मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर अहत्वा समरे कृष्णमप्रत्यूह्य च रुक्मिणीम् ।कुंडिनं न प्रवेक्ष्यामि सत्यमेतद्ब्रवीष्यहम् ॥२१॥कृष्ण विभांडूनि वाणीं । हिरोनि नाणितां रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणीं । मजलागूनि तो दोष ॥७७॥जे करिती साधुनिंदा । त्या पापाच्या मज आपदा । रणीं न जिंकितां गोविंदा । जरी मी नुसधा परतलों ॥७८॥विद्या घेऊनि गर्वा येती । विकल्पोनि ते गुरूसि निंदिती । तीं तीं पापें मज होती । जरी मी श्रीपति न जिंकें ॥७९॥केवळ पूज्य माता पिता । त्यांतें पुत्र हाणी लाता । तीं तीं पापें मज आतां । जरी कृष्णनाथा न जिंकें ॥३८०॥देखोनि साधुसज्जनांसी । दोष आरोपिती त्यांसी । तीं तीं पापें येतु मजपासीं । जरी मी कृष्णासि न जिंकें ॥८१॥कृष्ण न जिंकोनियां रणीं । घेऊनि न येतां रुक्मिणी । पुरीं न प्रवेशें कौण्डिन्यें । मुख परतोनि दाखवी ॥८२॥इत्युक्त्वा रथमारुह्य सारथिं प्राह सत्वरः । चोदयाश्वान्यतः कृष्णस्तस्य मे संयुगं भवेत् ॥२२॥ऐसी वाहूनियां आण । कवच लेयिला आपण । वेगीं घेऊनि धनुष्यबाण । आंगवण पहा माझी ॥८३॥कृष्ण अज्ञानाची आदी । त्यासि हृदयीं नाहीं बुद्धि । परणूं पाहें राक्षसविधी । तो मी सिद्धी जावों नेदी ॥८४॥कृष्ण गर्वित एकलेपणीं । दुजयातें हृदयीं नाणी । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बाणीं दंडीन ॥३८५॥रागें कांपतसे थरथरा । दांत खातसे करकरा । धूम्र निघे नेत्रद्वारां । रहंवरा चडिन्नला ॥८६॥रथीं बैसला मदगर्वित । वेगीं सारथियातें म्हणत । चपळ चौताळों दे रथ । कृष्णनाथ जेथ असे ॥८७॥आजि कृष्णेंसिं सन्नध । करणें आहे द्वंद्वयुद्ध । अगर्वीं धरितो गर्वमद । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥८८॥अद्याहं निशितैर्बाणैर्गोपालस्य सुदुर्मतेः ।नेष्ये वीर्यमदं येन स्वसा मे प्रसभं हृता ॥२३॥आजि माझ्या तिखट वाणीं । कृष्ण खिळीन रणांगणीं । चोरोनि नेली माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥८९॥सैन्य अवलोकिलें दृष्टी । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थाटी । शत्रें मुष्टि झळकती ॥३९०॥चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनियां प्रबळ । संख्या केवळ परियेसा ॥९१॥दोन लक्ष अठरा सहस्र । अधिक सात शतें वीर । संख्या अक्षौहिणी प्रकार । केला निर्धार श्रीव्यासें ॥९२॥किती गज किती रथ । अश्व पदाति समस्त । विभागसंख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥९३॥एकवीस सहस्र आड शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्मत्त । सैन्या आंत चालती ॥९४॥एक लक्ष सहस्र नव । तीन शत पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥३९५॥एक लक्ष नव सहस्र । तीनशें पन्नास पदातिभार । अश्वसादी रथ कुंज्नर । संख्या समग्र अक्षौहिणी ॥९६॥पांसष्टि सहस्र सा शतें । देक दशक अधिक तेथें । वीर पायांचे भीडते । युद्धीं पुरते निजगडे ॥९७॥इतुकी सैन्याची मिळणी । तया नाम अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणीं । महामुनीं शीव्यासें ॥९८॥ऐसें निज सैन्य अद्भुत । त्यामाजि रुक्मिया विराजत । साह्य आले राजे दक्षिणाइत । वीर गर्जत महाबळी ॥९९॥रणीं जिंकोनि जरासंद्ध । मिनले गदहलायुध । अवघे करिती विनोद । थोर आह्लाद जैं त्यांचा ॥४००॥यादव मिळोनि थोर थोर । करिती पातावयाचा विचार । येता देखोनि पारखे भार । मग समोर लोटले ॥१॥दोन्ही सैन्या झाला मेळ । घायीं उठिला हलकल्लोळ । वाजंत्राचा ध्वनि प्रबळ । रणवेताळ खवळला ॥२॥कोपें चालिला रुक्मिया वीर । ऐकोनि आला यादवभार । तेथें न देखे शार्ङ्गधर । रथ सत्वर पेलिला ॥३॥विकत्थमानः कुमतिरीश्वरस्य प्रमानवित् ।रथेनैकेन गोविंदं तिष्ठ तिष्ठेत्यथाहवयत् ॥२४॥एकाकी एकला चक्रपाणि । दूरूनि देखिला नयनीं । एके रथीं कृष्णरुक्मिणी । देखोनि मनीं प्रज्वळला ॥४॥सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेंवि वैरागी निघे योगासी । तेंवि सैन्य सांडूनि यादवांपाशीं । एकरथेंसीं धाविन्नला ॥४०५॥वल्गना करूनि ऐशापरी । एक्या रथीं ठाकिला हरि । कुमति नेणोनि ऐश्वर्यथोरी । उभा रे उभा म्हणतसे ॥६॥धनुर्विकृष्य सुदृढं जघ्ने कृष्णं त्रिभिः शरैः । आह चात्र क्षणं तिष्ठ यदूनां कुलपांसन ॥२५॥धनुष्य मांडूनि मांडणी । गुण वाइला तत्क्षणीं । बाण लावूनियां गुणीं । वोढी काढूनि चालिला ॥७॥कृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता हा नेणे प्रभावो । कुमति धरूनियां महागर्वो । काय पहा हो बोलत ॥८॥क्रुष्णासि म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें । चोरी करूनि पळसी काये । कोण माये राखेल ॥९॥यदुकुळासि तूं लांछनकर । क्षण एक समरीं राहें स्थिर । कामक्रोध सलोभ शर । कार्मुकीं दुर्धर सज्जिले ॥४१०॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP