मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक २६ ते २९ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक २६ ते २९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते २९ Translation - भाषांतर विष्णोर्माया भगवती यया संमोहितं जगत् । आदिष्टा प्रभुणांशेन कार्याथें संभविष्यति ॥२६॥सावध ऐकिजे गीर्वाणीं । ऐशी वदे विरिंचि वाणी । जे कां वैष्णवी भवानी । विश्वमोहिनी जगदंबा ॥६३॥महामोहाचें पाजूनि पेहें । विश्व विमोहिलें आहे । लाघवें ब्रह्मांड नाचविताहे । नाना देह लेववी ॥६४॥लक्षचौर्यांशीं जीवयोनि । तितुकीं नटनाट्यें देवऊनि । खेळविते एकलेपणीं । जे गवसणी सत्तेची ॥५६५॥ते वैष्णवी आदिमाया । आज्ञापिली अवतारकार्या । तीं तीं कार्यें साधावया । नंदसदनीं जन्मेल ॥६६॥आदिपुरुषें आज्ञापिली । जे गुणत्रयाची माउली । विश्व जयेचे साउली - । माजीं आधारें निर्बुजे ॥६७॥ते निजांशें भूमंडळीं । अवतरोनि दानव बळी । निर्दलूनार्थ करील कळी । श्रीवनमाळीक्षोभक ॥६८॥तेचि होऊनि गगनवाणी । शंका ओपील कंसमनीं । भगिनीबंधुबालहननीं । पापश्रेणी तो करी ॥६९॥देवकीगर्भाचें कर्षण । रोहिणीजठरीं तो घालून । गर्भगोपन करील ॥५७०॥तेचि द्वास्थां पाडील भ्रांति । मथुरे गाढमूढ सुषुप्ति । यशोदेची हरील स्मृति । स्वप्रसूति विसरवी ॥७१॥तेचि रुक्मिणीसत्यभामा । रूपें शिशुपालादि भौमा । रति क्षोभवूनि कामा । शंबरनामा निवटवी ॥७२॥उषारूपें प्रक्षोभून । बाणबाहूंचें खंडण । द्रौपदीरूपें निर्दळण । करील पूर्ण कौरवांचें ॥७३॥अस्तिप्राप्तीचेनि नांवें । जरासंध चढवूनि हांवे । काळयवनादि आधवे । दैत्य वघावे भूभार ॥७४॥ऐशी अवतार अवधि । यदुकुमारांची बसवूनि बुद्धि । निर्दळूनि यादवमांदी । कार्यसिद्धि साधील ॥५७५॥ऐशिया कार्याकारणें । आज्ञापिलीं नारायणें । अवतार शक्तीचें उपजणें । याचिकारणें गोकुळीं ॥७६॥श्रीशुक उवाच - इत्यादिश्यामरगणान्प्रजापतिपतिर्विभुः । आश्वास्य चं महीं गीर्भिः स्वधाम परमं ययौ ॥२७॥शुक म्हणे गा परीक्षिति । अभयें आश्वासूनि क्षिति । आज्ञापूनि देवांप्रति । गेला प्रजापति निजधामा ॥७७॥सकळ स्वर्गाचिये मुकुटीं । सत्यलोक सत्य रहाटी । परम उत्कृष्ट याचिसाठीं । शुकवाक्पटीं वाखाणी ॥७८॥यथार्थनामें सत्यभुवनीं । प्रवेशला पंकजयोनि । आज्ञेप्रमाणें निर्जरगणीं । अंशें धरणीं अवतरिजे ॥७९॥ऐसें वर्तलें गीर्वाणीं । नृपा सांगोनि बादरायणि । म्हणे सावधान श्रवणीं । चक्रपाणिचरित्र ॥५८०॥शूरसेनो यदुपतिर्मथुरामावसन्पुरीम् । माथुरान् शूरसेनांश्च विषयान् बुभुजे पुरा ॥२८॥जेथ ध्रुवाचें अनुष्ठान । मोक्षलक्ष्मीचें अधिष्ठान । मथुरापुरी पुण्यपावन । जेथें यदुगण नांदती ॥८१॥वृष्णिकुळीं शूरसेन । सत्त्वाथिला पुण्यपावन । यादवपति धन्य धन्य । मथुराभुवन तो वसवी ॥८२॥शूरसेन देश सकळ । समग्र मथुरामंडळ । ऐसा अनेक देशपाळ । होता दळबळप्रतापें ॥८३॥इत्यादि देशांचें शासन । करूनि भोगी शूरसेन । एथूनि कृष्णकथेचें कथन । अनुसंधान अवधारा ॥८४॥राजधानी ततः साऽभूत्सर्वयादवभूभुजाम् । मथुरा भगवान्यत्र नित्यं सन्निहितो हरिः ॥२९॥पुढें यादवकुळीं थोर । पृथक् झाले राज्यधर । नवमस्कंधीं तो विचार । पुनः विस्तार किमर्थ ॥५८५॥मथुरा पूर्वीच पुण्यखाणी । तेथूनि झाली राजधानी । यादवकुळींच्या भूपाळगणीं । भोगभुवनीं सेविली ॥८६॥नित्य सन्निध हरि । षड्गुणैश्वर्य जेथ वोगरी । कैवल्यद्वीपींची दुसरी । भवसागरीं तारिका ॥८७॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP