मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - एवं भगवता तन्वी रामेण प्रतिबोधिता । वैमनस्यं परित्यज्य मनो बुद्ध्या समादधे ॥५१॥होतां कृष्णरूपीं संलग्न । ऐकोनि बलरामाचें वचन । कृष्णमय झालें मन । तेणें स्फुंदन चालिलें ॥५६०॥कृष्णभाव झाला चित्ता । गेली देहबुद्धि सर्वथा । कृष्णचरणीं ठेविला माथा । तीन्ही अवस्था सांडूनी ॥६१॥वाचा झाली सद्गद । निःशेष खुंटला अनुवाद । सुखें कोंदला परमानंद । पूर्णबोध भीमकीसी ॥६२॥नाठवती भावे देर । वृत्ति झाली कृष्णाकार । ब्रह्मरूप चराचर । देखे सुंदर निजबोधें ॥६३॥देखोनि भीमकीची वृत्ति । हरिख न समाये रेवतीपती । उचलोनियां दोहीं हातीं । अतिप्रीतीं आळंगिली ॥६४॥कृष्ण बलभद्र रुक्मिणी । तिघें मिनलीं पूर्ण कृष्णीं । परमानंद रणाङ्गणीं । भावें रुक्मिणी भोगित ॥५६५॥कृष्ण भीमकी हलायुध । तिघां झाला एक बोध । एका जनार्दनीं अनुवाद । परमानंद प्रकटला ॥६६॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां रुक्मिणीप्रबोधरुक्मिबंधविमोचनं नाम त्रयोदशप्रसंगः ॥२३॥यापरी कृष्णपत्नी । रामें प्रबोधिली वचनीं । बंधुवैरूप्यखेद सांडूनी । स्वस्थ श्रीकृष्णीं रंगली ॥६७॥तेंविच बोधूनि चक्रपाणी । स्वस्थ केला विवेकवचनीं । रुक्मिया दिधला सोडूनी । विरूपपणीं सलज्ज ॥६८॥रुक्मिणी बोधिली बलरामें । तो बोध ऐकिलियाही अधर्मे । विकल्प अज्ञान सहसा न शमे । विशेषें श्रमे अपमानें ॥६९॥प्राणावशेष उत्सष्टो द्विड्भिर्हतबलप्रभः ।स्मरन्विरूपकरणं वितथात्ममनोरथः ॥५२॥अविशिष्ट प्राण उरले गांठीं । बोडूनि सोडियेलें यादवद्वेष्टीं । विरूप स्मरोनि होय कष्टी । कल्पना पोटीं बहु तर्की ॥५७०॥हीन दीन केली कळा । वीर्य शौर्य मुकला बळा । केंवि मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ॥७१॥पित्यानें म्हणितलें नपुंसक । त्या वचनाचें थोर दुःख । दावितां विरूपतेचें मुख । सकळ लोक हांसती ॥७२॥निष्फळ झाला मनोरथ । नगरा न वचवे लज्जित । मग भोजकट निवासार्थ । वसवी उपहत ऐश्वर्यें ॥७३॥चक्रे भोजकटं नाम विवासाय महत्पुरम् । अहत्वा दुर्मतिं कृष्णमप्रत्यूह्य यवीयसीम् ।कुंडिनं न प्रवेक्ष्यामीतुक्त्वा तत्रावसद्रुषा ॥५३॥प्रतिज्ञा करूनि वाहिली आण । रणीं विभांडोनि श्रीकृष्ण । भीमकी आणीन मी जाण । तोही पण नव्हेचि ॥७४॥यालागीं न वचें कौण्डिन्यपुरा । लाजा राहिला तो बाहिरा । उभवूनि भोजकोटनगरा । वसतीसि थारा तो केला ॥५७५॥रुक्मिया सोडिलिया उपरी । यादवांच्या दळभारीं । लागलिया निशाणभेरी । जयजयकारीं गर्जती ॥७६॥भगवान्भीष्मकसुतामेवं निर्जित्य भूमिपान् ।पुरमानीय विधिवदुपयेमे कुरूद्वह ॥५४॥मागधप्रमुख जिणोनि राजे । भीमकी स्वपुरा आणोनि पैजे । विधिवत् वारिली हें व्याख्यान वोजें । कुरुध्वजें परिसावें ॥७७॥विधिवत् पाणिग्रहणसिद्धि । इतुका आश्रय मुळींचे पदीं । प्रेक्षूनि वृद्धाचारप्रसिद्धि । विस्तार प्रबोधीं विवरावा ॥७८॥यापरी रणाङ्गणीं । जिणोनि महावीरश्रेणी । कृष्णें आणिली रुक्मिणी । अतिविंदानीं लाघवीं ॥७९॥कृष्ण निघाला वेगेंसी । आला पभासक्षेत्रासी । तेथें पूजोनि सोमनाथासी । दुसें चौंपासीं दीधलीं ॥५८०॥पाहोनि सावकाश वाडी । कटक उतरलें निरवडी । हाट चोहटे परवडी । घडमोडी वस्तूंची ॥८१॥राजे प्रजा देश देशिक । नगर नागरिक लोक । उपायनें जी अनेक । येती सम्मुख घेवोनी ॥८२॥जिणोनि सकळीकां रायांसी । विरूप करूनि रुक्मियासी । कृष्णें नेलें भीमकीसी । हें भीमकासी श्रुत झालें ॥८३॥ऐकोनि झाले अत्यंत सुख । जीवीं न समाये हरिख । मजवरी तुष्टला आदिपुरुष । भाग्य चोखट भीमकीचें ॥८४॥मजपासूनि दोघां जन्म । परि दोहींचें भिन्न कर्म । भीमकी पावली पुरुषोत्तम । विरूपधर्म रुक्मिया ॥५८५॥रुक्मिया निंदी श्रीकृष्णासी । तेणेंचि कर्में वैरूप्य त्यासी । भीमकी भावें कृष्णचरणांसी । अर्धाङ्गासी पावली ॥८६॥आपुला भावार्थचि जाण । कृष्णप्राप्तीसी कारण । यावेगळें शहाणपण । केवळ जाण दंभार्थ ॥८७॥यालागीं निजभावेंसी । शरण जावें श्रीकृष्णासी । भीमकी अर्पूनियां त्यासी । हृषीकेशी भजावें ॥८८॥पाचारूनि शुद्धमतीसी । वृत्तान्त सांगितला तियेसी । येरी म्हणे राहवा श्रीकृष्णासी । कन्यादानासी विधि करूं ॥८९॥कन्यादानाचेनि मिसें । कृष्णा पूजूं सावकाशें । पांच पंचकांचें फिटलें पिसें । अनायासें मन निवे ॥५९०॥भीमक निघाला वेगेंसीं । टाकूनि आला प्रभासक्षेत्रासी । लोटाङ्गण श्रीकृष्णासी । निजभावेंसी घातलें ॥९१॥त्राहि त्राहि जी दातारा । नेत्री अश्रूंचिया धारा । कृपा उपजली कृष्णवीरा । वेगीं सामोरा धाविन्नला ॥९२॥जीवींच्या जीवा झाली भेटी । कांहीं केल्या न सुटे मिठी । बाप कृपाळु जगजेठी । पूर्ण दृष्टि पाहिला ॥९३॥सच्चिदानंदें झाला तृप्त । सबाह्य देखे कृष्णनाथ । फिटला आर्तीचा मनोरथ । कृतकृत्यार्थ पैं झाला ॥९४॥मग म्हणे जय जय जी चक्रपाणि । माझें भाग्य तें हें रुक्मिणी । लीन झाली तुमचे चरणीं । कुळतारणीं चिद्गंगा ॥५९५॥शुद्ध करीत दोहीं कुळां । जेंवि प्रवाह गंगाजळा । तेंवि जन्मली हें बाळा । सकळ कुळां उद्धार ॥९६॥ शुद्ध शान्ति निवृत्ति भक्ति । ते हे भीमकी निज मूर्ति । तुज वोपिली श्रीपति । परि एक विनति परिसावी ॥९७॥वीर्य शौर्य भेमकीहरण । करितां न लगे अर्धक्षण । आतां विधानोक्त कन्यादान । पाणिग्रहण करावें ॥९८॥हेंचि विनति गरुडध्वजा । चारी दिवसां माझी पूजा । अंगीकारवी अधोक्षजा । मी दास तुझा निजभवें ॥९९॥ऐका श्रीकृष्णविंदान । भक्ताधीन होय आपण । भीमकीचें पाणिग्रहण । भावें जाण करितसे ॥६००॥होतें श्रीकृष्णाचे मनीं । संभ्रमें पर्णाची रुक्मिणी । देवकी सुभद्रा आणोनी । महोत्सव करावा ॥१॥हेंचि भीमकीच्याही चित्तीं । सोहळियानें वरावा श्रीपति । हळदी लावीन आपुल्या हातीं । बोहल्यापति बैसोनि ॥२॥दोघांसही प्रीतिकर । भीमक बोलिला नृपवर । कृष्णासि मानलें उत्तर । हर्षनिर्भर भीमकी ॥३॥कृष्ण म्हणे ज्येष्ठ माजा । दादोजींस विनति करा जा । रामासि नमस्कारी राजा । चरण वोजा धरियेले ॥४॥कृष्णासि म्हणे बलभद्र । होसी कार्यार्थें चतुर । रामें उठवूनि नृपवर । सम्मान थोर त्या केला ॥६०५॥राजा म्हणे श्रीहरि । माझा आश्रम पवित्र करीं । आपुलिया दासांतें उद्धरीं । कौण्डिन्यपुरीं त्वां यावें ॥६॥भीमकी म्हणे ऐक ताता । भाग्यें पावलासि कृष्णनाथा । मागें सरों नये तत्वता । गृहममता सांडावी ॥७॥सर्व सामग्री जीवेंभावेंसीं । आवडी आणीं कृष्णापासीं । भावें पूजावा हृषीकेशी । सकळ कुळासि उद्धरूं ॥८॥वचना मानवला बलदेव । ऐकोनि हांसिला देवाधिदेव । पाणिग्रहणा मूळमाधव । मूळींचा ठाव लग्नासी ॥९॥भीमक म्हणे कळलें बीज । कृष्णपूजेनें आमुचें काज । धन्य धन्य हे माझी आत्मज । कृष्ण निज पावली ॥६१०॥इच्या वचनाचें महिमान । पाहतां बुडोनि ठेलें मन । वचनें पळविला अभिमान । मी तूं पण उडविलें ॥११॥बाप माझें भाग्य थोर । कृष्ण परब्रह्म साचार । भीमकीयोगें चराचर । ब्रह्माकार पैं झालें ॥१२॥अवचट श्रीकृष्णचरणीं । वंशींचा विनटल्या कोण्हे । तोचि सकलकुळातें तारूनी । परब्रह्मभुवनीं नांदवी ॥१३॥ऐसे सुखाचेनि हरिखें । राजा बोलिल निजमुखें । वचन भीमकीचें कौतुकें । आवश्यकें मानिलें ॥१४॥सेवक पाठविले नगरासी । वैभवसामग्रीवेगेंसीं । नगरनागरिकलोकांसीं । मूळमाधवासी आणावें ॥६१५॥सवेंचि विनवी श्रीकृष्णासी । मूळ पाठवावें द्वारकेसी । देवकी आणि वसुदेवासी । सोहळियासी आणावीं ॥१६॥भाव जाणोनि मानसीं । संतोषला हृषीकेशी । मूळ पाठविलें द्वारकेसी । सोहळीयासी सकळिकां ॥१७॥द्वारेकेमाजि सिंहासनीं । उग्रसेन नृपाग्रणी । यादवशौरिप्रमुख वृष्णि । वार्तिकीं येऊनि जुहारिलें ॥१८॥रुक्मिणीहरणविजयोत्सव । पाणिग्रहणा मूळमाधव । मूळपत्रिका पाहोनि सर्व । करिती जयरव आनंदें ॥१९॥आज्ञा करूनि घरटीकारा । विजयोत्सवचा डांगोरा । नगरीं सर्वत्र श्रृंगारा । सहपरिवारा वाहनेंशीं ॥६२०॥तदा महोत्सवो नॄणां यदुपुर्यां गृहे गृहे ।अमूदनन्यभावानां कृष्णे यदुपतौ नृप ॥५५॥नगरीं ऐकोनि विजयघोष । नरनारींसी परमोह्लास । कृष्णविवाह पहावयास । मुदित मानस सर्वांचें ॥२१॥तेव्हां राजाज्ञेच्या गजरीं । उत्साह यदुपुरीमाझारी । यादव सन्नद्ध सहपरिवारीं । घरोघरीं हरिप्रेमें ॥२२॥श्रीकृष्ण जो यादवपति । त्याच्या ठायीं अनन्य प्रीति । आस्तिक्यभावें सप्रेमभक्ति । उह्लास चित्तीं त्या झाला ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP