मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर भूमेर्भारायमाणानामसुराणां क्षयाय च । अवतीर्णो यदुकुले गृह आनकदुंदुभेः । वदंति वासुदेवेति वसुदेवसुतं हि माम् ॥४१॥भूमीकारणें भाररूप । केवळ दैत्य असुर भूप । त्यांच्या क्षयाचा साक्षेप । कृतसंकल्प मम जन्म ॥३३॥अधर्मकरांचें संहरण । तेणेंचि धर्मसंरक्षण । असाधूम्चें निर्दळण । साधुपाळण तैं तेंची ॥३४॥महाविष्णु जो परात्मा । तो मी त्रिदशकल्याणकामा । भूभारहरणा प्रार्थितां ब्रह्मा । धरूनि जन्मा अवतरलों ॥२३५॥कोण म्हणोनि पुसिलें याचें । परिज्ञान करूनि साचें । कोणे गोत्रीं जन्म त्याचें । विवरण वाचे निरूपितों ॥३६॥सोमवंशीं यदुअन्वयीं । वृष्णिप्रवर वसुदेवगेहीं । म्यां हा अवतार धरिला पाहीं । ऐक नामेंही सांगतसें ॥३७॥आनकदुंदुभि जो वसुदेव । तेथें माझा प्रादुर्भाव । वसुदेवतनय वासुदेव । म्हणती मानव भूलोकीं ॥३८॥अवतारकार्य कांहीं कांहीं । यावत्काळ केलें तेंही । अल्प स्वल्प कथितों पाहीं । ऐकोनि हृदयीं समजावें ॥३९॥कालनेमिर्हतः कंसः प्रलंबाद्याश्च सद्द्विषः ।अयं च यवनो दग्धो राजंस्ते तिग्मचक्षुषा ॥४२॥कालनेमीचा अवतार । तो म्यां वधिला कंसासुर । सज्जनद्वेष्टे दैत्य क्रूर । प्रलंबप्रमुख निर्दळिले ॥२४०॥तुझिया तीक्ष्णदृगग्निपातें । राया यवन म्यां वधिला येथें । तुजवरी सुप्रसन्नचित्तें । अनुग्रहार्थ प्रकटलो ॥४१॥ सोऽहं तवानुग्रहार्त गुहामेतामुपागतः । प्रार्थितः प्रचुरं पूर्व त्वयाहं भक्तवत्सलः ॥४३॥कंटकाविळ घोरारण्य । किमर्थ प्रवेशलासि म्हणोन । राया तां जो केला प्रश्न । तत्प्रतिवचन हें ऐक ॥४२॥तवानुग्रहार्थचि जाणें । माझें येथ जालें येणें । तुज उमजावया कारणें । खुणा लक्षणें अवधारीं ॥४३॥कैवल्यदाता पैं श्रीहरि । जो एक तुजला कथिला सुरीं । तो प्रकटलों ये अवसरीं । प्रतीत तवान्तरीं बाणावया ॥४४॥चतुर्बाहु पीतवसन । मेघश्याम पंकजनयन । वैजयंती श्रीवत्सचिह्न । अभीष्टध्यान अवगमिजे ॥२४५॥भक्तवत्सल मी जो पूर्वीं । तुवां प्रार्थिलों सर्वभावीं । ते हे अभीष्टसिद्धि आघवी । फळली अटवी सुरतरूंची ॥४६॥वरान्वृणीष्व राजर्षे सर्वान्कामान्ददामि ते । मां प्रपन्नो जनः कश्चिन्न भूयोऽर्हति शोचितुम् ॥४४॥हे जाणोनि राजेश्वरा । मनोवांछिता मागें वरा । त्या देऊनि तव अंतरा । पूर्ण सत्वरा करीन ॥४७॥अनन्यभावें मातें शरण । कोण्ही एक होईल जन । पुढती त्यातें शोकदर्शन । नोहे जाण कल्पान्तीं ॥४८॥अनन्यभावें शरण मातें । होऊनियांही अपूर्णचित्तें । राहोनि शोक करावयातें । समर्थ नोहे कोण्हीही ॥४९॥अथवा अन्यत्र देवता भजती । जेंवि ते प्राणी शोकार्ह होती । तैसी मदेकशरणांप्रति । न शिवे कल्पान्तीं शोकोर्मि ॥२५०॥हें वाटेल तुज कानडें । तरी हें व्याख्यान ऐकें उघडें । दृष्टांतद्वारा अर्थ निवडे । तैम श्रोता न पडे संदेहीं ॥५१॥उखता बैसविला बिढारीं । तो तें इतरां दान न करी । गृहस्थ दात्यातेंचि दवडी दुरी । तैं कोण उजरी दानपात्रा ॥५२॥तेंवि सामान्यें दैवतें । पदेंण सहित नाशिवंतें । त्यांच्या वरें शोकाभिभूतें । भजकें होती सर्वत्र ॥५३॥तैसे न होती मदेकशरण । लाहोनि अक्षय मम वरदान । होती निष्कामनापूर्ण । शोक कोठून त्या स्पर्शें ॥५४॥ऐशी भगवन्मुखींची वाणी । ऐकोनि मुचुकुंद अंतःकरणीं । प्रत्यय बाणोनि वोळखी जुनी । स्मरोनि नमनीं प्रवर्तला ॥२५५॥श्रीशुक उवाच - इत्युक्तस्तं प्रणम्याऽऽह मुचुकुंदो मुदान्वितः ।ज्ञात्वा नारायणं देवं गर्गवाक्यमनुस्मरन् ॥४५॥शुक म्हणे गा कुरुनरशक्रा । इत्यादि कृष्णोक्ति अवक्रा । ऐकोनि मुचुकुंद पाहे वक्त्रा । शशांकचक्रा चकोरवत् ॥५६॥इत्यादि बोलिला होत्साता । कृष्णचरणीं ठेवूनि माथा । परमानंदें निर्भरचित्ता । माजि तत्वता विवरीतसे ॥५७॥राज्य करितां मज अयोध्यापुरीं । वृद्धगर्गोक्ति तैं ऐकिली श्रोत्रीं । द्वितीयपरार्धामाझारी । कीं अवतरेल हरि यदुवंशीं ॥५८॥अठ्ठाविसाव्या युगाच्या ठायीं । द्वापारान्तीं कलीच्या उदयीं । देवकीजठरीं वसुदेवनिलयीं । शेषशायी जन्मेल ॥५९॥ऐसी गर्गोक्ति स्मरोनि मनीं । तो हा नारायण जाणोनी । परम विनीत नम्र मूर्ध्नि । मुचुकुंद स्तवनीं प्रवर्तला ॥२६०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP