मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर अधुनाऽपि वयं सर्वे वीर यूथपयूथपाः ।पराजिताः फल्गुतंत्रैर्यदुभिः कृष्णपालितैः ॥१६॥आतांचि पाहें पां प्रत्यक्ष । आम्ही सर्वही यूथप मुख्य । कृष्णाश्रयें यादवीं देख । पराभविलों अल्पबळें ॥३६०॥काळ साह्य झालेपणीं । प्राप्त झाली त्या रुक्मिणी । मजसगट राजे रणीं । तृणप्राय जिंकिले ॥६१॥तो जंव काळ साह्य नाहीं । तंववरी युद्ध करिसील काई । वीर सोडिजतील घायीं । योद्धे ठायीं पडतील ॥६२॥जंववरी अनुकूळ नाहीं काळ । तंववरी काय करिसील बळ । सिद्धि न पवेचि सळ । श्रम केवळ पावसी ॥६३॥रिपवो जिग्युरधुना काल आत्मानुसारिणि ।तदा वयं विजेप्यामो यदा दैवं प्रदक्षिणम् ॥१७॥यालागीं धरीं धीर शहाणपणीं । जंव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंतूं अर्धक्षणीं । केंवि रणीं राहतील ॥६४॥एवं प्रबोधितो मित्रैश्चैद्योऽगात्सानुगः पुरम् ।हतशेषाः पुनस्तेऽपि ययुः स्वं स्वं पुरं नृपाः ॥१८॥यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासि प्रबोध । मग सांडूनियां युद्धक्रोध । निजनगरासि निघाला ॥३६५॥शिशुपालासि युद्धाआंत । जिवेंचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला अनर्थ । हित मानित दमघोष ॥६६॥तो म्हणे जरासंधासी । उतराई न हों उपकारासी । तुवां वांचविलें शिशुपालासी । पुत्रदानासि तूं दाता ॥६७॥ऐसें मानूनियां सुख । मग परतला दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥६८॥युद्धीं यादवीं मारितां । राजे उरले जे जुंझतां । तिहीं मानूनियां हिता । मग सर्वथा निघाले ॥६९॥घायीं जर्जर नेणों किती । नागवले सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रति । वेगें भूपति निघाले ॥३७०॥रुक्मी तु राक्षसोद्वाहं कृष्णद्विडसहन्स्वसुः ।पृष्ठतोऽन्वगमत्कृष्णमक्षौहिण्या वृतो बली ॥१९॥मग परतला शिशुपाळ । विमुख राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणें केलें ॥७१॥तो रुक्मिया नृपनंदन । कृष्णद्वेष्टा स्वसाहरण । राक्षसविधि न साहोन । धांवे क्षोभोन पाठीसीं ॥७२॥एक अक्षौहिणी दळ । योद्धे वीर महाप्रबळ । सक्रोध जैसा प्रलयकाळ । बोले शिशुपाळप्रमुखांतें ॥७३॥धूर रणीं होय विमुख । तेव्हांचि त्याचें काळें मुख । कवण वांचलियाचें सुख । घेवोनि विख मरावें ॥७४॥रुक्म्यमर्षीं सुसंरब्धः श्रृण्वतां सर्वभूभुजाम् ।प्रतिजज्ञे महाबाहुर्दंशितः सशरासनः ॥२०॥जरासंधा शिशुपाला देखतां । सकळ राजेहि ऐकतां । उभा करूनि भीमकीपिता । थोर गर्जता तो झाला ॥३७५॥तुम्हीं सांडिलें रे पुरुषार्था । मी तों नेवों नेदीं राजदुहिता । रणीं जिंकोनि कृष्णनाथा । भीमकी तत्वता आणीन ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP