मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ११ ते १४ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ११ ते १४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १४ Translation - भाषांतर व्रजे वसन्किमकरोन्मधुपुर्यां च केशवः । भ्रातरं चावधीत्कंसं मातुरद्धाऽतदर्हणम् ॥११॥वसति करूनि व्रजपुरीं । कैशी लीला करी हरि । पुढें मधुपुरीमाझारीं । कोणे परीं विचरला ॥११॥आणीक संशय असे एक । सांगा तयाचा विवेक । मातुलहननाचा अविवेक । सर्वज्ञासि कां घडला ॥१२॥मातुल साक्षात्पितृस्थानीं । ज्यासि अधिकार पिंडतर्पणीं । त्यासि मारूनि अनर्ह करणी । चक्रपाणि कां करी ॥१३॥देहं मानुषमाश्रित्य कति वर्षाणि वृष्णिभिः । यदुपुर्यां सहावात्सीत्पत्न्यः कत्यभवन्प्रभोः ॥१२॥घेऊनि मनुष्यदेहाची बुंथी । किती अब्दें केली वसति । वृष्णींसहित द्वारावरती । मथुरेप्रति निवास ॥१४॥किती झालीं अंतःपुरें । कैशीं तयांचीं स्वयंवरें । तीं मज कृपेचेनी सागरें । सविस्तर सांगावीं ॥४१५॥सूर्य निवारी जैसें तम । दुःख निवारी पुरुषोत्तम । पाप निवारी हरीचें नाम । प्रश्नविभ्रम तेंवीं करा ॥१६॥एतदन्यच्च सर्वं मे मुने कृष्नविचेष्टितम् । वक्तुमर्हसि सर्वज्ञ श्रद्दधानाय विस्तृतम् ॥१३॥इतुके पुशिले प्रश्न मुनी । आणीक स्फुरती निरूपणीं । ते ते सविस्तर माझे श्रवणीं । कृपा करूनि घालावे ॥१७॥अगाध कृष्णविचेष्टित । परिसावया आर्त्तभूत । चातकन्यायें माझें चित्त । वचनामृत इच्छितसे ॥१८॥तूं बोलावया वक्ता समर्थ । सर्वज्ञ आणि प्रेमभरित । मी अत्यंत श्रद्धावंत । आर्त्तभूत श्रवणार्थी ॥१९॥म्हणाल ऐकतां सविस्तर । श्रमें उबगेल तुझें अंतर । तरी तुमच्या वचनामृताचा तुषार । तो आधार मम प्राणा ॥४२०॥नैषाऽतिदुःसहा क्षुन्मां त्यक्तोदमपि वाधते । पिबन्तं त्वन्मुखम्मोजच्युतं हरिकथामृतम् ॥१४॥जे का प्राणाची रीणघेणी । लक्षूणि ठाके उभी वायणीं । कंहीं न पवतां जाचणी । करी विटंबणी ते ऐका ॥२१॥जरा येणार उत्तरवयसीं । ते आणूनि भेटवी एके दिवशीं । विकार करी इंद्रियांसि । कासाविसी प्राणांत ॥२२॥ असतां पांगुळ होती पाय । अंगींची शक्ति गळूनि जाय । वाचा बेंबळ होऊनि ठाय । जिचा घाय लागतां ॥२३॥कृश करी शरीर सकळ । अस्त पावेल्र रूपशील । उपजे क्रोधाग्नीचा ज्वाळ । लज्जा अत्काळ हरपे ॥२४॥सत्कर्माचा करी रोध । अपवादाचा न मानी बाध । न रुचे अमृततुल्यबोध । आत्मवाद नावडतीं ॥४२५॥सकळ भोगांची करी धुळी । विवेक घाली पायांतळीं । सुहृदयस्नेहाची करी होळी । दोषमाउली जे क्षुधा ॥२६॥जे जठराग्नीची ज्वाळ । तुच्छ करी प्रलयकाळ । सकळ कळा होती विकळ । मध्यान्हकाळ पातल्या ॥२७॥ज्ञान वैराग्य चातुर्य । वीर्य शौर्य हरपे धैर्य । वर्णावर्णाचें विचार्य । सर्व कार्य पारूषे ॥२८॥जिच्या भयें पावले व्यथा । शस्त्रघाय साहती माथां । समुद्रीं रिघती उदरार्था । जे सर्वथा दुःसह ॥२९॥जिच्या प्रतापें स्वामीसेवक । जिणें केले रावरंक । देवांमानवा लाविली भीक । जे निष्टंक निष्ठुर ॥४३०॥व्याघ्र वृश्चिक महासर्प । त्यांचें भय न धरिती अल्प । वघड गडाचे साक्षेप । खटाटोप विद्यांचे ॥३१॥पोट भरावयाचे साठीं । दांभिक तपाची आटाटी । एक रिघलेकपटी । पोटासाठीं कर्मठ ॥३२॥जटामुंडी केशलुंचन । काषायांवर नग्न मौन । एक करिती पर्णाशन । केले दीन क्षुधेनें ॥३३॥क्षुधेसाठीं शिष्यगुरु । क्षुधेसाठीं स्त्रीभ्रतारु । क्षुधेसाठीं राज्यभारु । येरांयेरु मीनिती ॥३४॥जरीं क्षुधेचा नसता आधि । तरी कोण कोणा मानिता कधीं । पाषाण तैसे समानबुद्धि । सर्व निरूपाधिअसतो ॥४३५॥किती मृत्तिका उकरिती । किती विष्ठा विसर्जिती । नीचतर कर्में करिती । हे विपत्ति क्षुधेची ॥३६॥हळाहळ घेऊं शके । महत्त्व टाकूनि मागवे भीके । परि क्षुधेचा भडका साहों शके । ऐसा न देखों बळियाढा ॥३७॥ऐशी अतितर दुःसह क्षुधा । मातें तिची न बाहे बाधा । तेही उपपत्ति प्रसिद्धा । ऐकें सिद्धा मुनिवर्या ॥३८॥चातक लक्षी जेवीं घना । तो नातळे भूजीवना । देवो वर्षतां अंबुकणा । प्राणतर्पणा तो करी ॥३९॥चातक लक्षी जेवीं घना । तो नातळे भूजीवना । करी घनाचें चिंतन । दुजें ध्यान तो नेणें ॥४४०॥भर्तृप्रीतीचा हृदयीं तोष । होतां दुःसह सासुरवस । न वाटे पांडवां वनवास । कृष्णकृपेच्या तुषारें ॥४१॥तैसा निराहार मी त्यक्तोद । परि मज स्पर्शों न शके खेद । मुखांबुजींचा अमृतस्वाद । तेणें आनंद मज तुझा ॥४२॥वदनांबुजींचें निःसृतामृत । श्रवणवदनें प्राशन करीत । तेणें स्म्तोषभरित चित्त । म्हणूनि त्वरित निरूपा ॥४३॥कृष्णकीर्ति तुमच्या वदनें । परिसतां तहानभूक विसरणें । यदर्थीं नवल मानिजेल कोणें । जे एथींचें नेणें रसपान ॥४४॥लोह वेधे अयस्कांतें । जडही धांवे तेणें पंथें । हरिकीर्तनीं जीं सचेतें । जीवंतचि प्रेतें न रुचतां ॥४४५॥हरिकीर्तनाची गोडी । लागतां वृत्ति होय वेडी । मोक्षसुखाची निरवडी । कोण परवडी विशयांची ॥४६॥हरिकीर्तनीं रंगतां रंगीं । संसारसुखाचीं धगी । कदा आतळों न शके आंगीं । सुख सर्वांगीं कोंदाटे ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP