मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ७० ते ७२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ७० ते ७२ Translation - भाषांतर मातरं पितरं भ्रातॄन्सर्वांश्च सुहृदस्तथा । घ्नन्ति ह्यसुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ॥७०॥प्राणपोषक विषयलुब्ध । राज्यमदें जे मदांध । देहलोभे विधिनिषेध । कर्म विरुद्ध न म्हणती ॥६८॥राज्यभोगविषयांसाठीं । मातपितरें वधिती कपटी । बंधुसुहृदांचिया कोटी । स्वार्थासाठीं मारिती ॥६९॥ऐसे राजे वर्त्तमान । याहूनि कलिकाळीं निर्घृण । करिती पिंडाचें पोषण । लज्जादूषण न गणिती ॥९७०॥वाइलेशीं भांडतां माता । क्रोधें करिती मातृघाता । द्रव्यविभागाचिया स्वार्था । पितृघाता न शिणती ॥७१॥मातापितरीं महत्त्व ऐसें । बंधुसुहृदां कोण पुसे । देहलोभें केलें पिसें । विषयसोसें नाचती ॥७२॥राजेचि मातृपितृघाती । तेथ प्रजांची कोण गति । कोण करी न्यायनीति । अधःपाती अवघे ॥७३॥ऐसे बहुतेक दुष्टजन । कंसावरूनि आठवण । झाली शुकासि म्हणून । निरूपण हें केलें ॥७४॥आत्मानमिह संजातं जानन्प्राग्विष्णुना हतम् । महासुरं कालनेमिं यदुभिः स व्यरुध्यत ॥७१॥होणार बळिवंत न चुके कर्म । तेणें कंसासि आठवे पूर्व जन्म । म्हणे माझा वैरी विष्णु परम । हें निजवर्म मी जाणें ॥९७५॥महादैत्य कालनेमि । वधिला विष्णूनें संग्रामीं । आतां तोचि एथ पैं मी । कंस होऊनि जन्मलों ॥७६॥अद्यापि मजशीं वैराकार । साधावया हे सुरवर । धरूनि यदुकुळीं अवतार । आले वरि स्मरोनि ॥७७॥गगनवाक्यें साशंकित । दैवें पातला ब्रह्मसुत तेणें सांगतां वृत्तांत । मग हे मात उमजली ॥७८॥मग सावध होऊनि मनीं । यादव घातले बंधनीं । करी अनेक जाचणी दैत्यश्रेणीसंग्रहें ॥७९॥उग्रसेनं च पितरं यदुभोजांधकाधिपम् । स्वयं निगृह्य बुभुजे शूरसेनान्महाबलः ॥७२॥धरूनि पिता उग्रसेन । तयासि केलें दृढ बंधन । भोज अंधक यादवगण । ज्याअधीन वर्त्तती ॥९८०॥तो बंदीं घातला यादवसखा । तेथ इतरांचा काय लेखा । शूरसेनादि नाना लोकां । भोगवी अनेकां दळबळें ॥८१॥कंस प्रतापी भोजकुळीं । बंदीं घालूनि यादवबळी । सामान्य ठेविले आज्ञेतळीं । भोगी महीतळी सकळांची ॥८२॥इतुकें श्रीमद्भागवतीं । परमहंसाची संवित्ति । अठरा सहस्रांचीये विस्तृति । जे व्यासोक्ति संहिता ॥८३॥महापुराण याचें नांव । परंतु ब्रह्मविद्येचा ठाव । दशमस्कंधीं प्रथमाध्याय । कथाप्रस्ताव वर्णिला ॥८४॥प्रत्यक्ष ब्रह्महत्या हरती । ऐशी महिमा आहे भारतीं । परंतु भागवताची ख्याती । अगाध गति श्रवणाची ॥९८५॥भारतादि सर्व पुराणें । स्वयें कथिली बादरायणें । परंतु परतल्या अंतःकरणें । विश्रांति नेणे स्वसुखाची ॥८६॥तेणें अनुतप्त अंतरीं । येऊनि सरस्वतीच्या तीरीं । अनशनव्रतधारी । प्रायोपशायी जहाला ॥८७॥तंव अकस्मात ब्रह्मर्षि । दैवें पातला व्यासापाशीं । तेणें पुसोनि वृत्तांतासी । गुह्य त्यासि बोधिलें ॥८८॥जें पद्मकल्पीं ब्रह्मयातें । नाभिकमळीं श्रीअनंतें । तप तप ऐसें बोधुनि त्यातें । वैकुंठातें दाविलें ॥८९॥तें आदिमायाविनिर्मित । नाहीं पंचभूतांची मात । तेथें विधीसि एकांत । रमाकांत प्रबोधी ॥९९०॥ऐशीच निर्माण करीं सुष्टि । अलिप्त राहें अंतर्दृष्टीं । ऐशी सांगोनि गुह्य गोष्टी । तो परमेष्ठी स्थापिला ॥९१॥पूर्ण अनुभविया हें कळे । अंतर्निष्ठासि विवळे । शास्त्रयुक्तीचें वाचाळें । त्यांसि न कळे हें गुह्य ॥९२॥शास्त्रज्ञ आणि अंतर्निष्ठ । अभ्यासशील अनुभवी स्पष्ट । तरी तो सर्वांहूनि श्रेष्ठ । चंदनकाष्ठ ज्यापरी ॥९३॥परिमळें इतर काष्ठां वेधी । चंदनकाष्ठीं हे स्वयंभू सिद्धि । तैसा वेदशास्त्रज्ञ विशाळबुद्धि । जो समाधिसुखभोक्ता ॥९४॥असो इत्यादि कडसणी । ब्रह्मा वेधिला चक्रपाणी । तेणें विवरूनि अंतःकरणीं । ग्रथिलें गुणीं चतुःश्लोकीं ॥९९५॥तें चतुःश्लोकी भागवत । ब्रह्मानुभवें ब्रह्मा ध्यात । नारदातें अकस्मात । तो एकांत फावला ॥९६॥ब्रह्मा बोधी नारदासि । तेणें बोधें तो ब्रह्मर्षि । नित्य क्रीडतां स्वानंदेशीं । श्रीव्यासासि भेटला ॥९७॥देखोनि व्यासाची विरक्ति । कळवळला तो करुणामूर्ति । मग नेऊनि एकांतीं । निजविश्रांति बोधिली ॥९८॥तेंचि चतुःश्लोकी भागवत । नारदप्रबोधें व्यासासि प्राप्त । तेणें निवाला तो महंत । निज एकांत सेवूनि ॥९९॥मग तो उदार करुणासिंधु । कीं परमामृताचा पूर्ण इंदु । स्वसुखामृतें परमानंदु । मुमुक्षुसुरवरां ओपिता ॥१०००॥चंद्र आंगींचें निजामृत । देवा देऊनि पडे रिक्त । म्हणोनि असम दृष्टांत । हा महंत आगळा ॥१॥व्यासरायाचे हृदयभुवनीं । परमामृतफळाची वानी । नारदें देतां पुराणवनीं । केली लावणी श्रीव्यासें ॥२॥तो परमामृतफळाचा तरु । अठरासहस्र सविस्तरु । त्या पक्क फळांचा घेऊनि आहारु । शुक सत्वरु निवाला ॥३॥परमामृत जें रसाळ श्रेष्ठ । गलित फळ तें शुकमुखोच्छिष्ट । तेणें परीक्षितीचे हरले कष्ट । झाला पुष्ट स्वानंदें ॥४॥तें फळ व्यासचि एकला खाता । तरी कोठूनि येतें जगाच्या हाता । तो वृक्ष विस्तारूनि पुरता । केला समस्तां फळलाभ ॥१००५॥संसारश्रांतासि साउली । भररोगिया पीयूषवल्लि । मुमुक्षु बुभुत्सु स्वानंदफळीं । प्राप्त सकळीं निवताती ॥६॥एथें श्रोते भृंग जाण । श्रवणें करितां आमोदपान । कृष्णसारूप्यें समाधान । आनंदघन भोगिती ॥७॥कीर्त्तननिष्ठ कोकिलाकृति । धरूनिया वरी कूजती । नाना वेदान्त व्युत्पत्ति । ते प्लवंगाकृति उप्लवनें ॥८॥घेऊनि एथिचे सर्वोपचार । मुळीं बैसले तापस धीर । निष्कामकर्मनिष्ठ द्विजवर । करिती घर ये वृक्षीं ॥९॥ऐसा अमृततरु ब्रह्मांडीं । कीजे सुरतरूची कुरवंडी । न सेवी त्याचे मृत्तिका तोंडीं । घाली अनावडी अभाग्यें ॥१०१०॥हा निर्धनाचें पूर्ण धन । पुण्यशीळाचें जीवन । प्रतिश्लोकीं कोटी यज्ञ । श्रवणें पान केलिया ॥११॥यज्ञसुकृत सरतां पतन । एथ जोडे अविनश पुण्य । जें अक्षय्य ब्रह्मनिराण । कैवल्यसदनप्रापक ॥१२॥प्राश्निक वक्ते आणि श्रोते । प्राप्ति समान अवधियांतें । मागें पुढें भरलें रितें । न्यून एथें असेना ॥१३॥जेथ व्यासाचा हरला भ्रम । कायसा हा शास्त्रपरिश्रम । म्हणोनि परमामृतद्रुम । हा निष्काम लाविला ॥१४॥येणें अविद्याचि संहरे । परमामृतें ज्ञप्ति मुरे । अनुभवापुरतें द्वैत नुरे । तें हें खरें परब्रह्म ॥१०१५॥एके अविद्येचे पोटीं । विपरीत ज्ञानें अनेक सृष्टीं । तेथ पापपुण्याच्या गोष्टी । शास्त्रदृष्ट्या बोलिजे ॥१६॥तें दृश्येंशीं अविद्या हरे । विपरीत ज्ञान कोठूनि उरे । मग ब्रह्महत्येचीं उत्तरें । कोण निदसुरें वोसणे ॥१७॥स्वप्नखेळीं अळणी जेवण । त्यासि जागृत होऊनि वाढी लवण । ऐसें जयाचें कोमलज्ञान । तो हें भाशन अनुवादे ॥१८॥एवं भागवताचिया श्रवणफळा । प्राश्निकां वक्त्यां श्रोत्यां सकळां । पुण्यप्रताप तुकितां तुळा । कोठें आगळा दिसेना ॥१९॥शुक म्हणे गा परीक्षिति । श्रवणीं सादर सप्रेमभक्ति । तुझेनि जगासि विश्रांति । अगाधकीर्ति तूं एक ॥१०२०॥पुढिले अध्यायीं गर्भस्तुति । ब्रह्मादि देव येऊनि करिती । तें ज्ञान सांठवावया चित्तीं । सादरवृत्ति असावें ॥२१॥शौनकप्रमुखां नैमिषारण्यीं । सूतें घालूनि इतुकें श्रवणीं । पुढिले कथेच्या निरूपणीं । करी विनवणी अवधाना ॥२२॥तें हें आदिनाथवरदें । दत्तात्रेयकृपाप्रसादें । जनार्दनें वात्सल्याच्या कंदें । एकनाथीं सांठविलें ॥२३॥तेणें वोळला चिदानंदघन । अवघें स्वानंदजीवन । गोविंद वरद गांग पूर्ण । दयार्णवीं तें भरलें ॥२४॥श्रोते प्राश्निक सुरवर । संवादमथनें चित्सागर । मथितां रत्नांमाजीं सार । अमृतोद्गार हे टीका ॥१०२५॥एथ करिती अमृतपान । हे म्हणों सुरवरां समान । हा दृष्टांत एथ गौण । ते निर्वाणसुखभोक्ते ॥२६॥कृष्णसमरण मंगलायतन । हें परम गुह्य करूनि जतन । प्रथमाध्याय कृष्णार्पण । यथाज्ञानें समर्पिला ॥२७॥छायाव्याख्यान केलें फार । म्हणोनि न मानावा विस्तार । हा अवघाचि परिहार । जगदुद्धार जाणतसे ॥२८॥अच्युतानंतगोविंद - । स्मरणें भवरोगाचा कंद । तुटोनि प्रकटे परमानंद । तो हा वरद चिन्मूर्ति ॥२९॥मी - तूं रहित जें चिन्मात्र । त्याचें तेणेंचि निजचरित्र । कथिलें स्वतःसिद्ध स्वतंत्र । सुधापात्र श्रोतयां ॥१०३०॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णावतारोपकथनं नाम प्रथमोध्यायः ॥१॥( इतर भागवतप्रतींत ‘ इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे पूर्वाधें श्रीकृष्णावतारोपक्रमे प्रथमोऽध्यायः ’ अशी प्रथमाध्याची पुष्णिका आहे. ) श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥७२॥ टीका ओव्या ॥१०३०॥ एवं संख्या ॥११०२॥पहिला अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP