मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५१ वा| आरंभ अध्याय ५१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६४ अध्याय ५१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीपरमात्मने नमः ॥श्रीमद्गोविंदपादाब्जभ्रमर । कृष्णदयार्णवआदेशकर । करूनि श्रोतियां नमस्कार । श्रवणीं सादर बैसऊनि ॥१॥एकावन्नावे अध्यायीं । यवना येऊनि शेषशायी । मुचुकुंददृगग्निमाजि दाही । भेटे लवलाहीं मुचुकुंदा ॥२॥यवनासमरीं पलायन । करिता जाला कां भगव्वान । म्हणाल तरी तें संबंधकथन । ऐका विष्णुपुराणोक्त ॥३॥कालयवन यवनेंद्रकुमर । सर्व यादवां भयंकर । ऐसा जाणोनि शंकरावर । करी श्रीधर पलायन ॥४॥येथ श्रोतयांचा आक्षेप । यवना वरद किमर्थ गरप । यदर्थी प्राचीन इतिहासकल्प । परिसा अल्प कथिजेतो ॥५॥वृद्ध गर्गाचा तनय गार्ग्य । तपस्वी निर्जितकरणवर्ग । लोहचूर्णाशी स्वदारसंग । न करी प्रसंग स्वप्नींही ॥६॥यास्तव उपहासें श्यालक । गार्ग्या म्हणतां नपुंसक । यादवीं ऐकोनि धीपूर्वक । षंढत्व सम्यक् आरोपिती ॥७॥यादवांच्या ज्या हेलनोक्ति । ऐकोनि गार्ग्य क्षोभला चित्तीं । दक्षिणसमुद्रीं एकाग्रभक्ति । केला पशुपति प्रसन्न ॥८॥द्वादश वर्षें लोहचूर्ण । भक्षूनि करितां अनुष्ठान । अघोर मंत्रपुरश्चरण तेणें । ईशान तुष्टला ॥९॥प्रसन्न होतां काळाग्निरुद्र । गार्ग्यें याचिला ऐसा वर । यदुकुळहंता देईं कुमर । ऐकोनि शंकर गुह्य वदे ॥१०॥कृष्णावेगळे यादव सर्व । समरीं जिंकील वत संभव । कृष्णही पावेल पराभव । न धरी हांव समरंगीं ॥११॥ऐसी ऐकोनि वरदवाणी । परमाह्लाद गार्ग्यामनीं । वर लाधलों यदुकुळहननीं । समरांगणीं हरि न थरे ॥१२॥गार्ग्य येतां निजसदनासी । मार्गीं यवनें देखिलें त्यासी । तेणें नेऊनि स्वनगरासी । भक्तिभावेंसिं पूजिलें ॥१३॥वृत्तांत पुसतां सविस्तर । गार्ग्यें कथिला शंकरवर । यवनें करूनि नमस्कार । प्रार्थिला मुनिवर बहुयत्नीं ॥१४॥तुमच्या वीर्यें माझिये क्षेत्रीं । पुत्र उत्पादा महाक्षत्रीं । कुठार होऊनि यादवगोत्रीं । करील धरित्री अयादवी ॥१५॥भक्ति देखूनि तोषला मुनि । मग काळीनामका यवनपत्नी । तीच्या जठरीं स्ववीर्यदानीं । पुत्र देऊनि निघाला ॥१६॥गार्ग्य गेलिया नंतर । यथाकाळें कालि कुमर । प्रसवली मधुकरभासुर क्रूर । वरदांकुर रुद्रांचा ॥१७॥भूतसृष्टीचा संहारकाळ । होतां उदैजे प्रळयानळ । तेंवि वाढला यवनबाळ । यादवकुळनिर्दळणा ॥१८॥काळा म्हणोनि काळयवन । सहज जालें गुणाभिधान । प्रतापी वीर कोठें कोण । पाहें धुंडून भूचक्रीं ॥१९॥पुढें नारदें देतां सूचना । क्षोभ उदेला कालयवना । तेणें रोधितां मथुराभुवना । द्वारकारचना हरि करवी ॥२०॥तेथ ठेवूनि मथुराजन । पाळावया हरवरदान । कृष्णें केलें पलायन । तें व्याख्यान अवधारा ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP