मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर तद्बलाबलवद्युद्धं समेताः सर्वयोषितः । ऊचुः परस्परं राजन्सानुकंपा वरूथशः ॥६॥पुरपुरंध्री परस्परें । ठायीं ठायीं निकरनिकरें । बोलती तें सदयोत्तरें । उत्तरोत्तरें परिसावीं ॥५९॥जेवीं मदगज गोवत्सेंसीं । कीं द्विजकुमार राक्षसेंसीं । तेंवि लेंकुरें महामल्लासीं । द्वंद्वयुद्धासीं योजिलीं ॥६०॥ऐसें सबळां अबळां युद्ध । देखोनि म्हणती हा प्रसाद । महा अन्याय धर्मरोध । अधर्म प्रसिद्ध ये ठायीं ॥६१॥महानयं बताधर्म एषां राजसभासदाम् । ये बलाबलवद्युद्धं राज्ञोऽन्विच्छंति पश्यतः ॥७॥महा अन्याय म्हणती नारी । राजसभासदांचे शिरीं । अबळां बलिष्ठां योजूनि समरीं । पाहती नेत्रीं कौतुक ॥६२॥अबळां बलिष्ठां युद्ध प्रबळ । नृपें वारिजे तें तत्काळ । तोचि झालिया अधर्मशीळ । सवेग काळ त्या ग्रासी ॥६३॥येथ अन्याय सभास्थानीं । बाळां बळिष्ठां समरांगणीं । युद्धीं योजूनि पाहती नयनीं । परि अधर्म कोणी न मनिती ॥६४॥परी हें न मने ईश्वरासी । अन्याय रुचला भोजेंद्रासी । याचें फळ येचि दिवसीं । भोगील ऐसी जनचर्चा ॥६५॥म्हणाल अन्याय कैसा येथ । तरी पाहती सदस्य सभानाथ । होवोनियां विचाररहित । युद्धवृत्तांत तो ऐका ॥६६॥क्क वज्रसारसर्वांगौ मल्लौ शैलेंद्रसन्निभौ । क्क चातिसुकुमारांगौ किशोरौ नाप्तयौवनौ ॥८॥चाणूर मुष्टिक महामल्ल । वज्रांगकठोर मंदरतुल्य । मल्लविद्येचें कौशल्य । तनुचापल्य अभ्यस्त ॥६७॥क्रूरप्रतापी महादुर्घट । युद्धीं अनेक जिंकिले वाट । न भंगे समरीं धारिष्ट । महाधीर कोणीकडे ॥६८॥कोणीकडे महा लेंकुरें । कोमळांगें नवनीताकारें । आंगीं नाहीं तारुण्यवारें । त्यांसीं निकरें हें युद्ध ॥६९॥धर्मलंघन याचेंहि नाम । सभासदां हा अधर्म । भल्यांहीं ऐसें देखतां विषम । दुर्लभ क्षेम ते म्हणती ॥७०॥धर्मव्यतिक्रमो ह्यस्य समाजस्य ध्रुवं भवेत् । यत्राधर्मः समुत्तिष्ठेन्न स्थेयं तत्र कर्हिचित् ॥९॥अधर्म जये सभास्थानीं । तेथ बैसों नये सज्जनीं । उठोनि जावें झडझडोनी । बैसतां हानि सर्वस्वें ॥७१॥न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन् । अवब्रुन्विब्रुवन्नज्ञो नरः किल्मिषमश्नुते ॥१०॥सभ्यांसहित सभानाथ । अधर्मरूपी असती जेथ । प्रज्ञावंतीं न वचिजे तेथ । अन्याय तत्कृत स्मरोनी ॥७२॥प्रवेशतां तें सभास्थान । जाणोनि भिडेनें धरितां मौन । होय अधर्मसंक्रमण । श्रेष्ठालागून तद्योगें ॥७३॥अज्ञान होवोनि न कळे म्हणतां । तथापि दूषण बैसे माथां । यालागीं भल्यांहीं आपुल्या स्वार्था । दुष्टसभे न वचावें ॥७४॥उभयपक्षें दोषसंचार । यालागीं अधर्मसभागार । सांडूनि सज्जनीं साचार । अतिसत्वर निघावें ॥७५॥पृथक्समुदायीं परस्परीं । ऐशा बोलती एकी नारी । तंव आणखी सदयोत्तरीं । वदती सुन्दरी तें ऐका ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP