मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ततो रथादवप्लुत्य खङ्गपाणिर्जिघांसया ।कृष्णमभ्यद्रवत्क्रुद्धः पतंग इव पावकम् ॥३१॥कृष्ण मारीन मी निर्धारीं । वोडण खांड घेतलें करीं । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धांविन्नला ॥४९॥रुक्मिया महावीर नेटक । वोडणखर्गांचा साधक । सरक थरक दावी चवक । अतिनिःशंक निजगड ॥४५०॥वोडण धडकूनि आदळित । खर्ग तुळोनि तळपत । उल्लाळे देऊनि उसळत । हात मिरवित खर्गाचा ॥५१॥कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारें तितुके तोडी । चार्ही मारावया घोडीं । रथाबुडीं रिघाला ॥५२॥दारुक सारथि निजगडा । रथें करूं पाहे रगडा । कृष्णें लाविला कुर्हाडा । रथापुढें येवों नेदी ॥५३॥बाण आदळला सत्राणें । आडवें वोडण धरिलें तेणें । वोडण भेदूनियां बाणें । शिरींचा मुकुट पाडिला ॥५४॥कोप आला रुक्मियासी । वेगें धाविन्नला मोकळा केशीं । हात घांसोनि भूमीसी । हातवशी खर्गातें ॥४५५॥तस्य चापततः खङ्गं तिलशश्चर्मवेषुभिः ।छित्वासिमाददे तिग्मं रुक्मिणं हन्तुमुद्यतः ॥३२॥कृष्णासि म्हणे देख देख । घायें छेदीन मस्तक । विकट देवोनियां हाक । वेगें सम्मुख लोटला ॥५६॥कृष्णें विंधिला तिखट बाण । तिलप्राय केलें वोडण । खङ्ग छेदूनियां जाण । अणुप्रमाण तें केलें ॥५७॥बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आलीवाट । रथ लोटूनि घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥५८॥दृष्ट्वा भ्रातृवधोद्योगं रुक्मिणी भयविह्वला ।पतित्वा पादयोर्भर्तुरुवाच करुणं सती ॥३३॥धनुष्य घालूनियां गळां । वोढूनि आणिला घायातळां । कांपिन्नली भीमकबाळा । घनसावळा देखतसे ॥५९॥दाटूनि आणिलें जी क्रोधा । झळफळित काढिली गदा । त्याच्या करीन मी शिरश्र्छेदा । येरी गदगदां कांपत ॥४६०॥कांहीं न बोलवे सर्वथा । चरणांवरी ठेविला माथा । कृपाळुवा श्रीकृष्णनाथा । यासि सर्वथा न मारावें ॥६१॥कृष्ण म्हणे परती सर । येणें निंदा केली थोर । याचें छेदीन मी वक्त्र । म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥६२॥तिखट देखोनि शस्त्रधार । चरण न सोडि सुंदर । बोलोनि मृदु मंजुळ उत्तर । गदाधर विनविला ॥६३॥योगेश्वराप्रमेयात्मन्देवदेव जगत्पते ।हन्तुं नार्हसि कल्याण भ्रातरं मे महाभुज ॥३४॥सुरासुरां तूं दुर्धर । योगियांमाजि योगेश्वर । विश्वनियंता ईश्वर । वेदा पार न कळेचि ॥६४॥ऐसियासि तुज युद्धीं । आकळूं पाहे हा अहंबुद्धि । पिता अवगणूनि तूंतें निंदी । होय अपराधी सर्वथा ॥४६५॥हा अभिमानिया मारिसी रणीं । माया प्राण सांडील तत्क्षणीं । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल ॥६६॥जेथूनि उठी निंदा क्रोध । त्या लिंगदेहाचा करीं छेद । मारूं नको ज्येष्ठ बंधु । लोकविरुद्ध न करावें ॥६७॥धरिलिया कृष्णकांस । द्यावा दोंपक्षीं उह्लास । नांदवावें सावकाश । येथें तेथें समत्वें ॥६८॥श्रीशुक उवाच - तया परित्रासविकंपितांगया शुचावशुप्यन्मुखरुद्धकंठया । कातर्यविस्रंसितहैममालया गृहीतपादः करुणो न्यवर्तत ॥३५॥नधरत चालिलें स्फुंदन । नेत्रीं लोटलें जीवन । झालें कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥६९॥देखोनि बोलाची चातुरी । उचलिले दोहीं करीं । आलिंगिली प्रीति थोरी । बंधु न मारीं सर्वथा ॥४७०॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP