनि कठिनत्वाचें बंड । केवळ रसाचें प्रचंड । कृष्णें कृष्णवर्ण उक्षुदंड । अतिउदंड आणिले ॥७७०॥बीजेंवीण काढिलीं फळें । एके त्वचेवीण रसाळें । चमत्काराचीं निर्मळें । कृष्णें फळें विस्तारिलीं ॥७१॥फळ विस्तारिलें प्रबळ । यादव श्रृंगारिले सकळ । भेरी त्राहाटिले मांदळ । निशाण ढोल लागले ॥७२॥अनर्घ्य लुगडीं आणि लेणीं । लेवोनि निघाल्या वर्हाडिणी । चार्ही बारा सोळा जाणी । चौघी जणी तयांपुढें ॥७३॥जीवशिवा वडील मान । तैसे वसुदेव उग्रसेन । संतोषोनि संकर्षण । करी परिपूर्ण याचकां ॥७४॥एका दिधलें कांहीं एक । एका दिधलें अनंतसुख । चिद्रत्नें अलोलिक । देवोनि याचक सुखविले ॥७७५॥फळ चालिलें गजरें । ढळती रत्नदंडीं चवरें । झळकती पल्लवच्छत्रें । दशविध तुरें वाजती ॥७६॥जैशी श्रद्धा आणि शान्ति । तैशी सुभद्रा आणि रेवती । मुख्यपणें माजि मिरवती । घेतल्या बुंथी पापेच्या ॥७७॥नानापरीच्या घेतल्या बुंथी । तरी अंतरशोभा बाह्य फांकती । अळंकारल्या निजवृत्ति । त्या न झांकती झांकिल्या ॥७८॥समीप फळ आलें देखा । ऐसें जाणवलें भीमका । सावधान अतिनेटका । भावें बैसका घातलिया ॥७९॥सामोरा येवोनि आपण । वसुदेवादि उग्रसेन । नमस्कारोनि संकर्षण । भीतरीं जाण आणिले ॥७८०॥विचित्र घातलीं आसनें । सुकुमार मृदुपणें । गाद्या पडगाद्या टेंकणें । वोटंगणें मृदोळिया ॥८१॥भीतरी आलिया वर्हाडिणी । शोभती जैशा दिव्य योगिनी । फळ मांडिलें विस्तारूनी । भावें रुक्मिणी हरिखेली ॥८२॥पीठ स्थापिलें कुसरी । श्रृंगारोनियां नोवरी । वेगें आणिली बाहेरी । मंत्रोच्चारीं द्विजवरीं ॥८३॥पाहतां भीमकीचें रूपडें । अरूपरूप तेज गाढें । मंडपामाजि उजेड पदे । आणिकीकडे न पाहती ॥८४॥नामरूपाचे प्रकाशें । अवघी भीमकीच भासे । देखोनि जी भुलले कैसे । डोळियां पिसें लाविलें ॥७८५॥उभवूनि स्वरूपरूपठसा । भुलविलें आदिपुरुषा । एकाएकीं धांवन्निला कैसा । कृष्ण पिसा इनें केला ॥८६॥कृष्ण शहाणपणें अतिगाढा । तोही भीमकिया केला वेडा । वोढोनि नेला आपल्याकडां । दुजे पडिपाडा इसी नाहीं ॥८७॥भीमकी लावण्याची राशि । कृष्णरूपा भाळली कैसी । सांडोनिया जातिकुळासी । कृष्णस्वरूपासी विनटली ॥८८॥भीमकी कृष्णायोग्य सहजें । कृष्ण वर इयेसि साजे । यासारिखें न देखों दुजें । बोलें लाजिजे बोलतां ॥८९॥पाहतां भीमकीची रूपरेखा । थक पडिलें सकळिकां । कृष्ण पारखी गे निका । जोडा नेतका मेळविला ॥७९०॥गोरेपनें अतिसुंदर । विशाळ नयन कपाळ थोर । आंग सर्वाङ्गें सकुमार । मनोहर उभारा ॥९१॥कृष्ण साधावया निधान । नेत्रीं सूदिलें अंजन । पाहतां भीमकीचें वदन । विकल्प मन करूं न शके ॥९२॥भोंवयी सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक । नाकीचें मोतीं जडित माणिक । तेणें श्रीमुख तें शोभत ॥९३॥सरळ बाहु समसपोस । कोंपर मणगटें कळास । पांचा आंगोळिया विन्यास । कळान्यास मुद्रिका ॥९४॥सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अतिआरक्त । बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ति ॥७९५॥कतिप्रदेश शोभती जघन । माज अतिशयेंसीं सान । घोंटीं कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥९६॥माथां मोतिलग जाळी । झळकत फरातळीं हांसळी । मिरवे भांग टिळा कपाळीं । तेज झळाळी तानवडां ॥९७॥नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी रत्नांची मेखळा । सुनीळ कांचोळी वेह्लाळा । लेयिली माळा मोतिलग ॥९८॥गंगातीरीं चक्रवाकें । तेंवि कुचद्वय सुरेखें । हृदयीं घननीळ झळके । शोभा पदकें दाविजे ॥९९॥नाकींचें झळकत सुपाणीं । तेणें शोभिली रुक्मिणी । शोभा आली बाहुभूषणीं । रत्नकंकणी कळाविया ॥८००॥चरणीं गर्जना नूपुरां । भुलोनि मदन आला दरा । तेही भुलली शार्ङ्गधरा । कृष्णवरा वरावया ॥१॥नाहीं लग्नासी व्यवधान । वेगीं करा फळार्पण । उठोनियां वसुदेव आपण । करी पूजन भीमकीचें ॥२॥पहिलें करावें गणेशपूजन । तंव गणेश वंदी श्रीकृष्णचरण । कृष्णचरणीं समाधान । गजवदन तुष्टला ॥३॥कृष्णपुरोहित निष्काम । न करिती कलशपूजेचा काम । नोवरीचे उपाध्यें सकाम । पुरुषार्थ परम त्यां दिधला ॥४॥वस्त्रें अर्पूनि सुंदरी । वेगीं नेली अभ्यंतरीं । मायावसनत्याग करी । अंगीकारी कृष्णवासा ॥८०५॥फेडूनि मायेचीं परिधानें । लेयिली कृष्णमय लेणें । भीमकी अत्यंत शोभली तेणें । लिंबलोण जीवभावा ॥६॥सवेंचि आणिलि बाहेरी । डोळां न पाहवे सुंदरी । दृष्टि जातसे चांचरी । आधार धरी धैर्याचा ॥७॥कृष्णीं विनटली वाडेंकोडें । ते कोणाचे दृष्टी पदे । भाग्य वसुदेवाचें गाढें । तयापुढें बैसविली ॥८॥कृष्णें पाठविलें फळ । निःशेष अर्पिलें सकळ । मस्तकीं धरी भीमकबाळ । जन्म सफळ येणें फळें ॥९॥फळ वांटिलें प्रबळ । झाले वर्हाडी सकळ । हाता आलें कृष्णफळ । खूण प्रेमळ जाणती ॥८१०॥भीमकासि म्हणे पुरोहित । वरासि मूळ निघा त्वरित । यादव परतले समस्त । गुण वर्णित भीमकीचे ॥११॥वर्हाडिणी सांगती गोष्टी । सगुणगुणांची गोरटी । भीमकीऐसी नाहीं सृष्टी । कृष्ण जगजेठी पारखी ॥१२॥यासि माया म्हणे वेडा । परि हा देखणा चोखडा । कैसा मिळविला जोडा । निजपडिपाडा समत्वें ॥१३॥आदिकुमारी येऊनि जाण । कृष्णासि तेल लावी आपण । बांधोनि दृश्याचें कंकण । जीवें जीव म्हणतसे ॥१४॥तिची करावया बोळवण । कृष्णाआंगीं आंगवण । येरा न कळे महिमान । जुनाट खूण वृत्तीची ॥८१५॥लग्नीं साधावया शार्ङ्गपाणि । भीमक हांकी वर्हाडिणी । शुद्धमतीसहित सुवासिनी । चालती निशाणीं गर्जत ॥१६॥नाना वाजंत्रांच्या ध्वनि । नाद न समाये गगनीं । मधुर शब्दांच्या किंकिणी । गोडपणीं वाजती ॥१७॥घेवोनि पूजेचे संभार । ठाकिलें विवाहमंडपद्वार । भीमकें केला अत्यादर । वेगीं वर आणावा ॥१८॥सहजचि नेटुगा दाटुगा । फेडी वेडी नाहीं श्रीरंगा । सभे बैसविला समचौरंगा । नयनभृंगा अह्लाद ॥१९॥दृष्टि जदली कृष्णरूपासी । परतोनि न ये दृश्यापासीं । पारणें होतसे डोळ्यांसी । कृष्णसुखासी भोगिती ॥८२०॥कृष्ण देखोनि धाले नेत्र । देताति तृप्तीचे ढेंकर । तर्ही भुकेले अपार । वारंवार हरि पाहती ॥२१॥शुद्धमतीनें आपण । कृष्णासि आणिलें तेलवण । सुखसेवयांचे लाडू जाण । गोडपण हरि जाणे ॥२२॥सोलींव विवेकाचे तिळवे । स्थूळ ना सूक्ष्म अतिबरवे । बांधा बांधले कृष्णस्वभावें । निजभावें विस्तारी ॥२३॥फोडोनि चार्वाकचारे । निज बीज काढिलें बाहीरें । चारोळ्यांचे लाडू साजिरे । श्रद्धासाखरे आळिले ॥२४॥आणूनि सडिली खसखस । धुवोनि साडिली घसघस । लाडू वळिले सावकाश । अतिसुरस श्रीरंगा ॥८२५॥अष्टदळकमळाचें बीज । फोडूनि सोलून काढिलें निज । लाडू वळिले सहज । दावी चोज शुद्धमती ॥२६॥वरी वरी वैराग्याचे कांटे । भीतरी अमृताचे सांठे । फणसें फोडूनि चोखटें । काढिलें गोमटें निज बीज ॥२७॥त्याची अवीटतेची गोडी । लाडू वळिले अतिआवडी । शुद्धमती दावी परवडी । प्रीति गाढी हरिचरणीं ॥२८॥वरिवरी पाहतां दिसे साजिरें । आंत पाहतां आंबट बोरें । त्यांच्या आठोळ्या फोडोनि निर्धारें । काढिलें साजिरें निजबीज ॥२९॥घालूनि समतेचा गूळ गोडु । त्या बीजाचे वळिले लाडू । कृष्ण करूं जाणे निवाडू । पडिपाडू स्वादाचा ॥८३०॥कृष्णालागिं तेलवणें । आणिलें कदकडीत कडकणें । फुटलें तुटले द्वंद्वपणें । रजोगुणें तळियेलें ॥३१॥वांकुडे कानवले तेलवणें । कृष्णासि आणिले कवणे गुणें । मुरडी मुरडिले अनुसंधानें । गोडपणें अंतरीं ॥३२॥शुद्धमतीनें आपण । कृष्णासि वाहिलें तेलवण । वस्त्रें अळंकार संपूर्ण । परिपूर्ण स्वानंदें ॥३३॥तेलवणाचा विस्तार । किती वाढवाल उपचार । होईल लग्नासि उशीर । वर सत्वर चालों द्या ॥३४॥शुद्धसत्वाचा श्वेतवारु । त्यावरी चढला कृष्ण वरु । झाला वाद्यांचा गजरु । मंत्रोच्चारु द्विजांचा ॥८३५॥अष्टभाव होऊनि गाढे । वारु धरिला दोहींकडे । छंदें चालती कृष्णापुढें । आणिकीकडे न वचती ॥३६॥निजबोधाचें आतपत्र । शिरीं तन्मयाचें छत्र । पहावया कृष्णवक्त्र । येती सत्वर नरनारी ॥३७॥मदें गर्जती अतिगंभीर । अनुभवस्वानंदाचे थोर । दोहीं बाहीं जी कुंजर । साळंकार पताकी ॥३८॥चंद्रकिरण अति साजिरे । तैसीं चवरें अत्यंत शुभ्रें । रत्नदंडी सहजाकारें । मनोहरें ढळताती ॥३९॥कृष्णें सोडिल्या त्याग देवोनी । अष्टमहासिद्धि नाचणीं । नाचताती चपळपणीं । देखोनि जनीं भुलिजेल ॥८४०॥सिद्धि नाचतां देखती जेथें । जन मिळाले त्यांभोवते । पाहों विसरले कृष्णातें । नाचवी तें भूलले ॥४१॥चैतन्यबुका घाली वनमाळी । ज्यासि लागे तो परिमाळीं । देत खुणेच्या अंजळि । पसे दान याचकां ॥४२॥कृष्णरंगें सुरंग विडे । वाढिताति वाडेंकोडें । जो राहिला मागिलीकडे । त्यासि न चढे तो रंग ॥४३॥ऋग्वेदादि सामगायन । गर्जती वेद वंदिजन । त्या शब्दाची उणखुण । सत्य श्रीकृष्ण जाणता ॥४४॥सत्वें सात्त्विक जगजेडी । घेवोनि विवेकाची वेताटी । दृश्य गलबला मागें लोटी । कृष्ण दृष्टी पहावया ॥८४५॥कृष्णासि आवडे अतिप्रीती । ते वैष्णव रंगीं नाचती । सांडोनि अहंसोहंवृत्ति । नृत्य करिती निजबोधें ॥४६॥कृष्णासवें सुवासिनी । शान्ति क्षमा दया उन्मनी । आल्या सुखासनीं बैसोनी । वरासनीं सुभद्रा ॥४७॥निर्धारूनियां तत्वता । निजभावाच्या अक्षता । घालिताति कृष्णमाथां । लक्ष सर्वथा न चुकती ॥४८॥उग्रसेन वसुदेव । वाहनीं चढले यादव । अवघियांपुढें बलदेव । महोत्सव करितसे ॥४९॥सोयरे कृष्णाचे निजभावीं । भक्त ज्ञानी योगी अनुभवी । तयांसी वाहनें बरवीं । कृष्णदेवें दीधलीं ॥८५०॥एका सलोकतेचे वारु । एका समीपतारहंवरु । एका सरूपताकुंजरु । महाथोर भद्रजाती ॥५१॥एका दिशले अमोल । सायुज्यताचवरडोल । त्याचा अनुभव सखोल । निजात्मबोल हरि जाणे ॥५२॥तयांसि सर्वथा श्रीहरि । आपणा वेगळें क्षणभरी । कोठें जावों नेदी दुरी । सरोवरी निजभावें ॥५३॥वर्हाड राखावया निगुती । गुणावतार गुणमूर्ति । करणें मारणें धरणें स्थिति । तिघां हातीं भरभार ॥५४॥तया तिघां मागिलीकडा । कृष्णपुरुष देखणा गाढा । दोहीं पक्षीं देखणा फुडा । भार वर्हाडा त्यामाथां ॥८५५॥वर्हाडाची घडमोडी । कृष्णाआंगीं न लगे वोढी । अवघें परबाहिरेम निवडी । ऐसी परवडी रचियेली ॥५६॥विचारितां निजनिवाडी । कृष्णाविण अर्ध घडी । इकडील तिकडे नव्हे काडी । वृथा वेडीं वल्गती ॥५७॥भरोनि रजतम औषध । करूनि अग्नियंत्रें सिद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दाविती ॥५८॥अग्नि लावूनि ठायींच्या ठायीं । ममता जाळिली हवायी । गगना उसळती ते पाहीं । धुपोनि ठायीं निवाली ॥५९॥मोहयंत्रीं सुमनमाळा । अग्निपुष्पें भासती डोळां । फुलें म्हणती त्या अबळां । पाहतां डोळा ते राख ॥८६०॥अतिलोभाच्या चुचुंदरी । अग्नि लावूनि टाकिती दुरी । पेटल्या पदती जनांवरी । उरी शिरीं जाळिती ॥६१॥देवोनिउपशमअनळा । जाळिती कामाचा हातनळा । भडभडां निघती ज्वाळा । तो तात्काळ निमाला ॥६२॥हातीं धरूनि कृष्णलीला । जाळिती क्रोधाचा भुयिनळा । धरूं नेणती त्या बरळा । जीवीं जिव्हाळा पोळती ॥६३॥पाहतां अत्यंत कठिन । चिन्मात्र अग्नि देवोनि जाण । सोडिती अहंकाराचे बाण । पळती जीव दचकोनी ॥६४॥मदमत्सरधूम्रमेळे । एकाचे झांकले जी डोळे । देहबुधीचीं भ्याडें सकळें । विषयबळें पळालीं ॥८६५॥स्वानुभवाचे महाथोर । उठावले जी कुंजर । रगडोनि अहंकाराचा धूर । निरंतर डुल्लती ॥६६॥सवेंचि निजतेजें चंद्रज्योती । उजळिली अवचिती । प्रकटली परम दीप्ति । ते हे स्थिति परियेसा ॥६७॥निःशेष आंधार नाहीं जेथ । उष्ण चांदिण्याहूनि अतीत । तेज प्रकटलें अद्भुत । संतोषत श्रीकृष्ण ॥६८॥पदोपदीं नाना त्याग । करित चालिला श्रीरंग । बोवाळणिया अनेग । दोहीं बाहीं पडताती ॥६९॥कौतुक दाखवावया श्रीपति । कपटमहामोहाचा हस्ती । आणूनि पुढां उभा करिती । भद्रजाती मातला ॥८७०॥नेणती त्याची लटकी कळा । देखोनि भय उपजे सकळां । कोण पुरे त्याचिया बळा । चळचळां कांपती ॥७१॥महामदें झाला उन्मत्त । अहंकारे अतिगर्जत । अव्हासव्हा जी धांवत । लोकाआंत अतिबळें ॥७२॥भ्याडापाठीं अधिकचि लागे । तंव ते सरती मागें मागें । अंधकूपीं पाडी वेगें । मागुती निघों नेदी तो ॥७३॥भेदें अधिकचि रगडी । तेणें चरफडती बापुडीं । एकीं त्या भेणें झोंपडी । जीवभावें धरियली ॥७४॥ऐसा जनासि लाविला धाक । तंव कृष्णें खुणाविला सेवक । लाता हाणोनियां देख । कपटवेष मांडिला ॥८७५॥धारणघायें कपट झाडी । भवगज हे गोष्टी कुडी । ऐसा देखणी दृष्टि ज्या चोखडी । भवभयवोढी त्या नाहीं ॥७६॥चतुर्विधा प्रसिद्ध दासे । शकुनालगीं हृषीकेशी । उभ्या पूर्णकलशेंसीं । महाद्वारासी तिष्ठती ॥७७॥कृष्ण भाण्डार तें अनंत । अखंड कृष्णासवें चालत । पाहोनियां शुद्धभावार्थ । उचित पदार्थ हरि देख ॥७८॥श्रद्धा कीर्ति धृति विरक्ति । त्याही दासी अति तिष्ठती । कृष्णवासातें वांछिती । जाणे श्रीपती मनोगत ॥७९॥जें जें कांहीं त्या मागत । तें तें कृष्णनाथ देत । त्याहूनि अधिक दे समर्थ । महाद्वारांत प्रवेशला ॥८८०॥सिद्ध सामग्री मधुपर्कासी । विष्टर दिधला हृषीकेशी । समतेच्या चवरंगासी । श्रीकृष्णासी बैसविलें ॥८१॥सांडोनि फलाशा समस्त । अर्घ्य अर्पिला सफळित । सुरनर कौतुक पाहत । सिद्ध समस्त तेथें आले ॥८२॥पाद्यालागीं आणिलें तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी आतीत । चैतन्यप्रवाहें शोभत । यथोचित मणिकर्णी ॥८३॥उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळीं नृपति । जेथूनि तीर्थांची उत्पत्ति । ते पूजिती श्रीचरण ॥८४॥चरणक्षाळणा ठेविलें अंबु । तंव पावला तीर्थकदंबु । आम्हांसि लागों द्या एक थेंबु । चरणाम्बू कृष्णाचे ॥८८५॥मूळमाधवीं जाऊनि पाहें । कदंबतीर्थ अद्यापि आहे । भाग्यवंत तो तेथें नाहे । कृष्णपाय तें तीर्थ ॥८६॥शुद्धमतीनें आपण । कृष्णासि दिधलें आचमन । तीन वेळां न करीच जाण । सर्वापोशन एक वेळे ॥८७॥ब्रह्मपदींचा अधिष्ठात्रा । त्यासि देती ब्रह्मसूत्रा । मान देतो वेदविप्रा । श्रुतिव्यवहारा संरक्षी ॥८८॥चंदन पुष्पें टिळे माळा । भावें पूजिला घनसांवळा । आनंद भीमभूपाळा । परब्रह्म डोळां देखत ॥८९॥हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासि अर्पिल्या विचित्रा । बाहुभूषणें जडितमुद्रा । पीताम्बरा अर्पित ॥८९०॥दधि मधु एकत्रता । करीं घातलें अच्युता । मेहुणे म्हणती कृष्णनाथा । लाज सर्वथा न धरावी ॥९१॥गोकुळीं चोरूनि दहीं दूध खातां । तुम्हांसि लाज नाहीं सर्वथा । आम्ही निज भावें अर्पितां । कां लाजतां निज चोरा ॥९२॥सलज्ज हांसे शुद्धमती । वर्हाडी वर्हाडिणी हांसती । निष्कर्म्यासि कर्मप्राप्ति । जनवदंती विपरीत ॥९३॥भेमक म्हणे प्रतिगृह्यतां । प्रतिगृह्णामि म्हणें अच्युता । ठक पडिलें कृष्णनाथा । मग तत्वता विचारी ॥९४॥खूण बोलिला कृष्णस्वामी । दान देतों एक आम्ही । हाही भाव सांडा तुम्ही । मग प्रतिगृह्णामि सर्वांची ॥८९५॥संकल्प सोडितां तत्काळ । दधि मधु सेवी गोपाळ । भीमकाचें जन्म सफळ । सकळ कुळ उद्धरिलें ॥९६॥देऊनि कृष्णासि आचमन । सवेंचि केलें करक्षाळण । सद्गुरु म्हणती सावधान । नाहीं व्यवधान लग्नासी ॥९७॥कृष्णचरण शून्य पडे । म्हणोनि घातले परिपूर्ण पायमांडे । कृष्ण चालविला पुढें । वाडेंकोडें लग्नासी ॥९८॥भीमकी भावार्थें आयिती । परणावया निजपति । गौरीहर सहजस्थिति । उमापति पूजितसे ॥९९॥कृष्णासि अंतःपट पुढें । बोलतां बोलणें हें तंव कुडें । श्रोते म्हणती नसुची झाडें । लग्न निवाडें लागों द्या ॥९००॥आधींच कृष्णकथा सखोल । त्यावरी तुझे रसाळ बोल । जाणसी प्रेमाची वोल । येताति डोल सुखाचे ॥१॥ऐकोनि श्रोतियांचें वचन । आनंदला एकाजनार्दन । मनेंकरूनि लोटाङ्गण । वंदिले चरण निजभावें ॥२॥येरीकडे घटिका पूर्ण । म्हणती सावधान सावधान । नाहीं उरलें व्यवधान । हरिचिंतन करा वेगीं ॥३॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां पंचदशप्रसंगः ॥१५॥अंतःपट आहे ज्यासी । वेगीं सावध करा त्यासी । पळ अक्षर निमेषोन्मेषीं । हरिचरणांसि चिंतावें ॥४॥सद्गुरु म्हणती सावधान । घटिका होऊं आली पूर्ण । वचनीं नेदावें प्रतिवचन । सावधान परिसावें ॥९०५॥सांडा चौघींची कळकळ । महामौनेसीं रहा निश्चळ । लग्नघटिका भरें चपळ । अति सत्वर वेगेंसीं ॥६॥आंगीं धरूनि जाणपण । वचना देती प्रतिवचन । तेणेंचि वचनें त्यांसि दूषण । सावधानपण त्या नाहीं ॥७॥अतिसमयो वर्त्ते लग्न । दोहीं पक्षीं सावधान । अच्युतचिंतनीं राखा मन । सावधान निजबोधें ॥८॥ॐपुण्या पडली मिठी । द्वैतभावाच्या सुटल्या गांठी । तुटला अंतःपट दृष्टी । उठाउठीं हरि वरी ॥९॥भीमकीमाथां एक एक । कृष्ण अक्षता घाली देख । तोचि हस्तक मस्तक । परम सुख पावली ॥९१०॥भीमकी कृष्णाचिया माथां । घालूं जाय जंव अक्षता । तंव कृष्णचि देखे सभोंवता । हरि पाहे ॥११॥कृष्ण देखे जिकडे तिकडे । अक्षता घाली चहूंकडे । पुरोहित म्हणती लागलें वेडें । कृष्ण निवाडें नोळखसी ॥१२॥कृष्णालागीं परम पिसी । माळ घालूनि रथीं होतीसी । सेखीं कृष्ण नोळखसी । केंवि नांदसी संसारीं ॥१३॥ऐसें हे झालें पाणिग्रहण । कृष्णें प्रकृति पाहिली जाण । मग बांधावया कंकण । शुद्ध सुतें सुतविती ॥१४॥पहिले सूक्ष्म तंतु अत्यंत । तोचि अष्टधा वाढत । स्थूळमानें दृश्य होत । मग तोडित तडतडा ॥९१५॥पहिलें दुखंड केलें जाण । त्रिगुण गुणें घाली वळन । अर्ध स्त्रीनामें कांकण । अर्ध जाण कृष्ण पुरुषा ॥१६॥एकचि तंतु द्वैत झाला । अर्ध स्त्रीआंगीं बाणला । अर्ध पुरुषत्व पावला । करीं बांधिला कृष्णाचे ॥१७॥फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्ट्पुत्र्यां पीताम्बर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ॥१८॥मलिनवास सांडी प्रकृति । सांडिलें दोहीं पक्षींचे न घेती । सलोभ उपाध्ये ते नेती । मग भांडती परस्परें ॥१९॥भीमकिया वरिला नारायण । झळकत दृश्याचें करीं कंकण । सौभाग्यद्रव्यें देतसे बाण । अहेवपण श्रीकृष्णें ॥९२०॥जीवीं जीवा पडिली मिठी । बाहीर पालवा दिधली गांठी । भीमकी कृष्ण पाहे दृष्टी । हरिख पोटीं न समाय ॥२१॥विवाहहोमालागीं श्रीहरि । वेगीं चला बोहल्यावरी । कडे घ्यावी जी नोवरी । लहानथोरीं वेढिला ॥२२॥नोवरी न धरितांचि हातीं । नारी मिळाल्या नेणों किती । प्रकृति वेढिला श्रीपती । अडकलेती गोविंदा ॥२३॥बाईल हातीं धरिल्यासाटीं । कृष्ण गोविला जगजेठी । येरां जीवांची कायसी गोष्टी । बैसतां पाटीं गोड लागे ॥२४॥कृष्ण विचारी निजवृत्ति । मजचि वरी माझी प्रकृति । माझेनि गमनें इयेसि निश्चिती । लाजों किती लटिकाचि ॥९२५॥हे बैसली माझिया कडिये । जीवेंभावें मजचि पडिये । प्रपंचाचें आंतुलीकडिये । नाम रूप इचेनि ॥२६॥मजविण हे नोवरी । पुढें न चले पाउलभरी । लटकी लाज सांडूनिया दुरी । वचन करी वडिलांचें ॥२७॥आंगा नातळत श्रीहरि । हात न लावितां नोवरी । उचलोनि आणिली बोहल्यावरी । लहान थोर हांसती ॥२८॥विवाहहोम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणिग्रहण । भीमकें दिधली वरदक्षिण । भूरिदान वांटिलें ॥२९॥कान पिळूं मेहुणे भीती । होईल रुक्मियाची गति । रूपा विटम्बील श्रीपती । याची ख्याति तिहीं लोकीं ॥९३०॥त्यांचा जाणोनियां भावो । कृष्णें फेडिला संदेहो । मेहुणे गौरविले पहाहो । दिव्याम्बरीं भूषणीं ॥३१॥भीमक कृष्णासि विनती करी । चतुर्थ होम आमुचे घरीं । करावा जी कृपें करीं । सहपरिवारीं सुहृदेंसीं ॥३२॥पहावया सुनमुखासी । मूळ पाठवा वरमायेसी । भंवर्या कलस आहे तीपासीं । निघे वेगेंसीं शुद्धमती ॥३३॥कृष्ण वसवी जीच्या हृदयासी । धन्य धन्य तिच्या कुशी । शुद्धमती लागे पायांसी । देवकीसी प्रार्थिलें ॥३४॥बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्रांच्या ध्वनि । विजणें वीजिती दोघी जणी । पायरावणी पदोपदीं ॥९३५॥ शुद्धमती देतसे विडिया । पीक धरावया सुवर्णघडिया । श्रीगिरिवरी डोलती गुढिया । पायघडिया पदोपदीं ॥३६॥चांदवे मोतीलग विस्तारें । दोहीं बाहीं ढळती चंवरें । देवकी समारंभें थोरें । आणिली गजरें मांडवा ॥३७॥कृष्णरुक्मिणी अतिगोमटीं । साजिरीं वोहरें देखिलीं दृष्टी । ऐसा जोडा नाहीं सृष्टी । माझी दृष्टि झणी लागे ॥३८॥देवकी येऊनि आपण । दोघां उतरी निंबलोण । कृष्ण निंबलोणा हुताशन । मुख पसरोनि धाविन्नला ॥३९॥कृष्ण निंबलोण पडतां मुखीं । तेणें मुख सरतें तिहीं लोकीं । हें जाणोनियां याज्ञिकीं । अतिसाक्षेपीं सादर ॥९४०॥कृष्ण लिंबलोणा अतिसाक्षेप । करितां सरले त्रिविध ताप । जावोनि देहस्थ संताप । सुखस्वरूप तो झाला ॥४१॥सून बैसवूनि मांडीवरी । कृष्णश्रवणें जडित भंवरी । कानीं घाली जी निर्धारीं । कळस वरी धैर्याचा ॥४२॥मुक्तमोतीलग गंभीर । श्रवणीं बाणल्या साचार । तेणें शोभली सुंदर । मनोहर सकळिका ॥४३॥लग्न लागल्या येरे दिवसीं । सोहळा मांडिला वोहरांसी । मूळ पाठविलें हळदीसी । यादवांसी भीमकें ॥४४॥मूळ पाठविलें सकळा । दोहीं बाहीं वारा सोळा । करवली अतिवेह्लाळा । चाले सुढाळा उन्मनीं ॥९४५॥अत्यंत शाहाण्या सुवासिनी । आणीक आल्या नवजणी । कृष्णाची खुतीखावणी । त्या जाणोनि वर्तती ॥४६॥वडिलपणें अत्यंत श्रेष्ठ । सकळांमाजि वरिष्ठ । शान्ति चालिली चोखट । अतिलोभिष्ठ श्रीकृष्णा ॥४७॥सभा बैसली निजबोधें । धवल गाती स्वानंदें । हळदी आरंभिली विनोदें । झाली सावधें अधिकारें ॥४८॥पाहों जाणती कृष्णकौतुक । तेही सावध झाले लोक । अनधिकारियां लगबग देख । पाहती मुख वनितांचें ॥४९॥वोहरें पाहतां निवे मन । दोहीं पक्षीं सावधान । कोण्हा न बोलवे वचन । पडिलें मौन सकळिकां ॥९५०॥चौघी जणी अतिचपळा । गुजबुजिती वेळोवेळा । कैशा झाल्याति तोंडाळा । शब्दचाळा न संडा ॥५१॥शान्ति म्हणे परत्या सरा । सांगेन मी तें तुम्ही करा । कुरवंडी कृष्णवरा । लोण उतरा सर्वस्वें ॥५२॥स्नेहें उजळोनियां वाती । भीमकी सम्मुख दाषिती । येरीं नातळे जी हातीं । स्नेहवृत्ति नावडे ॥५३॥कुरवंडी न धरीच हातीं । माया धाया शंकल्या चित्तीं । मग बोलिली निजशान्ति । नव्हे श्रीपति हें योग्य ॥५४॥जया दीपाचिये मेळीं । न निघे स्नेहधूम्रकाजळी । तैशा दीपें दीप उजळी । मग वोवाळी श्रीकृष्णा ॥९५५॥ऐकोनि भीमकी झाली सुखी । खूण बाणली नेटकी । जीवीं जीवाची वोळखी । परम पारखी तो जाणे ॥५६॥निर्धूम अग्नीच्या निजमेळीं । कृष्णदीपें दीप उजळी । आकाश लोपलें प्रभेतळीं । भावें वोवाळी श्रीकृष्णा ॥५७॥न कळे भीमकीचें लाघव । सकळ म्हणती धन्य भाव । आतां घेवोनियां नांव । पाय मागें कृष्णाचे ॥५८॥ऐकोनियां जनाची गोष्टी । भीमकी दचकली पोटीं । काय आतां बोलों वोठीं । न दिसे सृष्टी नांव रूप ॥५९॥याच्या नामरूपभेदा । व्यक्तीसि नाणवे वेदा । पुढारीं वाट न चले शब्दा । नेतिअनुवादा परतले ॥९६०॥पाहतां रूपाचा दुकाळ । घालितां साकारतेचा आळ । लावितां नामाचा विटाळ । तेणें गोपाळ क्षोभेल ॥६१॥सवेंचि म्हणे कळलें चित्ता । गोइंद्रियांचा हा नियंता । यासि गोपाळ म्हणतां । दोश सर्वथा मज नाहीं ॥६२॥ऐसें विचारूनि वेह्लाळा । लक्ष लाविलें चरणकमळा । वेगीं पाय देगा गोपाळा । भीमकबाळा बोलिली ॥६३॥तंव पिटिली टाळिया टाळी । ऐकोनि हांसिजे सकळीं । भीमकीये भली केली रांडोळी । खूण वनमाळी जाणत ॥६४॥ऐकोनि भीमकीचिया बोला । कृष्णदेव मानवला । वर्तत खुणा जीवाआंतुला । देत पाउला स्वानंदें ॥९६५॥अबला सांगती वडिलां । यानें अभिमान सांडिला । कृष्ण बाइले अधीन झाला । तिच्या बोलामाजि वर्तत ॥६६॥कृष्ण देखूनि बहु काळा । हळदी लावी वेळोवेळां । उटूनियां घनसांवळा । अतिसोज्वळा करूं पाहे ॥६७॥जें जें कृष्णाआंगीं लागे । तें कांहीं केल्या न निघे मागें । भीमकी उटी लागवेगें । मळी न निघे सर्वथा ॥६८॥अत्यंत निर्मळ वनमाळी । निजनिर्मळीं न निघे मळी । चाकाटली भीमकबाळी । न देखे तळीं मळिवटी ॥६९॥पाहतां कृष्णाचिया चरणरेखा । चरणीं देखे तिहीं लोकां । भीमकीकृष्णलग्न देखा । उटणें हरिखा होतसे ॥९७०॥कृष्णचरणीं निजस्वरूप । देखतां आला स्वेद कंप । कंठीं दाटला पैं बाष्प । विकळरूप मूर्च्छित ॥७१॥सद्गुरु म्हणे सावधान । कृष्णचरणीं दृढ मन । धैर्यबळें राखोनि जाण । विकल्पमन करूं नको ॥७२॥मोहें धाविन्नली धाय । म्हणे तुज झालें काय । झणीं दृष्टि लावो माय । उचलूनि कडिये घेतली ॥७३॥कृष्णचरणीं जें अनुभविलें । तें तंव न बोलवे बोलें । भीमकिये शहाणपण केलें । खुणे वारिलें धायेतें ॥७४॥पाळी आली कृष्णाकडे । एकेचि हातें फेडीं बिरडें । न फिटे तरी रोकडें । दंडवत घडे भीमकीसी ॥९७५॥मेहुणेपणाचे परिपाटी । विषयतृष्णेचिये दृष्टी । बिरडा पडिल्या सुबद्ध गांठी । केंवि जगजेठी सोडिल ॥७६॥मेहुणे म्हणती हा जगजेठी । जाणे बिरडियांची हातवटी । अभ्यास केला यमुनातटीं । दाटोदाटीं गौळणींसीं ॥७७॥वर्में कर्में बोलती खुणा । यादव म्हणती श्रीकृष्णा । बिरड्या पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ॥७८॥महावीरांचें बिरडें पडिलें । तें त्वां येकलेन फेडिलें । मेहुणे न लाजती बोलतां बोलें । रुक्मिया दिधलें तें दीजे ॥७९॥सासूसासर्यांची आवडी । देवकीवसुदेवांची गोडी । म्हणती कृष्णा विरडें फेडीं । वचन न मोडीं वडिलांचें ॥९८०॥कृष्ण अवलोकी कृपादृष्टी । बिरड्यांच्या सुटल्या सुबुद्धगांठी । द्वैतकांचोळी समदृष्टि । फेडि जगजेठी तत्काळ ॥८१॥पहा गे यानें नवल केलें । कृष्णें दृष्टीच उगविलें । न सोडितां पैं फेडिलें । बिरडें काढिलें निजदृष्टी ॥८२॥पाहतां कृष्णदृष्टीकडे । फिटे संसारबिरडें । त्यासि हें दुर्घट केव्हडें । फेडितां बिरडें नोवरीचें ॥८३॥नानाव्रतें तपें दान । योगयागादि साधन । करितां शिणले योगिजन । तर्ही कृष्णचरण न ठाकती ॥८४॥भीमकी दैवाची पैं चांग । परमभाग्यें अतिसभाग्य । पावली कृष्णाचें अर्धाङ्ग । भावें श्रीरंग भोगित ॥९८५॥कृष्णसम्मुख भीमकी । बैसविली जी कौतुकीं । लाजा झाली अधोमुखी । कृष्णाकडे न पाहे ॥८६॥तंव तळवटीं एकाएक । देखती झाली कृष्णमुख । पाठमोरी पाहतां देख । देखे सम्मुख श्रीकृष्ण ॥८७॥वाम सव्य दोहींकडे । देखे कृष्णाचें रूपडें । आतां मी पाहूं कोणीकडे । चहूंकडे हरि देखे ॥८८॥ऐशा परी अति संकटीं । लाजतां कृष्ण देखे दृष्टी । मग लाज सांडोनि गोरटी । उघडी दृष्टी हरिरूपीं ॥८९॥भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इयेसि हळूचि उटीं । कठिन हस्त तुझा जगजेठी । मल्ल मुष्टी मारिले ॥९९०॥तुझा लागतांचि हात । देहबुद्धी चाकरिसी घात । याचिलागीं जीव भीत । तुझी मात न करवे ॥९१॥रेवती म्हणे जी यादवा । आधीं घ्यावें इच्या नांवा । हळद मग इयेसि लावा । देवाधिदेवा श्रीकृष्णा ॥९२॥कृष्ण म्हणे हळदीमिसें । मजचि लावूं आलिया पिसें । नाम रूप मज न दिसे । काय म्यां कैसें म्हणावें ॥९३॥नामरूपाची व्यवस्था । रुक्मिणीच जाणे तत्वता । माझ्या आंगीं नाहीं सर्वथा । नांव घेतां मी नव्हे ॥९४॥आग्रह न करावा गोपाळा । नामरूप अतूंचि जिव्हाळा । व्यर्थ चाळविसी अबळा । सुखसोहळा तुझेनि ॥९९५॥कृष्ण खूण सांगे जीवींची । नामरूपें अतिरूपाची । सगुणगुणें हे गुणाची । प्रिया आमुची निजदृष्टी ॥९६॥कृष्ण म्हणे रुक्मिणीदेवी । नामरूपें तूंचि आघवी । मज परिस तूंचि बरवी । हासिजे सर्वीं ऐकोनी ॥९७॥हळदी घेवोनि श्रीरङ्गें । उटी भीमकीचीं अष्टाङ्गें । येरी निवतसे सर्वाङ्गें । जाणती आंगें अनुभवी ॥९८॥चरणीं उद्धरिली शिळा । ते कर भोगी भीमकबाळा । मृदुपणाचा जिव्हाळा । जाणती कळा निजभक्त ॥९९॥हा तंव ब्रह्मादिकांचा ईश । हळदीमिसें हृषीकेश । भीमकीचा झाला दास । जगन्निवास जगाचा ॥१०००॥दासाचेंही दास्य करणें । हें तंव श्रीकृष्णचि जाणे । उच्छिष्टें भक्तांचीं काढणें । स्वामीपणें फुगों नेणें ॥१॥कृष्ण साचार देवाधिदेवो । फेडीत भक्तांचा संदेहो । जैसा जैसा भक्तिभावो । तैसा देवो तयासी ॥२॥भक्तभावाचिया आवडी । धूतसे रणाङ्गणीं घोडीं । भक्तसुखाची निजगोडी । जाणे धडफुडी श्रीकृष्ण ॥३॥कृष्णचरणीं सत्य समता । शुद्धभावार्थ अक्षता । भीमकीये ठेवीं माथां । लाज सर्वथा न धरावी ॥४॥ऐकोनि हरिखेली वेह्लाळा । धन्य दशा आली कपाळा । चरणवंदनीं गोपाळा । भीमकबाळा हरिखेली ॥१००५॥हरिखें नमूं पाहे गोरटी । तंव पूर्वील सख्या वक्रदृष्टी । देखतां लाज आली पोटीं । भेद उठी शंकेचा ॥६॥तेणें चुकविले समचरण । वृथा गेलें जी नमन । मायेसकट हांसती जन । येरीं अभिमान धरियेला ॥७॥थोर अभिमानली बाळी । धरी अंगुष्ठ करतळीं । नमन चुकों नेदीं इये वेळीं । इषत् वनमाळी हांसत ॥८॥येरी मस्तक जंव लोटी । तंव समचरणां पडली तुटी । अभिमानें केली हिंपुटी । पाय ललाटीं न लागती ॥९॥नमस्कारलागीं भलें । येरीं मागुतें आंग वळिलें । तंव समसमय पाउलें । कांहीं केल्या नातुडती ॥१०१०॥जितुकें अभिमानाचें बळ । तितुकें निजदृष्टीस पडळ । तेणें चुकविलें चरणकमळ । वेगें वेह्लाळ गजबजिली ॥११॥वियोग न साहवे पोटीं । ऊर्ध्वश्वासें स्फुंदे गोरटी । चरण न लागती ललाटीं । कपाळ पिटी निजकरीं ॥१२॥दुःखें म्हणतसे कटकटा । मर मर दुष्टा रे अदृष्टा । कृष्ण पावलें या गोष्टी फुकटा । चरण ललाटा न लागती ॥१३॥लोक म्हणती सकळ । धन्य भीमकीचें कपाळ । तें हें आजि झालें निष्फळ । कृष्णचरणकमळ नातळती ॥१४॥मनीं होती ऐसी आश । करूनि उटणियाचें मिष । कृष्ण नमीन सावकाश । तेंही उदास भाग्य झालें ॥१०१५॥चरणां न पावेचि कपाळ । जिवीं लागली तळमळ । गात्रें जाताति विकळ । परम विह्वळ होतसे ॥१६॥चंडवातें जैसी केळी । उलथूं पाहे जी समूळीं । त्याहूनि अधिक भीमकबाळी । गात्रें सकळी कांपती ॥१७॥नेत्रीं अश्रूंचिया धारा । आंगें कांपतसे थरथरा । चरनवियोगें सुंदरा । शरीरभारा उबगली ॥१८॥गळती अंगींचीं भूषणें । करमुद्रिका आणि कंकणें । पडली अवशेषित प्राणें । सत्वगुणें मूर्च्छित ॥१९॥जीवनावेगळी मासोळी । तेंवि तळतळी भीमकबाळी । उद्धव कलवळिला तये वेळीं । आनंदजळीं वर्षतु ॥१०२०॥उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । तुझी अवस्था शोधित चित्ता । विनोद न करीं भक्तहिता । चरणीं माथा ठेवूं दे ॥२१॥मग धांवोनि लवलाहें । धरी भीमकीची बाहे । म्हणे उठीं उठीं हो माये । वंदीं पाये कृष्णाचे ॥२२॥सांडी सांडीं लाज अभिमान । निर्विकल्प राखीं मन । वृत्ति करूनि सावधान । हरिचरण वंदावे ॥२३॥उद्धवाचे निजवचनीं । दृढविश्वासें रुक्मिणी । लाज सांडिली निपटूनी । हरिचरणीं निर्लज्ज ॥२४॥समचरणांचिये भेटी । सुटल्या अहंसोहंगांठी । उठूं विसरली गोरटी । घातली मिठी हरिचरणीं ॥१०२५॥वृत्तीसि झालें समाधान । खुंटला शब्द तुटलें मन । भोगिताहे चैतन्यघन । समचरण वंदितां ॥२६॥उपरमली विषयदृष्टी । निजानंदें कोंदली सृष्टि । तेथें हारपली त्रिपुटी । उठाउठीं निजलाभ ॥२७॥कृष्णचरणीं जदली कैसी । देह विदेह नाठवे तीसी । विसरली विवाहसोहळियासी । कृष्णसाम्येंशीं समरस ॥२८॥नोवरा नोवरी नाठवे हेतु । आण वाहूनि गेला दृष्टान्तु । अर्थ स्वार्थ आणि परमार्थ । झाला अंत अनंतीं ॥२९॥हरि म्हणे हे वेह्लाळ । दिसे देहभावीं विकळ । माय धाय करिती कोह्लाळ । सोयरे सकळ मिळोनी ॥१०३०॥ऐशा करितील गोष्टी । पायां लागलिया साठीं । जीवभावासि पडली तुटी । वर जगजेठी वरूं नये ॥३१॥लौकिक परमार्थासि सळ । दोहीं पक्षीं पडेल विकळ । माया धाया करिती कोह्लाळ । मजवरी रचितील विटाळ ॥३२॥ऐशीं उफराटीं बिरडीं । पडलीं देवासि सांकडीं । सावधान हे धडफुडी । केवीं तांतडी होईल ॥३३॥भीमकीनिजसुखान्तरीं । वेगीं प्रवेशला श्रीहरि । तोही विसरला सुंदरी । सावधान करावया ॥३४॥देवो देवी झाली एक । भेद फिटला निःशेख । लागली निज सुखा टकमक । चेववी देख कोण कोणा ॥१०३५॥सहजें सहज मेळीं । निजबोधें वनमाळी । स्वभावें भीमकबाळी । सावध करी सवेगें ॥३६॥निजीं निजसुखावेगळी । न निवडे कोणे काळीं । करूनि अहंकाराची होळी । होय वेह्लाळी सावध ॥३७॥तिसी देहा जरी येणें । तरी देह ऐसें मी न म्हणें । अवघें आंगींचे आंगवणे । पूर्णपणें रचिलीसे ॥३८॥चराचर जैसें दिसें । तें तें आघवेंचि मी असें । जीव शिव झाले मदंशें । रितें न दिसे मजवीण ॥३९॥यापरी कृष्णरुक्मिणी । सावध झालीं एकपणीं । माया गेली लिंबलोण करूनी । ओवाळूनि सर्वस्वें ॥१०४०॥ऐक्याचिया बोहल्यावरी । दोघें वधूवरें साजिरीं । बैसविलीं अभिन्नप्रीतीवरी । निजनिर्धारीं स्वलीला ॥४१॥सरली नमस्काराची वारी । तंव श्रीकृष्णें केली चोरी । लिंगदेहाचे गांठीभीतरी । डाव श्रीहरी चोरिला ॥४२॥पालवीं पालव बांधण्यासाठीं । चहूं देहांच्या सोडिल्या गांठी । पायां लागे गोरटी । नेदी महाहटीं हटवादी ॥४३॥चैतन्यचोर हा निजदृष्टी । सोडीत अभ्यंतरींच्या गांथीं । घेतलें देवों नेणे जगजेठी । वृथा चावटी कां करा ॥४४॥आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आयती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण ॥१०४५॥ॐकार आळा दृढमूळ । सहज वृक्ष तो सुनीळ । वाढिन्नला सकोमळ । अर्धमात्रापर्यंत ॥४६॥आगम निगम तींच पानें । वैराग्यमुहुराचीं सुमनें । महुरला कवणे मानें । श्रद्धाजीवनें सपोस ॥४७॥परिमळा लोधले साचार । रुंजी करिती मुमुक्शुभ्रमर । आमोदरसभावें सादर । झण्त्कार सांडोनी ॥४८॥स्वानंदवसंताचें रिंगवणें । वृक्ष नित्य नवा तेणें गुणें । संतकोकिळांचीं सुटलीं मौनें । टाहो करिती निजबोधें ॥४९॥सकळ फळें फळल्यापाठीं । आम्रवृक्षफळें शेवटीं । रसस्वादाचिया खोटी । पोटींची आंठी सांडिलिया ॥१०५०॥निज सेजे जो मुराला । तोचि सज्जनें सेविला । बहुत काय बोलों बोला । आंबा शिंपों आला श्रीकृष्ण ॥५१॥तेथें केली नवलकुसरी । सम्मुख पाहतां नोवरा श्रीहरि । विमुख पाहतां तोचि नोवरी । ऐशिये मांडीवरी बैसविली ॥५२॥सेंडा धरूनि समूळीं । अखंड एक धार लागली । आंबा शिंपी भीमकबाळी । चौघी वेह्लाळी तेथ गाती ॥५३॥प्रकृति पुरुष दोघें जणें । आंबा शिंपिती एकपणें । च्यूत विस्तारला अच्युतपणें । बाप म्हणणें जगाचा ॥५४॥आंबा शिंपोनि गोरटी । कृष्णासहित वेगें उठी । हातींची रिती नव्हे वाटी । कृष्ण पूर्णदृष्टि पाहिला ॥१०५५॥त्रिगुणगुणातीत जाण । तिसरे दिवसीं तेलवण । करूनि नोवरीस अर्पण । वाण पालटणें चतुर्थीं ॥५६॥कृष्णासि वाण पालटण । नामरूपाचें वास संपूर्ण । स्थितिकाळासि देवोनि मान । लीला श्रीकृष्ण नेसला ॥५७॥वाण पालटणें नोवरीस । अक्षयाचें सपुर वास । नेसोनियां सावकाश । निजसुखेंसीं वर्तत ॥५८॥वोहरें बैसवोनि वाडेंकोडें । समसाम्य वाहोनि साडे । ऐरणी विस्तारावया पुढें । शुद्धमती सावध ॥५९॥व्याही गौरविलें सकौतुकें । कृष्णासमान मानूनि सकळिक । अवघियां देवोनियां सुख । एक एक गौरविले ॥१०६०॥भीमकें मांडिलें विंदान । भवऐरणीसंपादन । कृष्णासी वंशपात्रदान । विधिविधान वेदोक्त ॥६१॥वंश विस्तारितां कौतुक । सोळा कळांचे सोळा करक । प्रकृतिस्वभाव सुपलिया देख । ज्ञानदीप सोज्वळ ॥६२॥शुद्धमतीनें तत्वता । एकाजनार्दना पाहतां । वंष ठेविला कृष्णाचे माथां । जुनाट कथा परियेसा ॥६३॥पूर्वीं पितामहाचा पिता । तयासी प्रसन्न सुभानु होता । तेणें भानुदासें वंश सरता । केला तत्वता हरिचरणीं ॥६४॥प्रह्लादाचे कृपेसाथीं । बळीचें द्वार राखी जगजेठी । तैसीच हेही आहे गोष्टी । कृपादृष्टि कृष्णाची ॥१०६५॥सांगता वंशपात्रदान । लागलें निजवंशाचें अनुसंधान । आमुचे वंशींचें वरदान । परम भक्त श्रीकृष्णाचे ॥६६॥मी जन्मलों धन्य वंशीं । म्हणोनि हरिभक्ति जाण आम्हांसी । संत सोयरे नीज सुखासी । वंश कृष्णासि निरविला ॥६७॥जें जयासि निरविलें । तेणें तें पाहिजे सांभाळिलें । आमुचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसे लाविलें जनार्दनें ॥६८॥कथेसी झाली आडकथा । म्हणोनि न कोपावें श्रोतां । धेंडा नाचवीन कृष्णनाथा । रसाळ कथा पुढें आहे ॥६९॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां श्रीकृष्णविवाहसंभ्रमकंकनबंधनादिचतुर्थहोमाम्रवृक्षसिंचनकथनं नाम षोडशप्रसंगः ॥१६॥श्रोते म्हणती नवल । ऐकतां याचे बोल । रसाळ आणि अतिसखोल । येताति डोल प्रेमाचे ॥१०७०॥मग म्हणे कविपोषका । थोरा मिळविलें जी सुखा । पार नाहीं आजिच्या हरिखा । कथा सांग काम निःशंक ॥७१॥महाप्रसाद जी आतां । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । कोणें नाचविलें कृष्णनाथा । नोवरी नाचविता कोण झाला ॥७२॥दोहीं पक्षींच्या दोघां जणां । कास घेवोनि आले रंगणा । सभा देखोनि दाविती खुणा । कळा नाचना दावीं पां ॥७३॥बोधें कृष्ण घेवोनि खांदीं । नाचे ऐक्यताळें तिही संधी । चुकों नेदी समानबुद्धि । नानाछंदीं नाचत ॥७४॥देहाभिमानें घेतली नोवरी । दावीत नानाशब्दकुसरी । द्वंद्वताळातें सांवरी । देतसे भंवरी भयस्वर्गीं ॥१०७५॥बोध नाचत घेऊनियां कृष्ण । नोवरी घेवोनि देहाभिमान । आपुलाले पक्षीं जाण । दोघे जण नाचती ॥७६॥ओंवाळूनि श्रीकृष्णासी । अनंत मुद्रा याचकांसी । देऊनि अमर केलें त्यांसी । मागों आणिकांसी विसरले ॥७७॥ओवाळणी हातीं चढे । तो न पाहे आणिकीकडे । वाणिती कृष्णाचे पवाडे । मागणें त्यापुढें खुंटलें ॥७८॥श्वेत पीत त्रिगुण वास । ओंवाळूनि सावकाश । त्याग करिती कृष्णदास । अतिउह्लास सोहळियाचा ॥७९॥ओंवाळणी नोवरीकडे । अमित विषयीं सुख पडे । घेतां अधिक तृष्णा वाढे । चहूंकडे ते मागती ॥१०८०॥न सुटती अभिलाषांच्या गांठी । सोडोनि देतां कांपती मुष्टि । मागुती लोलिंगता दृष्टी । कवडीसाठीं झोंबती ॥८१॥त्यागितां जीर्ण देहाचें वास । दाते होती कासावीस । न सरे मागत्याची आस । त्यांतें बहुवस वाणिती ॥८२॥पाहें पां अत्यंत जर्जर झालें । दिसे नवां ठायीं तडकलें । पाहिजे अविमुक्त त्यागिलें । वायां गेलें दों दिसां ॥८३॥ऐकोनि त्यागाची मात । अधोमुख होय गृहस्थ । लोभ न संडी पोटांत । क्रोधें निंदित सिकविल्या ॥८४॥तुम्हीं कैसेनि त्याग केला । सिकवूं आलेति पुढिलांला । आम्ही नायकों तुमच्या बोला । म्हणवोनि रुसला त्यागासी ॥१०८५॥त्याग नोहे नोवरीपक्षीं । देखोनि हांसिजे मुमुक्षीं । कृष्णवर्हाडी अतिदक्षी । त्यागाविशीं उद्भट ॥८६॥कृष्ण घेवोनि नाचतां । बोध शिणला तत्त्वतां । हळूच उतरूनि कृष्णनाथा । होय निघता लाजोनी ॥८७॥देहाभिमान पैं नोवरी । कांहीं केल्या जी नुतरी । पडे उठी पळे दुरी । लाज न धरी सभेची ॥८८॥धरूं धांविन्नले एक । नोवरी घेवोनि पळे देख । कोंडों जातां अधिकाधिक । ठकोनि लोक तो पळे ॥८९॥त्यासी संतीं केली विषी । हळूचि आणिला सोहंबुद्धि । तेहि सांडोनि त्रिशुद्धि । नोवरी बुद्धि उतरिली ॥१०९०॥तेथ झाली नवलपरी । भक्तीं प्रार्थिला मुरारि । नोवरी घेऊनि खांद्यावरी । रंगीं श्रीहरि नाचावें ॥९१॥भक्तिभावा भुलला देवो । वचन नुल्लंघीच पहाहो । नोवरी घेवोनि देवाधिदेवो । दावी निर्वाहो नृत्याचा ॥९२॥निजीं निजरूपावरी । समसाम्यें निज नोवरी । घेवोनियां खांद्यावरी । नृत्य करी स्वानंदें ॥९३॥पहिलेनि ताळें जी तत्वतां । अकार हाणोनियां लता । उकारमकारांच्या माथां । पावोनि पिटिता होय कृष्ण ॥९४॥उल्लाळे देत कवणेपरी । वैकुंठ कैलासाहूनि वरी । शून्य सांडोनियां वरी । चिदंबरीं नाचत ॥१०९५॥नोवरी वाढवी आपणावरी । आपण वाढे नोवरीवरी । क्षणा तळीं क्षणा वरी । नानापरी नाचवी ॥९६॥पाहतां पाहतां पडलें ठक । नोवरा नोवरी झालीं एक । जीव श इव हे सरली भाक । निजसुख स्वानंदें ॥९७॥कृष्णासी आठवलें देख । आम्ही दोघें होवोनि एक । नाचतां जीव सकळिक । जीवपणा मुकतील ॥९८॥यालागीं काळाचिये स्थिति । नोवरी उतरिली श्रीपति । जयजयकार कीजे भक्तीं । ओंवाळिती सर्वस्वें ॥९९॥धेंडा नाचविला यायापरी । तंव तळी आणिली बाहेरी । फळीं पुष्पीं अतिसाजिरी । ज्ञानदीपें सोज्वळ ॥११००॥दीधली अनुभवाच्या हाता । वंदूनि झाला तो बोलता । वेगीं सांगा कुळदेवता । नाचविता मी होईन ॥१॥आधीं सांगावें नोवरीकडे । नांवें ऐकों द्यावीं निवाडें । तें नाचवीन वाडेंकोडें । वराकडे मग पुसों ॥२॥नोवरीकडील कुलदेवता । मायराणी आणि ममता । कल्पना कामाक्षी सर्वथा । माजिले घरीं खेळतसे ॥३॥सवासना देवी सकळी । बाळा बगळा मुकी मैळी । मारको मेसको कंकाळी । उच्छिष्ट चांडाळी भाणाची ॥४॥आशा तृष्णा दोघीजणी । आमुच्या कुळीं मुळींहूनी । निंदादेवी महादारुणी । तीस सज्जनीं कांपिजे ॥११०५॥मोहमातंग आमुचे कुळीं । लोभवेताळ त्यांजवळी । क्रोधझोटिंग महाबळी । आधी सळी शुभकार्यीं ॥६॥जें जं दैवत सांगे पैं गा । तें तें नातळतां आणि रंगा । नये त्या वाटे लावी वेगा । नाचवूनि उगा तो राहे ॥७॥कृष्णपक्षीं अलौकिक । अवघें कुलदैवत एक । नाचतां अनुभव कौतुक । पडिलें ठक सकळिकां ॥८॥कृष्णकुळदैवत एक । दुजें नाहीं नाहीं देख । एकाजनार्दनीं सुख । अतिसंतोष नाचतां ॥९॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां धेंडाकुलदेवतादिवर्णनकथनं नाम सप्तदशप्रसंगः ॥१७॥हातीं दुधा तुपाची वाटी । देवकी बैसवूनि पीठीं । पुढें दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपीं शुद्धमती ॥१११०॥धन्य धन्य तुमची कुशी । जेथें जन्मला हृषीकेशी । म्हणोनि लागली चरणांसी । भीमकीसी निरवित ॥११॥चौघां पुत्रांहूनि आगळी । वाढविली हे वेल्हाळी । आतां दिधली तुम्हांजवळी । कृष्णस्नेहें पाळावी ॥१२॥दोघीजणीं मातापितरीं । हातीं धरूनि नोवरी । यादवांचिये मांडीवरी । यथाक्रमें बैसविली ॥१३॥गहिवर न धरवे भीमकासी । प्रेम लोटलें तयासी । मिठी घालोनि कृष्णचरणांसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥१४॥लाज सांडोनि शुद्धमती । पायां लागली श्रीपति । भीमकी देवोनि हातीं । वैकुंठपति जोडिला ॥१११५॥पाहती नरनारी सकळा । आसुवें आलीं त्यांच्या डोळां । खंती न करी भीमकबाळा । मायेकडे न पाहे ॥१६॥कृष्णीं लागलिया प्रीति । मायामाहेरीची खंती । सर्वथा न करी चित्तीं । निजवृत्ति हरिचरणीं ॥१७॥मोहमायेसी कळवळा । पायां लागे वेळोवेळा । आसुवें पूर्ण आलीं डोळां । म्हणे प्रतिपाळा भीमकेसी ॥१८॥शुद्धमति म्हणे रायासी । मज आंदण द्यावें भीमकीसी । होईन कृष्णाची निजदासी । चरणसेवेसी निरंतर ॥१९॥राजा म्हणे शुद्धमति । जीव प्राण आणि संपत्ति । सर्वस्व अर्पिलें श्रीपति । विकल्प चित्तीं न धरावा ॥११२०॥भाव विश्वास दोघे जण । दीधले भीमकीसी आंदण । कृष्णसेवेलागीं जाण । अहर्निशीं सादर ॥२१॥द्विपदा आणि चतुष्पदा । नाना धातु रत्नें अष्टधा । भीमकें आंदण गोविन्दा । बहुत संपदा दीधली ॥२२॥भीमकें विनविलें कृष्णासी । विनंती आहे पायांपासी । पुत्र झालिया भीमकीसी । निजपंक्तीसी शेष दीजे ॥२३॥चतुर्विधा सुसूत्रधारी । तुमची आज्ञा आमुचे शिरीं । भोजनाचा आग्रह न करी । वचन श्रीहरी मानलें ॥२४॥वरात निघाली वेगेंसीं । गृहप्रवेश द्वारकेसी । आज्ञा दीधली भीमकासी । निज नंगरासी तो निघे ॥११२५॥दोघें वधूवरें गजस्कंधीं । भोंवती यादवांची मांदी । गीत नृत्य अतिविनोदीं । द्वारकेमध्यें उत्साह ॥२६॥युग्मम् - द्वारकावर्णनप्रसंगेन पुनर्व्याख्यायते ॥सा वृष्णिपुर्युत्तमितेंद्रकेतुभिर्विचित्रमालांबररत्नतोरणैः ।बभौ प्रतिद्वार्युपक्लृप्तमंगलैरापूर्णकुंभाऽगुरुधूपदीपकैः ॥६०॥सिक्तमार्गा मदच्युद्भिराहूतप्रेष्ठभूभुजाम् ।गजैर्द्वाःसु परामृष्टरंभापूगोपशोभिता ॥६१॥मृगमदगंधाचे पैं सडे । कुंकुम कस्तूरी चहूंकडे । मखरें श्रृंगारिलीं पुढें । वाडेंकोडें झळकती ॥२७॥नगर श्रृगारिलें कुसरी । गुढियाह तोरणें घरोघरीं । कर्दळीस्तंभ रोविले द्वारीं । फळें माझारी शोभती ॥२८॥पूर्णकलश द्वारोद्वारीं । प्रदीप्त दीप ठेविले वरी । दध्यक्षता दूर्वाङ्कुरीं । सुमनाहारीं सुगंधा ॥२९॥वोहरें पहावया कौतुक । नगरनागरिक लोक । मुंडपघसणी होतसे देख । एक एक धाविन्नले ॥११३०॥चढले माडिया गोपुरीं । पुष्पाञ्जलि ओपिती नारी देव वर्षती अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥३१॥पाहतां कृष्णस्वरूपासी । अराणुक नाहीं डोळ्यांसी । यालागीं नये दृश्यापाशीं । कृष्णसुखासी पडकले ॥३२॥पदोपदीं दीपावळी । ओंवाळिती वनमाळी । बाप दैवाची नव्हाळी । भीमकबाळी अर्धाङ्गी ॥३३॥वेश्या आणि संन्यासी । मुंडपघसणी होतसे कैसी । कोप आला श्रीपादासी । दंडें वेश्येसी ठोकिती ॥३४॥येरी विसरली देहभावासी । वृत्ति लाधली कृष्णरूपासी । रागें लाथा हाणोनि तिसी । विटाळ आम्हांसीं कां केला ॥११३५॥येरी हांसोनि कपाळ पिटी । अजुनी क्रोध न सांडा पोटीं । विटंबिली दंडकांसोटी । आत्मदृष्टि तुम्हां नाहीं ॥३६॥मी उत्तम पैल हीन । हें विषमभेदाचें अज्ञान । सर्वभूतीं समाधान । निजात्मज्ञान तुम्हां नाहीं ॥३७॥नाहीं निजशान्ति रोकडी । तरी कां केली तडातोडी । भगवीं नाशिलीं लुगडी । उपाधि गाढी श्रीपदा ॥३८॥शेंडी सांडीला उपडुनी । वासना वाढविली चौगुणी । श्रीकृष्ण देखिलिया नयनी । विटाळ मानी तो निजान्ध ॥३९॥ऐसा करितां वाग्वाद । तरी दुरी अंतरला गोविंद । आडवा दाटला जनसंबंध । न दिसे मुकुंद सर्वथा ॥११४०॥वोहरें आलीं महाद्वारा । लोण उतरिती सुंदरा । मूद ओंवाळी सुभद्रा । कृष्ण पुढारा चालिला ॥४१॥पूर्णकलशेंसीं आल्या दासी । अनन्तवाणें परिवस्त्रेंसीं । ते ते मेचू देवोनि त्यांसी । नवविधांसीं अलंकार ॥४२॥शोभा आली भाणवसासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । साच मानली जनासी । तिनें सकळांसी भुलविलें ॥४३॥येतां देखोनि श्रीकृष्णनाथा । लक्ष्मी लाजली तत्वता । सांडूनियां कृत्रिमता । निजरूपता प्रकतली ॥४४॥भीमकीनें देखिलें लक्ष्मीसी । विस्मयो दाटलां तियेसी । विचारितां निजमानसीं । दोहीं रूपेंसीं आपणचि ॥११४५॥विधि गृहप्रवेशासी । वोहरें बैसविलीं भाणवसीं । करविती लक्ष्मीपूजनासी । विधिवादेंशीं द्विजवर ॥४६॥परमामृतें भरोनि वाटी । देवकी लावी सुनेच्या ओंठीं । पुसे वृद्धाचारगोठी । सुने घालीसि निज माये ॥४७॥येरी म्हणे परमानंदें धालें । कृष्णसुखें नित्य निवालें । तुमच्या सेवेसि पावलें । प्राप्त झालें हरिपदीं ॥४८॥रेवती येऊनि भीमकीपाशीं । वेगीं निरवी भाणवसासी । हातीं धरूनि नोवरीसी । काय तियेसी सांगत ॥४९॥वरूनि आलीस कृष्णनाथा । तरी हें सर्वस्व तुझे माथां । घेणें देणें कार्यचिंता । कर्तव्यता तुज आली ॥११५०॥येथील आहे ऐसी रीति । सुचित राखावी चित्तवृत्ति । सकळ मानावी कृष्णस्थिति । तेणें श्रीपति संतोषे ॥५१॥जें कां खरकटलें लेपलें । अत्यंत गोगाणीं गोंगायिलें । तें भाणवसाबाहीर केलें । नेवोनि घातलें ओंवळ्यात ॥५२॥जें कां उठंडळ गडबडी । आश्रमआळां ठेवीं रोकडी । अत्यंत झणत्कारें बडबडी । वेळणी तोडीं विधीची ॥५३॥जें कां कांठफरा उललें । देखसी ज्याचें बूड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचिलें निज आळां ॥५४॥तपें तापली तुपावी । स्वर्गसिंका बैसली त्याची । सामगी वेंचिल्या तेथींची । मग उलंडूनि सांडिती ॥११५५॥कामक्रोधाचे उंदीर । कोरोनि ठोल्हार करिती घर । त्याचे मुखीं घालूनि पाथर । येतें द्वार बुजावें ॥५६॥लाविल्या लवण न लगे ज्यासी । लवणलक्षण काय त्या पाहसी । तें तव नाणावें पंक्तीसी । चवी तयाशी पैं नाहीं ॥५७॥सगळे शिजवितां अवघड । कांकड करिती कडकड । समभावें भरडीं दृढ । होतील गोड परिपाकें ॥५८॥कणीक चाळावी असकट । चाळोनि सांडावें कसपट । होईल परिपाकें चोखट । पूर्ण पुरिया सिद्धलाडू ॥५९॥कृष्णभाणवसा त्रिशुद्धि । अष्टमहासिद्धि नवमहानिधि । तेथ त्वां वागावें अतिबुद्धि । जीवोपाधि न करावी ॥११६०॥सासू सासरा भावे देवर । आदिकरूनि लहान थोर । होवोनि अवधियांसि सादर । अतितत्पर सेवेसी ॥६१॥वडील जावू आपण । भीमकीकरीं निजकंकण । घालूनि करी निरवण । पाणिग्रहण भाणवसा ॥६२॥धाकुटे जावेशीं प्रीतिकर । नवविध रत्नांचा हार । कंठीं घातला मनोहर । येरीं नमस्कार तिसी केला ॥६३॥बाई जें जें तुम्हीं शिकविलें । तें तें मज हितासि आलें । रेवती हरिखेली येणें बोलें । आलिंगिलें भीमकीसी ॥६४॥असो हा ऐसा विवाहोत्सव । द्वारके येवोनि वासुदेव । मूळवराडी आजे सर्व । देवोनि गौरव वोळखिले ॥११६५॥जे जे भूतळींचे भूपति । आपुलाल्या नगरा जाती । ते ते मार्गीं त्यांप्रति । जे जे भेटती जनसमूह ॥६६॥राजे प्रजा देशिक जन । महानुभाव महाजन । रुक्मिणीहरनपाणिग्रहण । मानिती ऐकोन विस्मय ॥६७॥तैसेचि याचक विद्योपजीवी । त्यागदक्षिणालब्धागौरवीं । त्यांच्या वदनें कीर्ति आघवी । प्रकट झाली तिहीं लोकीं ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP