मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर लब्ध्वा गुहं ते स्वःपालं मुचुकुंदमथाब्रुवन् ।राजन्विरमतां कृच्छ्राद्भवान्नः परिपालनात् ॥१६॥देवीं आपणा स्वर्गरक्षक । यत्नें आणूनियां षण्मुख । तेणें पदखळिला तारक नृप धार्मिक स्थिराविला ॥३७॥सुरवर म्हणती मुचुकुंदातें । राया घेइजे विश्रांतीतें । आमुच्या पालनार्थ क्लेशातें । पावलासि तूं चिरकाळ ॥३८॥ब्रह्मयाच्या वरें करून । षण्मुखहस्तें तारकमरण । तो दैत्येंसिं करील रण । तूं येथून विश्रामें ॥३९॥क्षुधातृषानिद्रात्यागें । समरीं क्लेश सोसिले आंगें । आमुच्या कैपक्षप्रसंगें । ऐश्वर्यभोगें अंतरूनी ॥१४०॥आम्हांनिमित्त ऐश्वर्य त्यजिलें । ऐसें देवीं जें बोलिलें । तें ये श्लोकीं निरूपिलें । श्रोतीं परिसिलें पाहिजे ॥४१॥नरलोके परित्यज्य राज्यं निहतकंटकम् ।अस्मान्पालयतो वीर कामास्ते सर्व उज्झिताः ॥१७॥लक्षूनि नरलोकाची प्राप्ति । अमर मरणातें वांछिती । जेथ जन्मोनियां सुकृती । अक्षय साधिती कैवल्य ॥४२॥त्या नरलोकाच्या ठायीं । जन्म लाहूनि सूर्यान्वयीं । क्षात्रधर्मीं नीतिन्यायीं । दुष्ट अन्यायी दंडिले ॥४३॥निष्कलंक सर्व जगती । शासिली सप्तद्वीपवती । भविष्यमाणीं अथवा भूतीं । नाहीं नृपति तुज ऐसा ॥४४॥ते त्वां तुमच्या पालनकार्या । स्वराज्यभोग त्यागिले राया । समरीं असुरां त्रासूनियां । निर्जरनिलया रक्षियलें ॥१४५॥तुज रक्षितां अमरावती । जाली अजरामरत्वप्राप्ति । मर्त्यलोकींच्या भोगसंपति । त्यांची निर्गति अवधारा ॥४६॥सुता महिप्यो भवतो ज्ञानयोऽमात्यमंत्रिणः ।प्रजाश्च तुल्यकालीया नाऽधुना संति कालिताः ॥१८॥निर्जर म्हणती मान्धातृतनया । भोगभोजनें ज्या तव जाया । पट्टमहिषी परम प्रिया । समानवया अनकूळा ॥४७॥त्यांच्या ठायीं तव औरस । गुणाढ्य पुत्र जे रूपस । समरप्रवीण कृताभ्यास । स्वधर्मलालस तुजहूनी ॥४८॥बंधु गोत्रज ज्ञातिवर्ग । तवाश्रयें जे प्रवृद्ध साङ्ग । भोगिती ऐश्वर्य भूभाग । शौर्यें समरंगप्रवीण ॥४९॥अमात्य मंत्री सेनाधर । धीर धार्मिक शूर चतुर । चमू चतुर्विध दुर्गें राष्ट्र । एकातपत्र असपत्र ॥१५०॥अनुकूळ प्रजा अनुशासना । अनुल्लंघ्य भूचक्रीं एकाज्ञा । सांडूनि ऐसिया सिंहासना । सुरक्षणा स्वीकेलें ॥५१॥तियेकाळींचे स्त्रियापुत्र । मंत्री अमात्य सेनागोत्र । कोश भांडार दुर्गें राष्ट्र । काळें सर्वत्र भक्षिलीं ॥५२॥तुझिये काळींचें दृश्य कांहीं । इये काळीं उरलें नाहें । भूतळीं जाऊनि पाहसी कायीं । कालप्रवाहीं गतसृष्टि ॥५३॥कोण कैसा काळ म्हणसी । तोही राया तूं परियेसीं । जो अनावर ईश्वरासी । सृजूनि ग्रासी त्रिजगातें ॥५४॥कालो बलीयान्बलिनां भगवान्विष्णुरव्ययः ।प्रजाः कालयते क्रीडन्पशुपालो यथा पशून् ॥१९॥राया तूं जरी ऐसें म्हणसी । समरीं तारक न थरे मजसीं । मत्प्रजांतें काळ ग्रासी । गोष्टी कायसी हळवट हे ॥१५५॥तरी हें न म्हणावें भूपति । बळीष्ठाबळिष्ठ जितुके असती । त्यांहूनि बलिष्ठ काळशक्ति । करी समाप्ति सर्वांची ॥५६॥ब्रह्म निर्गुण निराकार । तेथील प्रथम स्फुरणाङ्कुर । जगद्बीज जो ओंकार । तद्वत साचार कालात्मा ॥५७॥काळकळनें नाकळे कांहीं । प्रणवबीजें तें सृजलेंचि नाहीं । यालागीं जो ईश्वर तोहि । कालप्रवाहीं लय पावे ॥५८॥जे जे काळीं जें जें सृजिलें । तें तें तेव्हांचि काळें व्यापिलें । व्यापक विष्णुत्व जें संचलें । कालरूपीं तें जाण ॥५९॥निमेषपळलवअहरहवेगें । कालप्रवाहीं लोटती युगें । त्यामाजि भ्रमिजे चंचळ जगें । क्रीडाप्रसंगें काळाचिया ॥१६०॥स्थूळें चंचळें भ्रमती भुयी । तीं पडलिया प्रारब्धक्षयीं । लिंगें भ्रमवी नाना ठायीं । क्रीडाप्रवाहीं कालात्मा ॥६१॥जेंवि पशूंतें पशुपालक । नानास्तानीं संस्थापक । होय रक्षक नियामक । काळ चाळक तेंवि जगा ॥६२॥यालागीं बलिष्ठ कालसत्ता । जाणोनि राज्याची सांडीं आस्था । मागें जें तुज आवडे चित्ता । तो तत्त्वता वर देऊं ॥६३॥वरं वृणीष्व भद्रं ते ऋते कैवल्यमद्य नः । एक एवेश्वरस्तस्य भगवान्विष्णुरव्ययः ॥२०॥एक कैवल्य वेगळें करून । मागें अपेक्षित वरदान । कैवल्यदाता श्रीभगवान । विष्णु सनातन अव्यय जो ॥६४॥तया ईश्वरावांचून कोण्हा । सामर्थ्य नाहीं कैवल्यदाना । त्यावीण अभीष्ट भोगनाना । आम्हां सुरगणां तूं मागें ॥१६५॥राया कल्याण असो तूतें । तुवां रक्षिलें सुरगणांतें । उत्तीर्णया तव क्लेशातें । कांहीं आम्हां तें प्रार्थावी ॥६६॥ऐसी ऐकोनि सुरवरवाणी । राजा विवरी अंतःकरणीं । कैवल्य नेदवे अमरांचेनी । न रुचे मनीं नैश्वर्य ॥६७॥आतां वृथा मागणें काय । श्रमापहरणीं निद्रेसि ठाय । पुसतां निर्जर वदले काय । तें कुरुरायें परिसावें ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP