मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर शुश्रूषतामव्यलीकमस्माकं नरपुंगव । स्वकर्म जन्म गोत्रं वा कथ्यतां यदि रोचते ॥३१॥ऐकों इच्छितियां आम्हांसी । यथार्थवादें पुशिली पुशी । नरश्रेष्ठा तव मानसें । मानेल तैसी निरूपीं ॥२००॥जरी हे रुचेल मम प्रार्थना । तरी तूं निरूपीं क्रमेंचि प्रश्ना । स्वगोत्र जन्म कर्माचरणा । बोधवीं श्रवणामाजिवडें ॥१॥कोणापासूनि तुझें जन्म । कोण गोत्र काय नांव । कोण वृत्ति कैसें कर्म । यथानुक्रमें बोधवीं ॥२॥इत्यादि मातें पुससी जरी । स्वमुखें कथितों मे अवधारीं । त्यानंतरें तूं कथन करीं । संशय अंतरीं न धरूनी ॥३॥वयं तु पुरुषव्याघ्र ऐक्ष्वाकाः क्षत्रबंधवः ।मुचुकुंद इति प्रोक्तो यौवनाश्वात्मजः प्रभो ॥३२॥भो भो श्रेष्ठो नरशार्दूळा । आमुची ऐक्ष्वाकवंशमाळा । माजि जन्मलों क्षत्रियकुळा । जनक बोलिला मान्धाता ॥४॥मुचुकुंद ऐसें नाम माझें । तारकसमरीं सुरवरकाजें । युद्ध केलें प्रतापतेजें । स्वधर्मव्याजें चिरकाळ ॥२०५॥सुरकैपक्षी षण्मुख आला । तारकसमरीं सज्ज जाला । क्लेशोपशमना निर्जरी मजला । निरोप दिधला ते समयीं ॥६॥चिरप्रजागरश्रांतो निद्रयापहतेंद्रियः ।शयेऽस्मिन्विपिने कामं केनाप्युत्थापितोऽधुना ॥३३॥दोनी महर्युगें मात्र । युद्ध केलें अहोरात्र । समरश्रमें श्रान्तगात्र । मुकुलितनेत्र निद्रेनें ॥७॥विकळ इंद्रियें निद्राभरें । मग यें विपिनीं निर्जरवरें । निद्रा केली स्वेच्छादरें । कोणें चेइरें मज केलें ॥८॥आतां निद्रा भंगोनि मातें । जेणॆं उठविलें अवचितें । तोही जळाला दृगग्निपातें । निज दुष्कृतें बहुतेक ॥९॥सोऽपि भस्मीकृतो नूनमात्मीयेनैव पाप्मना । अनंतरं भवाञ्श्रीमांल्लश्रीतोऽमित्रशातनः ॥३४॥त्यानंतरें देदीप्यमान । देखिलासि तूं श्रीभगमान । भो भो अमित्रनिबर्हण । मित्रतोषण मित्रात्मा ॥२१०॥तेजसा तेऽबिषह्येण भूरि द्रष्टुं न शक्नुमः । हतौजसो महाभाग माननीयोऽसि देहिनाम् ॥३५॥तुझ्या अविषह्य तेजें करून । पहावया असमर्थ आमुचे नयन । न पाहवेचि चंडकिरण । डुडुळालागून साकल्यें ॥११॥जितुकें प्राणी देहधारी । त्यांसि मानार्ह तूं चराचरीं । महाभाग या नामोचारीं । संबोधूनियां म्हणतसें ॥१२॥तुझिया तेजःप्रतापेंकरून । स्तिमित बुद्ध्यादि इंद्रियगण । हतौजसपदांचें व्याख्यान । विस्मयापन्न करीतसे ॥१३॥नृपदर्शनीं सामान्य रंक । चकित पाहे जेंवि साशंक । तेंविच मुचुकुंदें श्रीवत्साङ्क । होऊनि अल्पक प्रार्थिला ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP