मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ४८ ते ५० अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ४८ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४८ ते ५० Translation - भाषांतर निर्बंधं तस्य तं ज्ञात्वा विचिन्त्यानकदुंदुभिः । प्रपतं कालं प्रैव्योढुमिदं तत्रान्वपद्यत ॥४८॥व्याघ्रवदनीं पडतां धेनु । जैसा कळवळी सज्जन । काळपाशीं आकर्षण । होतां प्राण ज्यापरी ॥७६५॥जैशी त्रिदोषांची बाधा । मानूं नेदी दिव्यौषधा । तैसा वसुदेवाचिया बोधा । कंस निर्बंधा न संडी ॥६६॥जाणोनि त्याचा तो निर्बंध । वसुदेव पावला परम खेद । धैर्य धरूनि सावध । हृदयीं विषद विचारी ॥६७॥धैर्य पुरुषाचें स्वरूप । धैर्यें शमे पापताप । धैर्य विपत्तीचा लोप पुण्यप्रताप प्रकाशें ॥६८॥धैर्य सद्गुणा अधिष्ठान । धैर्य यज्ञाचें भूषण । धैर्य मोक्षाचें साधन । धैर्यहीन दरिद्री ॥६९॥धैर्यपद नाहीं मुळीं । वृथा न म्हणावी वाचाळी । वसुदेवाचेच जन्मकाळीं । पिटिली टाळी सुरवरीं ॥७७०॥आनकदुंदुभीचा घोष । करूनि देवीं मानिला तोष । तोचि एथ नामविशेष । धैर्ययशसूचक ॥७१॥महाभागपदव्याख्यानें । पूर्वीं कथिलीं जीं लक्षणें । तितुकीं सिंहावलोकनें । विचक्षणें जाणावीं ॥७२॥हेचि श्रवणाची सामग्री । आस्था असावी अंतरीं । स्वास्थ्य असावें शरीरीं । प्रज्ञा तिसरी परमार्थीं ॥७३॥प्रकाश असावा गुरूपदिष्ट । धारणा असावी अंतर्निष्ठ । पंचलक्षणीं श्रवण पुष्ट । कीजे यथेष्ट सच्छास्त्रीं ॥७४॥सिंहावलोक वक्ष्यमाण । उपमा रूपक विशेषण । उपक्रमोपसंहरण । हे सप्त गुण उभयांसी ॥७७५॥पूर्वपीठिका लापनिका । प्रश्नपरिहार आर्षेका । लालित्य रसोत्पत्ति भूमिका । प्रस्तावना प्रशंसा ॥७६॥प्रमेय प्रगल्भ अलंकार । गूढरहस्य ध्वनितोद्गार । अतिशयोक्ति सारासार । तारतम्य व्यंग्योक्ति ॥७७॥कुलकें आणि कलापकें । पारंपर्योक्ति युग्मकें । संमति कक्ष कूटवाक्यें । उपहासकें अविरोधी ॥७८॥इत्यादि गुणीं अलंकृत । श्रोते व्यक्ते मिळती जेथ । तेथ महत्त्व पावे ग्रंथ । बोधे यथार्थ अबलांसि ॥७९॥नातरी हीनवरा राणी । अलंकारिली वस्त्राभरणीं । उपहासिजे सकळ जनीं । तैसें श्रवणीं गौरव ॥७८०॥तथापि ते जरी पतिव्रता । तरी नरका जाय उपहासितां । तैशी भाविकां कृष्णकथा । सेव्य यथार्थ दुभेल ॥८१॥नेणतां केलें अमृतपान । परि तें करील आपुला गुण । ध्रुवासि भेटल्या भगवान । ब्रह्मज्ञान न वंची ॥८२॥तैसें आबालसुबोधजन । भावें करिती श्रवणपठण । कृष्णकथेचें महिमान । पूर्णज्ञान त्यां होय ॥८३॥कृष्णकथेचा श्रोता वक्ता । पावे कैवल्य तत्त्वता । कथा प्रियकर भगवंता । होय तिष्ठता कीर्तनीं ॥८४॥जेथ स्वामी तेथ लक्ष्मी । सिद्धि तिष्ठती अभीष्टकामीं । एवं सर्व संपत्ति उपक्रमीं । निष्कामकामी हरिकथा ॥७८५॥असो कंसाचा निर्बंध । जाणोनि वसुदेव प्रबुद्ध । धैर्य धरूनि सावध । हृदयीं विविध विचारी ॥८६॥मूर्ख जैसें पडिलें गळां । त्यासिं प्रबुद्ध गोंवी खेळा । तैसें प्रलोभें या खळा । आजिच्या काळा निवारूं ॥८७॥जेणें देवकीचा मृत्यु टळे । कंसासि स्नेहभाव कळे । तें हें वसुदेवें भूपाळें । प्रज्ञाबळें योजिलें ॥८८॥ऐकें परीक्षिती साचार । वसुदेव बुद्धीचा सागर । तेणें केला जो विचार । तो प्रकार अवधारीं ॥८९॥प्राप्त झालिया संकट । धैर्यविचारें वारिती श्रेष्ठ । काल मृत्यूहूनी कनिष्ठ । हा पापिष्ट दुरात्मा ॥७९०॥अदृष्ट झालिया विपरीत । अमृतेंचि राहूसि मृत्य । सानुकूल तैं सागरांत । राजा दशरथ वांचला ॥९१॥कंस पूर्वीं हा स्नेहाळ । आतां प्रत्यक्ष भासे काळ । देवकीचा अंतकाळ । म्हणे केवळ हा वाटे ॥९२॥ मृत्युर्बुद्धिमताऽपोह्यो यावद्बुद्धिबलोदयम् । यद्यसौ न निवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः ॥४९॥बुद्धिमंत जो जो प्राणी । तेणें मृत्युनिवारणीं । आलस्य सहसा न कीजे यत्नीं । चक्रपाणिप्रसादें ॥९३॥जितुका बुद्धिमंता विचार स्फुरे । तितुका प्रयत्न कीजे धीरें । सहसा होऊनि घाबिरें । नेत्रद्वारें न लवावीं ॥९४॥जेव्हां बुद्धीचें बळ खुटे । तेव्हां लागे मृत्युवाटे । बुद्धि स्फुरे तो तत्काल सुटे । मृत्युमुखवटें पावतां ॥७९५॥बुद्धिस्फुरणासि कारण । सदा स्मरावा श्रीभगवान । तेणें निरसे महाविघ्न । आनंदघन सहजेंचि ॥९६॥कृष्णावताराचें मूळ । तो हा वसुदेव केवळ । म्हणोनि तो स्मरणशीळ । चिंती घननीळ सर्वदा ॥९७॥तेणें बुद्धीचा प्रकाश । हृदयीं नांदें हृषीकेश । काय विचार स्फुरला त्यास । तो विशेष अवधारीं ॥९८॥अथवा कोणी एक प्राणी । मृत्यु चुकवितां पावें मरणीं । तरी ते ईश्वराची अलोट करणी । दोष कोणी न ठेविती ॥९९॥बुद्धिबळें टाळितां काळ । जरी तो भक्षील तत्काळ । तरी ते त्याची काळवेळ । अपराध केवळ त्या नाहीं ॥८००॥देवकी अनाथ केवळ । कंस इचा प्रत्यक्ष काळ । मज होतांचि उपेक्षाशीळ । हा तत्काळ वधील ॥१॥मी एकला निःशस्त्र रथीं । हा तंव रथाचा सारथि । स्नेहसंभ्रमें मिरवितां पथीं । ये अनर्थी प्रवर्त्तला ॥२॥यासि करितां क्रोधवळ । इचें छेदील कंठनाळ । मज हंसतील लोक सकळ । बुद्धिविकळ म्हणोनि ॥३॥निवारावया लोकापवाद । एक विचार सुचला विशद । तो करूनि पाहों प्राणप्रद । श्रीगोविंद निर्वाणीं ॥४॥प्रदाय मृत्यये पुत्रान्मोचये कृपणामिमाम् । सुता मे यदि जोयेरन्मृत्युर्वा न म्रियेत चेत् ॥५०॥देवकीचा अष्टम कुमार । करीर कंसाचा संहार । हा ऐकोनि गगनोच्चार । धाक थोर कंसासि ॥८०५॥तरी इचे पोटीं होती सुत । कंसा ओपीन ते समस्त । आजिचा इचा चुकवीन घात । हा वृत्तांत विचारी ॥६॥गर्भ देणें काळाहातीं । हेही लोकीं अपख्याती । परंतु एथ एक युक्ति । शौरी चित्तीं विचारी ॥७॥शुभ ते शीघ्र आचरावें । अशुभीं कालहरण करावें । कृपा केलिया वासुदेवें । विपरीताचें सुपरीत ॥८॥पुत्र देवकीस होती । तंव कंसचि पावला मृति । तरी विघ्नाची झाली शांति । दोषनिवृत्ति अनायासें ॥९॥देवकीउदरीं माझे सुत । कंस करी त्यांचा घात । तेव्हां होणार बळिवंत । आजिचा मृत्यु चूकला ॥८१०॥पुत्र होईल देवकीपोटीं । तंववरी वांचेल कंस कपटी । तरी हे आकाशवाणीची गोठी । कदा खोटी हों नेणे ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP