मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच ॥ एवं चर्चितसंकल्पो भगवान्मधुसूदनः । आससादार्थ चाणूरं मुष्टिकं रोहिणीसुतः ॥१॥जैसा संकल्प अंतःकरणीं । तैसाचि चाणूरवदनें करूनी । कृतनिश्चयें चक्रपाणि । तन्निग्रहणीं प्रवर्तला ॥३१॥भुजा ठोकोनि सम्यक । जाला चाणूर सम्मुख । तें देखोनि रोहिणीतोक । रंगीं मुष्टिक पाचारी ॥३२॥दक्षिणहस्तें घेऊनि माती । मर्दूनियां उभयहस्तीं । बळें अधरोष्ठ चावूनि दांतीं । करीं आंसुडिती परस्परें ॥३३॥हस्ताभ्यां हस्तयोर्बद्ध्वा पद्भ्यामेव च पादयोः । विचकर्षतुरन्योन्यं प्रसह्य विजिगीषया ॥२॥हस्तीं पडे न पडे मिठी । तंव ते आंसुडिती जगजेठी । चांचरी जातां धरापृष्ठीं । उठाउठीं सांवरिती ॥३४॥पडतां मणिबंधासि मिठी । बळें सोडविती चिकाटी । चरणें चरणांसी घालूनि आंटी । दाटोदाटीं रेटिती ॥३५॥बलात्कारें आंसुडिती । अंगप्रौढी झिंजाडिती । एकमेकांतें ओढिती । तळीं पाडिती परस्परें ॥३६॥पृष्ठी शिवे न शिवे मही । तंव चमत्कारें उसळती पाहीं । मल्लविद्येची नवाई । दाविती देहीं प्रतापें ॥३७॥परस्परें जिंकावया । कर्षिती हाका देवूनियां । द्वंद्वयुद्धाचिया क्रिया । दाविती राया उत्साहें ॥३८॥हा हा म्हणोनि दीर्घस्वरीं । हुंकारिती मेघगजरीं । हिरण्यकशिपूचि समरीं । नरकेशरी जेंवि गर्जे ॥३९॥अरत्नी द्वे अरत्नीभ्यां जानुभ्यां चैव जानुनी । शिरः शीर्ष्णोरसोरस्तावन्योन्यमभिजघ्नतुः ॥३॥तर्जनी अंगुष्ठ उभयसंधि । मिठ्या घालूनि वज्रबंदी । आंसुडिताती द्वंद्वयुद्धीं । विजयसिद्धिसाधना ॥४०॥अरत्नी म्हणिजे समुष्टिहस्त । कूर्परघातें करिती स्वस्त । जानुप्रहार करिती व्यस्त । पदविन्यस्त चापल्यें ॥४१॥मल्लविद्येच्या कुसरी । थडका हाणिती उरीं शिरीं । दंतपातनें चपेटप्रहारीं । हुमण्या निकरीं मारिती ॥४२॥लत्ताप्रहार मेढ्रस्थानीं । ऊरु भंगिती हाणुनि पार्ष्णी । गुल्फप्रहाराचिया हननीं । पडती नयनीं झांपडिया ॥४३॥पर्भ्रामणविक्षेपपरिरंभायपातनैः । उत्सर्पणापसर्पणैश्चान्योन्यं प्रत्यरुंधताम् ॥४॥करांगुळी बलात्कारीं । परस्परें कवळूनि करीं । सव्यदक्षिणावर्त फेरी । देती भंवरी परस्परीं ॥४४॥एकमेकां क्षोभविती । सिंहनादें गर्जताती । साटोप धरूनि उफाळती । हिणाविती सरोष ॥४५॥बळें देती किंकळिया । भंवत्या मल्लांच्या आरोळिया । नागर जनांच्या टाळिया । बाहुस्फालनें उभयत्र ॥४६॥बाहुपृष्ठीं उरि टिरी । चपेटे ठोकूनि परस्परीं । क्षोभविती हुंकारगजरीं । उरीं शिरीं थडकिती ॥४७॥कर आंसुडोनि कवळिती कवा । सुहृद स्नेहाळ जैसें खेंवा । मिथा प्रपातनाचिया हांवा । दशनीं अधर रगडिती ॥४८॥मिथा शरीरें कवळूनि बळें । निकरें चेंपिती जीवनकळे । आंसडूनि पाडितां शरीर आदळे । सवेंचि उफाळें उसळती ॥४९॥एकमेकां आपटिती भूमीं । मिथा समानपराक्रमी । निघे उमटताती व्योमीं । विजयकामी उभयत्र ॥५०॥अवचट सुटतां शरीरमिठी । चढोनि जाती एक जगजेठी । अपर मागां सरती हट्टी । नेदूनि पाठी समरंगीं ॥५१॥पाउलें मात्र टाकिती मागें । सिंतरों पाहती कृतांतवेगें । सक्रोध दृष्टी लक्षूनि आंगें । लागवेगें आंसुडिती ॥५२॥एकमेकांचे घ्यावया प्राण । ऐसे करिती गात्रें भग्न । विक्रमशक्तीचें धरूनि त्राण । युद्ध दारुण न सांडिती ॥५३॥उत्थापनैरुन्नयनैश्चालनैः स्थापनैरपि । परस्परं जिगीषंतावुपचक्रतुरात्मनः ॥५॥भूमीं पाडूनि वीरवाट । मुरडूनि करपद करिती मोट । बळें उचलिती जैसे घट । नेती मुकुटपर्यंत ॥५४॥अयस्कार निजव्यापारीं । लोह ठोकी घनप्रहारीं । तैसे आदळिती भूमीवरी । गात्रें चकचुरी करावया ॥५५॥वरुणपाशांसमान कंठीं । निकरें घालिती वज्रमिठी । तीतें उखळिती जगजेठी । दशन ओष्ठीं रगडूनी ॥५६॥चरणें चरणां घालूनि आढी । हृदय कवळूनि बाहुप्रौढी । भूमीं पाडूनि करपद मोडी । निर्मूनि घडी स्थापिती ॥५७॥एवं मिथा जिंकावया । शरीरें भंगिती कौरवराया । हें देखोनि नागरीजाया । कृपें द्रवलिया बोलती ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP