मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर वल्गतः शत्रुमभितः कृष्णस्व वदनांबुजम् । वीक्षतां श्रमवार्युप्तं पद्मकोशभिवांबुभिः ॥११॥पहा सखिया हो कौतुक । शत्रुजयार्थ नंदतोक । आवेशें प्रयत्नपूर्वक । झोंबे सम्यक चहूंकडूनी ॥७७॥अभितः म्हणिजे सर्वांकडूनी । शत्रु आकळी चक्रपाणि । तेणें श्रमांबु उमटलें वदनीं । जेंवि जीवनीं अब्जकळिका ॥७८॥किं न पश्यत रामस्य मुखमाताम्रलोचनम् । मुष्टिकं प्रति सामर्षं हाससंरंभशोभितम् ॥१२॥कां न पहा रामवदन । आवेशें आरक्त लोचन । मुष्टिकातें दटावून । शोभायमान सस्मित ॥७९॥अधर चावूनि उभय रदनीं । अभंग प्रताप मल्लकदनीं । वीरलक्ष्मी सस्मितवदनीं । पाहतां सज्जनीं धणी न पुरे ॥८०॥पुण्या बत व्रजभुवो यदयं नृलिंगगूढः पुराणपुरुषो वनचित्रमाल्यः । गाः पालयन्सहबलः क्कणयंश्च वेणुं विक्रीडयांचति गिरित्ररमार्चितांघ्रिः ॥१३॥तंव अन्यवनिता म्हणती बाई । पुण्यवंत हे व्रजींची भोई । जया कारणास्तव इये ठायीं । शेषशायी अवतरला ॥८१॥पुराणपुरुष जो श्रीपति । घेऊनि नरदेहाची बुंथी । आच्छादूनि ऐश्वर्यशक्ति । गोपाकृति नटलासे ॥८२॥विचित्र वनसंभवें सुमनें । कंठीं मुगुटीं कृतभूषणें । क्रीडेसहित संकर्षणें । रक्षित गोधनें होत्साता ॥८३॥वेदव्याख्यानीं जो प्रवीणु । स्वयें अध्यापी कमलासनु । तो येथ धरूनि प्रणववेणु । करी क्कणन निजवदनें ॥८४॥गिरीश धरूनि कपि आकृति । रमा होवोनि सीता सती । ज्याचे पादाब्ज अर्चिती । तो गोपति गोगोप्ता ॥८५॥ऐशा धन्य व्रजींच्या भूमी । क्रीडतां निवती श्रीपादपद्मीं । धिग् धिग् निर्दैवा पैं आम्ही । देखों श्रमीं समरंगीं ॥८६॥सभासदस्य अन्यायपर । न करिती बळाबळविचार । बाळांसमान मल्ल क्रूर । करितां धिक्कार समस्तां ॥८७॥बलिष्ठ मल्ल बाळकांवरी । घालूनि निग्रहूं पाहती समरीं । धिग् धिग् ऐसे सभाधिकारी । पडती अघोरीं महानरकीं ॥८८॥तंव येरी म्हणती आमुचें पुण्य । परम अल्प साधारण । यास्तव अनवसरीं कृष्ण । आमुचे नयन विलोकिती ॥८९॥पैल गोपींचीं महा तपें । पुण्यें नुमानवतींचि मापें । जिहीं श्रीकृष्ण क्रीडाकल्पें । यथासंकल्पें सेविला ॥९०॥ऐशी वामदृशांची ग्लानि । गोपी सभाग्य हरिक्रीडनीं । श्लोकत्रयें बादरायणि । नृपा लागूनि निरूपी ॥९१॥गोप्यस्तपः किमचरन्यदमुण्य रूपं लावण्यसारमसमोर्ध्वमनन्यसिद्धम् ।दृग्भिः पिबंत्यनुसवाभिनवं दुरापमेकांतधाम यशसः श्रिय ऐश्वयस्य ॥१४॥काय आचरल्या गोपी तपें । तया पुण्याच्या साक्षेपें । लक्ष्मी वेधिली जया रूपें । तें ज्या सोपें विलोकिती ॥९२॥अनंतकौटिकंदर्पकांति । कुरवंडूनि टाकिजे परती । तें लावण्यसार कृष्णाकृति । गोपी प्राशिती निजनयनें ॥९३॥ब्रह्मांडसंदोहा माझारी । लावण्यसमता कोणी न करी तेथ अधिक लावण्यपरी । वदतां वैखरी सलज्ज ॥९४॥अलंकारें लावण्य विविध । त्यासी बोलिजे अन्यसिद्ध । ऐश्वर्यलक्ष्मी जे स्वतःसिद्ध । तें धाम प्रसिद्ध अनन्य ॥९५॥एवं आभरणांवांचून । ज्याचें लावण्य शोभायमान । त्रिजगीं ऐश्वर्य शोभवी पूर्ण । गोपीनयन प्राशिती तें ॥९६॥मधुप मधुपानें उन्मत्त । लावण्यामृत नूतन नित्य । प्राशितां गोपीनयन मत्त । पूर्णसुकृत यास्तव तें ॥९७॥यशःश्रीचें एकांतधाम । ब्रह्मादिकांसि दुर्लभ परम । तो लावण्यसुखसंभ्रम । गोपी निःसीम भोगिती ॥९८॥कैसकैश्या कोणे समयीं । कोण क्रीडा कोणे ठायीं । कैसी लावण्यसुखनवाई । भोगिती तेंही अवधारा ॥९९॥या दोहनेऽवहनने मथनोपलेपप्रेंखेंखनार्भरुदितोक्षणमार्जनादौ ।गायंति चैनमनुरक्तधियोऽश्रुकंठ्य धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥१५॥व्रजस्त्रिया ज्या दोहनकाळीं । लावण्यरूपी श्रीवनमाळी । आठवूनियां हृदयकमळीं । गाती स्नेहाळी तच्छंदें ॥१००॥दोहनपात्रीं वाजती धारा । सानुरागें जगदुद्धारा । गाती तच्छेंदें सुन्दरा । पुणें सधरा व्रजरामा ॥१॥एकी करितां कणकंडना । सप्रेम गाती मधुसूदना । एकी करितां दधिमंथना । गाती कृष्णा अनुरक्ता ॥२॥एकी सारवितां स्वसदनें । हरिगुण गाती सप्रेमवदनें । एकी हालविती पाळणे । कृष्णगायनें रंगोनी ॥३॥लेंकुरा बुझाविते अवसरीं । वदनीं गाती कैटभारि । सडासमार्जन करितां घरीं । पूतनारि वधू गाती ॥४॥गातां अनुरागें मुकुन्द । सबाह्य पावती परमानंद । अनेक जन्मींचा विसरती खेद । तो आह्लाद विधि नेणे ॥१०५॥बुद्धि रंगल्या कृष्णगुणीं । आनंदाश्रु स्रवती नयनीं । धन्य धन्य त्या व्रजकामिनी । कृष्णचिंतनीं अनुरक्ता ॥६॥विशाळ ज्याचा पदविन्यास । उरुक्रमनामें बोलिजे त्यास । त्रिविक्रम तो हृषीकेश । व्रजवनितांस सुखसेव्य ॥७॥चित्तें रंगल्या उरुक्रमीं । म्हणूनि न वधी संसारऊर्मीं । धन्या व्रजवधू वर्ततां धामीं । तें न देखों आम्ही दुर्भाग्यें ॥८॥आणखी म्हणती अहोरात्र । नित्यनूतन कृष्णचरित्र । सादर पाहती त्यांचे नेत्र । तेंही समग्र अवधारा ॥९॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP