मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर ततः कूटमनुप्राप्तं रामः प्रहरतां वरः । अवधील्लीलया राजन्सावज्ञं वाममुष्टिना ॥२६॥रामें मुष्टिक मारिल्यावरी । कूटनामा मल्ल समरीं । लोटला संकर्षणावरी । आंगी वीरश्री बाणोनि ॥१५०॥बाहू ठोकूनि ठकारें ठाके । तंव वाममुष्टिप्रहारें एकें । लीलेंकरून रोहिणीतोकें । रंगभूमिके निजविला ॥५१॥तर्ह्येव हि शलः कृष्णपदापहतशीर्षकः । द्विधा विदीर्णस्तोशलक उभावपि निपेततुः ॥२७॥तैसिचि दोघे महामल्ल । कृष्णावरी शलतोशल । उठावले शलभतुल्य । वीरश्री बहळ साटोपें ॥५२॥कृष्णें वज्रलत्ताप्रहारीं । मस्तक चूर्ण केलें समरीं । अशुद्ध वाहे धरणीवरी । राममुरारी जयवंत ॥५३॥चाणूरे मुष्टिके कूटे शले तोशलके हते । शेषोः प्रदुद्रुवुर्मलाः सर्वे प्राणपरीप्सवः ॥२८॥चाणूर मुष्टिक महामल्ल । कूट आणि शल तोशल । मारिले असतां मल्लदळ । भयें तत्काळ पळालें ॥५४॥प्राण वांचवावयाचे चाडें । मरणभयें झाले वेडे । पळतां मार्ग न सांपडे । धाकें चहूंकडे विखुरले ॥१५५॥कोणी लपती वनितांमागें । कोणी म्हणती आम्ही भणगें । एक पळाले लागवेगें । राजमार्गें अधोमुख ॥५६॥पळतां वळलिया वेंगडी । जीतचि होऊनि पडलीं मडीं । एक तृणें धरिती तोंडीं । आली हुडहुडी एकांतें ॥५७॥ऐसे प्राणपरीप्सव । वांचवावया आपुले जीव । समरंगाचा घेऊनि भेव । भाकूनि कींव पळाले ॥५८॥तंव रामकृष्ण प्रतापमेरु । तयांसि देऊनि नाभीकारू । म्हणती भयत्रस्तांतें न मारूं । धरूनि धीरु बैसा रे ॥५९॥ऐसें सभयां देऊनि अभय । उभय बंधु परम निर्भय । कृष्ण आणि रोहिणीतनय । करिती काय तें ऐका ॥१६०॥गोपान्वयस्यानाकृष्य तैः संसृज्य विजह्रतुः । वाद्यमानेषु तूर्येषु वल्गंतौ रुतनूपुरौ ॥२९॥गोप वयस्य संवगडे । आकर्षूनि आपणाकडे । मंडळ रचूनि वाडेंकोडें । विविधा क्रीडे दाविती ॥६१॥मल्लरंगीं महागजरें । वाजत असतां विचित्र तुरें । चरणीं रुणझुणती नूपुरें । रामें श्रीधरें नाचतां ॥६२॥ऐसें देखोनि सर्वांमनीं । परमानंद सभास्थानीं । जयजयकाराचिया ध्वनी । टाळी सज्जनीं पीटिली ॥६३॥जनाः प्रजहृषुः सर्वे कर्मणा रामकृष्णयोः । ऋते कंसं विप्रमुख्याः साधवः साधुसाध्विति ॥३०॥कंसावांचूनि सर्व सभा । पात्र झाली आनंदलाभा । रंगीं क्रीडतां पद्मनाभा । अपार शोभा मिरविली ॥६४॥रामकृष्णांच्या देखोनि कर्मा । आह्लाद सर्वांच्या हृदयपद्मा । स्तविती रामा पुरुषोत्तमा । नागरी वामा जयघोषें ॥१६५॥संत सज्जन महानुभाव । ब्राह्मणप्रमुख ज्ञाति सर्व । वोपिती आशीर्वाद सर्व । साधु साधु इहीं शब्दीं ॥६६॥धन्य धन्य म्हणती कृष्णा । भला गा भला संकर्षणा । कठ्होर मल्लांचिये तुळणा । समरंगणा आंगविलें ॥६७॥समस्त समूह आह्लादभरित । जनमानसें उत्फुल्लित । कंस क्षोभे परभतप्त । तत्संकेत अवधारा ॥६८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP