मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ वासुदेवशिष्यपावन; कोटीहवन Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- सद्गुरुनाथा श्रीमाधवा । तुझा महिमा किती गावा । करिसी मुक्त नाना जीवा । नानापरी ॥१॥तूं मनोहर कल्पतरू । श्रांत जीवांचा आधारू । जो येईल छायेखाली नरू । ताप हरिसी तयाचा ॥२॥अमृत फलेंही देऊन । हरिसी क्षुधा तहान । त्यासी न दाखविसी ऊन । पुनरपि गा ॥३॥तूं स्वयें गंगा निर्मल । तुला दुर्गंधाचाही मिळे नाला । परि हृदय संपुटीं तयाला । सांठविसी ॥४॥तूं भक्तसंकटाचा मेरू । करांगुलीवरी उचलिसी सद्गुरु । जारज अंडजाही कृपारस मधुर । पाजिसी नित्य ॥५॥तूं सूत्र भक्त मोतीं । प्रेमें गुंफिसी हार सुमति । घालिसी आपुल्या कंठी । अहर्निश ॥६॥तुझें कराया स्तवन । नाना शब्द आणूं कोठून । शब्द हेंचि तुझें स्तवन । योगेंद्रा रे ॥७॥शब्दसृष्टीचें भांडार फोडुनी । आणिले जरी हे जननी । तरि तेच शब्द फिरूनी । येतील आई ॥८॥म्हणोनी मुख मिटवुनी । दृष्टी वरती नेउनी । कंठकूपीं हनुवटी ठेवुनी । करीन तव स्तुति ॥९॥न घेई शब्दांची माळ । एकच वाहीन मन कमल । अंगीकारीं तमालनीळ । एवढी शोभा ॥१०॥गत किरणीं विनायका । नाथें दिधली स्वानुभव नौका । चित्तसागरीं फिरूनी नेटका । करी विहार ॥११॥मग जाई पुण्यपुरीस । पाही चंपाबाई कन्येस । देखतां तियेचा वृत्तिभास । आनंद न समाये ॥१२॥चंपाबाईचें कन्याभूषण । तिचें नांव ठेवी रतन । श्रीनाथासी केलें कन्येनें । प्रेमें वश भारी ॥१३॥नाथाविण न घेई अन्न । न घाली वस्त्र भूषण । न जाई कोठें सोडून । नाथराया ॥१४॥नाथ हीच तिची खरी माता । विसरली आपुली मायमाता । पूर्व जन्मींचा उदय तत्वतां । झाला वाटे ॥१५॥नाथ देई शिक्षण कुमारिला । नाना स्तोत्रें भूपाळ्या । भगवद्गीतेचाही पाठ सगळा । प्रभूनें दिधला हो ॥१६॥अष्ट वर्षांची ही बाला । करीं घेउनी श्रीगीतेला । शुद्ध वाणीनें वाचितां । सगळ्या जनां नवल वाटे ॥१७॥जेथे सर्व शुद्धांचें सार । शिकवी नाथ योगेश्वर । तेथें अशुद्ध कैसें रहाणार । कन्येच्या वाणींत ॥१८॥घेऊनी आपुल्या सवें । दाविली सर्व तीर्थें देवें । पुरवी कोड भावें । कुमारीचे ॥१९॥रत्नातें केलें रत्न । निज माळेंत गुंफून । सदा ठेवीं जैसें वत्सलांछन । हृदयीं गा ॥२०॥नाशीक प्रांतीं नांदगांव । तेथें येई नाथदेव । असे भक्त वासुदेव । थत्ते उपनामक ॥२१॥वासुदेवाचें वर्णन । आतां यथार्थ करीन । तो केवळ नांवाचा देव जाण । परि कृति दानवापरी ॥२२॥आधीं आंग्लविद्येचा संस्कार । त्यावरी आंग्ल ज्ञाता भिषग्वर । तेथें आचाराचा विचार । कैसा राहे ॥२३॥न पाही जातिधर्म । विषम जयातें वाटे सम । विषय सागरीं विराम । सदा पावे ॥२४॥खानपानाचा सोडिला विचार । नीति अनीतीच्या पैलावर । सत्यासत्याचा विसर । पडला तयासी ॥२५॥त्या न कळे पापपुण्य । सदा आपुल्या नादीं रममाण । करी पूर्ण योग्याचें ( ? ) लक्षण । ज्ञानावांचूनी ॥२६॥वासुदेवातें चैनीस्तव । होती पैशाची भारी हाव । श्रीनाथ देई भूमिगत द्रव्य । ऐसा लौकिक ऐकिला ॥२७॥आला धांवत श्री - दर्शनी । म्हणे आमुचें द्यावें द्रव्य काढुनी । प्राप्तीचा अर्ध चरणीं । अर्पण करूं ॥२८॥नाथें केलें हास्यवदन । तुझें सांभाळी धन । तव गृहीं पश्चिमें गुप्तधन । सांठविलें असे ॥२९॥अरें हें धन दो दिसांचे । तुज पुरणार नाहीं साचें । जातां हे दिन उन्नतीचें । मग रडशील ॥३०॥तुझें धन जो परमार्थ । त्याचाच धरीं अर्थ । नको भुलूं रें व्यर्थ । मायापाशीं ॥३१॥काळाचा नियम नाहीं । केव्हां करील तव होळी । उगीच गुंतसी माया जाळीं । जिवलगा ॥३२॥या विषयपंकीं तूं रमसी । देह - धनही घालविसी । क्षणिक सुखातें भुलसी । करिसी आत्मघात ॥३३॥तुझे सर्व सखे सोयरे । हे मधुमक्षिकेसम बा रे । तव द्रव्य - मधु हरूनी सारे । चावा घेतील ॥३४॥अल्पायुषीं मानव देह । अर्ध तरी निद्रेंत जाय । अर्ध्यामाजीं उदराचा कलह । राहिलें मग शून्य ॥३५॥तरी आतां जागा होई । सत्कर्माच्या मार्गी जाईं । तुज भेटेल लवलाही । अपार धन ॥३६॥ऐसा नानापरी बोध केला । भक्त हृदयाचा काला झाला । निजकृतीचा पश्चात्ताप झाला । आला शरण पदांसी ॥३७॥निजलो होतों विषय - पंकांत । त्वां मज सावध केले अवचित । माझें शरीर केलें धूतवस्त्र । दीनानाथा ॥३८॥आतां मातें उद्धरावें । सोडिली सारीं पूर्व वैभवें । त्या मार्गी आतां न जाय । महाराजा ॥३९॥धन्य नाथाची कृती । वळविला भक्त दुष्कृति । तयाची केली विषयतृप्ती । चार वाक्यांत ॥४०॥विनायक होता आधींच शुद्ध । त्यास नाथ करी विशुद्ध । परि अशुद्ध वासुदेवा सिद्ध । करी तो धन्य ॥४१॥सुवर्णातें लागाया बावन्न कस । न लागती बहू सायास । परि सुवर्ण करी लोहास । तेंचि अतुल सामर्थ्य ॥४२॥शुभ्र वस्त्र गुलाबी कराया । न लागती कष्ट रंगारिया । परि कृष्णातें गुलाबी चढवाया । अधिक सामर्थ्य लागे ॥४३॥ओल्या वृक्षासेसे जल । देतां वृक्ष फोंफावेल । परि शुष्कासि पल्लव आणील । तोचि अगाध कृतीचा ॥४४॥दिशा उजळतां सूर्यप्रकाश । होणें हा निसर्ग - विलास । परि अंधः कारीं करील प्रकाश । तोचि स्वयंतेजी ॥४५॥नाथांचें न कळे सामर्थ्य । सर्व करिती निसर्गविरहित । अज्ञानासी ज्ञानवंत । अपंडितासी पंडित ॥४६॥शुद्ध पश्चात्तापानलें । जाळिलें पूर्व पाप सगळें । मग नाथें अनुग्रहजलें । शांत केलें ॥४७॥होतां अनुग्रह प्रभूचा । जाहला । पुनर्जन्म तयाचा । विसरला पाश भवाचा । सदा रंगें आपुल्या रंगीं ॥४८॥नाथें दिधली ज्ञानमुद्रा । त्यांतच लावी लय सदा । सोडी सारा गृह धंदा । वासुदेव ॥४९॥वडिलीं केली सावकारी । होतीं कुळें अनेक परी । तिकडे लक्ष न देई भवारी । राहे नित्य अनुष्ठानीं ॥५०॥घेणें बुडालें देणें उदेलें । परि हे शांतीचे भोगिती डोहोळे । दुष्काळानेंही बहुत गांजिलें । तरी वृत्ती न हाले ॥५१॥घरें दारें विक्रीस निघालीं । परि शमता नाहीं ढळली । मग सद्गुरु माउली कळवळली । घेतला कारभार स्वकरीं ॥५२॥नाथ करी सुतासी चाकरीं । गृहाची दुरुस्ती स्वयें करी । शेताचीही खबरदारी । घेई प्रभु हा ॥५३॥पाही गुरांचें चारापाणी । वृक्ष वेलीला घाली पाणी । धन्य मापी हा चक्रपाणी । भक्ताघरीं ॥५४॥ऐसा करोनी भक्त - संसार । मग सांगे योगीवर । आतां येई वृत्तीवर । करी प्रपंच ॥५५॥मज पाही प्रपंचांत । तोचि तुझा रे परमार्थ । मग हा वासुदेव भक्त । करी संसार ॥५६॥वैद्यकीचा धरिला छंद । देई उत्तम औषध । कदां न राही बद्ध । कोणापाशींही ॥५७॥असला रोगी भयंकर । त्यास देई पुड्या चार । परमार्थाचा येतां आहेर । जांईं टाकुनी तैसाची ॥५८॥बहुत होती रोगमुक्त । कोणी धरिती मृत्युपंथ । कोणी धन देती बुडविती । तरी खंती नाहीं ॥५९॥नाहीं दंभाचा लेश जवळ । न दावी अंतर दुज्याजवळ । रोमरंध्रीं खेळवी खेळ । श्रीगुरुचा ॥६०॥वासुदेवाची पत्नी अन्नपूर्णा । ती केवळ अन्नपूर्णा । करी सहाय्य परमार्था पूर्ण । पतिराया ॥६१॥धौति नेति क्रियासंपन्न । प्राणायामें परिपूर्ण । वाटे शांतिदेवी अवतीर्ण । जाहली येथें ॥६२॥नाथाचें शक्तिसर्वस्व । एक जाणे वासुदेव । घेई नानापरी अनुभव । योगेंद्राचे ॥६३॥अन्नपूर्णेची एक कन्या । मथुरी नामें धन्या । जियेचें रूप घेई योगीराणा । ऐका ती कहाणी ॥६४॥एकदां वासुदेवाची पत्नी । जाई कन्येसह पितृभुवनीं । नाथे आज्ञापिलें पत्रांनीं । मथुरीस गृहीं आणावें ॥६५॥परि आल्या कांहीं अडचणी । म्हणोनि न पाठविलें तयांनीं । पुनरपि लिहिलें प्रभूंनीं । आणावें सत्वर ॥६६॥भवितव्यता होती विलक्षण । मथुरी झाली अस्वस्थ जाण । विषमज्वरानें छाया घालून । पीडीलें तिजलागीं ॥६७॥मग नाथें लिहिलें कठिण पत्र । आणावें सप्तदशदिनांत । पाठविली विभूति त्वरित । द्यावया कन्येसी ॥६८॥जाहले सप्तदश दिवस । परि न पाठविले बालिकेस । कळवळा आला मातामहास । क्षीण कन्या न पाठवी ॥६९॥दुर्दैव कैसें ओढवलें । कन्येतें कोणी घेरिलें । मूर्छित रत्न तें झालें । एकाएकीं ॥७०॥आणिलें वैद्य थोर थोर । विभूतीचा झाला विसर । मथुरी गेली सत्वर । इहलोक सोडुनी ॥७१॥पांच वर्षांची बाला कोमल । स्वभावें अत्यंत प्रेमळ । विवेक शांतीचें हें फल । गोजिरें का नसावें ॥७२॥बोले मधु मधु बोल । वागे श्रेष्ठापरी विमल । सदा आनंदी मुखकमल । करी लीला अपार ॥७३॥मथुरी बाला निसर्ग - मनोहर । जिचा वर्ण अत्यंत गौर । गुलाबापरी ओष्ठ रुचिर । दंतपंक्ति शुभ्र कलिका ॥७४॥मथुरी आवडे सर्वांसी । मथुरी घालवी वृत्ति उदासी । मथुरी प्रिय बालकांते जैसी । तैसीच वृद्धांसी ॥७५॥ऐसी मथुरी कोमल वल्ली । अवचित सुकोनी गेली । सर्व जनता दुःखी झाली । मग मातापितरांचें काय ॥७६॥जियेच्या पोटीं जन्मले । जियेच्या कुशीं खेळली । जियेनें कौतुकें वाढविली । तिच्या दुःखा पार नसे ॥७७॥जियेचें प्रेमनिधान । होती नेत्र तुष्ट जिला पाहून । ती माता शोक करी दारुण । आठवूनि गुण कन्येचे ॥७८॥मथुरें तूं पांच वर्षांची बाला । परि नाहीं दुखविलें मला । न कधींही हट्ट केला । बालिके तुवां ॥७९॥मी असतां कधीं उदासी । तूं मिठी घालिसी गळ्यासी । प्रेमभरें मज पुसशी । “ आई काय झाले ॥८०॥आई तुझें म्लानमुख । मज देई भारी दुःख । ” म्हणोनि लडिवाळपणें अंकीं । बैससी वेल्हाळे ॥८१॥आतां मी झाले दुःखित । येईं ग सये धांवत । माझी घाली समजूत । बोबड्या बोलें ॥८२॥तूं माझी एकच हिरकणी । नेली कालें हिरावोनी । आम्हा समर्थें जागृत केलें झणीं । परि दुर्दैव ओढवलें ॥८३॥मथुरें तुझ्यावीण शून्य सदन । मज कांहीं गडे उमजेना । जाऊं पाहे माझा प्राण । तुजविणें लाडके ॥८४॥ऐसा फोडी हंबरडा । आवरेना दुःखाचा ओढा । वासुदेव करी शांतवन सदा । परि निष्फल होई ॥८५॥मथुरीचें चालणें बोलणें । मथुरीचें रूप गोजिरवाणें । मथुरीचें नानापरी खेळणें । हेंचि दिसें सर्वद ॥८६॥जाहली वेडी बिचारी । मायापाश बिकट संसारीं । मग पातली प्रभूची स्वारी । नंदिग्रामीं ॥८७॥देखोनि दुःखाचा कहर । नाथें केला उपदेश फार । परि प्रियकन्येचा विसर । न पडे मातेसी ॥८८॥नाथ मनीं विचारी । आतां होणें लागे मथुरी । त्याविणें ही माया दुरी । होणार नाही ॥८९॥मग पांच दिवस नाथ । करी बाललीला निजरूपांत । मी तुझी मथुरी खचित । मज जेऊं घालीं ॥९०॥माझा नवा दे परकर । कंचुकी कशिदा जिच्यावर । मी मुलींसवें खेळणार । भातुकली गे ॥९१॥तूंही येई आमुच्या घरीं । तुज भोजन देऊं खीरपुरी । आई मज अंकावरी । खेळवीं आतां ॥९२॥ऐसे नाथ मथुरीसम बोल बोले । तों मातेतें बहुत दुःख आठवलें । प्रभु म्हणे हें विपरीत झाले । आतां काय करावें ॥९३॥गुरुवारीं प्रभातकाळीं । पति पत्नीची जोडी पाचारिली । कां पडतां दुःखानलीं । काया भाजेल ॥९४॥तुम्ही परमार्थी भक्त थोर । करितां मायेस्तव दुःख फार । हा अधोगतीचा मार्ग दुष्कर । कां ओढोनि घेतां ॥९५॥पहा पहा हो तुमची मथुरी । ऐसें म्हणोनि दृष्टी वर करी । पाहती मातापिता वरी । तों मथुरी खेळे खालींच ॥९६॥नाथ न दिसे तेथ । मथुरीच खेळ खेळत । आई मी आलें धावत । सांडी आतां दुःख तूं ॥९७॥मज खाऊचा पुडा देई । कां पाहसी टकमक आई । मी तुझी मथुरी नाहीं । सांग काय ॥९८॥ऐसे नाना खेळ केले । मग केवळ नाथ दिसले । म्हणती तुज काय हवें बाळें । मथुरी अथवा निजरूप ॥९९॥मातापितरांची भ्रांति निमाली । नको देवा मथुरी बाळी । असतां तूं चिरसुखाची पुतळी । मथुरी मायारूप ॥१००॥मथुरी हें परांचे धन । तूं आमुचें सदांचें धन । नको मथुरीचें मोहन । घालूं मोहनारे ॥१०१॥तूंच माझी मथुरीबाळा । हें तत्व बिंबलें हृदयाला । पुन्हा न घेई दयाळा । ऐसें रूप ॥२॥महाभक्त वासुदेव । ज्यांच्या गृहीं खेळे माधव । त्यांचे वर्णन काय । गावें मतिमंदें ॥३॥वासुदेवाचें वैभव अनंत । कैसे येतील सर्व किरणांत । परि कांहीं अल्प सिद्धांत । दाखवीन ॥४॥श्रीनाथें वासुदेवाप्रति । दिली ज्ञानेश्वरीची पोथी । हीच तुझी परमार्थाची ज्योती । जाण बाळा ॥५॥ज्ञानेश्वरीची एकवीस पारायणें । करितां तुज होईल वेदांतज्ञान । हीच देणगी समर्पण । करीन भक्तोत्तमा ॥६॥ऐसा आशीर्वाद दिधला । वासुदेवें सिद्धीस नेला । एक दिन ऐसा घडला । पोथी नाहीं पढियेली ॥७॥प्रपंचाचे कष्ट होती । म्हणोनि निजूं पाहे ही मूर्ती । तों पंचकासह नाथ येती । उठविती बालका ॥८॥श्रीपरमहंस शीलनाथ । श्रीसद्गुरु सांईनाथ । धुंडिराज पळुसीं गजानन शेगांवांत । गोपाळदास नाशिकीं ॥९॥हें पंचायतन नाथांचें । परम होतें जिव्हाळ्याचें । चाले सूत्र एकमेकांचें । अंतः शक्तीनें ॥११०॥नाथें पाठवितां प्रिय शिष्यास । हें पंचक ओळख देती त्यास । करिती नाथप्रभूच्या लीलेस । त्या सन्मुख ॥११॥ऐशा पंचकासह नाथ । म्हणती वासुदेवा ऊठ बा ऊठ । ज्ञानेश्वरीचा वाची पाठ । आम्ही श्रोते बैसलों ॥१२॥आतां किती काल आम्ही बैसावें । तूं स्वस्थ निद्रेस वरावें । नित्य नियम न मोडावें । कदा काळीं ॥१३॥वासुदेवे केला नमस्कार । वाचिली पोथी सत्वर । एकदां श्री पंढरपूर । दाखवीन म्हणे नाथ ॥१४॥दृष्टांतीं दाविलें पंढरपूर । प्रत्यक्ष न देखतां नगर । सर्व सांगे श्रीविठ्ठल मंदिर । कैसें असें ॥१५॥आली एकादशी जवळ । भक्त विनवी दाखवा विठ्ठल । तों एकादशीचे दिवशी दयाळ । दाखवूं म्हणे ॥१६॥आला तो पुण्य दिवस । होता मध्यान्हींचा प्रकाश । ठेवी कटेवरी करद्वयास । पहावा पांडुरंग ॥१७॥तों जैसा श्रीपंढरपुरीं । नांदे भक्तकैवारी । तैसीच मूर्ती साजिरी । भक्तगणां दिसली ॥१८॥श्रीमाधवनाथ वैश्वानर । सांगे हवन परमार्थपर । करी आपण संचार । विविध स्थलीं ॥१९॥हवन करी वासुदेव । तों एके दिनीं मंत्र चुकोनि जाय । ‘ स ’ सोडुनी श ’ ध्वनि होय । मुखांतुनी ॥१२०॥तों एकाएकीं “ थांब ” ऐसी । ध्वनी निघें पूर्वेसी । मनीं म्हणे हा भास मजसी । वाटतो गा ॥२१॥पुनरपि त्याच अक्षरानें । करी हवन संतोषपणें । तैसिच ध्वनि ऐकतां वासुदेवानें । पाहिला मंत्र ॥२२॥तों चूक दृष्टीस पडली । नाथ माउली मनीं चिंतली । पूर्ववत आहुती अर्पिली । अग्नि देवासी ।२३॥येतांच प्रभूची स्वारी । हस्त ठेवी पाठीवरी । म्हणे मंत्र चुकतास तरी । कठिण झालें असतें ॥२४॥श्रीनाथ केवळ त्रिकालज्ञानी । पाहे जनीं वनीं स्वप्नीं । ऐसे अनुभव निशिदिनीं । घेई भक्त वासुदेव ॥२५॥या नंदिग्रामीं श्रीनाथ । करिती अनेक हवनें नित्य । इक्षुदंडपलश बिल्वपत्र । इत्यादि साहित्य - मंत्रें ॥२६॥अपूर्व केल स्वाहाकार । परि नवग्रहांचें हवन थोर । कोटी आहुति घेई वैश्वानर । या ग्रामीं ॥२७॥अनेक स्वाहाकार करी देव । परि ते सर्व भक्तास्तव । ऐसा संकल्पूनी करी भाव । लोकोपकारार्थ ॥२९॥नंदिग्रामीं बाग महादेव । जो नितांत शांत स्वयमेव । आम्र कदंब वट वैभव । शोभवी त्या उपवना ॥१३०॥मध्ये विलसें श्रीशंकर । बांधिलें मंदिर मनोहर । तयाच्या घुमटीं चौफेर । बसविले तापसी ॥३१॥बघोनि मुनींचे पुतळे । कारागिरांचें कौशल्य कळे । चेतन देणें राहिलें । एकच तेथें ॥३२॥सुवर्णाचा दिसे कळस पताका त्यावरी हालवी चित्तास । भिंतीवरी चित्रांचा प्रकाश । पुराणकालींच्या ॥३३॥भोंवतीं शुष्क नदीचें वाळवंट । उपवनाला दगडी कोट । परि न रुचलें सरितेस द्वैत । म्हणोनि तट पाडीला तियेनें ॥३४॥ऐशा पवित्र आश्रमांत । नाथ करी यज्ञ श्रेष्ठ । केलें हवन कुंड उचित । यज्ञासी जें ॥३५॥हातीं घेवोनी मृत्तिका । नाथ स्वयें करी कुंड देखा । अज्ञातवासाच्या कौतुका । येथेंही करी ॥३६॥येसगांवीं योगेश्वर । भिंतीस गिलावा करी सुंदर । येथेंही करणी घेऊन करी । बाललीला ॥३७॥कुंडास केल्या मेखळा । नाभीहि रचिली विधीला । सूत्राचाहि फरक तयाला । ठेविला नाहीं ॥३८॥जैसें शास्त्रीं कुंडविधान । तैसें करी प्रभु आपण । येती विद्वान तैलंगण ब्राह्मण । म्हणती धन्य कारागीर ॥३९॥शास्त्र नियमानुसार । आजचि देखिले प्रकार । करिती सद्गुरुसी नमस्कार । साष्टांग भावें ॥१४०॥आघाडा दर्भ औदुंबर । पिंपळ तेवीं खदिर । शमी रुई वृक्षांच्या रुचिर । घेई समिधा नाथ देव ॥४१॥त्या सर्वांचें वीत प्रमाण । शुभ मुहूर्तीं आणवी तोडून । मुहूर्तेंच तांदूळ घृत तेल आणी । मुहूर्तराज श्रीनाथ ॥४२॥आणविली धेनु सवत्स । तिचें पूजन करी नाथ । मृगाजिनावर होई स्थिर । आसनबद्ध ॥४३॥सवें घेई प्रिय बालाना । तेंवि विश्वान ब्राह्मणां । या ऋत्विजांसह नारायणा । आहुती देई नारायण ॥४४॥पंच दश घटिका नित्य । राहे प्रभु आसनस्थ । इतर बालें असमर्थ । बसावया इतुका काल ॥४५॥नाथ प्रेमाचा सागर । देखोनि श्रांत प्रिय कुमर । म्हणे उठावें एक पळ भर । पुनरपि बैसावें ॥४६॥आपण राहे अचल । सोशी धूम्राचें लोळ । परि नियम न करी चंचल । धन्य नियम तयाचा ॥४७॥यापरी पांच दिन । करी स्वाहाकार दयाघन । वाढे उल्हास दैनंदिन । प्रभुरायाचा ॥४८॥आली पूर्णाहुतीची वेळ । तो प्रसंग बहु अमोल । नाथसुतांच्या चित्तीं अचल । राहिला प्रसंग हा ॥४९॥घेउनी घृत पांच शेर । एकटाच टाकी घृत धार । वाटे शिवजटेंतुनि गंगाधार । पडे अग्निकुंडांत ॥१५०॥नाथ भासला शिवरूप भास कशाचा प्रत्यक्ष स्वरूप । अग्निकुंडींही देव दैदिप्त । पाहिला कित्येकीं ॥५१॥करोनी अंजुली बालमूर्ती । अग्निकुंडामाजी दिसती । अंजुलींत सोडी घृत धार ती । जाहला तदाकार ॥५२॥नगरावासी जन बहु आले । कित्येकीं नारिकेल समर्पिले । तीन प्रहर झाले । परि नाथ उभे तैसेच ॥५३॥मग वासुदेवे पायावरी । मस्तक ठेवितां येई देहावरी । म्हणे कोठें बालमूर्तीची स्वारी । अंतर्धान पावली ॥५४॥वासुदेव म्हणे ती मूर्ती मूर्तीत । समरस पावली नाथ । मग पोट धरोनी हांसत । अर्थ कळे एकासीच ॥५५॥त्यानंतर अवभृतस्नान । करी हे योगिभिर्ध्यान । करोनि मंडप उंच चौकोन । ठेविल्या फळ्या त्यावरी ॥५६॥तेथें ठेविला चौरंग । वरी बसे नाथ जो दावी चौरंग । लंगोट कांसे कसिला मग । लावी तेथ समाधीं ॥५७॥शत घागरीहुनी अधिक । आणिती उष्ण जल भक्त । टाकिती हर्षुनी अनेक । परि नाथ शून्य ॥५८॥मंडपाखालीं भक्त मेळा । स्नानास्तव सरसावला । रोगी निरोगीचा जमला । एकच मेळा ॥५९॥या तीर्थराजाचें स्नान । जयानें केले भावपूर्ण । तो जाहला दुःखमुक्त, निधान । लाभलें तया ॥१६०॥जेंवि प्रसाद घ्यावयातें । बालें सरसावती नेटे । तेंवि झालें आज तेथें । स्नानास्तव ॥६१॥वृद्ध तरुणही झाले बाल । म्हणती कैं स्नान लाभ होईल । यथाशक्ति करिती बळ । पुढे सरसावया ॥६२॥ऐशा पांच घटी पर्यंत । नाथ मस्तकीं वाहे धार संतत । परि चलन वलनही किंचित । केलें नाहीं ॥६३॥मग पाण्याची धार संपली । नाथ मुखांतुनि गंगा वाहू लागली । एक घटिका अखंड राहिली । धन्य हें नवल ॥६४॥केलें ब्राह्मणसंतर्पणा । देई तांबूल दक्षिणा । देई नाथजी विद्वज्जना । जरतारी शाली ॥६५॥नाथें भरविला दरबार । बोलिला शिष्य संभार । वासुदेव जोडोनि कर । सन्मुख उभा असे ॥६६॥वासुदेवाचे निमित्तानें । ज्ञानामृत पाजिलें प्रभूनें । ती कथा प्रकाशिजे किरणे । तेवीसाव्या ॥६७॥जया लाभला ऐसा देव । तयाचें जीवित पुण्यमय । घेईल मुक्तीचा डोह । म्हणे नाथसुत ॥१६८॥इति श्री माधवनाथ दीपप्रकाशे नाथसुत विरचिते वासुदेवशिष्यपावनं नाम द्वाविंशतितमः किरणः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP