मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर प्रातर्व्रजाद्व्रजत अविशतश्च सायं गोभिः समं क्कणयतोऽस्य निशम्य वेणुम् ।निर्गम्य तूर्णमबलाः पथि भूरिपुण्याः पश्यंति सस्मितमुखं सदयावलोकम् ॥१६॥प्रभाते थापटोनि यशोदा । जागृत करी श्रीमुकुन्दा । सालंकृत सिदोरी खांदा । सुरभिवृंदासमवेत ॥११०॥ससंकर्षणगोपमेळीं । वेणुक्कणनें प्रयाणकाळीं । मिरवत घनतनु सांवळी । व्रजमंडळी आनंदवी ॥११॥ऐकोनियां तें वेणुक्कणन । गोपीसमूह सांडूनि सदन । व्रजपुराबाहीर धांवून । नयन भरून विलोकिती ॥१२॥विशाळ पुण्याचिया कोटी । असती व्रजवनितांचे गांठीं । यास्तव सादर पाहती दृष्टीं । हरि जगजेठी जगदात्मा ॥१३॥आकर्ण नयन सस्मित मुख । विशाळ भाळ सरळ नासिक । कृपाकटाक्ष सदयावलोक । पाहती सम्यक कृतपुण्यें ॥१४॥आम्ही अभाग्या अल्पपुण्या । यास्तव कृष्णा संकर्षणा । मल्लनिग्रहणीं आमुच्या नयनां । दावितां करुणा विधि नुधवे ॥११५॥ऐशा समस्त पुरपुरंध्री । सखेद वदतां परस्परीं । अंतरवेत्ता श्रीमुरारी । कौतुक करी तें ऐका ॥१६॥एवं प्रभाषमाणासु स्त्रीषु योगेश्वरो हरिः । शत्रुं हंतुं मनश्चक्रे भगवान्भरतर्षभ ॥१७॥सदयस्त्रियांचें अंतर । द्रवलें जाणोनि योगेश्वर । करावया शत्रुसंहार । मनोव्यापार अवलंबी ॥१७॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । साक्षात् श्रीहरि भगवान । निववावया अभिरत जन । शत्रुनिग्रहण आदरी ॥१८॥भरतवंशीं श्रेष्ठ पूर्ण । भरतर्षभ त्या संबोधन । देता झाला व्यासनंदन । सादर देखोन श्रवणार्थीं ॥१९॥ऐशा नागरवधूंच्या वाणी । ऐकोनियां जनकजननी । पुत्रभावना रामकृष्णीं । स्नेहें द्रवोनि झळंबती ॥१२०॥सभयाः स्त्रीगिरः श्रुत्वां पुत्रस्नेहशुचातुरौ । पितरावन्वतप्येतां पुत्रयोरबुधौ बलम् ॥१८॥सभयोत्तरीं नागरवामा । स्नेहें झळंबती कृष्णरामा । जननीजनकें हृदयपद्मा । माजी ऐकोनि दचकलीं ॥२१॥पुत्रप्रताप विदित नाहीं । म्हणोनि शोकसंतप्त हृदयीं । प्रकट रडों न लाहती पाहीं । अंतरीं लाहीसम फुटती ॥२२॥ऐसी पितरांची अवस्था । आणि कळवळिल्या नागरवनिता । हें जाणोनि मन्मथजनिता । काय करिता झाला पैं ॥२३॥तैस्तैर्नियुद्धविधिभिर्विविधैरच्युतेतरौ । युयुधाते यथाऽन्योन्यं तथैव बलमुष्टिकौ ॥१९॥मल्लविद्येच्या कुसरी । जाणे अवघ्या कैटभारि । तिहीं तिहीं युद्धप्रकारीं । समरीं श्रीहरि क्रीडला ॥२४॥परप्रतापें नोहे च्युत । यालागीं नामें तो अच्युत । याहूनि इतर जो बळवंत । तो मल्ल विख्यात चाणूर ॥१२५॥जैसे भिडती चाणूरहरि । बळमुष्टिक तयांचि परी । द्वंद्वयुद्धाच्या कुसरी । दावूनि समरीं आक्रमिती ॥२६॥रामकृष्ण तूं म्हणसी राया । तुल्य मल्लेंसीं केलिया । बाल्यें माल्यें समान काया । केंवि विजया आकळिती ॥२७॥तरी हें ऐसें सहसा न म्हण । इंधनासमना कें कृशान । अगस्ति म्हणूं नये लहान । उदधिजीवन प्राशितां ॥२८॥भगवद्गात्रनिष्पातैर्वज्रनिष्पेषनिष्ठुरैः । चाणूरो भज्यमानांगो मुहुर्ग्लानिमवाप ह ॥२०॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । जरी गोपाकृति भगवान । तथापि प्रतापें असाधारण । गोपासमान तो नोहे ॥२९॥पाषाणघातें ताडितां घटा । तैं घटशकलांचा होय कुटा । घटेंही ताडितां पाषाणगोटा । तरी घटचि स्फोटा पावतसे ॥१३०॥तैसें भगवद्गात्रावरी । प्रहार करितां चाणूर समरीं । तो श्रीभगवान वज्रशरीरी । गात्रबोहरी मल्लाची ॥३१॥वज्रनिष्ठुर भगवत्प्रहार । लागतां मल्लाचें शरीर । संधीं संधीं झालें चूर । वाटे घोर तो समर्थ ॥३२॥स्वप्रहारीं भगवत्प्रहारीं । चाणूर भग्नांग झाला समरीं । क्षणक्षणां मूर्च्छा शरीरीं । नयनीं चंद्री लागतसे ॥३३॥पुन्हा अवलंबूनियां धीर । म्हणे हा समय महाक्रूर । दांत खावूनि करी निकर । नंदकुमर मारावया ॥३४॥एकाचि घाये मारीन हरि । म्हणोनि सक्षोभ दीपापरी । प्रज्वळला तेंचि तूं अवधारी । कुरुकेसरी नृपनाथा ॥१३५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP