मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर इति निश्चित्य यवनः प्राद्रवंतं पराड्मुखम् ।अन्वधावज्जिघृक्षुस्तं दुरापमपि योनिनाम् ॥६॥ऐसा निश्चय करूनि यवन । धरावयाचे इच्छे करून । रथातळवटीं उतरून । निःशस्त्र होऊन धाविन्नला ॥३६॥यवनापुढें पराड्मुख । चपळ पळतां यदुनायक । तदनुलक्षें ग्रहणोन्मुख । धावे सम्यक कालयवन ॥३७॥माझा प्रताप जाणोनि प्रौढ । सामान्यत्वीं आपणा गूढ । करूनि पलायन करी वाड । जाणें कैवाड मी याचें ॥३८॥मजपुढें हा पळेल कोठें । मारीन हाणोनियां चपेटे । म्हणोनि धांवे परम नेटें । पडती कोठें पद न कळे ॥३९॥ऐशी विशाळ हांव म्लेच्छा । कृष्णापाठीं धांवे स्वेच्छा । दुर्लभ यत्ना योगियांच्या । तो या तुच्छा केंवि गवसे ॥४०॥योगियांचीं शिक्षितमनें । परम एकाग्रें सावधानें । त्यांसि नावरे दुर्घट प्रेमें । कालयवनें त्या धरितां ॥४१॥हस्तप्राप्तमिवाऽऽत्मानं हरिणास पदे पदे । नीतो दर्शयता दूरं यवनेशोऽद्रिकंदरम् ॥७॥पदोपदीं स्पर्शती बोटें । तों तों यवन धांवे नेटें । म्हणे आतां पळसी कोठें । माझे चपेटे चुकवूनी ॥४२॥हातीं सांपडलियाचि परी । आपणातें त्या दावी हरि । पदोपदीं स्खलना वारी । तनु सांवरी पुनः पुनः ॥४३॥पळतां पळतां जाती झोंक । तैसाचि धीरें सांवरी तवंक । तंव पाठीशीं ताम्रमुख । मारी हाक भयंकर ॥४४॥हस्त वितस्ति अंगिळें चारी । अलब्धगात्र स्पर्शें करीं । आवेशें दीर्घ हाका मारी । मानी अंतरीं हस्तगत ॥४५॥जीवधाकें पळतो हरि । मार्ग अमार्ग हें न विचारी । दरें दरकुटें गिरिकंदरीं । घोर कान्तारीं धांवतसे ॥४६॥कडे कपाटे डोंगर । नद्या प्रस्रव द्रुम पाथर । पुलिनें खदकें कंटक क्रूर । कर्दम दुस्तर उल्लंघिती ॥४७॥पळतां अवचितें मृग जंबुक । वराह वानर कुंजर वृक । व्याघ्र चमरीमृगनायक । पळती निःशंक जीवभयें ॥४८॥ऐसा हावे चढवूनि यवन । कृष्णें करूनि पलायन । नेला गिरिकुक्षीं वोढून । निधनकारण लक्षूनी ॥४९॥म्लेच्छ मानी आपुले मनीं । पळतां कृष्णासि जाली ग्लानि । आतां प्रतापें आकळोनी । बळें बांधोनि नेईन ॥५०॥तंव तो गतिमंतांचा स्वामी । ज्याचेनि मारुत जवीन व्योमीं । चपळ कल्पना मनोधर्मीं । कामना कामीं अनावर ॥५१॥तयासि पळतां कायसे कष्ट । कालयवनाचें वळलें मेंट । तथापि धरूनियां धारिष्ट । बोले लघिष्ठ नोकूनी ॥५२॥पलायनं यदुकुले जातस्य तव नोचितम् । इति क्षिपन्ननुगतो नैनं प्रापाहताशुभः ॥८॥म्हणे रे यदुकुळीं जन्मोन । समरीं करिसी पलायन । हें तुज उचित नोहे जाण । पाहें परतोन मुख दावीं ॥५३॥पुरुषचिह्नें आंगीं वाहसी । तरी कां समरीं पळोनि जासी । यदुकुळीं जरी जन्मलासी । तरी समरासि दृढ होयीं ॥५४॥ऐसा बहुधा निस्तेजून । बोलत होत्साता पै यवन । कृष्णामागें परम जवीन । करी यत्न धरावया ॥५५॥अहताशुभ जो अक्षीणकर्मा । धरूं न शकेचि मेघश्यामा । मांद्य जाणोनि आपुल्या वर्ष्मा । नोकी जन्मा यदुकळींच्या ॥५६॥एवं क्षिप्तोऽपि भगवान्याविशद्गिरिकंदरम् ।सोऽपि प्रविष्टस्तत्रान्यं शयानं ददृशे नरम् ॥९॥ऐसा हिणावितांही हरि । दाटोदाटीं गिरिकंदरीं । प्रवेशला गुहाद्वारीं । तोषे अंतरीं यवनेंद्र ॥५७॥आतां पळेल कवणे ठाइं । गुहेमाझारी कोंडला पाहीं । गुहा धांडोळोनि सर्वही । धरीन बाहीं कवळूनी ॥५८॥म्हणोनि प्रवेशे गुहेमाजी । भीतरी न्याहाळी नेत्रकंजीं । अन्यत्र पुरुष निद्रिस्त सहजीं । सध्वान्ततेजीं अवगमला ॥५९॥मंद प्रकाशामाजि जेंवि । रुज्जु लपोनि सर्पत्व दावी । काळयवनें तयाचि भावीं । तो नर माधवीं अवगमिला ॥६०॥कालयवनातें नेऊनि तेथें । निजरूप लपविलें भगवंतें । यवन वितर्की आपुल्या चित्तें । तें कुरुनाथें परिसावें ॥६१॥नन्वसौ दूरमानीय शेते मामिह साधुवत् ।इति मत्वाऽच्युतं मूढस्तं पदा समताडयत् ॥१०॥बहुतेक मातें आणूनि दुरी । प्रवेशोनि हा गुहान्तरीं । येथें निजेला साधूपरी । ऐसें अंतरीं मानूनी ॥६२॥अच्युत ऐसें त्या मानून । भगवन्मायामोहित यवन । मूढमतीस्तव लत्ताहनन । करिता जाला तयातें ॥६३॥कालयवनाच्या लत्ताप्रहारें । जालें निद्रिता चेइरें । निद्रा भंगतां निर्जरवरें । म्लेच्छ संहरे तें ऐका ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP