मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक २१ ते २५ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर तत्र गत्वा जगन्नाथं देवदेवं वृषाकपिम् । पुरुषं पुरुषसूक्तेन चोपतस्थे समाहितः ॥२१॥करूनि बाह्य शरीरशुद्धि । आसन वळिलें यथाविधि । विषयांपासूनि इंद्रियमांदी । आत्मसमाधीं परतविली ॥५०५॥गोधनें विखरलीं डोंगरां । गोरक्ष वळूनि आणी अरा । करणें गुंतलीं विषयचारा । तेवीं धाता परतवी ॥६॥पंचप्राणांचीं लावूनि दावीं । अंतरवृत्ति खुंटा गोंवी । बैसोनि रोवंथ करिती जेवीं । सुखसंभवीं मनाच्या ॥७॥मग दोहती गोरससार तूप । निदिध्यासें उजळी दीप । प्रकाशे विधीचा साक्षेप । साक्षात्कारीं प्रवर्तला ॥८॥ब्रह्मा झाला जरी मोठा । सहित सुरवरां श्रीकंठा । न साधितां अंतर्निष्ठा । न मुके कष्टा कर्माच्या ॥९॥ब्रह्मा सगुण आकारवंत । तया अगम्य श्रीअनंत । म्हणूनि झाला समाहित । पुरुषसूक्त जपावया ॥५१०॥जगत्पति जगन्नाथ । देवाधिदेव श्रीसमर्थ । आदिपुरुष पुरुषसूक्त - । पठणें स्तवित विधाता ॥११॥निरुपाधिक जें कां सुख । तया सर्वगा नाम आक । धर्मरूप तेजें आक । तें वृषाक बोलिजे ॥१२॥वृषाकपाणि वृषाकपि । एवं सर्वभोक्ता सर्वव्यापी । तया पुरुषसूक्ताच्या जपीं । स्तवी साक्षात् विधाता ॥१३॥गिरं समाधै गगने समीरितां निशम्य वेधास्त्रिदशानुवाच ह ।गां पौरुषीं मे श्रृणुतामराः पुनर्विधीयतामाशु तथैव मा चिरम् ॥२२॥वेधा सांगे त्रिदशांप्रति । ऐकोनि वैष्णवी भारती । गगनगर्भीची आयती । बरवे रीतीं बोलिली ॥१४॥ते समाधीच्या ठायीं । कानीं पडतां विरिंचि कायी । देवांसि बोलिला ते नवाई । श्रवणालयीं सांठला ॥५१५॥म्हणे अमरहो ऐका मात । माझ्या मुखें श्रीअनंत । बोलवील जो वृत्तांत । सावचित्त तो ऐका ॥१६॥देवल मिसें ठेविता फुलें । आंगीं वारें भरोनि बोले । कां नृपाचें निरूपिलें । प्रकट केलें अमात्यें ॥१७॥कां पत्रीं लिहिले अभिप्राय । तें वाचकाचें बोलणें न होय । तैशी माझ्या मुखें जें जें काय । प्रकट होय ते हरिवाणी ॥१८॥ते आदिपुरुषाची भारती । मजपासोनि बरवे रीतीं । ऐकोनि तैसेंतैसें पुढती । शीघ्रगतीं अनुष्ठा ॥१९॥गुरु देव कां भूंपति । जे जे आज्ञा निरूपिती । शुभ आचरिजे शीघ्रगतीं । अशुभाप्रति त्रिप्रश्न ॥५२०॥कंद मूळें फळ जळ । तीर्थ प्रसाद केवळ । हें सेववितां तत्काळ । विघ्नकल्होळ विलंबे ॥२१॥शुभ सत्वर ससाक्षेप । अशुभीं कीजे कालक्षेप । ईश्वरकृपेचा लागतां दीप । होय लोप अशुभाचा ॥२२॥म्हणूनि न करितां कालक्षेप । अचिरें आचरा हरिसंकल्प । ऐसा देऊनि निरोप । गोप्यागोप निरूपी ॥२३॥पुरैव पुंसाऽवधृतो धराज्वरो भवद्भिरंशैर्यदुषूपजन्यताम् ।स यावदुर्व्या भरमीश्वरेश्वरः स्वकालशक्त्या क्षपयंश्चरेद्भुवि ॥२३॥न सांगता गर्भीची व्यथा । जेवीं जाणे गर्भिणी माता । आदिपुरुषें भूआकांता । न सांगतां ऐकिलें ॥२४॥जो कां सर्वांतरनिवासी । सर्वव्यापक सर्वदेशीं । सर्वदा सर्व विदित ज्यासी । जो हृषीकेशी जगदात्मा ॥५२५॥पाटें पाणी जेवीं माळी । पाववी सर्व झाडांमुळीं । फुटलें पसरलें सांभाळी । तेवीं वनमाळी स्वधर्मा ॥२६॥धर्मसंस्थापनेचा जगीं । अभिमान वाहे श्रीशार्ङ्गी । धर्म भंगे युगींयुगीं । लगबगीं अवतरे ॥२७॥तेणें न सांगतां धराज्वर । पूर्वीं अवधारिला सविस्तर । तुम्ही यदुकुळीं सत्वर । सर्व सुरवर अवतरा ॥२८॥पुण्यें जोडिली स्वर्गसंपत्ति । तें सांडोनि कैसें जावें क्षिती । ऐशी न करा तुम्ही विनति । ऐका उपपत्ति यदर्थी ॥२९॥कुंडीं असतांचि पावक । वेगळा कीजे स्फुलिंग एक । दोहीं ठायीं सम दाहक । अंशविवेक तेवीं करा ॥५३०॥सांडूनि स्वर्गीं अमरभोग । कां भोगिजे जरारोग । हा संशय न शिवो अंग । तो प्रसंग अवधारा ॥३१॥स्वर्गीं कीजे सुधापान । विनोदवाटिका नंदनवन । रंभाऊर्वशीचें मैथुन । व्योमयान वाहनार्थ ॥३२॥इतुकें स्वर्गीं आहे सुख । दैत्यदानवक्षोभें दुःख । नित्य निर्दोष निरुपाधिक । मुख्य चित्सुख नेणा रे ॥३३॥हुंडी न म्हणिजे पत्रखंड । शिक्षा न म्हणिजे शासनदंड । भेषज न म्हणिजे कडू गोड । कर्म अवघड न म्हणावें ॥३४॥जेणें चित्सुखाची प्राप्ति । त्या जन्माची न म्हणिजे क्षिती । कुर्वंडूनि स्वर्गसंपत्ति । भाग्यें क्षिति सेवावी ॥५३५॥नेत्र बांधोनि बांधिला शाळे । मुखीं आढळे तें त्या कळे । अनेक रत्नांचे सोहळे । केवीं आंधळे भोगिती ॥३६॥पंक्ती दिव्यान्नें सेविती । रोगिया पथ्याची परिमिति । अव्युत्पान्नापाशीं पोथी । परि ते व्युत्पत्ति तो नेणे ॥३७॥देऊनि अमरत्वाची बुंथी । भोगवी स्वर्गीची संपत्ति । देवमायेची हे ख्याति । कदा कल्पांतीं नुमजवी ॥३८॥श्रीमंत सेविती परमान्न । तें भक्षितां वमी श्वान । मनुष्याचें खातां वमन । तेणें श्वान सुखावे ॥३९॥दिव्य भोगेशीं इंद्रभुवन । तें विरक्त मानिती वमन । तेणें तोषती अज्ञान । हीन दीन अविवेकी ॥५४०॥धरूनि नेले राजद्वारीं । नियोजिले कारागारीं । राजैश्वर्यभोगाची परी । तया दूरी बहुतेक ॥४१॥दुष्टां निगडीं पदबंधन । एका धामीहूनि वर्जिती गमन । एका दृष्टीचें संरक्षण । परि निर्मुक्तपण तें नोहे ॥४२॥नेमूनि दिधलें तें तें खाती । नेमिल्या ठायापर्यंत जाती । व्यापक सर्वैश्वर्यगति । तयांप्रति दुर्लभ ॥४३॥तैसें दैवी मायें तुम्हांसि केलें । स्वर्गीं नरकीं संस्थापिलें । स्वकर्मभोगीं नियोजिलें । पुण्यपापभोगार्थ ॥४४॥तया बंधाची निवृत्ति । होणार तरी हे जन्मक्षिति । फुकासाठीं चारी मुक्ति । या श्रीपतिसहवासें ॥५४५॥हरिजन्माचा समारंभ । तेव्हां सलोकतेचा लाभ । बालक्रीडेचें वालभ । तेव्हां सुलभ समीपता ॥४६॥जेव्हां वळाल गोधनें । तेव्हां देवें सरूपता तुमची घेणें । तैशीच आम्हांस आपुली देणें । वत्सहरणप्रसंगें ॥४७॥यदुकुळीं अवतरावें ही वाणी । तरी कां गोवळ निरूपणीं । ऐशी आशंका मानील कोणी । तिहीं कडसणी ऐकावी ॥४८॥नंदाद्या ये व्रज गोपा । शुक या श्लोकें सांगेल नृपा । तो अभिप्राय भिडवूनि रूपा । आणूनि सोपा बोलिलों ॥४९॥एवं यादव आणि गोपाळ । देवची अवतरावे सकळ । म्हणोनि विधीच्या मुखें वर्णिलें फळ । हें भूतल वसतीचें ॥५५०॥म्हणाल कित्येक काळवरी । सुलभ होईल श्रीहरि । तेंही ऐका वरच्या परें । सविस्तरीं बोलतों ॥५१॥तृनें गादलिया धरणी । ग्रीष्मक्षोभें शोषी तरणि । पचनपावकांमिलवूनि । करी जाळूनि निःशेष ॥५२॥तैसा जोंवरी अवनीभार । उतरावया जगदीश्वर । स्वकाळशक्ति महाक्रूर । क्षोभवील स्वसत्ता ॥५३॥भूभारुतरावयाचेनि मिषें । भूमी क्रीडतां मनुष्यवेषें । तुम्हीं श्रीहरिसहवासें । सुखसंतोषें क्रीडावें ॥५४॥तो ईश्वराचा ईश्वर । जोंवरी उतरी धराभार । तोंवरी तुम्ही आज्ञाधर । होऊनि सहचर हरि सेवा ॥५५५॥नित्य नूतन करी लीला । अलौकिक दावील खेळा । खेळतां मारील दैत्यमेळा । हरि यदुकुळा येऊनि ॥५६॥म्हणाल यादवांचीं कुळें बारा । कोण गणी त्या विस्तारा । कोठें जन्म परमेश्वरा । त्या विचारा परिसावें ॥५७॥वसुदेवगृहे साक्षाद्भगवान्पुरुषः परः । जनिष्यते तत्प्रियार्थं संभवन्तु सुरस्त्रियः ॥२४॥शूरसेनाचा औरस । जैसा सद्भाव स्वप्रकाश । तया वसुदेवसदनीं हृषीकेष । आदिपुरुष प्रकटतो ॥५८॥जो ईश्वराचा ईश्वर । मायाचक्राहूनि पर । तो साक्षात्परमेश्वर । घेतो अवतार वृष्णिकुळीं ॥५९॥तयाचें करावया प्रिय । सुरस्त्रियांचे समुदाय । भूतळीं उपजोत आनंदमय । आणीक काय विधि बोले ॥५६०॥वासुदेवकलानन्तः सहस्रवदनः स्वराट् । अग्रतो भविता देवो हरेः प्रियचिकीर्षया ॥२५॥ज्यावरी हरि करी शयन । पृथ्वी ज्याचें मौलीभूषण । वासुदेवकला संकर्षण । त्याचें जनन हरी आधीं ॥६१॥हरीसि करावें संतुष्ट । हेचि इच्छा धरूनि श्रेष्ठ । श्रीअनंत भगवन्निष्ठ । होईल प्रकट हरी आधीं ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP