मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर तथातिरभसांस्तांस्तु संयतान्रोहिणीसुतः । अहन्परिघमुद्यम्य पशूनिव मृगधिपः ॥४१॥चपेटघातें फोडूनि वदन । परिघ घेतला हिरोन । परिघप्रहारें सशस्त्र चूर्ण । केले संपूर्ण आठही ॥४६॥जैसा केसरी प्रतापजेठी । मर्दी करटी कोट्यानकोटी । तेथ सामान्य मृगाची गोठी । केंवि वोठीं प्रशंसिजे ॥४७॥तेंवि मातले अष्टहि शलभ । मर्दूनियां रोहिणीडिंभ । विजयश्रीचा ऊर्जितकोंभ । रंगीं शोभा प्रकाशी ॥४८॥हें देखोनि निर्जरगणीं । जयजयकारें गर्जोनि गगनीं । उत्साह केला तो सज्जनीं । सावध होवोनि परिसावा ॥४९॥नेदुर्दुंदुभयो व्योम्नि ब्रह्मेशाद्या विभूतयः । पुष्पैः किरंतस्तं प्रीताः शशंसुर्ननृतुः स्त्रियः ॥४२॥समल्ल सानुज कंसासुर । मर्दूनि विजयी वसुदेवकुमर । देखोनि आनंदें निर्भर । करिती निर्जर जयघोष ॥२५०॥भवाब्जभवादि अमरीं सकळीं । पूर्वीं जावोनि क्षीराब्धिपाळीं । प्रसन्न करितां स्वपक्षशाळी । श्रीवनमाळी अवतरला ॥५१॥आजि तो वधूनि कंसासुर । निर्भय केले सुरभूसुर । म्हणोनि आनंदें निर्भर । जयजयकार सुर करिती ॥५२॥ब्रह्मेशादि निर्जरपति । श्रीप्रभूच्या गुणविभूति । दुंदुभिघोषें उत्साह करिती । विजयावाप्ति जाणोनि ॥५३॥करिती अमोघ पुष्पवृष्टि । दिव्यसुमनीं भरली सृष्टि । कृष्णमहिमा लक्षूनि दृष्टीं । स्तोत्रपाठीं प्रशंसिती ॥५४॥प्रीतिपूर्वक निर्जरगण । करिती भगवद्यशोवर्णन । अप्सरांचें सुनर्तन । सामगायन्गंधर्वीं ॥२५५॥म्हणती जयजय जगदीश्वर । संकटीं कैपक्षी तूं अमरां । मर्दूनियां महाअसुरां । भूभुसुरां तोषद तूं ॥५६॥जयजय जगज्जननीजनका । जयजय जगद्भयभंजका । जयजय सज्जनमनोरंजका । अघगंजका अखिलाद्या ॥५७॥जयजय पुण्यपावनचरिता । जयजय अखिलांडकोटिभरिता । जयजय पादाब्जशौचसरिता । भवनिस्तरिता भ्रमहंत्री ॥५८॥इत्यादि स्तवनीं स्तवितां अमरीं । येरीकडे मागधकुमरी । कंसकलेवर कवळिती समरीं । जैशा भ्रमरी मधुभंगी ॥५९॥येथूनि तयांचें शोककथन । राया ऐकें सावधान । श्लोकषट्के निरूपण । व्यासनंदन निरूपी ॥२६०॥तेषां स्त्रियो महाराज सुहृन्मरणदुःखिताः । तत्राभीयुर्विनिघ्नंत्यः शीर्षाण्यश्रुविलोचनाः ॥४३॥तेषां म्हणिजे बहुतांचिया । शोक करिती बहुत जाया । दुःखें धांवूनि आलिया । महाराया तें ऐकें ॥६१॥महामल्लांच्या मल्लवनिता । आणि कंसाच्या राजकान्ता । कंसबन्धूंचिया समस्ता । शोकसंतप्ता धांवती ॥६२॥आप्त सोयरा जीवप्राण । वल्लभा समान दुसरा कोण । त्या प्राणप्रियाचें देखोनि मरण । दुःखें दारुण झळंबती ॥६३॥हाहाकारें आक्रंदती । उर मस्तक वदनें पिटिती । लोचनीं अश्रुधारा स्रवती । विलाप करिती परोपरी ॥६४॥अंगें टाकिती धरणीवरी । हस्तें ताडिती उरीं शिरीं । शोकसंतापमहापूरीं । दुःखलहरीमाजिवड्या ॥२६५॥शयानान्वीरशय्यायां पतीनालिंग्य शोचतीः । विलेपुः सुस्वरं नार्यो विसृजंत्यो मुहुः शुचः ॥४४॥वीरश्रीमंडित रंगक्षिति । तेथ अभंग निद्रिस्त पति । त्यांतें आलिंगोनि त्या सती । शोक करिती आक्रोशें ॥६६॥आपुलाल्या पतींचीं प्रेतें । आलिंगूनियां उभय हस्तें । भूमि भिजविती अश्रुपातें । संतप्तचित्तें त्या रुदती ॥६७॥मुखामाजी भरली माती । ते काढिती आपुल्या हातीं । रक्तें लेपलीं गात्रांप्रति । तें त्या पुसिती निजवसनीं ॥६८॥निडळें लाविती कांतनिडळा । अश्रुपात ढळती डोळां । मुखें चुंबिती वेळोवेळां । घालिती गळां निजहस्त ॥६९॥हस्तें धरूनियां हनुवटी । वदती भोगिल्या विलासगोठी । दीर्घस्वरें रुदतां कंठीं । प्रकटे सृष्टी सुस्वरता ॥२७०॥स्वभावें मधुर स्त्रियांचे कंठ । करुणास्वरें रुदतां स्पष्ट । विविधा विलपती तो बोभाट । सुस्वर म्हणोनि शुक वदला ॥७१॥वारंवार अश्रुपात । दुःखशोकें वदनें घेत । बहुधा विलाप करूनि तेथ । करिती आकान्त तो ऐका ॥७२॥हा नाथ प्रिय धर्मज्ञ करुणानाथ वत्सल । त्वया हतेन निहता वयं ते सगृहप्रजाः ॥४५॥अहा अहा रे प्राणप्रिया । समर्थ नाथा जिवलग सखया । आमुची अभिरंजनविलासक्रिया । पुरवावया तूं योग्य ॥७३॥अन्नपानें वस्त्राभरणें । देखों न लाहसी आमुचें उणें । झळंबसी आमुचे करुणे । झालों तुजविणें अनाथा ॥७४॥दास दासी पोष्यवर्गें । पुत्र कलत्र कुटुंब अवघें । मरण पावलों तव वियोगें । कोण तुजमागें आपंगी ॥२७५॥आमुचा किमर्थ विषाद आला । कां पां धरिला दीर्घ अबोला । कां पोष्यांचा त्याग केला । धर्मज्ञाला अनुचित हें ॥७६॥तुझिया उच्छिष्टाची आस । धरूनि पाहूं चिरकाळ वास । अनाथ दिसती दासी दास । कां पोष्यांस उपेक्षिलें ॥७७॥ऐशा समस्त स्त्रिया रुदती । विशेष कंसाचिया सती । वाग्विलापें शोक करिती । तो भूपति अवधारीं ॥७८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP