मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ३६ ते ४० अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर इत्युक्तः स खलः पापो भोजानां कुलपांसनः । भगिनीं हन्तुमारब्धः खङ्गपाणिः कचेऽग्रहीत् ॥३६॥स्नेह सांडूनि वाट चाले । देहलोभें टाकी पाउलें । यश कीर्ति पुण्य लाहे । अमृततुल्य पामरा ॥३३॥गगनवाणीच अर्थ चित्तीं । धरूनि खवळे खल दुर्मति । भोजकुळासि अपख्यातिं । पापमूर्ति दुरात्मा ॥३४॥ईश्वरें केलें तें होणार । त्यासि चुकवावया अविचार । दुर्मति अविवेकप्रकार । केला विचार तो ऐका ॥६३५॥अभ्र धूम्राचा विकार । तेणें मेघें भंगेल घर । म्हणोनि मारी थोर ढोर । धूम्र संहार करावया ॥३६॥तैशी मारीन हे धाकुटी । मग कैंचे गर्भ उपजती पोटीं । आठवा तयाचे शेवटीं । होऊनि निवटी मज कोण ॥३७॥ऐसें चिंतूनि उताविळा । करें ओढोनि करवाळा । बळें छेदूं पाहे गळा । केशकवळा झोंबत ॥३८॥प्रवर्त्तला भगिनीघाता । देहरक्षण मानूनि हिता । निंद्यकर्माची न मनीं चिंता । निर्लज्जता निष्ठुर ॥३९॥तं जुगुप्सितकर्माणं नृशंसं निरपत्रपम् । वसुदेवो महाभाग उवाच परिसान्त्वयन् ॥३७॥सूर्योदयापुढें प्रभात । कीं मेघापुढें हरिश्चंद्रवात । तैसा कृष्णावतारहेत । भाग्यवंत वसुदेव ॥६४०॥होतां श्रीमंत बिढार । आधीं शृंगारिती मंदिर । पुढें येऊनि किंकर । यथाधिकार वोळगती ॥४१॥तैसे सकळ उत्तम गुण । भरले वसुदेवीं येऊन । उदरा येईल श्रीभगवान । हें कारण तयाचें ॥४२॥शांति क्षमा दया पूर्ण । चातुर्य अमृतोक्तिभाषण । वीर्यशौर्याचें कालज्ञान । धैर्यधारण गांभीर्य ॥४३॥ऐशी अनंतगुणसंपत्ति । सुरवर सुकृतें जे इच्छिती । वसुदेवातें सहजस्थिती । झाली प्राप्त कृतपुण्यें ॥४४॥जैसा दरिद्री बांधितां घर । लाहे पूर्वजांचें भांडार । काम पूर्वपुण्यें देवतावर । लाहे इतर साधितां ॥६४५॥तैसे वसुदेवाचे गुण । महाभागपदें गहन । शुक बोलिला तें व्याख्यान । श्रोते सज्ञान जाणती ॥४६॥वसुदेवाचे जन्मकाळीं । आनक दुंदुभी अंतराळीं । देवीं वाजवूनि सकळीं । संज्ञा केली तं नाम ॥४७॥तो महाभाग वसुदेव । जाणोनि कर्माचा अभिप्राव । सांतवावयाचें लाघव । शब्दगौरव बोलत ॥४८॥वसुदेव उवाच - श्लाघनीयगुणः शूरैर्भवाग्भोजयशस्करः । स कथं भगिनीं हन्यात् स्त्रियमुद्वाहपर्वणि ॥३८॥साम बोधी पंच लक्षणें । संबंध लाभ उपकरणें । अभेद आणि गुणकीर्त्तनें । दोन्ही लक्षणें भेदाचीं ॥४९॥इहलोकींचें मरणभय । पुढें यमयातना होय । भेद द्विविध अभिप्राय । विदित होय ज्या रीतीं ॥६५०॥वसुदेव म्हणे कंसराया । गुणीं श्लाघ्य तूं लोकत्रया । त्या तुज ऐशी निंद्य क्रिया । स्पर्शावया पातली ॥५१॥सकळ भूमंडळींचे शूर । तुझिया गुणाचे अलंकार । ल्यावयालागीं निरंतर । निजव्यापार नियमिती ॥५२॥तूं भोजकुलींचा कुलदीप । विख्यात यश कीर्ति प्रतप । तुज निष्पापासि पाप । हा संकल्प अयोग्य ॥५३॥सामान्य जंतूंचें एकशत । वधितां एक कुक्कुटघात । शतकुक्कुटें एक बस्त । बस्तशतसम एक धेनु ॥५४॥शतधेनुवधाचें पाप । तें एक नरहत्येचें रूप । शत नरहत्यांचें अल्प । अघ अमूप ब्रह्महत्या ॥६५५॥ब्रह्महत्या शतभरी । वीरहत्येची पावे सरी । त्याहूनि स्त्रीवधाची थोरी । बहुतापरी आगळी ॥५६॥त्यांहीमाजी साक्षात् भगिनी । पितरांहूनि अयोग्य हननीं । तथापि विवाहपर्वणि । वधितां गणी अघ कोण ॥५७॥लक्ष्मी आणि नारायण । विवाहीं वधूवरें समान । त्रैलोक्यवधाचें पाप जाण । लाभ कोण केलिया ॥५८॥जेणें भगिनीस्नेह राहे । निष्पाप यशोलाभही आहे । कृतोपकार या विवाहें । मीही लाहें अभिवृद्धि ॥५९॥एक देह वांचवणें । त्रैलोक्यवधाचें पाप घेणें । जळो जिणें अश्लाघ्यवाणें । काय कारण वांचोनि ॥६६०॥तो तूं कैसा भगिनीवध । करूं पहासि धर्मकोविद । उभयलोकीं बुधाबुध । अश्लाघ्यवाद बोलती ॥६१॥म्हणसी वांचावया प्राण । करावें पुत्रदाराअर्पण । तरी यदर्थीं निरूपण । सावधान परियेसीं ॥६२॥मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते । अद्य वाऽब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥३९॥जितुके जन्मवंत प्राणी । मृत्यूपासूनि सुटले कोणी । नाहीं ऐकिले आपुले कर्णीं । शास्त्रीं पुराणीं अश्रुत ॥६३॥देह जन्मल्याही आधीं । मृत्यु लागला त्रिशुद्धि । देहा विसंबेना कधीं । पाहे अवधि कर्माची ॥६४॥धातयाही जातां शरण । देहवंतां न चुके मरण । यत्नें केलिया संरक्षण । सार्थक कोणतें तें सांगें ॥६६५॥राया श्रियाळाचा सुत । बाळपणींच पावला मृत्य । मृत्यु पावोनि झाला अमृत । कीर्तिवंत उजळिला ॥६६॥अकीर्तीनें शताब्दवरी । वांचोनि निरर्थक स्म्सारीं । कालसर्पाचियापरी । देहविवरीं कोंडोनि ॥६७॥तथापि वांचवितां देहो । जोडे पुण्याचा संग्रहो । पुण्यसुखाचा लवलाहो । उभय लोकीं भोगणें ॥६८॥पापें यातना फार घडती । नरकीं अनेक विपत्ति । जेणें जोडे हे दुर्गति । तें कां चित्तीं धरावें ॥६९॥देहे पंचत्वमापन्ने देही कर्मानुगोऽवशः । देहान्तरमनुप्राप्य प्राक्तनं त्यजते वपुः ॥४०॥देह पडतां वर्तमान । जरी देह न होता नूतन । तरी हें असो आचरण । देहरक्षणप्रलोभें ॥६७०॥तैसें येथ दुर्लभ काय । होतां प्रारब्धकर्मक्षय । देह पडण्याआधीं होय । नूतन देह संप्राप्त ॥७१॥आयुष्याचिये शेवटीं । देही लागे कर्मापाठीं । घेऊनि कृतकर्म कोपटी । पूर्वपर्णकुटी विसर्जी ॥७२॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP