मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर पुरा रथैर्हैमपरिष्कृतैश्चरन्मतंगजैर्वा नरदेवसंज्ञितः । स एव कालेन दुरत्ययेन ते कलेवरो विट्कृमिभस्मसंज्ञितः ॥५१॥पूर्वीं तारुण्यभरतें आंगीं । ऐश्वर्यमदाच्या प्रसंगीं । नरेंद्रनामाथिलों जगीं । महत्त्वें भोगीं नृपपदवी ॥१७॥रत्नजडित सुवर्णरथ - । परिवेष्टित शतानुशत । अनेक कुंजर साळंकृत । रत्नखचित साभरणीं ॥१८॥शिबिकाप्रमुख अनेक यानें । विशाळ शिबिरें तुंग वितानें । सन्नद्ध बद्ध प्रबळ सैन्यें । अमात्यरत्नें धीमंत ॥१९॥तिहीं वेष्टित भूतळपृष्ठीं । मृगयाव्याजें देऊनि घरटी । समरीं नृपवर कोट्यनुकोटी । जिंकूनि सृष्टी यश मिरवीं ॥३२०॥अजरामर मानूनि आपणा । म्हणवी महेंद्र नृपवर राणा । संपत्तिमदें भुलोनि कोण्हा । न गणी मरणा विसरोनी ॥२१॥काळात्मका तो तुझेनि योगें । विपत्ति पावे ऐश्वर्यभंगें । तेव्हां तोचि देह देखिजे जगें । दैवप्रसंगें परिणमतां ॥२२॥श्वानसृगाळीं भक्षिला देहो । तैं होय तद्विष्ठेचा पोहो । सडोनि जातां कृमींचा रोहो । पावता दाहो भस्ममय ॥२३॥म्हणसी येवढ्या ऐश्वर्यवंता । किमर्थ होईल हे अवस्था । तरी दुरत्यय तुझी काळसत्ता । तीतें लंघितां कोण असे ॥२४॥काळें ग्रासिले अनेक भूप । अगाध ऐश्वर्य प्रतापकल्प । आपण केउते त्यामाजि अल्प । तथापि साक्षेप मदगर्वें ॥३२५॥ऐश्वर्याची ऐसी दशा । कुत्सितदेहपरिणाम ऐसा । ऐसें कळतां तनुभरंवसा । धरूनि कां फांसां पडताती ॥२६॥ममता करूनि देहावरी । जे नर न भजती श्रीहरि । ते आपणा आपण वैरी । जाले संसारीं जन्मोनी ॥२७॥काय म्हणोनि म्हणाल ऐसें । तरी आत्मशत्रुत्व त्यांचें दिसे । यदर्थीं पुराणसंमति असे । तें तूं परिसें भगवंता ॥२८॥संमतिः - योने सहस्राणि बहूनि गत्वा दुःखेन लब्ध्वाऽपि च मानुषत्वम् ।सुखावहं येन भजंति विष्णुं ते वै मनुष्यात्मनि शत्रुभूताः ॥अनेकयोनींचें सहस्र । पावोनि मरतां वारंवार । भोगितां दुःखें अतिदुष्कर । दुर्लभ फार नरदेह ॥२९॥तेंही लाहूनि मनुष्यपण । अवयवपाटव बुद्धिज्ञान । असतां न भजती जे भगवान । आपणां आपण शत्रु ते ॥३३०॥प्राणी परतंत्र जठरचाडे । जचतां पदती काळदाढे । म्हणोनि पूर्वींच जे दिग्विजयी । विषयपरतंत्र होऊनि तेही ॥३१॥अन्तक प्राप्त झालाचि नाहीं । त्याहूनि पूर्वींच जे दिग्विजयी । विषयपरतंत्र होऊनि तेही । दुःखप्रवाहीं बळें बुडती ॥३२॥तयांची विषयपरतंत्रता । मुचुकुंद कथी श्रीभगवंता । एकाग्र होऊनि परिसिजे श्रोतां । विषयावर्त्ता चुकवावया ॥३३॥निर्जित्य दिक्चक्रमभूतविग्रहो वरासनस्थः समराजवंदितः ।गृहेषु मैथुन्यसुखेषु योषितां क्रीडामृगः पूरुष ईश नीयते ॥५२॥सप्तद्वीपवती अवनी । जिंकूनि दिक्चक्र विग्रहयानीं । एकातपत्रीभूशासनीं । भद्रासनीं सार्वभौम ॥३४॥जिंकूनि भूतळींचे भूपाळ । साधूनि असपत्न भूमंडळ । वरिष्ठ भूभुज पूर्वील सकल । नमिती पदतळ दासवत् ॥३३५॥समरीं विग्रह न करी कोण्ही । यालागिं निवांत चतुरंगिणी । करभार येती पत्रशासनीं । न्यायरक्षणीं धुरंदर ॥३६॥ऐसें ऐश्वर्य जोडल्यावरी । नव्हती श्रीपदभजनाधिकारी । नरदेह नृपत्व तिहीं पामरीं । वृथा संसारीं कां कीजे ॥३७॥रंकें परतंत्र जठरचाडे । सार्वभौमातें नाहीं कोडें । भगवद्भजनीं तोही न जडे । तेंचि निवाडें बोलतसें ॥३८॥बाह्यप्रतापी तेजःपुंज । एकातपत्र कीर्तिध्वज । जिंकूनि दिक्चक्र भूभुज । भोगी साम्राज्य स्वतंत्र ॥३९॥परंतु शत्रु अंतर्गत । कंदर्पदर्पें धडधडित । तो न जिणतां अवघें व्यर्थ । करी ग्रहगस्त स्त्रीकामें ॥३४०॥कामशत्रु बळिष्ठ प्रबळ । तो उत्पादी देहुडें बळ । मग तो अजिंक अरिवर्गमेळ । करी व्याकुळ मौनास्त्रें ॥४१॥भोगलिप्सास्पदीभूत । प्रलोभ बळिष्ट तत्संगत । भोगतृष्णा विफळ जेथ । द्वेष बैसत ते ठायीं ॥४२॥कामभूपाचे पार्षद दोघ । मुख्य शत्रु हेचि त्रिवर्ग । या तिघांचे प्रतिनिधि तिघ । परम अभंग प्रतापी ॥४३॥कामप्रतिनिधि जो मद । तो जाणिजे अष्टविध । लोभप्रतिनिधि दंभ विशद । तोच बहुविध अनावर ॥४४॥द्वेषप्रतिनिधि तो मत्सर । गर्वविषादतिरस्कार । एवमादि शत्रुनिकर । अजिंक अंतर्गत राहे ॥३४५॥पशुपक्ष्यादि युद्धीं जयिन । शुकसारिकासुभाषितप्रवीण । प्लवंग करिती शिक्षानर्तन । तेंवि नृपासन बहिर्मुख ॥४६॥कमनीयकामिनीकटाक्ष क्रूर । भेदतां न भंगे हृदय कठोर । कंदर्पदर्प जो जिंके धीर । अपरशूर तो वदान्य ॥४७॥मर्मस्पर्शाचे वाग्वाण । निंदाद्वेषीं निश्चळ मन । विषयव्याघातीं प्रशान्त पूर्ण । तोचि जयवान जगत्त्रयीं ॥४८॥बाह्यप्रतापें सामाज्यपदवी । अंतरशत्रु कोण्हा नदवी । तो हस्तकीं देऊनि दिवी । नर्तितां वदवीं उदो उदो ॥४९॥स्त्रीकामाचे कटाक्षबाण । लागतां विरहें व्याकुळ प्राण । तेणें होऊन स्त्रीअधीन । क्रीडामृगपण अवलंबी ॥३५०॥स्त्रिया नाचविती तैसा नाचे । वचन लंघूं न शके त्यांचें । परमवालभ स्त्रीकामाचें । आन न सुचे परमार्थ ॥५१॥नित्य नूतन रत्नजडितें । भूषणें लेववी रुक्मघडितें । एकापरिस एक चढितें । यानें भुवनें वसनादि ॥५२॥पानें अन्नें सौरभरस । विविध अर्पूनि करी विलास । अनुल्लंघ्य आज्ञापालना दास । रक्षी मानस स्मरवेधें ॥५३॥स्त्रियासंगीं खेळे द्यूत । स्त्रियांसमवेत करी नृत्य । एवमादि चेष्टा बहुत । वादित्र गीत स्मरलास्यें ॥५४॥क्रीडार्थ भ्रमे वनोपवनीं । नानास्थानीं भुवनीं जीवनीं । विविधयानीं गम्यमानीं । मानी मैथुनीं आह्लाद ॥३५५॥सापत्न ईर्ष्यासंरुष्ट वनिता । साष्टांगनमनें प्रसन्न करितां । न स्मरे साम्राज्यपदयोग्यता । निरपत्रपता येथवरी ॥५६॥नर्मव्यंग्योक्ति तद्विलासीं । लत्तापहार साहे शिशीं । ष्ठीवनलेहनीं न मनी चिळसी । मन्मथपाशीं संरुद्ध ॥५७॥कैवल्याहूनि अधिकतर । मैथुनसुखचि परमरुचिर । जिये ठायीं निरंतर । तें स्त्रीमंदिर न संडवे ॥५८॥ऐइस्या स्त्रियांच्या मंदिरीं । मैथुनसुखार्थ निरंतरीं । गोळाङुळाचियेपरीं । नर्त्तन करी तच्छंदें ॥५९॥मुचुकुंद म्हणे भो भो ईशा । सार्वभौमही पुरुष ऐसा । वरपडोनि विषयसोसा । व्यर्थ आयुष्या नाशितसे ॥३६०॥नरदेहींची आयुष्यघडी । न मिळे वेंचितां सहस्रकोडी । मैथुनसुखार्थ पामर दवडी । न धरूनि आवडी तव भजनीं ॥६१॥याहूनि अपूर्व ऐकें ईशा । विषयतृष्णाकुलमानसा । संप्राप्त भोगार्थ अवकाशा । न लभे दुराशा भ्रमग्रस्त ॥६२॥करोति कर्माणि तपःसु निष्ठितो निवृत्तभोगस्तदपेक्षया ददत् ।पुनश्च भूयेयमहं स्वराडिती प्रवृद्धतर्षो न सुखाय कल्पते ॥५३॥अनकूळ भोग भोगितां हांव । मानसीं तृष्णा वाढवी भाव । म्हणे इहलोकींचें वैभव । क्षणिक सर्व नैश्वर्य ॥६३॥शाश्वत अमरपदींचे भोग । तत्प्राप्तीचे विवंची योग । तपश्चर्यादि कर्में सांग । आदरी अव्यंग मीमांसा ॥६४॥वसंतग्रीष्मीं तीव्र पंचाग्नि । प्रावृटीं शरत्काळीं गगनीं । माळा करूनि दिवसरजनी । वर्षतां घनीं दृढ राहे ॥३६५॥हेमंतशिशिरीं आकंठजळीं । कणींग मांडूनि भरी उपळीं । माजि बैसे निशाकाळीं । सापेक्ष फळीं सुरभोगा ॥६६॥ब्रह्मचर्यादि व्रते कठिन । जटा कौपीन कृष्णाजिन । फलमूलाशन अधःशयन । भोग लक्षून अमरांचे ॥६७॥कुंडें मंडप वेदि शुद्ध । हविर्मत्राज्यसंभार विविध । यथोक्ति दक्षिणा द्विजवर विबुध । परम विशुद्ध आर्त्विज्य ॥६८॥क्रियाकलापमंडित ऐसे । राजसूयादिक्रतुवरसोसें । आचरे अमरेंद्रपदाभिलाषें । भरलें पिसें तृष्णेचें ॥६९॥इत्यादि कठोरकर्माचरणीं । अमरेंद्र होईल हें मानूनी । रंभा उर्वशी मोहिनी । म्हणे या रमणी मज होती ॥३७०॥नंदनवनादिवनक्रीडन । स्वेच्छा करीन पीयूषपान । ऐरावतादिवारनयान । विलासभुवन अमरपुरी ॥७१॥चिरकाळ ऐश्वर्य भोगीन ऐसें । पुण्यक्शयाचें भय कायसें । मर्त्यांमाजि तत्पुण्यलेशें । साम्राज्य सरिसें लाहेन ॥७२॥पुडती होईन चक्रवर्ती । पुडती भोगीन असपत्न क्षिति । लालसललनाललितगीतीं । भोगीन रति स्मरलास्यें ॥७३॥इत्यादितृष्णाप्रवृद्धपुरुष । वाढवूनि विषयसोस । भोगून लाहे प्राप्त भोगांस । सोसी क्लेश हव्यासें ॥७४॥एवं तृष्णेचिया भरीं । पडोनि सोसी दुःखलहरी । फळाभिळाषें कर्में करी । सुख संसारीं दुर्लभ त्या ॥३७५॥ऐसा धरूनि विषयाभिलाष । कामतृष्णाप्रवृद्धक्लेश । तपश्चर्याकर्में विशेष । सुकृतलेश उत्पादी ॥७६॥तेणें अमुत्रभोगकामें । भोगभूयिष्ठ पावे जन्में । पतन पावे सुकृतोपशमें । जठरी नियमें मग पचणें ॥७७॥अधोमुख जठरकुहरीं । नवमास विष्ठेच्या दाथरीं । पवोनि प्रसवे मूत्रद्वारीं । पुन्हा संसारीं भ्रमग्रस्त ॥७८॥पुन्हा विषयार्थ तैसाचि जचे । प्रेम धरूनि स्वर्गसुखाचें । व्रततपनियमकाम्यकर्मांचें । करितां कांचे क्लेशभरें ॥७९॥सर्वदा कर्मसाङ्गता कैंची । घरटी अनावर काळाची । अघटितरचना रची खची । ते माया प्रपंचीं भ्रमवीतसे ॥३८०॥एवं जन्में उच्चावचें । धरूनि विषयप्रलोभें जाचे । आठं श्लोकीं त्या बहिर्मुखांचें । विविशत्व कथिलें भो ईशा ॥८१॥तेथूनि सुटिका जेणें होय । तो एक पदभजनोपाय । कोण्या योगें प्राणी लाहे । तें वदताहे मुचुकुंद ॥८२॥भवापवर्गो भ्रमतो यदा भवेज्जनस्य तर्ह्यच्युत सत्समागमः ।सत्संगमो हर्हि तदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मतिः ॥५४॥ज्याचें ऐश्वर्य नोहे च्युत । म्हणोनि नामें तो अच्युत । त्यातें मुचुकुंद संबोधित । भो भो अच्युत म्हणोनिया ॥८३॥मुचुकुंद म्हणे पुरुषोत्तमा । भव म्हणिजे या संसारभ्रमा । माजि संसरे मरनजन्मा । भोगिती श्रमा भ्रमग्रस्त ॥८४॥अपवर्ग म्हणिजे भ्रमाचा अंत । त्या नांव मुख्य परमपुरुषार्थ । तो प्राण्यांसि अकस्मात । जोडतां प्रपत सत्संग ॥३८५॥भ्रमापासूनि सुटला जरी । तरीच सत्संगीं प्रेम धरी । सत्संगप्रेमा जरी अंतरीं । तरी संसारीं मग न रमे ॥८६॥सत्संगाची लाहतां सोय । सर्वसंगाची निवृत्ति होय । निःसंग जालिया सद्गति लाहे । तोचि उपाय अवधारीं ॥८७॥कार्यकारणनियंता जो तूं । त्या तुझ्या ठायीं सप्रेम तंतु । लाहोनि अनन्य भक्तिपंथु । होय निर्मुक्त तव बोधें ॥८८॥तुझा भजनमार्ग लाहतां सरळा । तरणोपाय भाविकां अबळां । योगयागादि न परिपाळा । सप्रेमळा तव भजनीं ॥८९॥शब्दस्पर्शरूपरस । गंधादि पंच विषयाभास । याचि नामें भवाब्धि दृश्य । प्राणी अशेष बुडविता ॥३९०॥या पंचकापासूनि मन । निःशेष होऊनियां वितृष्ण । सप्रेम तव पदभजनीं लीन । तैं भवभान केउतें ॥९१॥योगयागतपःप्रयास । वेदशास्त्रविद्याभ्यास । हा अवधाचि विषयाभास । येणें विशेष भ्रम वाढे ॥९२॥म्हणाल इत्यादि न कीजे कांहीं । तरी मग भजन तें कैसें काई । अनावर मानस मुक्तिसोयीं । कोण्या उपायीं लागेल ॥९३॥मुचुकुंद म्हणे याचिसाठीं । तुझी न होतां कृपादृष्टि । न सुटे संसारबांधाटी । तैं मनोजयगोष्टी कैं कोण्हा ॥९४॥यालागिं तवानुग्रहें करून । संसृतिचक्रीं भ्रमतां जन । त्यासि मुक्तता भ्रमापासून । तैं लाहे निर्वाण भवविलयें ॥३९५॥अनुग्रह म्हणाल कैसा काय । जैं सत्वसंपत्ति करी उदय । तैं विवेकाची लाभे सोय । अविवेक जाय निःशेष ॥९६॥शुद्धसत्वीं वस्तु अवतरे । तैं पूर्ण ऐश्वर्य तें उभारे । सर्वज्ञसर्वकर्तृत्व स्फुरे । हें श्रुतिनिर्धारें उमजे कीं ॥९७॥पुढें त्रिविध गुणक्षोभ । तेथही सत्वगुणाचा कोंभ । तेथेंचि ज्ञानशक्ति स्वयंभ । येरा बालभ द्रव्यक्रिया ॥९८॥सूxxतेजें गगन भरे । तत्तेज सूर्यकान्तीं अवतरे । येर शुष्केन्धनें लघुतरें । नव्हती चतुरें तद्ग्रहणीं ॥९९॥एवं होतां सत्वसंपन । ज्ञानशक्तीचें अधिष्ठान । तेथ प्रकटे श्रीभगवान । न लगे अनुमान यदर्थीं ॥४००॥भगवदनुग्रहें सत्वशुद्धि । तें जाणो ये विवेकबुद्धि । विवेकाथिली प्राञ्जळबुद्धि । तोडी उपाधि भ्रमभूता ॥१॥विवेकाञ्जन बुद्धिनयनीं । मिलतां विचार सर्वां करणीं । प्रवृत्तिप्रवाह विषयाचरणीं । निवृत्तिवाहणी त्या मुरडी ॥२॥ गंधविषयोन्मुख जें घ्राण । बाह्यगंधार्थ वळघे रान । बुद्धि लाहतां विवेकनयन । पाहे गंधज्ञ त्यामाजि ॥३॥गंधज्ञाची गवेषणा । करितां निवृत्ति होय घ्राणा । गंधविषयभमभावना । तैं कें कोणा भ्रामक पैं ॥४॥गंधप्रकाशक अपान । पायुघ्राणें त्यागादान । एतज्ज्ञापक जो अभिमान । निवृत्त होऊन तो राहे ॥४०५॥रसना बाह्यरसाचे पाठीं । लागोनि भंवे अखिल सृष्टि । तेथ रसज्ञ विवेकदृष्टि । पाहतां उफराटी ते होय ॥६॥रसप्रकाशक प्राण बव्हें । त्यागादान शिश्नजिह्वे । रसज्ञापक जें चित्त प्रभावें । तैं तें स्थिरावे स्वस्वरूपीं ॥७॥चक्षु बाह्यरूपग्रहण । साभिलाष करिती भ्रमण । तेह बुद्धिविवेकें रूपाभिज्ञ । पाहतां वयुना निवृत्ति ये ॥८॥रूपप्रकाशक उदान । चरणा नयना त्यागादान । उभयज्ञापक मनीषाकरण । निवृत्ति होऊनि तैं राहे ॥९॥बायस्पर्शाचिये चाडे । सैरां त्वगिंद्रिय वावडे । विवेकदृष्टि स्पर्शज्ञाकडे । परततां मोडे बाह्य भ्रम ॥४१०॥समान स्पर्शातें प्रकाशी । त्यागदानकरत्वकाशी । उभयज्ञापकता मनासी । निवृत्तीसी तें लाहे ॥११॥शब्दविषय श्रवणीं फावे । तदर्थ बाह्यगगनीं भ्म्वे । विवेकदृष्टि विभ्रमभावें । करी तैं ठावें शब्दज्ञा ।१२॥शब्दचेष्टक चेष्टा व्यान । वाक्श्रोत्रें त्यागादान । उभयज्ञापक अंतःकरण । ठाके परतोन निवृत्त जैं ॥१३॥तवानुग्रहें सत्वसंपत्ति । तेणें विवेक लाहे मति । विवेंके मोडे विषयप्रवृत्ति । होय निवृति सुविचारें ॥१४॥निवृत्त जालिया अंतःकरण । सत्संगमें समाधान । नितान्तनिर्मलता लाहोन । त्वदेकशरण सप्रेमें ॥४१५॥अपरोक्षअभेदबोधावाप्ति । जिये नांव चौथी भक्ति । ते लाहोनि भवनिवृत्ति । भ्रमोपहति या नाम ॥१६॥भ्रमनिवृत्तीसी जो कारण । तो हा तवानुग्रह पूर्ण । यावीण योगयागाध्ययन । तें भवभान तन्मात्र ॥१७॥शब्दविषय गुरूच्या वचनें । शिष्यें करूनि श्रवणें । केलीं वेदशास्त्राध्ययनें । विषयज्ञानें तीं अवघीं ॥१८॥तीर्थें क्षेत्रें देवदर्शनें । तेथ रूपविष फावे नयनें । स्नानार्चनें शीतोष्णसहनें । स्पर्शाविणें आन न फवे ॥१९॥तीर्थप्रसाद पुरोडाश । देवब्राह्मणपितृशेष । अवघा रसविषयो जिह्वेस । तेंवि घ्राणास भूगंध ॥४२०॥त्यामाजि शुभाशुभभावना । अभ्यस्तशास्त्रविवंचना । अविधिविधिप्रवृत्ति नाना । सर्वकल्पना मनोभव ॥२१॥परस्परें विरोध शास्त्रां । तदाचरणें त्या तन्मात्रा । रूप आणिती यथासूत्रा । शरीरयात्राप्ररोचका ॥२२॥ऐसी बाह्याभ्यासप्रवृत्ति । दीक्षित पंडित सर्वज्ञ होती । देहाध्यासें भवीं बुडती । जनीं मिरवती ज्ञोतपणीं ॥२३॥देवतिर्यक ब्रह्मराक्षस । करी प्रवृत्ति ज्ञानाभ्यास । तवानुग्रहें दःखनिरास । विषयाभास मावळवी ॥२४॥कोण्हे एके योनीआंत । तवानुग्रहें विवेकवंत । होतां होती क्लेशरहित । हा सिद्धान्त श्रुतीचा ॥४२५॥ऐसा तुझा अनुग्रहमैमा । प्रत्यक्ष प्रत्यय बाणला आम्हां । तूं तुष्टलासि पुरुषोत्तमा । तेणें भवभ्रम मावळला ॥२६॥मजवरी कैसा अनुग्रह तुझा । तें अवधारीं गरूडध्वजा । मुचुकुंदाच्या स्फुरती भुजा । स्वलाभ वोजा उमजलिया ॥२७॥मन्ये ममानुग्रह ईश ते कृतो राज्यानुबंधापगमो यदृच्छया ।यः प्रार्थ्यते साधुभिरेकचर्यया वनं विवक्षद्भिरखंडभूमिपैः ॥५५॥सर्वनियंता तूं ईश्वर । संबोधनें तो ईशोच्चार । तुझी ईशनशक्ति सधर । येर परतंत्र सर्वही ॥२८॥हेतुगर्भितें कर्मफळें । तैसतैसा फळभोग मिळे । तुवां स्ववश केलें बळें । करुणावत्सळें ईशत्वें ॥२९॥जन्ममरणांची समाप्ति । व्हावया कारण भ्रमोपहति । तीचें कारण सत्संगति । तेणें उपरति भवभोगीं ॥४३०॥सत्संगमें नित्यानित्य । कळतां अनित्यीं होय विरक्त । अनित्य राज्यादिभोग समस्त । निःसंग होत तत्त्यागें ॥३१॥ऐसीं सहेतु मोक्षसाधनें । तीं मज न घडतां जनार्दनें । अनुग्रह केला ईशपणें । तो मी नेणें आजिवरी ॥३२॥तोचि अनुग्रह म्हणसी कैसा । माझा सार्वभमत्वठसा । साङ्ग सुंदर लावण्ययसा । रुचली मानसा रतिलास्यें ॥३३॥तेथें विरक्ति रुचे कवणा । अष्टमदांचिया आडराना । माजि बळिष्ठां शत्रुगणा । जालों अंकणा भ्रमग्रस्त ॥३४॥नसतां विरक्तीसि कारण । कोण्हा न करवे सोडवण । यथार्थ ईश्वर चिंतूं म्हणोन । बळें तेथून सोडविलें ॥४३५॥न इच्छितां अकस्मात । देवीं प्रार्थिलों स्वकार्यार्थ । तेथ तारकसमरीं नित्य । भिडतां बहुत युगें गेलीं ॥३६॥देवीं षण्मुख तारकहनना । आणूनि मजला दिधली आज्ञा । पुन्हा जातां भद्रसेना । कालकलना सूचविली ॥३७॥भववैरस्यें मग ये विवरीं । निद्रिस्त होतों आजिवरी । तुवां अनुग्रह हा श्रीहरि । केला मजवरी ईशत्वें ॥३८॥सार्वभौमपदींचे भोग । सर्वोपचार ऐश्वर्यसंग । बळेंचि कृपेनें तोडिले सांग । विरक्ति अभंग प्रयोजिली ॥३९॥राज्यानुबंधाचा अपगम । प्रार्थितीं राजर्षिसत्तम । साधु साधनीं कृतसंयम । शमदमोपशमसंपन्न ॥४४०॥अवगमोनि एकात्मता । लाहोनि निस्पृह निःसंगता । खंडोनि भूपत्वाहंता । वांछिती तत्वता वनवास ॥४१॥सेवक अनुयायी पार्षद । किंबहुना जे उपचारमद । अशन वसन वदूसंबंध । इत्यादि विच्छेद संगाचा ॥४२॥एकचर्येंकरूनि वनीं । अखंड विचारावें म्हणोनी । वांछिती भूभुज बहुधा जनें । तें मजलागूनि अनायासें ॥४३॥म्हणाल एकचर्या ते कवण । उपचारप्रद जो पार्षदगण । एकवर्ष्म तदाचरण । करूनि पूर्ण निःसंग ॥४४॥जलद अंजलि अमत्रक । मृदुळास्तरणीं भूपर्यंक । आच्छादनें गगनांसुक । उपबर्हणीं निजबाहु ॥४४५॥गीत वादित्र अनाहत । स्वात्मानुभूतिरतिएकांत । आत्मोपलब्धानंदभरित । इत्यादि समस्त एकचर्या ॥४६॥तुझा अनुग्रह हा मजवरी । म्हणोनि भंगली भवभ्रमलहरी । प्रतीति बाणली ममान्तरीं । दर्शनथोरी हे तुझी ॥४७॥अनुग्रह करावया कारणें । आलों म्हणोनि समर्थपणें । बोलिला तें पूर्वस्मरणें । अनुग्रहिलों तें कथिलें ॥४८॥पूर्वींच अनुग्रहिलों ऐसा । आतां उमजलें श्रीपरेशा । वरांतें मागें या उद्देशा । पावूनि दुराशा पोखिली ॥४९॥तरी तयाविषयीं मम प्रार्थन । ऐकें श्रीहरि सावधान । भवसुखैश्वर्य भगवद्भजन । दोन्ही विवरून बोलतसें ॥४५०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP