मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| त्रिस्त्रींशतितम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - त्रिस्त्रींशतितम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ शतचंडी हवन Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- जयजयाजी सद्गुरु - शिक्षका । किती वर्णावें तव कौतुका । करिसी नाना नाटका । भक्तोध्दार करावया ॥१॥जीव हा केवळ अज्ञानी । पशूसम वर्ते जनीं । परीं तूं वळविसी सगुणीं । अतुल शक्तीनें ॥२॥साम - दाम दंड । नातरी करिसी भेद । आणिसी ओढुनी गोविंदा । आपणाकडे ॥३॥सर्व भक्तांनी स्वरूपासी । जावें ही हौस मानासीं । म्हणोनी सकलां शिक्षण देसी । यथोचित ॥४॥कोणा हठयोग लययोग । कुणा राजेश्वर राजयोग । कुणा देसी पूर्ण वैराग्य । कुणा ध्यानीं रमवीसी ॥५॥कुणा भक्तियोगाचा महिमा । सांगसी आत्मारामा । कुणा ज्ञानामृत उत्तमा । पाजिसी गा ॥६॥कोणी नटती राजकारणीं । वेंचिलें आयुष्य तयांनीं । स्वयें कर्मयोगी होउनी । निष्काम कर्मे सांगसी ॥७॥विरोधी भक्तीचेही पुतळे । नाथा ! त्वां निर्माण केले । अपशब्दांचे ऐकतां चाळे । वाटे आनंद ॥८॥कोणी म्हणती म्हातारा । कोणी म्हणती निर्दय पुरा । कोणी कपटी चोरा - । ऐसीं विशेषणें देती ॥९॥कोणी सांगती केलें वाटोळें । आम्हां सर्वस्वी नागविलें । ऐसें बडबडती भक्त मेळे । मानसीं तव समाधान ॥१०॥भक्तांचे पाहसी अंतर । नावडे तुज बाह्यात्कार । तूं सदा अंतरींच रमणार । योगीनाथा ॥११॥नाहीं जटा तेंवी कौपीन । कमंडलू मग घेई कोण । पायीं खडावा नाहीं जाण । फिरसी पादचारी ॥१२॥आंगरखा रूमाल शोभला । अंगवस्त्राचा हार केला । ओळखीनेंच ओळखिला । पाहिजे नाथ माझा ॥१३॥सदा भक्तांस्तव योगेश्वर । करिसी तूं कष्ट फार । जाहले क्लांत शरीर । त्यामुळें ॥१४॥घेसी प्रत्यहीं जनांचा ज्वर । देवी गोवर हे तुझे पोर । सदा खेळविसी अंगावर । लडिवाळपणें ॥१५॥ऐसी जरी दिसते क्लांत काया । परी बलवान होसी समया । भक्तकाजास्तव सखया । श्रमसी ना कदापि ॥१६॥ध्यानाचें मूल तुझी मूर्ती । पूजेचें मूल त्वत्पद असती । त्वद्वाक्य हे मंत्र श्रीपती । कृपा ही मुक्ति जाणे ॥१७॥ऐसें गुरुगीतेचें वचन । जें यथार्थ आहे जाण । करितों साष्टांग नमन । त्या गुरुराजया ॥१८॥नाथा ! त्वां कृपा दृष्टीनें । प्रकाशविली बत्तीस किरणें । मज न वाटे हें कार्य होणें । कृपासागरा ॥१९॥नसतें जरी तुझें साह्य । किरण प्रकाशित न होय । नाथसुत अंतरींच होय । निःस्तब्ध तो ॥२०॥सन्मार्गीं भक्ता आणावया । करिसी यत्न किती राया । एक आख्यान या समया । सांगेन गा ॥२१॥महाराष्ट्रीं एक भक्त । होता श्रीनाथ अनुग्रहित । त्यातें वांचवी कुमार्गी सत्य । ती कथा अवधारा ॥२२॥होता तो भक्त प्रेमळ । सद्गुरुपदीं निष्ठा अचल । गुरुभजनाविणें काळ । जाऊं नेदी ॥२३॥गुरु हेंचि तयाचें दैवत । न पाही कदापि अन्य पंथ । परी एक होतें व्यंग त्यांत । सादर ऐकावें ॥२४॥परस्त्रीच्या जाळीं सांपडे । चित्त ओढी तियेकडे । न चाले बळ इंद्रियांपुढें । त्या भक्ताचें ॥२५॥नव्हती झाला भ्रष्ट भक्त । परी केवळ मनाचा संकेत । टाकी मोहूनी स्त्री अत्यंत । या गुरुभक्तासी ॥२६॥कामवासना बलवत्तर । ही मायेची कन्या प्रियकर । असो योगी वा योगीवर । त्याही बली घेई ॥२७॥मन ओढी परस्त्रीकडे । विवेक ओढी सद्गुरुकडे । षड्रिपूंच्या पाशांत सांपडे । भक्तराय ॥२८॥ऐसा जो तो ओढी आपल्यापरी । जाहला भ्रांत शिष्य अंतरीं । प्रेमें सद्गुरुचा धांव करी । सोडवावें ॥२९॥आतां देवा काय करूं । नायके हा मन - चोरू । परस्त्री - विषाचा अंगिकारू । कराया धावे ॥३०॥वाटे एकदां तिकडे जावें । परी तव मूर्ती दिसतां भावें । पुनरपि मागुती यावें । लागतें नाथा ॥३१॥चालला इंद्रियांचा झगडा । षड्रिपू बसवूं पाहती पगडा । तव भजनाचा घालुनी वेढा । परतवितों त्यातें ॥३२॥चिंतन करी ऐसें नित्य । जाई सद्गुरु दर्शनार्थ । नाथें ओळखिलें चंचल चित्त । करी एक लीला ॥३३॥आणिलें गंगेचें तीर्थ । म्हणे घेई ऐसी शपथ । परस्त्री मातेसमान नित्य । मानीन मी ॥३४॥धेनूहि एक पाचारी । तिचें पुच्छ धरोनी करीं । उपरोक्त शपथ क्रिया करीं । सांगे नाथ ॥३५॥भक्त मनीं चपापला । विनवी न घेई शपथेला । माझा विकार बळावला । सद्गुरुनाथा ! ॥३६॥तो दाबाया मी असमर्थ । नको नको ही क्रिया खचित । परी नायके सद्गुरुनाथ । म्हणे हें तुज सुदर्शन ॥३७॥हें सुदर्शन ठेवितां अचल । काय करील काम खळ । तुज माझी आज्ञा केवळ । क्रियेसाठीं ॥३८॥घेतली सद्गुरुची शपथ । पायांवर ठेविला हात । रक्षाया माझें व्रत । सहाय्य तुवां व्हावें ॥३९॥मी तुज साहाय्य करीन । दंडा मारूनी आणीन । न सोडीं माझें ध्यान । भक्तराया ॥४०॥कांहीं काल शिष्याची वृत्ती । राहिली वासनामुक्त ती । परी मायेची दुष्कृती मोठी । घाली पाश पुन्हा ॥४१॥सहस्त्रावधी केले प्रयत्न । मुळीं नावरे तयाचें मन । जाई सद्गुरुकडे धांवून । तळमळीनें ॥४२॥दुरोनी बघुनी भक्तासी । नाथ करी बहु रूदनासी । स्फुंदस्फुंदोनी अश्रूंसी । गाळता होय ॥४३॥न बोले कांहीं वचन । दुःख करी प्रभु दारूण । याचें तत्व भक्तालागून । कळलें नाहीं ॥४४॥मनीं म्हणे मी बहुतां दिवशीं । भेटलों श्रीसद्गुरुसी । यास्तव गाळी अश्रूंसी । वाटतें मज ॥४५॥भक्तास नाकळे संतांची खूण । बाह्य दृष्टीचा तो दीन । करोनी घेई समाधान । व्यवहारानें ॥४६॥विनविलें त्या दयाघनासी । नाथा ! कां स्वस्थ बससी । मज दिधलें ज्या वचनासी । तें पूर्ण करी गा ॥४७॥या षड्रिपूंनीं केला । पुन्हा कहर दयाळा । क्रियेचा म्यां शिरीं घेतला । भार मोठा ॥४८॥आतां भ्रष्ट होतां हें मन । मी सर्वस्वी बुडेन । तुजवांचूनीं नाहीं अन्य । कैवारी गा ॥४९॥बहुत केलें म्यां नाथा यत्न । या रिपूचा घ्यावया प्राण । परी करिती हीन दीन । मजलागीं ॥५०॥करी इतुकी विनंति । नाथ राहे मूक स्थिती । अश्रू घळघळ नयनीं गळती । प्रेम मूर्तीच्या ॥५१॥निरूत्साही होऊन भक्त । आला आपुल्या ग्रामाप्रत । तों पाठवी नाथ पत्र । शिष्यराया ॥५२॥ऐक शिष्या सुकुमारा । येतां मजकडे तुझा वारा । दुःख जाहलें बा अपारा । भडभडून येई ॥५३॥आमुचे बंधुवर्गें पूर्वीं । ऐसी केली नवाई । तीही दृष्टीपुढें येई । त्या कालीं ॥५४॥समर्थ रामदास तुकोबा थोर । भेटती एकमेकां समोर । “ त्वंपुरा ” करोनी फार । रडताती ॥५५॥हीच त्यांची झाली भेट । जाती आपुल्या स्थलाप्रत । भक्तजन होती विस्मित । पुसती सद्गुरुसी ॥५६॥सांगतीप्रेमें समर्थ । तुकोबा रडती किमर्थ । बोधीतसे जन अमित । परी कोणी न ऐकती ॥५७॥जो तो राहे विषयीं मस्त । कैसें करावें कार्य येथ । न होई नेटकें अवतारकृत्य । म्हणोनी रडती तुकोबा ॥५८॥म्यां करोनिया ‘ त्वंपुरा ’ । दिधलें त्यासी प्रत्युत्तरा । तैसीच गती कवीश्वरा । माझ्या सीमेंत आहे ॥५९॥भेटीचें कार्य जाहलें । एकमेकां परतविलें । तेंच चित्र उभें राहिलें । माझ्यासमोर ॥६०॥आतां तरी सावध होईं । दुर्बल चित्ता सोडुनी देई । सुदर्शन चक्राची ठेवी । आठवण ॥६१॥तों उघडले भक्ताचे डोळे । नाथ कांहीं सामान्य नोहे । कांहीसीं वृत्ती मोकळे । या पत्रानें ॥६२॥जैसा फुफाट्यांतील अग्नि । बाहेर येतां पेट घेऊनी । जाळी वाडे मंदिर झणी । तैसा हा विषय ॥६३॥राहतां थोडाही अंश । जाळील देह मंदिरास । विंचवासी थोडें विष । परी भिनतें सर्व शरीरीं ॥६४॥या विषयांचा विषय दुश्चरित स्त्रिया । यांची नको कदा छाया । दृष्टीही फिरविता वायां । पुरूष होतो मलीन ॥६५॥पुरूष चित्त हें दुग्धासमान । कुलटा स्त्री - दृष्टी लवणाचे कण । मिसळतां जाई नासोन । विमल दुग्ध ॥६६॥संशयाचे असती भोंवरे । अविनयाचीं बांधतीं घरें । या रसांची नगरें । परस्त्रिया भूषविती ॥६७॥कपाटाचें प्रबलो क्षेत्र । अविश्वासाची मूर्त । स्वर्गाआड येई खचित । ऐसी ही जाती ॥६८॥नरकाचें आहे मुख । मायेचें रूप प्रत्यक्ष । अंतरीं आहे केवळ विख । भासे परी अमृत ॥६९॥मुनि म्हणती माया ही अरूपी । मज न वाटे ही यथार्थ उक्ती । स्त्री हीच मायेची मूर्ती । प्रत्यक्ष असे ॥७०॥ऐशा परस्त्री पाशांत । पुनरपी अडकूं पाहे भक्त । अधोगतीचा काळ बिकट । जवळी पातला ॥७१॥षड्रिपूंनीं त्या जिंकिलें । विजयाचें निशाण लाविलें । प्रवेश करूं म्हणती बळें । देह राज्यीं तयाच्या ॥७२॥ऐशा शत्रूच्या लढ्यांत । झाला पूर्ण पराजित । पाहतां उठता नाथ । दंडा घेउनी ॥७३॥म्हणे आतां न पहावा अंत । नातरी भक्ताचा होईल अंत । धांवत आला श्री अनंत । सत्वरी तेथें ॥७४॥मारिला भक्तासी एक दंडा । कां जाहलासी निर्बल षंढा । ऊठ करीं रिपूंचा चुराडा । नाम - बाणें ॥७५॥कार्य न होई वाचेनें । मोहाचें मद्य सोडणें । मांडीवरी दंड ठोकणें । रिपुसवें लढाया ॥७६॥बैस रे निश्चय रथीं । मग होईन तुझा सारथी । पाहतां तुज हिंपुटी । जाईन येथुनी ॥७७॥आतां तुझे देहनगर । षड्रिपु करितील बेजार । ऊठ ऊठ संशय फार । घेऊं नको ॥७८॥ऐसा तो प्रेमळ भक्त । प्रत्यक्ष जाऊनी आवरी नाथ । विषय वासनेचा निःपात । केला नाथरायें ॥७९॥ओढिलें भक्ता निजपदीं । दाविली आपुली नित्य गोडी । ती चाखितां विषय धुंदी । उतरली भक्ताची ॥८०॥ऐसा कनवाळू श्रीनाथ । कुपापात्री करी पात्र । परी पाहे भाव मात्र । साधकें चित्तीं ठेवावें हें ॥८१॥न ठेवी भाव गुरुवरी । विचारातें करी अविचारी । होई नाना दुराचारी । जाई मग अधोगती ॥८२॥न करी यत्न कांहीं एक । मनांतुनी आवडे विषय पंक । विनवी सद्गुरुसी रंक । मज तारावें ॥८३॥कल्पनेचा जेथें पसारा । भावनेचा नाहीं थारा । नेदी आश्रय नाथ जरा । या कर्तव्य शून्यासी ॥८४॥तरी माझें बंधुभगिनी । मस्तक ठेवी तुमच्या चरणीं । भावें लागा सद्गुरु भजनीं । मग तुटतील बंधनें ॥८५॥सद्गुरुचे गुणदोष । पाहील तो नामशेष । जाईल रौरव नरकास । श्रुतिवचन हें ॥८६॥आधींच विचार करावा । मग सद्गुरुचा अंगिकार हवा । वारंवार पाढा वाचावा । कैसा आपुल्या पुढें ॥८७॥दुज्यानें अनुग्रह घेतला । म्हणोनी आपणही कान फुंकिला । तो नव्हें गा शिष्य भला । परमार्थासी अधिकारी ॥८८॥नातरी शेवटीं पश्चात्ताप । जो करी नरा स्वमनीं मृत । यास्तव सांगणें सांप्रत । विवेकें क्रिया आचरावीं ॥८९॥‘ जाणोनी सर्व कीजे ’ । ऐसें समर्थांचें वचन जें । त्यास पाळिलें पाहिजे । कृतीयुक्त ॥९०॥नाथ येती रांजणगांवीं । तेथें ब्रह्मसमंधें पुंडाई । करोनी अनेकां त्रस्तवी । जाहले - दुःखी जन ॥९१॥‘ दगडू नागेश ’ नामें सावकार । होता कृपण स्वयें फार । जयांते स्वप्नींही धर्म साचार । ठाऊका नसे ॥९२॥जोडीले बहुत अन्याया । कित्येकां छळिलें वायां । कित्येकांचा गळा चिरूनियां । मारिलें धनास्तव ॥९३॥कन्येविन पुत्रसंतती । न होई त्या द्विजाप्रती । पंचत्व पावला अंतीं । जाहला समंध ॥९४॥होते तयाचें गृह मोठें । परी कोणा न येऊं दे तेथें । करी विचित्र लीलेतें । पिशाच्च हें ॥९५॥कन्येतेंही धन घेऊं देईना । मग इतरांची करावी कल्पना । जयाच्या गृहीं द्रव्यांश जाणा । त्यातें पीडा करी ॥९६॥न फिरकों देई गृहाभंवती । म्हणे माझी ही सारी संपत्ती । कोणी गुरेंढोरें जरी बांधिती । तीं होती मृत्युवश ॥९७॥श्रीनाथ शिष्य गणेश दामोदर । तयांचें पीडिलें शरीर । असे संबंधीं साचार । पिशाच्चाचा ॥९८॥लाविलीं गृहातें कुलुपें दोन । कोणी न उघडूं शकती जाण । शेजारीपाजारी दीन । जाहले या योगें ॥९९॥आला प्रभुपदीं शरण । तारावा पुत्र दीन । नाथ म्हणे शतचंडी हवन । करीं पुत्रराया ॥१००॥अवश्य म्हणोनी तो कुमर । करी प्रेमें स्वाहाकार । येई सर्व नाथ परिवार । समारंभासी ॥१॥वासुदेवा देवें आज्ञापिलें । त्वां आधीं जावें बळें । कुलुपें उघडावीं स्वये । करावा प्रवेश ध्यानबळें ॥२॥गृहाचा भाग कांहीं । त्वां खोदवावा लवलाही । हवनीय कुंड तेथें पाहीं । करूं स्थापन ॥३॥श्री आज्ञा घेउनी वासुदेव । जाई त्वरित रांजणगांवीं । पोक्त सल्ला कोणी देई । न उघडावें द्वार ॥४॥अहो हा समंध भयंकर । करील तुमचा संहार । परी वासुदेव नव्हता येर । गबाळापरी ॥५॥द्वार आनंदें उघडिलें । तो अंतरीं कांहीं वाजलें । इतर बहुत भ्याले । स्थीर राहे वासुदेव ॥६॥होता एक लांकडी दोला । त्यावरी बालरूपें बसला । पाहीं वासुदेव भला । नाथरूपें तया ॥७॥इतरां न दिसली ती मूर्ती । केवळ पाळण्याची चलित गति । पाहुनी वाटे भीती । अंतरींच ॥८॥आधीं भक्तश्रेष्ठ शिरे आंत । मग येती कांहीं जन त्वरित । सिंचिलें नथ पदाचें तीर्थ । सर्वांठायी ॥९॥काढावया गृहाचा भाग । शोधिला सारा मजूर वर्ग । परी भीतीनें कांपे आंग । थरथर तयांचे ॥११०॥ग्रामींचे जन न येती । मग वासुदेवें केली युक्ती । बोलाविले मध्यरात्रीं । परस्थ जन ॥११॥केलें सारें इच्छित कार्य । आला विद्वान द्विज समूह । मुहुर्तेच योगीराय सर्व । कृत्यें करी हें ठावें ॥१२॥सहस्त्राहुनि अधिक । येती दर्शना भाविक । म्हणती न जाय पिशाच्चनयक । येथुनियां ॥१३॥आले मोठे मोठे पंचाक्षरी । जपलें मंत्र अघोरी । निंबू उडीदही कोणी मारी । परी न जाय समंध ॥१४॥नाथ न दिसे पंचाक्षरी । आहे वाटे वारकरी । समंधाची चुकविना फेरी कदा काळीं ॥१५॥कोणी म्हणती श्रीनाथदेव । मूर्तीमंत पवित्र होय । यापुढें पिशाच्च टिकाव । कैसा धरील ॥१६॥प्रभूच्या केवळ दृष्टीनें । पिशाच्चांनीं पळ काढणें । मग कृती करितां राहणें । तया शक्य नसे ॥१७॥ऐसे नाना तर्क करिती । जन त्रिविध याची येई प्रचीती । कोणी निंदिती कोणी वंदिती । कोणी हांसती मनीं ॥१८॥द्विज करिती पाठ सप्तशती । पिशाच्चाची खवळली वृत्ती । जाहली संचाराची प्रगटी । बोलूं लागला ॥१९॥मी आहे सर्वाधिकारी । माझी कोण बरोबरी करी । यावें आमुच्या दरबारीं । समंध म्हणे ॥१२०॥मी या कलेवरातें । न ठेवी येथें । केलीं जरी साधनें अनेक । तीं सर्व निष्फळ करीन ॥२१॥नाथांचे नाव घेता । कंप सुटे तया भूता । कधीं विचित्र वाचाळता । कधीं विद्वानापरी ॥२२॥धरोनी आणितां नाथा सन्मुख । पिशाच्च करी दीन मुख । नाथ म्हणे राहिला एक । दिवस आतां ॥२३॥होता हवनाची पूर्णाहुती । होईल पंगू निश्चितीं । यातें देईना मुक्ती । कांहीं काल ॥२४॥जैसी नंदिग्रामीं पूर्णाहुती । तैसीच येथें जाहली रहाटी । पिशाच्चलीलेची अधिक भरती ॥२५॥पडतां नारिकेल शेवटचा । जाहलें बहु दुःख पिशाच्चा । रडोनी विनवी या योनीचा । नको आतां वारा ॥२६॥माझे हस्त पाद तुटोनी गेले । आतां कांही उपाय न चाले । नाथ सांगे त्वां कष्ट दिधले । अनेकांसी ॥२७॥तयाचें फल बहुत काल । तुज भोगावें लागेल । मग मुक्तीचा मार्ग दिसेल । कांहींसा ॥२८॥गणेशाचा शरीराभोग । निर्दोष जाहला मग । करी चोज जनांचा संग । अघटित म्हणोनि ॥२९॥आला शिष्यगण थोर थोर । त्यांत विनायकाचा कुमर । बालकनाथ म्हणती योगीवर । बालमुनीसा ॥१३०॥बालपणींच श्रीनाथ । तया योगदीक्षा देत । खेचरी प्राणायाम अद्भूत । मूद्रेनें शिकवी ॥३१॥शैशवींच हा योगासक्त । न होई विवाह - पाशयुक्त । आजन्म ब्रह्मचर्याचा संकेत । ठरवी बालवीर ॥३२॥ज्याची बालपणींच ही वृत्ती । तो कां न व्हावा योगपती । सवाई विनायक या पदवीप्रती । कां न जाईल ॥३३॥शांत वृत्ती शांत कर्य । दंभाचें नाहीं नांव । कधीं न येऊं दे अंतराय । नित्य नियमासी ॥३४॥श्रीनाथ ही केवळ वसुंधरा । सांठवी अनेक रत्नांचा पसारा । तैसी सुवर्णाची निकरा । नाथमूर्ती ॥३५॥कैसाही येवो भक्त । त्यातें देई स्थल उचित । भक्तीचा भुकेला । नित्य । योगीराणा ॥३६॥श्रीनाथ - दीपाचे किरण । आतां राहिले सारे दोन । माझा स्वामी धन्य धन्य । मम करी इच्छापूर्ती ॥३७॥श्रीनाथ - दीपाची काजळी । प्रभूनें मम नेत्रीं घातली । अंधदृष्टी उघडली । कृपायोगें ॥३८॥किती स्मरावे उपवार । किती करावे नमस्कार । पूर्णातें अपूर्ण उपचार । कैसे शोभती ॥३९॥परीं थेंबुटा जैसा सागरांत । मिळतां सांठवी तो त्यांत । तैसा सांठवील श्रीनाथ । हा निश्चय ॥१४०॥पुढील किरणीं माधवनाथ । नित्य नियमाचा देई पाठ । तो आचरितां गुरुदैवत । प्रसन्न होईल ॥४१॥नाथसुत विनवी श्रोतयां । नियमानें बांधा काया । अनियमी तो गेला वायां । श्रीनाथवचन हें ॥४२॥मानवाहुनी चतुष्पाद । किती असती नियमबद्ध । उत्तम जन्म घेऊनी निंद्य । करणी न करावी ॥१४३॥इति श्रीमाधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते भक्तोद्धारणंनाम त्रिस्त्रिंशतितमः किरणः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP